भाग -15.
काही वेळाने शालिनी विशाल च्या कॅबिनमध्ये येते, " आत येऊ का..? " शालिनी कॅबिनचा दरवाजा नॉक करते.
" हो प्लीज ये ना.. " विशाल तिला आत बोलावतो..
तिचं सतत लक्ष घड्याळाकडे असत..
" काय झालं...? काही प्रॉब्लेम आहे का..? " शालिनी ला कसं बोलु हे सुचत नव्हतं.
" ते मला ना.. जरा लवकर जायचं होतं.. म्हणजे मि ऑफिस वर्क पुर्ण केलंय... काही बाकी नाही आहे... त्यामुळे मि लवकर जाऊ शकते का..? " शालिनी विशाल ला विचारते..
" अगं हो हो... मि तुला कामाचं काही विचारलं का...? नाही ना... बरं तुला बरं वाटतंय ना...? मि ड्राइव्हर ला सांगुण तुला घरा पर्यँत सोडु का..? " विशाल तिला विचारतो..
ती अस्वस्थ होते, " नाही नको मि जाईन... " शालिनी बोलते.
" बरं ठीक आहे.. उद्या तुला जमलं तर ये.. " विशाल बोलतो.
शालिनी घरी जायला निघते..
तेवढ्यात विशाल चा फोन वाजतो," आई चा कॉल...? " विशाल कॉल घेतो..
" अरे राजा तुला वेळ असेल तर माझ्यासाठी अपॉइंटमेंट घेशील का डॉक्टरांची..? " विशाल ची आई समोरून विचारते.
"हो मि स्वतः जाऊन घेईन.." विशाल फोन वर बोलतो..
आणि तो फोन ठेवतो..
त्याच्या आईची हाडांच्या डॉक्टर कडे ट्रीटमेंट चालु असते.. आणि सर्व खर्च विशाल करत असतो. वयोमाना नुसार त्यांची महिन्यातुन एकदा डॉक्टरांन कडे फेरी असते..
त्याच्या आईची हाडांच्या डॉक्टर कडे ट्रीटमेंट चालु असते.. आणि सर्व खर्च विशाल करत असतो. वयोमाना नुसार त्यांची महिन्यातुन एकदा डॉक्टरांन कडे फेरी असते..
विशाल ऑफिस मधुन जरा लवकरच निघतो.. आणि थेट सिटी हॉस्पिटल जवळ येतो, गाडी पार्किंग लॉट मध्ये उभी करतो..
तेवढ्यात त्याच्या बाजुने शालिनी जाते.. तोह वळणार इतक्यात त्याचा फोन वाजतो...
फोन वर त्याची आई असते आणि तिचा कॉल घेणं तेही इतकं महत्वाचं असत..
" आई तु थांब मि तुला काही वेळाने कॉल करतो.. " असं बोलुन विशाल कॉल कट करतो..
तो इथे तिथे आजू बाजूला पाहतो.. तो हॉस्पिटलच्या आत रिसेपशन काउंटर ला जातो.. शालिनी देसाई च्या नावाने चौकशी करतो पण, त्याला हवं तसं उत्तर भेटत नाही..
" नाही ती शालिनी नसणार... पण डोळ्यांवर अविश्वास कसा दाखवु... " तो स्वतःशीच पुटपुटतो..
पुन्हा तो काउंटर ला जातो, पुन्हा त्याला तेच उत्तर भेटत.. शालिनी देसाई नावाचं कोणी ही पेशंट नाही..
तो हॉस्पिटल च्या बाहेर येतो," एक काम करतो... शालिनीला कॉल करतो आणि विचारतो...!"
"नाही पण ती का खोटं बोलेल..? आणि तसं ही तिला आज बरं वाटतं नव्हतं... मग त्यासाठी तर ती आली नसणार ना..?" त्याच्या मनाचा गोंधळ उडतो..
तो शांत होतो, गाडी जवळ येतो. गाडीत बसतो आणि शालिनीला न राहून कॉल लावतो..
शालिनी त्याचा कॉल घेते, " हा सर.. " शालिनी समोरून विचारते...
आधी तो काही क्षण शांत राहतो," सर अहो बोला की.. काय झालं..? " शालिनी पुन्हा समोरून त्याला विचारते..
" नाही ते... अअ.. तु आहेस कुठे..? " तो गोंधळतो तिला नक्की काय विचारू आणि कुठून सुरवात करू असा प्रश्न पडतो..
"अगं तु... मला वाटलं तु हॉस्पिटल वगरे आहेस की काय...? नाही तुला बरं नव्हतं ना.. त्यासाठी.." विशाल विचारतो..
शालिनी विशाल च हे बोलणं ऐकुन शांत बसते, " अगं बोल तु हॉस्पिटल ला गेलेलीस का...? " विशाल पुन्हा तिला विचारतो..
"नाही सर मि कुठे... मि तर घरात आहे.. म्हणजे कुठेच नाही गेली...तुम्हाला का असं वाटलं..?" शालिनी अडखळत बोलते..
" अगं खरं तर मि हॉस्पिटल ला गेलो होतो,,, तेव्हा मला एका मुलीला पाहुन असं वाटलं की तु आहेस की काय..तु नव्हतीस ना...? " विशाल विचारतो..
क्रमश...