हरवलेलं प्रेम ( भाग - 1 )

Saagar Sarita

आज सागर आणि सरिता ज्या कॉलेज ला होते, त्या कॉलेज मधल्या सर्व मुलांनी मिळून गेटटुगेदर ठेवलं होत, त्यामुळे सागर आणि सरिता तिथे भेटले होते. सागर आणि सरिता मनमोकळ बोलतच नव्हते.

त्यांनाही ते जाणवून आलं. नात्यावर कित्येक वर्षांची धूळ बसली होती. कदाचित त्याची जाणीव दोघांनाही झाली होती.

त्या छोट्याश्या प्रोग्राम मध्ये सगळे गुंग झाले होते. जुन्या मित्रांन मध्ये कित्येक आठवणी जाग्या करत होते. पण या जुन्या आठवणीत एक हळूवार प्रेमाची आठवणही आपली पान उलगडू पाहत होती.

सागर आणि सरिता आपल्यात हरवून गेली होती. मध्येच एखादा मित्र किंवा मैत्रिणी यायची आणि दोघांशी बोलत बसायचीं, पण दोघेही त्या क्षणातून बाहेर येत नव्हते. बोलायचं खूप होत पण दोघांनाही शब्द सापडत नव्हते, सरिता च्या डोळ्यात बोलता बोलता अचानक अश्रू आले तिने ते सागर च्या नकळत पुसले पटकन.

आयुष्यात फक्त सोबत असणं यालाच प्रेम म्हणतात ??” सरिता शांत  स्वरात म्हणाली.
“नाही !! पण न सांगता निघून जाणं याला तरी कुठ प्रेम म्हणायचं.

” सागर सरिता कडे नजर रोखत म्हणाला.

 बघता बघता पार्टी संपत आली होती. सगळ्यांनी खूप मजा केली. अखेर निघताना सगळे एकमेकांना पुन्हा भेटण्याचं  बोलू लागले.

 सागर आणि सरिता उभे होते.

तेवढ्यात सरिता चा फोन वाजतो. ती उचलते आणि बोलते .
हा आलेच, एवढं बोलून ती फोन कट करून कोणाला काहीही न बोलता निघून जाते.

सागर चे मित्र विचारतात काय बोललात रे दोघ ” सागर बोलतो विशेष अस काही नाही.”
तरीपण बोललीना ती !! भेटलात ना तुम्ही !! “

तीचं लग्न झालं  आहे आणि ती पूर्वीच्या सगळ्या आठवणींतून बाहेर पडली असावी असच वाटलं मला, सागर म्हणाला.

 मी जिच्यावर प्रेम करत होतो ती ही नाही रे !! तीच वागणं बोलणं सगळं सारखं होत !! पण ती माझं प्रेम नाही, तर कोणाचं दुसऱ्या चं प्रेम झाली आहे.

सर्व मित्र म्हणाले,  आपण कॉलेज नंतर आठ वर्षांनी भेटत आहोत !! तीच लग्न झालेलं असणार !! त्यात एवढं काय मनाला लावून घ्यायचं.

“आजही ती न सांगता निघून गेली !!आजही तिची ती सवय काही गेली नाही !! “ सागर म्हणाला.

सागर चा मित्रा राज सागर ला त्याच्या घरी सोडून गेला. सागर एकटाच कित्येक वेळ फ्लॅटमध्ये रात्रभर सरिता च्या आठवणीत जागत राहिला.

“आज आठ वर्षा नंतर भेटलो तेव्हा खरंतर एका क्षणाला आनंद वाटला होता. ती समोर आली तेव्हा एक क्षण मी हरवून गेलो तिच्यात, पण ते तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र, आणि डोळ्यात पाणी आलं . आयुष्यभर तिच्या आठवणीत एकटं राहायचं ठरवल होत. ती साथ द्यायला नक्की येईल कधीतरी, अस सागर स्वतः शीच विचार करत राहिला.

 आणि मध्येच मोबाइलची मेसेज टोन वाजते. एवढ्या रात्री कोणाचा मेसेज आला ते सागर पाहतो. तर तो सरिता चा चं असतो.

पुढच्या भागात आपण बघणार आहोत सागर आणि सरिता चं हे अधांतरी नातं  पुढे जातं कि नाहीं.

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी ).¡