हरवलेलं प्रेम - ( भाग - 3 )

Saagar Sarita

सरिता ला भेटून  सागर घरी गेला.तेव्हा त्याचा मित्र राज त्याची बाहेर वाटच पाहत होता.

बोलत बोलत दोघेही आत गेले. राज सोफ्यावर बसतं म्हणाला. कुठे गेला होतास, मी विचारलं फोन वर तर काहीच बोलला नाहीस आलोच एवढं चं म्हणालास.

सागर क्षणभर शांत राहिला आणि म्हणाला,

सरिता ला भेटायला गेलो होतो.

राज हे ऐकून अचानक बोलला,

“काय ?? सरिता ला ??”

“हो !!”अरे पण कस काय ?? म्हणजे !! अरे !! तिला ?काय म्हणाली मग ती ?” राज प्रश्नावर प्रश्न विचारू लागला.

“अरे काही नाही सहजच भेटायला बोलवलं होत तिने .

सागर आणि राज दोघेही खूप वेळ बोलत बसले.

सागर ने राज ला आज घडलेलं सर्व सांगितलं.

“म्हणजे बाबांच्या मर्जीसाठी तिने त्या पारस बरोबर लग्न केलं तर...

“आणि उद्या तू भेटायला जाणार आहेस तिला??”

“हो ” सागर मध्येच बोलला..

“पण जाऊ का रे भेटायला मी ??” सागर राज ला म्हणाला.

 बघ सागर झालं गेलं यात तुझी काहीच चूक नव्हती ना तिची काहीं चूक होती. 

“पण मला काय बोलावं काहीच कळणार नाही रे तिच्या घरी गेल्यावर.!! “

“सगळं विसरून जा भेटायला. राज म्हणाला.

दुसरा दिवस उजाडला तसे सागर ला सरिता कडे जाण्याची ओढ लागली. खरतर पुन्हा भेटावं अस त्याला कधीच वाटलं नव्हतं. पण आता त्यालाही पारस ला सुद्धा भेटायचं होत.

सागर सरीता ने दिलेल्या पत्त्यावर थोड्याच वेळात पोहचला. दरवाजाची बेल वाजवुन थांबला. थोड्याच वेळात दरवाजा उघडला समोर सरीता होती.

“सागर !! आत ये ना... सरीता म्हणाली. 

घरात जाताच समोर सरीता आणि पारस चा फोटो भिंतीवर पाहून तो क्षणभर त्याला पाहत राहिला.

दोघेही थोडा वेळ बोलत बसले. आणि तेवढ्यात कोणीतरी सरीता ला हाक मारत होतं , तो पारस होता. सरीता आत गेली आणि त्याला बाहेर घेऊन आली. सागर आणि पारस समोरासमोर आले. समीरला काहीच बोलायचं कळेना.

सरीता पारस ला व्हीलचेअर वर घेऊन आली होती. 

हॅलो मी पारस !! ” व्हीलचेअर वर बसलेला पारस हात पुढे करत म्हणाला. सागर निशब्द झाला.

“खूप ऐकलंय बर तुझ्या बद्दल मी आमच्या मॅडम कडून !! “पारस हसत म्हणाला.

“तुम्ही दोघे बोलत बसा !! मी आलेच !!” सरीता एवढं बोलून आत निघून गेली.

थोड्या वेळात सरीता किचन मधुन बाहेर आली. सोबत आणलेली चहा देत ती बोलू लागते.

इकडं तिकडं च्या गप्पा होतात.

आणि मध्येच पारस बोलतो.

“सागर पण माझी एक कंप्लेंट आहे बर तुझ्याकडे !!”

“कोणती !! ” सागर पारस कडे पाहत बोलतो.

“ एखाद्या चित्रपटात नायक आणि नायिका भेटलेच, तरच प्रेम पूर्ण होत अस नायकाला वाटत राहतं...

“पण प्रेम केलं तर ते भेटायला हवंच ना?” सागर एकदम प्रश्न विचारतो.

“न भेटताही प्रेम करता येतं ना ??” पारस सागर ला बोलतो.

सागर क्षणभर गोंधळतो.

” सरीता तुझ्यावर आजही तितकंच प्रेम करते सागर !!पण ती माझ्यात अडकून पडली आहे !! मी म्हटलं तिला !! तू माझा विचार करू नकोस, पण ती ऐकत नाहीं.

“लग्नाआधी हे जग फिरायची इच्छा होती माझी!! आणि एका अपघाताने माझं सर्वस्व हिरावून घेतलं. !! खरतर जीव द्यावा असा मनात विचार होता. पण मी असा असूनही माझ्याशी लग्न करायला तयार असलेल्या सरीता ला पाहून पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळाली. !!” पारस सागर ला मनातलं बोलू लागला.

“तुला माहितेय सागर पहिल्यांदा पाहिलं ना मी तिला !! तर तिच्या प्रेमातच पडलो मी,  अजूनही क्षणाक्षणाला ते वाढतच आहे !! ” पारस सागर कडे एक स्मितहास्य करत म्हणाला.

दोघांत बोलणं चालू असतानाच सरीता बाहेर आली.

“चल आता सरीता मी निघतो. सागर म्हणाला.

पारस हे ऐकून एकदम म्हणाला . सागर जेवून जा ना.

“खरंच नको !! मी पुन्हा येईन जेवायला कधीतरी!! ” सागर सरीता कडे पाहून म्हणाला.

“मग तुला लंडन ला यावं लागेल बरं का !!” पारस थोडंसं हसत म्हणाला.

“लंडन ला ??” सागर म्हणाला.

त्यात मध्येच सरीता बोलू लागली.

“आम्ही उद्याच लंडन ला निघतोय !! चार वर्ष झाली तिकडेच होतो !! मागच्या महिन्यातच इकडे भारतात आलो होतो !! सगळ्यांशी भेट होईल या निमित्ताने !!

“उद्या किती वाजता निघत आहात ??” सागर म्हणाला.

“संध्याकाळी सात वाजता आहे फ्लाईट !!” सरीता शांत बोलत होती. तिच्या आवाजात एक दुःख जाणवत होत.

अच्छा, एवढं बोलून सागर निघाला.

सरीता त्याला सोडायला बाहेर पर्यंत आली. 

सागर दोन पावले पुढे गेला आणि मागे फिरून सरीता ला म्हणाला.

” जाण्याआधी पुन्हा एकदा भेटशील मला??”

सागर असे म्हणताच सरीता च्या डोळ्यात पाणी आले. तिला काय बोलावं कळलंच नाही.

मान होकारार्थी हलवत सरीता फक्त हो म्हणाली.

... पुढच्या भागात आपण बघणार आहोत, ह्या अव्यक्त नात्यात काय होत ते..

नमस्कार.. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all