रुसलेल्या साड्या

An imaginary conversation between Me and my sarees. They were forced to remain in the cupboard during the lockdown period . Hence the were angry upon me . I am trying to convince them with this beautiful comic poem .

कोरोनामुळे  डाऊन लागला आणि सगळ्यांना घरी राहावं लागलं. त्याच दरम्यान माझ्या साड्या माझ्यावर रुसाल्या, का ? 

 

 माझ्या साड्या माझ्यावर रुसल्या

कपाटात बसवल म्हणून त्या चिडल्या!

कित्येक दिवसात कुठे नाही न्हेल,

नटून-थटून त्यांना नाही मिरवल!


पैठणी म्हणाली,"गेले कुठे सगळे सण?
घडीत राहून राहून आले माझ्या अंगावर वण!"

गोर्जेट -शिफॉन तर हिरमुसल्या...
"म्हणे पार्टी ,किटी सगळंच बंद?
तेजल,बदलले का ग तुझे आता छंद?"

काठा पदराच्या आल्या घोळका करून,
लाल, हिरवी, केशरी आणि मारून,
"कधी आहे हळदीकुंकू, मुंज, बारस?"
आता न्हेत नाहीस तू आम्हाला कुठे फारस!!"

अगं अगं ऐका, नका अश्या रुसू,
कोपऱ्यात जाऊन तुम्ही नका बसू!
घरात राहूनच आपण द्यायचा आहे लढा,
तरच टळेल, ही कोरोना ची पीडा!

तुम्हा सगळ्यांनचे कौतुक केलं जातं जिथे,
चला, आज मी तुम्हाला घेऊन  जाते तिथे!
फेसबुक वॉट्स ऍप वर खेळूया खेळ,
अनेक चॅलेंजेस्, आहेत त्यात जाईल छान वेळ!

साडी चॅलेंज, नथीचा नखरा, बांगड्या बुगड्या ,
शृंगार करून, साड्या नेसून नटल्या साऱ्या सख्या!
घरात राहून बायकांनी खेळले ऑनलाईन खेळ,
डी.पी. स्टेटस् ठेवण्यात,बघण्यात छान जाई वेळ!

रुसलेल्या साड्या, आता मात्र खुश झाल्या,
ऑनलाईन कार्यक्रमात त्या खूप मिरवून आल्या!
मला म्हणे, कित्ती ग तुम्ही बायका हुश्शार,
कठिण परिस्थितीत देखील तुमचे संयंम अपार!

घरात राहून दिला तुम्ही
एकमेकींना आधार अन् प्रोत्साहन,
घरकाम, स्वयंपाक, वर्क फ्रॉम होम करत
केलीत सगळ्यांची पिरपिर सहन!

अग, तुम्ही (साड्या) होतात म्हणून झालं आम्हाला  कित्ती सहाय,
तुमच्या रंगानंमुळे झाले, लॉकडाऊनचे दिवस सुसह्य!

साडी अन् स्त्रीचं असतं अनोखं नातं,
नेसून साडी, करून शृंगार
रूप देखणं तिचं आणखीनच खुलतं!

आई भरते जेव्हा तिची पहिली ओटी,
घेऊन नारळ, तांदूळ, साडी आणि खण्
तिच्या प्रत्येक साडी मागे असते
दडलेली एक प्रेमळ आठवण!

नाही न राग, आता माझ्यावर कसला?
आता तरी गेला का ग तुमचा रुसवा!


मी तर माझ्या साड्यांचा रुसवा दूर करण्याचा प्रयत्न केला....आणि तुम्हीं??

© तेजल मनिष ताम्हणे