सारं काही तिच्यासाठी भाग -16

प्रेम
भाग -16

" नाही अजिबात नाही.. मि घरीच आहे.. पण तुम्ही तिथे..? " शालिनी बोलते..

" ते माझ्या आईला डॉक्टरांची अपॉइंटमेंट हवी होती, त्यासाठी तिथे गेलो होतो.. " विशाल बोलतो..

" नशीब माझं.. " शालिनी तोंडल्या तोंडात पुटपुटते..

" काय म्हणालीस का...? " विशाल

बराच वेळा नंतर विशाल घरी पोहचतो..
त्याला शालिनीच बोलणं पचत नव्हतं, पण विश्वास ठेवून चालायचं म्हणुन त्याने विषय तिथेच सोडून दिला..

हळू हळू शालिनी बद्दल त्याला काळजी वाटू लागली होती..

खरं की खोटं पाहण्यासाठी त्याच्या मनात तिच्या घरी जाणं येतं..
" जाऊ की नको..? तिची तब्येत ही ठीक नाही जाऊन पहायला हवं... " तो गाडी काढतो आणि तडक तिच्या पत्त्यावर पोहचतो..

घराला बाहेरून टाळा पाहिल्यावर त्याच्या मनात अनेक सौंशयाची पालं चूक चूक ते..

तो आजू बाजूला पाहतो, पण कोणीच दिसत नसतं..

तो घड्याळात पाहतो, घड्याळात सहा वाजलेले असतात..
" आता ह्या वेळेला ही गेली कुठे..? कदाचित माझा सौंशय खरा तर नसेल ना..? " तो फोन काढतो आणि सरळ तिला फोन करतो..

शालिनी कॉल घेते, " हॅल्लो... " विशाल बोलतो आणि तेवढ्यात बाजूचे शेजारच्या काकू बोलतात..

" शालिनी देसाई घरात नाही आहे,, तुम्ही काही निरोप असेल तर सांगा. आम्ही तुमचा निरोप पोहचवू त्यांना.."शेजारच्या काकू बोलतात..

" ओके ओके... ठीक आहे.. " विशाल बोलतो..

विशाल आणि शेजारच्या काकूचं संभाषण शालिनी ऐकते..

" अगं तु आहेस कुठे..? मि तुझ्या घरा जवळ उभा आहे.. तु कुठे बाहेर गेली आहेस का...? " विशाल विचारतो..

" हा म्हणजे ते, माझे काका... त्यांची तब्येत अचानक बिघडली म्हणुन त्यांना घेऊन मि डॉक्टरांच्या क्लिनिक मध्ये आली आहे.. " शालिनी त्याला कारण देते..

" ओके.. मग तुला वेळ लागणार आहे का..? मला क्लिनिक चं नाव सांग मि येतो हवं तर तिथे... "विशाल विचारतो..

" नाही नको.. म्हणजे तुम्हाला कशाला त्रास ना.. मि उद्या ऑफिसमध्ये भेटते ना... ओके... बाय मि ठेवते.. " शालिनी कारण सांगुण फोन कट करते..

" हॅल्लो.... हॅल्लो... " विशाल समोरून. " कट केला.. "विशाल स्वतःशीच बोलतो.

" ह्यांनी मला पाहिलं म्हणुन कदाचित ते घरी आले असणार.. नशीब बाजूच्या काकू बोलल्या आणि ते मला ऐकू आलं.. नाही तर मला पाहिलं आणि मि तिच होती हे खरं वाटलं असत.. " शालिनी विशाल शी खोटं बोलतं होती आणि ते विशाल ला कळत होतं..

पण कधीतरी खरं काय आणि खोटं काय हे शालिनी ला विचारणं महत्वाचं होतं..

विशाल शालिनी मध्ये गुंतत चालला होता, तिच्या अशा वागण्याचा त्रास विशाल ला होतं होता..

तो हताश होऊन घरी येतो, सोफ्यावर बसुन एकटक विचारात असतो.

आई त्याच्या पुढ्यात पाण्याचा ग्लास ठेवते, तो पाणी पितो. त्याची शांतता त्याच्या आईला कळत असते..

" भेटली का रे अपॉइंटमेंट..? " आई विचारते..

" हो भेटली... अपॉइंटमेंट ही भेटली आणि शालिनी पण भेटली.. " विशाल बोलतो..

" शालिनी...? म्हणजे...? " आई विचारते..

" नाही काही नाही... उद्या सकाळची आहे.. " विशाल बोलतो..

आईला त्याचं बोलणं विचित्र वाटतं, शालिनीच काय हे आईला जाणून घ्यायचं होतं..

आई त्याच्या बाजूला बसते, त्याच्या खांद्यावर मायेने हात ठेवते.

" तु प्रेमात तर नाही ना तिच्या..? " आई काळजीने विचारते..

सीमा च्या प्रसंगातून कसाबसा विशाल निघालेला असतो, आणि आता नविन काही नको.. अशा ने विशाल डिप्रेस मध्ये जाईल ह्याची काळजी त्याच्या आईला असते...

आज काल विशाल चं ड्रिंक करायचं प्रमाण वाढलेल असत.

विशाल आईच्या मांडीवर डोकं ठेवतो, " मि तिच्या प्रेमात पडलोय.. मला सारखी तिची काळजी असते.. पण आजकाल तिचं वागणं अतिशय विचित्र होतं चाललंय.. " आणि त्याच्या डोळ्यांतून पाणी येतं..

" विचित्र म्हणजे..? " आई विचारते..

" ती आजकाल खोटं वागते बोलते... सतत काही तरी लपवते.. " विशाल बोलतो.

" मग तु तिच्या घरी का नाही जातं..? कदाचित तुला उत्तर भेटेल.. " आई त्याला सुचवते..

पण तो तिच्या घरीच जाऊन आलेला असतो, "गेलेलो.. घराला कुलूप होतं.. कोणीचं नव्हतं.." विशाल बोलतो..

तो उठतो बाल्कनीत जाऊन उभा राहतो, स्वतःशीच हसतो..
" आज तिला मि हॉस्पिटल ला पाहिलं, पण तिला विचारलं तर तिने मि नव्हती दुसरं कोणी असेल हे उत्तर दिलं.. " विशाल बोलतो.

" अरे मग खरचं कोणी दुसरं असेल, तु जास्त विचार नको करुस. त्रास होईल तुला... " आई बोलते...

क्रमश...🎭 Series Post

View all