ऋतुराज
पृथ्वीला लागले डोहाळे
गायला लागल्या कोकिळा
पुसू लागल्या बाई कितवा महिना
शरमून सांगितले आजच लागला
श्रावण महिना
नववधू पृथ्वीला हिरवा शालू नेसवा
काय हा सुगंध तिला ओली माती भरवा
रंगीबेरंगी फुलांनी सजवा
मोराला सांगा तिला नाचुन दाखवा
अचानक पृथ्वी लोळू लागली
वाऱ्याला त्याची चाहूल लागली
वीज आनंदाने कडाडली
सगळीकडे आनंदी आनंद झाला
या पृथ्वीला पुत्ररत्न झाला
लोक ऋतुराज म्हणती त्याला !
© शीतल महामुनी माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा