प्रेम कथा - साहिल - रुपाली ( दिवाळी ची भेट )

Love, And Gifts

साहिल आणि रुपाली कष्टकरी कुटुंब असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच  असते,  दिवाळी च्या  दिवशी त्या दोघांनाही एकमेकांना काहीतरी छानशी वस्तू भेट द्यायची मनातून खूप इच्छा असतें . साहिल ऑफिस ला गेलेला आहे तर रुपाली घरी आहे. तिने तिच्या घरखर्चातून काही तुटपुंजी बचत केलेली आहे. आता ती पैशांचा डबा उघडून पाहते आणि तिच्या लक्षात येते, की त्यात अवघे 200 च रुपये आहेत.

आता रुपाली त्या रकमेकडे पाहून खूप विचार करते, की तिच्या लाडक्या नवऱ्याला एवढ्याशा छोट्या रकमेतून काय भेटवस्तू आणू ? विचार करून तिला खूप वाईट वाटते.  साहिल आणि रुपाली कडे  संपत्ती जास्त नसली तरी त्यांना एकमेकांबद्दल खूप आदर, अभिमान होता. रुपाली खूप वेळ विचार करत राहिली आणि नंतर तिला सुचले कि साहिल कडे घड्याळ नाही आहे, आपण त्याला घड्याळ च भेट म्हणून घ्यावी..

 क्षणभर रुपाली ने विचार केला आणि तिच्या डोळ्यातून एक दोन अश्रूही गळाले. आणि ती मनाशीच म्हणाली 200 रुपयात काही फार सुंदर घड्याळ येणार नाही, पण त्यातून दुकानात जाऊन बघु, . घाईतच रुपाली घरातून निघाली आणि दुकानात पोचली. ती घाईने आत शिरली आणि तिथल्या बाईंना तिने अधीरतेने विचारले, 200रुपये पर्यंत एखाद चांगलं घड्याळ आहे का, त्यावर दुकानातल्या ताई हॊ म्हणायला, रुपाली मनोमन खूप खूश  झाली.

आता तिला नवर्‍यासाठी  छान घड्याळ घेता येणार होते. आणि  दुकानात तिला एक छान सोनेरी पट्टा असलेले घड्याळ दिसल.  सोनेरी पट्टा पाहिल्यावर रुपाली ला अत्यानंद झाला आणि ती मनात म्हणाली,

“ माझ्या साहिल साठी हीच उत्कृष्ट भेट राहील”.

मग तिने 200 रुपये देऊन ते घड्याळ विकत घेतले . आता अत्यंत आनंदी मनाने पर्समध्ये घड्याळ घेऊन ती बागडत घरी पोचली. संध्याकाळचे 8  वाजले. तिने दोघांचे जेवण तयार ठेवले होते. तिच्या मनात धाकधूक होती की  हे घड्याळ साहिल ला आवडेल कि नाही,  तिने ते घड्याळ हातात घेतले आणि दाराजवळ बसून साहिल ची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात साहिल आला.

आणि त्याने ऑफिस ची बॅग, रुपाली च्या हातात देतच तिला विचारलं आज अशी दारात का उभी होतीस माझी वाट बघत, त्यावर रुपाली हसली, आणि तेवढ्यात साहिल ने त्याच्या शर्ट च्या  खिशात हात घालून हळूच एक वस्तू बाहेर काढली. ती कागदात गुंडाळलेली होती. त्याने ती टेबलावर ठेवली. आणि तॊ म्हणाला, रुपाली हे बघ मी  तुझ्यासाठी काय आणले ते. तिने अधीरतेने ती वस्तू उचलून त्यावरील कागद काढला. आत पाहताक्षणी ती एकदम आनंदाने ओरडली पण दुसऱ्याच क्षणी रडू लागली. साहिल ने तिला बरेच दिवस पैसे साठवून सुंदर असे कानातले झूमके आणले होते . खूप दिवसांपासून रुपाली च्या मनात तशे झूमके घ्यायचे होते. पण पैशाअभावी जमत नव्हते, तिने प्रेमभराने ती भेटवस्तू छातीशी घट्ट धरली.

मग रुपाली ने त्याच्यासाठी आणलेल सोनेरी पट्टा असलेल घड्याळ त्याला दाखवल.. ती म्हणाली, “बघ किती छान आहे.. आता तू तुझ्या घड्याळ्याला  छानपैकी हातावर बांध बघू. आता तू दिवसातून शंभर वेळा सुद्धा वेळ बघू शकशील !  साहिल ला ही रुपाली ने आणलेले घड्याळ खूप आवडते.

स्वतःपेक्षाही आपल्या जोडीदारावर अधिक प्रेम करणारे दाम्पत्य असे हे साहिल आणि रुपाली.... प्रत्यक्ष वस्तूपेक्षाही देणारी व्यक्ती ही अधिक मौल्यवान आहे..

नमस्कार... सौ.. सोनल गुरुनाथ शिंदे.. ( देवरुख - रत्नागिरी )