भाग - 17
" त्रास तर होतोच आहे मला तिच्या अशा विचित्र वागण्याचा.. मि ठरवल आहे तिला सत्य विचारायचं.. " विशाल बोलतो..
" सत्य आणि ती सांगणार तुला...? असं खरचं तुला वाटतं का..? " आई त्याला विचारते..
" हो.. सांगावं तर लागणार तिला.. आणि मि वदवून घेईन.. " विशाल जणू हट्टालाच पेटलेला असतो.
"मि उद्याच तिला तिच्या मनात काय आहे आणि माझ्या मनात काय आहे, हे सांगूनच राहणार.." विशाल बोलतो..
" म्हणजे नक्की काय करणार आहेस तु...? " आईला जरा भिती वाटते, एकतर सीमा नावाचा प्रॉब्लेम सुरु आहे आणखी त्यात शालिनी नावाची भर नको..
" तु ऐक माझं.. तु शांत हो.. ही ती वेळ नाही.. वेळ आली की नक्की बोल तु... " आई त्याला समजावते.
पण विशाल काहीच ऐकायच्या मनस्थितीत नसतो, कारण तो नव्याने कुणाच्या तरी प्रेमात पडलेला आहे..
सकाळ होते, " बरं बरं.. सगळी व्यवस्था नीट झाली आहे ना..? एकही मला खराब किंवा तुटक फुटकं नको.. " विशाल फोनवर कुणाशी तरी बोलतं होता..
आईचं लक्ष बरोबर विशाल वर असत..
आणि तो डायनिंग टेबलवर येऊन बसतो, विशाल खुप खुश दिसत होता..
आणि तो डायनिंग टेबलवर येऊन बसतो, विशाल खुप खुश दिसत होता..
पण त्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय हे आईला कळत नव्हतं..
ह्याबद्दल विशाल ला विचारणं गरजेचं होतं..
" काय रे कोणाचा फोन होता...? आणि कसली तयारी बद्दल बोलतं होतास..? " आई त्याला नॉर्मली विचारते..
" सांगेन तुला... आता मला खुप भूक लागली आहे. तु पटापट नाश्ता दे, ऑफिस ला जायचं आहे.. आज अनेक मिटिंग आहेत.. " विशाल भराभर नाश्ता करत बोलतो..
आई त्याच्या कडे पाहतंच राहते, तिच्या मनात सौंशय येतो. कदाचित शालिनी बद्दल तर नाही ना...?
" अपॉइंटमेंट बद्दल विचारते, कदाचित खरं काही तरी कळेल.. " आई स्वतःशीच बोलते..
" बरं ते आज डॉक्टरांन कडे जायचं आहे ना..? अपॉइंटमेंट आहे ना आजची...? " आई त्याला विचारते..
" अगं आई विसरलीस की काय... उद्याची आहे आजची नाही.. " तो इतकंच आईला उत्तर देतो आणि बॅग घेऊन ऑफिस ला निघतो...
" मला तर बाई भीतीच वाटायला लागली आहे.. शालिनीमुळे तो पुन्हा एकदा त्रासातून नको जायला.. जसं सीमामुळे होता तसा... " आई स्वतःशीच बोलते..
विशाल ऑफिस ला पोहचतो, आणि तडक कॅबिनमध्ये जातो.. त्याच्या मागोमाग मोहन सुद्धा आत जातो..
" मोहन आजच्या सगळ्या मिटिंग्स कॅन्सल करा.. " विशाल बोलतो..
विशाल चं हे बोलणं ऐकुन मोहनला धक्काचं बसतो, कारण आज कंपनीच्या सी इ ओ सोबत त्याची महत्वाची मिटिंग असते..
" सर अहो कसं शक्य आहे... आपली आज कंपनीच्या सी इ ओ सोबत मिटिंग आहे आणि ती रद्द नाही करू शकत.. " मोहन त्याला समजावून सांगतो..
" उद्यावर ढकला, बस... " आणि विशाल लॅपटॉप खोलतो..
मोहन तिथेच उभा असतो, " काय झालं आता त्या सी इ ओ सोबत मि बोलु का...? म्हणजे तुमच्याने नाही जमत असेल तर..? " विशाल बोलतो. त्याचं सतत लक्ष बाहेर शालिनी वर असत..
" बरं पण त्यांना कारण काय सांगु...? ते जरा सांगितलात तर बरं होईल.. " मोहन बोलतो..
" गेले किती वर्ष तुम्ही ह्या कंपनीत माझ्या सोबत काम करत आहात...? " विशाल भडकूनच विचारतो..
" दहा सर... पण सर...? " मोहन बोलतो..
" पण बिन असं काही मला ऐकायचं नाही तुम्ही बोला की मि बोलु..? " विशाल कठोर आवाजात विचारतो..
तेवढ्यात शालिनी कॅबिनचा दरवाजा नॉक करते, " आत येऊ का..? "
" प्लीज ये... " शालिनी आज जाते.. मोहनचा चेहरा पाहुन तिला एकंदरीत काय झालं असेल हे कळत..
" मि नांतर येऊ का...? " शालिनी विचारते..
" नाही नको थांब.. आणि मोहन जे कामं दिल आहे त्याचं अपडेट द्या मला. " आणि मोहन केबिनच्या बाहेर जातो..
क्रमश...