Login

रुसलेल्या ता-याची मैत्री भाग १

कथा रुसलेल्या मैत्रीची
“दोन दिसांच जिणं
एक जन्म एक मरण,

हाती आपल्या फक्त
भरभरुन जगण…”

अस काही ऐकायला येताच त्याचे कान टवकारले गेले. त्याने आजुबाजुला पाहीले. तर एक १५-१६ वर्षाचा मुलगा दिसला जो त्याच्याच वयाच्या मुलासोबत काहीतरी बोलत होता.

ती वाक्य ऐकून त्याला भरुन आले होत, तो पटकन त्या मुलाजवळ आला.

“अरे वा, भारी बोललास रे” महेश, एका आयटी कंपनीत उच्च पदावर होता. खुप कमी वयात त्याने यशाची चव चाखली होती.

“थँक्यू सर” नवीन

“तुझ स्वतः च आहे, की कुठे ऐकल आहेस??” महेश त्याचा चेहरा वाचत बोलला.

नवीनला महेशच्या डोळ्यात कसलीतरी आस दिसली. पण अनोळखी माणसाला कस डायरेक्ट विचारायच म्हणून त्याने काहीच विचारल नाही.

“नाही हो, माझ नाही. आमच्या सरांच्या संग्रहातल्या रचना आहेत या” नवीन सहज बोलुन गेला.

महेशने दिर्घ श्वास घेत त्याचे डोळे मिटले. डोळे जरा पाणावले.

“हमम, खुप छान लिहीतात तुमचे सर. भेटाव लागेल त्यांना” महेश स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवत बोलला.

“हो तुम्ही भेटाच एकदा. खुप छान छान लिहीतात. वरुन माणुस म्हणुन तर एकदम जबरदस्त माणुस आहे.” नवीन

“ठिक आहे, मला पत्ता देऊन ठेव त्यांचा” महेश.

मग नवीन ने त्यांच्या सरांचा पत्ता दिला. बराच वेळ तो पत्ता महेश वाचत बसला. नवीनला जरा वेगळच वाटल.

“बर, तुझ्या मित्राचा काय प्रोब्लेम झालाय?” महेशने नवीनला विचारले.

“ते, त्याच्या आयुष्यात जरा टेन्शन आलय तर हात पाय गाळुन बसलाय. मग त्याला तेच समजावत होतो.” नवीन ने त्याच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवला. “त्याच्या लहान बहिणीच्या ह्रदयाला छिद्र आहे, त्याच ऑपरेशनच्या टेन्शन मध्ये होता.”

“बस एवढच” महेशने एका कागदावर काहीतरी लिहील आणि नवीन कडे दिला.

“मुंबईला जाऊन यांना भेट. माझ नाव सांग. कुठल्याही एका योजनेअंतर्गत तीच ऑपरेशन होऊन जाईल. बर तुमच्या सरांना काही सांगु नका ह. जरा सरप्राईज देऊया त्यांना.” महेशच्या चेहऱ्यावर आता जरा हसु आल होत.

ती दोन्ही मुल आनंदाने त्यांच्या घरी निघुन गेली.

महेश त्याच्या कामासाठी नाशिकला गेला होता. त्याच तिथल्या कंपनीतल काम आटपून तो बाजुलाच असलेल्या स्नॅक्स कॉर्नरवर तो नाश्त्यासाठी बसला होता. तेव्हा नवीनचा आवाज त्याच्या कानावर पडला होता.

ते वाक्य ऐकुन त्याला एवढ भरुन आल होत, की त्याला पहीले काय करु सुचत नव्हत. त्याने त्याच्या मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एकच मेसेज टाकला.

“गड्यांनो, आपला शोध संपला रे. आपल्यावर रुसलेला आपला तारा भेटलाय.” महेश
तसे धडाधड त्याला कॉल येऊ लागले. ते उचलण्याचही भानही त्याला राहील नव्हत. त्याने परत मेसेज टाकला.

“नाशिकला या, मी लोकेशन शेअर करतोय.” महेश

सगळ्यांचा वेळ न दवडता मेसेज आला डन म्हणून. महेशने त्याच्या कंपनीत सुट्टी एक्सटेंड केल्याचा मेल केला. त्याच्या ऑफीसमधल्या सगळ्यांनाच चक्कर यायची बाकी होती. कारण महेशने स्वतःहुन कधीच सुट्टी घेतली नव्हती. जी काही घ्यायचा ती कंपनीने दिली तरच, त्यातही तो अर्धा दिवस तरी जायचा. त्यामुळे त्याला सहज सुट्टी मंजुर करुन दिली होती. सुट्टी कन्फर्म झाल्याचा मेल आल्यावर तो जरा रिलॅक्स झाला. त्याच मन भुतकाळात हरवल.

साधारणतः काही वर्षापूर्वी.

महेशच्या कॉलेजच पहील्या वर्षाचा पहिला दिवस. त्या दिवशी महेशची आणि त्याची ओळख झाली होती.

लक्ष नाव होत त्याच. कवी मनाचा, मैत्रीला जागणारा, मदतीला धावणारा. धावणाऱ्या या वेळेसोबत त्यांची मैत्री पण घट्ट झाली. त्यांचा ग्रुपमध्ये आता तेजस, तन्मय, मेघना, आकांक्षा, किरण एवढी जण होती.

बघता बघता पहील वर्ष संपल होत. लक्षच्या कवितांनी सगळ्यांनाच भुरळ घातलेली होती. आता तर सुट्ट्या लागणार होत्या म्हणून त्यांची मन खट्टू झाली होती. पण फक्त महीनाभर तर लांब रहायच होत. जुन महीन्यात परत भेटणार, मग सगळेच रिलॅक्स झाले होते.

त्यांच्या परीक्षेचा निकाल लागला होता. मेघनाला बरेच कमी मार्क पडले होते. याला कारण ही ती स्वतः होती. कारण कोण्याच्यातरी प्रेमात पडून तिचा अभ्यासच झाला नव्हता. वरुन त्या मुलानेही तिला आता नाकारलेल होत. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेलेली होती. आता आपल्या आयुष्यात काहीच नाही म्हणून ती जीव द्यायला चालली होती. ती पुलावर जाऊन उभी राहीली.

“काय, खोली मोजतेस का नदीची??” लक्ष हातात शेंगदाणे घेऊन शांतपणे खात होता.

मेघना चपापली. तिने पाहील तर तिला लक्ष दिसला. निकाल लागल्या लागल्या लक्षला मेघनाचा पडलेला चेहरा दिसला होता. तिच्या बॉयफ्रेंडने तिला सोडल होत ते ही त्याला कळल होत. म्हणून तो तिच्या मागेच आला होता. त्याला आलेली शंका खरी ठरली होती.

“तुला काहीच माहीत नाही, तु नको मध्ये पडूस” मेघना रागात थरथरली.

“नको टेन्शन घेऊन. मी काही मध्ये पडणार नाही. तुला तुझा जीव देण्यासाठी मदत करायला आलोय. थोड एक माझ. नंतर मीच मदत करेल तुला.” लक्ष निर्विकार होत बोलला.

मेघना गोंधळली. 'बाकी कोणी असत तर मला अडवल असत जीव देण्यापासून, पण हा काय असा उलटेच बोलत आहे.’ मेघनाच मन

“फक्त तु उडी मारल्यानंतर काय काय होईल एवढच सांगेल. नंतरच बघायला तु थोडीच असशील.” लक्षने ति काही बोलण्या आधीच पुढे बोलायला सुरवात केली.