सेव अवर सोल

आत्महत्या खरच उपाय आहे का?हा विचार करायला लावणारी कथाा

पेपरात होणाऱ्या आत्महत्येच्या घटना वाचल्या आणि आमच्या ऑफिस ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली..मग मी एवढेच म्हटले माणुस जाण्याआधी सेव अवर सोल म्हणतोच  ..फक्त तो ओळखता आले पाहीजे..त्यासाठी मी माझ्या गुरूंची आणि माझ्या मित्राची शेलची कथा सांगितली.


त्या रात्री अचानक रात्रीच्या एक वाजता फोन वाजला...शातंतेत माझ आवडते गाण ."अजीब दास्तान है ये,काही शुरु कहाँ खतम...ये मंजिलें है कोनसी" सुद्धा खुपच हॉरीबल वाटल होत ऐकायला...मग लक्षात आल की मी माझा मित्र शेलसाठी ही सींगटोन मोबाइलवर ठेवली आहे, मग मात्र टेशंन वाढल की शेलने एवढ्या रात्री का बर फोन करावा...मी लगेच फोन उचलाला.


शेलचा रडण्याचा आवाज येत होता...मी म्हटल "शेल यार क़ाय झाल रे, तु असा का रडतोय."


"भाई आपुन जा रहा है ,ये अपना लास्ट कॉल है तुझको"...शेलच अस रडवेल बोलण ऐकुन तर मी अजुनच टेशंनमध्ये आलो..शेल सेंटी झाला की असेच डायलॉग मारतो.

काय झाल रे .?.कुठे जातोस तु..आणि लास्ट कॉल वैगरे काय लफड आहे भावा.?."आधी हिंदी डायलॉग बंद कर..मला सांग काय मॅटर झाला रे...?"मी टेंशनमध्ये विचारलं.

"भाई माझी नोकरी गेली रे.!.त्याच नोकरीच्या जीवावर आणि पुढे प्रमोशनच्या आशेने मी गाडी आणि घराच लोन काढल होतं..आता मी कुठुन इ.मा.य. देवु रे.?"शेल रडवेला होत म्हणाला .

"बँक माझ्या घरावर जप्ती आणणार.. "
आई बाबा पण बेघर होणार ..मीच त्यांना चाळीच घर विकायला लावुन हा फॅल्ट घेतला होता .आता मी नाही बघु शकत त्यांना बेघर होताना, त्यांच्या घरावर जप्ती आणणताना..भाई आई बाबांची काळजी घे .मी जातो..!"शेल अगदी निर्वाणीच  बोलत होता.


हे ऐकुन मला काय कराव हे सुचतच नव्हत ,पण मला एवढच माहीत होतं कि आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरती सोपा उपाय नाहीच.मला शेलचा एस .ओ.एस. कळला होता आणि प्रत्येक क्षण त्या दिवशी मोलाचा होता.मग मला माझ्या गुरूंची आठवण आली.मला माहीत होतं की तेच शेलला वाचवु शकतात.

मी शेलला बोललो "मी तुला नाही आडवणार ,पण मला तुला एकदा भेटायचे आहे ..शेवटच ..!मग तु बिनधास्त जा. मीही येतो तुझ्याबरोबर ."मी अगदी आर्जव करत फोनवर शेलला विनंती केली.

मला माहीत होतं जर मी शेलला आता जरी काही समजावलं तरी तो ऐकणार नव्हताच...

मी बाईकने दहा मिनिटताच त्याच्या घरी पोहचलो आणि त्याला समजावले ," तु आताच्या आता माझ्या गुरूंकडे चल ते तुला नक्की काही उपाय देतील."

शेलनेही ते मान्य केल आणि आम्ही समुद्र किनाऱ्यावरती गेलो.शेल तर बुचकळ्यात पडला होता आणि आता तोच मला वरती पाठवेल अश्या खुन्नसने मला बघत बसला.

मग मी त्याच्याकडे बघत शांतपणे म्हटलं ."तुला काय वाटल मी कोणत्या बाबाकडे घेउन जाइन आणि ते काय भस्म काढुन तुझ्यावर पैशाचा पाउस पाडणार होते ?"

"माझा गुरू म्हणजेच हा अंथाग सागर आहे..तो तुम्हाला संकट असो किंवा सुख असो, तुम्हाला  तो शांतच रहायला शिकवतो."

"तु कधी निराश असला ना तर समुद्रच्या लाटकडे बघत जा ,त्या लाटा तुला खळखळ करत आंनद नि जीवनाचे महत्व सांगताील."

"त्यांचही आयुष्य काही क्षणांच असत, पण त्या किती आनंदात आवाज करत किनाऱ्यावर येतात आणि तुझं आयुष्य तर नक्कीच त्यांच्यापेक्षा मोठ आहे शेल..!"

"कधी विचार केला आहे ,तुला कित्येक सुंदर क्षण दिले आहेत देवाने..त्याच्या वापर तु फक्त उद्याची चिंता करण्यात घालवतो आहे..अरे !शांतपणे विचार कर ...लोक तुझी गाडी गेली,नोकरी गेली म्हणुन काही दिवस हसतील ,पण नंतर काय होणार..?

"मात्र तु कायमचा जगातुन  गेल्यावरती काय होइल ह्याचा विचार कर जर तु स्वत:ला काही करून घेतलस तर तुझे आई बाबा काय करतील रे..? त्यांना कोण दुसरा मुलगा ऑप्शन म्हणुन ठेवणार आहेस?"

"त्यांनी किती कष्टाने वाढवल आहे तुला..तुझ कलेवर पाहुन त्यांना जीवंतपणी नरकयातना देणार आहेस का?
आणि तु गेल्यावर बँक काय घरावर जप्ती नाही आणणार का.? मग त्यांनी कुठे जायच ? का तुझ्यासारखच त्यांनाही हाच मार्ग वापरायचा का?"

"ह्या समुद्रकडे पाहा , तो कधीही  कोणताच कचरा कधीच आत ठेवत नाही.. तो लगेच सगळ काही किन्याऱ्यावर फेकुन देतो, तसेच आपण चिंताच्या चितेसाठी आपली लाकड नाही जमा करायची मनातल्या मनात..!ताण विसरयचा ..ह्याचीच तुला आता गरज आहे..  "

शेल समुद्राकडे पाहत सार काही ऐकत होता.मग मी त्याला शांत होताना पाहुन अजुन समजावत राहीलो.

"आता अजिबात पॅनिक नको होवुस आणि अरे हा जॉब गेला तर दुसरा मिळेलच ..
राहता राहीला ईमाय ..तो काय लगेच नाही थकत .गाडी विकुन टाक ना .. !मग गाडीचे लोन संपेलच आणि तुझी काहीतरी सेविंग असेलच.तु हे मोठ घर भाड्याने देउन ईमाय भर आणि कुठेतरी छोट घर भाड्याने घे.."

हे सगळ ऐकुन शेल अजुनच शांत झालाआणि तो काही क्षण त्याने घेतलेल्या चुकीच्या निर्णयाबद्दल विचार करत  राहीला.
शेल आणि मी काही वेळ त्या लाटांमघ्ये पाय ठेवुन शांत व निशब्द उभे  होतो.सागराच्या स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावर जगण्याचा उत्साह परत आला.

"मला तर समुद्र आणि त्याच्या लाटा स्टेकाम आणि स्टे पॉसिटीव्ह हेच शिकवतात . त्यादिवशी त्यांनी शेललाही हेच शिकवले होते."

जीवन कुठे सहज आहे पण म्हणुन सहज संपवणे हे उत्तर नाहीच..

असे हल्ली  कुणी मित्र फारसे प्रत्यक्षात नसतात  पण जर तुम्ही गुगल केले तर अश्या ऑर्गनाइजेशन किंवा NGO आहेत .
जे अश्या लेकांना किंवा डिप्रेशनमध्से असणाऱ्या लोकांना मदत करू शकतात असे विचार आल्यावर मदत करू शकतात.प्रत्येक जीव आत्महत्या करण्यापुर्वी तशी लक्षण दाखवतो ..फक्त तो SOS ओळखायला हवा अस मला वाटत.