सारं काही तिच्यासाठी भाग -14

प्रेम
भाग -14.

विशालची सीमामुळे चिडचिड होत होती..

" तु शांत हो.. असं चिडून काय होणार..? तिला कोर्टाचे रुल माहित नाही का..? " त्याची आई विचारते..

" नाही माहित काही, पण मि खुप वैतागलो आहे तिच्यापासुन.. " विशाल बोलतो..

" तु शांत हो.. आणि फ्रेश होऊन घे..कॉफ़ी करते बरं वाटेल तुला.. " आई कॉफ़ी करायला जाते..

विशाल फ्रेश होऊन बाहेर डायनिंग वर बसतो आई त्याच्या पुढ्यात कॉफी आणुन ठेवते.

" घे पी... बरं वाटेल तुला.. " आई बोलते.

विशाल कॉफ़ीचा कप बाजूला करतो," नको मला... "

" हे काय.... का नको..? " आई विचारते..

" नाही गं नाही नको मला... माझी ना आता चिडचिड होतेय.. " आईला विशाल फ्रस्टेट झाला आहे दिसत होतं, पण ह्या सगळ्या परिस्थितीला आई काहीच करू शकत नव्हती..

" मग काय करणार आहेस..? चिडचिड करून काही होणार नाही.. त्या पेक्षा विषय सोड आणि कॉफ़ी घे.. " विशाल कॉफ़ी घेतो...

" सगळ्याच गोष्टीवर ड्रिंक हा काही पर्याय नसतो.. " आई बोलते..

" वाह काय बरं वाटलं.. " विशाल कॉफ़ीचा घोट घेतो..

सकाळ होते विशाल ऑफिसला येतो, आणि कॅबिनमध्ये जातो.
त्या मागोमाग मोहन सुद्धा जातो, " मोहन अपडेट...? " विशाल बोलतो..

" हो सर... " आणि मोहन त्याला अपडेट देतो..

त्याचं लक्ष कॅबिनच्या बाहेर असलेल्या शालिनीच्या डेस्कवर जातं.. आणि तो घड्याळात पाहतो.. " हे काय.. शालिनी आज आली नाही.. तुला काही सांगितलं आहे का..? "
विशाल बोलतो.

" नाही सर.. मला काहीच काही बोलली नाही ती.. " मोहन बोलतो..

तो मोबाईल काढून तिला कॉल करतो, पण शालिनी तिथून कॉल कट करते..

" हे काय...? " विशाल बोलतो..

" काय झालं सर...? " मोहन विचारतो..

"तिने कॉल कट केला.. आज येणार नाही असं काही बोलली वगरे का ती..?" विशाल बोलतो.

"नाही सर मला तिने असं काही सांगितलं नाही..." मोहन बोलतो..

तेवढ्यात शालिनी येते, " ही बघा आली सर.. " मोहन बोलतो..

" एक काम करा तिला तुम्ही बाहेर जाल ना, तेव्हा आत पाठवून द्या... " आणि मोहन केबिनच्या बाहेर जातो..

आणि शालिनीला कॅबिनमध्ये पाठवतो..
" मि आत येऊ का सर...? " शालिनीचा आवाज विशालला नरम वाटतो..

" ओह्ह.. ये ना.. बस.. " विशाल तिला समोर बसायला सांगतो..

" आज उशीर झाला..? तुझी तब्येत तर ठीक आहे ना..? नाही तु आलीस पण उशिरा आणि आवाज ही नरम वाटतोय मला.. " विशाल अनेक प्रश्नांचा तिच्यावर वर्षाव करतो..

" हा म्हणजे थोडी तब्येत बिघडल्यासारखी वाटते आहे.. " शालिनी बोलते..

" अगं मग तु आलीस का..? नाही आराम करायचा ना..? मला किंवा मोहनला कॉल करून जरी सांगितलं असत तर बरं झालं असत.. " मोहन काळजीने बोलतो.

" नाही ते कामाचा चौथा दिवस आणि त्यात रजा घेणं बरोबर नाही दिसत.. म्हणुन मग आली.. " शालिनी बोलते..

" बरं तु एक काम कर, तु घरी जा आराम कर.. आणि उद्या ही तुला जमलं तर ठीक आहे नाही तर आराम कर.. " विशाल माणुसकीच्या नात्याने बोलतो.

" नाही नको मि थांबते,, जर नाही वाटलं बरं तर जाईन.. " शालिनी बोलते..

बराच वेळा नंतर शालिनी फाईल चाळत काम करत असते, पण काही केल्या तिचं मन लागत नसतं..

तेवढ्यात ऑफिस चा पियुन ज्युस चा ग्लास भरून तिच्या पुढ्यात डेस्कवर ठेवतो..

" हे काय.. हे मि नाही मागवलं..? " शालिनी त्याला बोलते..

तेवढ्यात तिच्या बाजूला असलेला ऑफिस फोन वाजतो, ती रिसिवर उचलून कानाला लावते..

" हा ज्युस मि तुझ्यासाठी मागवलाय... पियुन घे बरं वाटेल.. " विशाल बोलतो..

ती ज्युस घेते आणि हळू हळू पिते.. समोरून कॅबिनच्या काचेमधून विशाल पाहत असतो..

क्रमश...






🎭 Series Post

View all