ऋतुराज वसंत

ऋतुराज वसंत
*ऋतुराज वसंत*

लागता चाहुल चैत्राची
बहरतो ऋतुराज वसंत,
रखरखणा-या उन्हात तो
तना मनास करतो शांत.

नव चैतन्याने गोड खुलून
डोलतो चोहिकडे निसर्ग,
मनमोहक अशा देखाव्याने
जणू भासू लागतो स्वर्ग.

लाल हिरव्या रंगात सृष्टी
फुलते कोवळ्या पर्णांनी,
वृक्ष वेली दिसून प्रफुल्लीत
मोहरते नाजुकशा फळांनी.

सांज सकाळी पाखरे गाती
होऊन स्वछंदी बागडती,
किलबिल त्यांची ती आपल्या
सुरांची तार हळूच छेडती.

चटके देणा-या उन्हाळ्यात
निसर्ग फुललेला देतो गारवा,
तृप्त होऊनी हरएक सजीव
निसर्गात या घेतो विसावा.

गणला जातो वसंत ऋतू
सर्व ऋतूंचा हाच राजा,
दिपते नयन या सौंदर्यांने
पाहण्या एक वेगळीच मजा..
---------------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all