रूप ? भाग ३

I am reader , I am only try to write something

अहो पाटील दादा मुलगी झाली तुम्हाला...- मीना
काय मुलगी .. खरच ... - पाटील एकदम शॉक होऊन बोलतात.. ( मानसी चे वडील केशव पाटील)
हो.. हे बघा - मीना मुलीला घेऊन पाटील जवळ येते..
नाही ही माझी मुलगी असूच शकत नाही.. दूर करा हीला माझ्याजवळुन ... - पाटील खूप रागात संतापून बोलतात.. आणि मुलीला न पाहतच निघून जातात
हो हो माझ्या केशव ला मुलगी होऊच शकत नाही.. - ( मानसी ची आज्जी) जरा रागातच बोलुन बाहेर येते
का.. होऊ शकत नाही आजी.. - मीना जरा रागात बोलते..
कारण मी एका बाबा ला विचारल होत की माझ्या सुनेला काय होणार आहे.. दुसऱ्यांदा, तर त्याने सागितलं होत.. की दुसऱ्यांदा पण मुलगाच होईल ... - आज्जी पूर्ण आत्मविश्र्वास दाखुन बोलत असते...
हो का... ढोगी बाबा होता तो.. ज्याने हे सागितले.. - मीना खूप रागात  बोलुन आत येते.. आणि रडत असते...
काय झालं मीना अशी का रडत आहेस काही झालं काय... मी बरी आहे..  काळजी करू नको.- रूपा बाजी वर झोपलेली असते तिला खूप थकवा जाणवत असते.. खूप कमजोर अवस्ता असते.. तिची.. थोड्या वेळापूर्वी तिची डीलेवरी झाली असते.. डिलेवरी घरीच झाली असते.. मीना ला रडताना पाहून रूपा विचारते... ( रूपा मानसी ची आई)
मीना रूपा चां गळ्याला बिलगून जोरजोरात रडायला लागते.. आणि बाहेर कोण कोण काय काय म्हणाले ते सगळ सगाते..
रुपा ला तर विश्र्वाच बसत नाही की केशव पाटील अस काही बोलले असतील... तरी सुद्धा ती म्हणाला घट्ट करत मनात स्वातशीच बोलते..
काहीही झालं तरी ही माझी लेक आहे ... मी हिला इतक्या वेदना सहन करून जन्म दिला आहे.. तर हिला कोणी अपनव या नको मी मात्र हिला कशाची ही कमी पडू देणार नाही.. खूप प्रेम देणार.. मोठ बनवेल.. - रूपा मनात बोलते.. आणि आपल्या मुलीच्या कपाळावर चुम्बन करते..

××××××××
असेच काही दिवस निघून जातात आज घरात त्या नवीन लहान चिमुकली च लाड फक्त तिची आईं.. तिची.. आत्या.. आणि तिचा मोठा भाऊ जो फक्त ८ वर्षच असतो ते करत असतात.. केशव पाटील ला तर ती नजरे समोर पणं नको असते.. आजी च पणं काही वेगळे नसते.. ती पण केशव प्रमाणेच असते.
आज त्या चिमुकलीचा नामकरण असतो.. रूपा केशव जवळ येते..
अहो आज आपल्या लेकीच नामकरण आहे ... बाहेर सगळे आलेआहेत तुम्ही पणं येता काय.. - रूपा प्रेमाने बोलते..
ती काळी माझी लेक नाही... तुला जे करायचं आहे ते कर मला बोलवायचं नाही.. निघ ईतून आता..- केशव एकदम रागात बोलतात.. आणि आपल्या कामात व्यस्त असल्याचे नाटक करत असतात..
ओ...हो.... मला आतपर्यंत वाटत होत ती मुलगी आहे म्हणून तुम्हाला आक्षेप आहे.. पणं तसं तर आहेच आहे ...आणि आता ती काळी आहे हा ही आक्षेप आहे... खरच कोणी आपल्या स्वतच्या मुलीबद्दल असं बोलेल वाटल न्हवत.. पणं एक सागू ती माझी मुलगी आहे म्हणून काळी आहे...  जो तिच्या आई च रंग आहे तोच तिला आहे त्यात तिची काय चूक हो तिला तर ते ही माहिती नाही.. की देवाने कोणता रंग देऊन पाठवल आहे... जाऊदे हो...
तुम्हाला मी आधीपासूनच नाही आवडत हे मला मान्य होत..
कारण मी काळी.. आहे.. तुम्ही फक्त तुमच्या बाबांसाठी माझ्या सोबत लग्न केलं होत.. ना.. माहिती आहे मला.. नेहमी मला काळी काळी म्हणून तुम्ही आणि तुमची आई मला अपमानित करता ... मी ते सहन करते.. पणं आता मी माझ्या मुलीला सहन करू देणार नाही... आणि तुम्हाला मीच आवडत नाही म्हंटल्यावर माझी मुलगी कशी आवडेल.. हे कशी विसरू शकते... -  रूपा खूप रागात बोलत असते.. आणि घडाघड रडत असते...
झाल तुझ प्रवचन आयकुन निघायचं इतून ... नाही तर आताच हात पकडुन बाहेर करावं लागेल मला.. - केशव रागात बोलुन रूपा ला रूम बाहेर जा म्हणतात..
रूपा डोळे पुसुन चेहऱ्यावर खोटी हसु आणुन बाहेर येते..
काय ग केशव दादा नाही आलेत काय... - बाहेर बसलेल्या पैकी एक बाई रूपा ला विचारते..
रूपा एकदा मीना कडे बघते... आणि म्हणते..
ते त्यांची थोडी तब्येत बरी नाही.. तर ते म्हणाले तुम्ही आटपवा कार्यक्रम.. - रूपा खोटी खोटी स्मित करत बोलते..
मीना सगळ समजून जाते...
तशेच सगळे काही पाडणे म्हणून त्या चिमुकलीला पाडण्यात टाकतात..
साग ग रूपा काय नाव ठेवते.. मुलीचं...- ती बाई पुन्हा रूपा ला विचारते...
रूपा मीना जवळ येते... आणि म्हणते..
हा हक्क आत्याचा असतो ... मीना ताई बोल काय नावं देतेस आपल्या भाशीला.. - रूपा
मी !.. मी कशी देऊ शकते.. नाही म्हणजे मी काही सक्की आत्या नाही आहे..   मी तर ह्या घरची मोलकरीण.. - मीना बोलतच असते.. आणि रूपा तिला थाबवत म्हणते..
कोण म्हणत तु मोलकरीण आहेस माझे सासरे तुला नेहमी मुलगी म्हणत.. कदीच तुला मोलकरीण म्हणून वागवलं नाही.. आणि तू ह्यांना पणं दादा म्हणतेस ना मग .. ह्या नंतर कदिच स्वतला मोलकरीण म्हणायचं नाही... - रूपा..
मीना ला खूप ग्यवरून आल असत... आणि ती रूपा ला जोरात गळायला बिलगते आणि म्हणते..
खरचं वहिनी तुम्ही आहात म्हणून बाबा गेल्यावर पणं काही वाटल नाही.. ह्या अनाथ ला तुम्ही लोकांनी माया लावली... आणि आज हक्क सुध्दा देत आहात आणखी काय पाहिजे मला..- मीना
झाल आता माझी चिमुकली रडेल आत्या नाव नाही देत म्हणून ... लवकर नाव द्या... - रूपा हसत हसत मीनाच्या पाठीवरून हात फिरवत  बोलते... तशेच सगळे होकार देतात.. आणि मीना नाव सगते..
"मानसी" नाव देते मी माझ्या भाशिला ... - मीना
खूप सुंदर... - रूपा खूप आनंदी होऊन म्हणते..
तशीच एक बाई विचारते मानसी नावाचं अर्थ काय... तशीच मीना आनंदाने सगायला सुरुवात करते..
मानसी म्हणजे..
"मानसी नावाचा अर्थ शुद्ध आत्मा/पविञ मनाची असा होतो . प्रभावी व्यक्तिमत्व आणि कोणत्याही परिस्थितीत समस्यांपासुन दूर न जाता त्यावर मात करणाऱ्यांचे नाव दर्शवते . मानसी हे एका पुराणांमधील विद्यादेवतेचे पण नाव आहे . मानसी नाव हे पूर्णपणे प्रामाणिकतेचे आणि शुद्धतेचे प्रतिबिंब आहे ." - मीना..
खूप सुंदर खरच - एक बाई आनंदात बोलत असते..
नामकरण संपते सगळे आपल्या घरी निघून जातात...
असेच हळु हळु दिवस जात असतात.... घरात केशव आणि त्याच्या आई ला सोडून बाकी सगळे मानसी साठी आनंदी असतात..
केशव गावात सरपांच्यच्या घरी मुनिमचे काम करतात.. म्हणून गावात त्याची चागली ओळख असते.. माण असतो..
केशव फक्त मुलाच्या शिक्षणावर लक्ष देतात त्यांना मानसी शी काही लेन देणं नसते.. म्हणून ते त्याच्या मुलाला.. प्रदीप ला तालुक्याच्या शाळेत पाठवतात..
मानसी पणं मोठी होत असते.. तिला पणं शाळेत पठवाव अस तिच्या आई ला वाटत.. पणं केशव लक्ष न देत असल्याने रूपा स्वतचं निर्णय घेते की काहीही झालं तरी मुलीला शिकवेल.. मोठ करेल.. आणि ती शेतात कामाला  जायला लागते.. आणि पैसे गोळा करत असते.. मुलीच्या शिक्षणासाठी. केशव ला ते पटत नाही म्हणून तो रूपा सोबत भांडण करतो पणं रूपा मात्र काहीही एकत नाही.. आणि कामाला जात असते...
असच एक दिवस मानसी शाळेतून घरी आली असते.. तिला शाळेत एका मुलीने काळी म्हणून चिडवल सगात असते.. तिच्या आई ला फार वाईट वाटत ... आणि ती म्हणते..
काही नाही होत बाळा म्हणू दे आपण नेहमी प्रेमाने वागावं.. माणसाची ओळख त्याच्या रंगाने नाही त्याच्या मणाने, कामाने होत.. एक दिवस तू शिकून खूप मोठी होशील ना तर हा रंग काही मायने नाही ठेवणार.. आणि काळा रंग वाईट नसतो.. तो तर रंग आपल्या विठोबाचा पणं आहे.. तो तर नाही चिडत कधी काळ्या रंगावरून .. म्हणून तू पण नाही चिळायच.. - रुपा प्रेमाने समजावत मानसी ला सांगत असते.. मानसी पणं सगळ म्हण लावून ऐकत असते..
तेव्हाच केशव राव तिथेच बसून सगळ एकत असतात.. आणि मधातच बोलतात..
काही शिकून वैगरे मोठी नाही होणार आहे शेवटी चूल आणि मुल च करायच आहे.. माहिती नाही चूल आणि मुलं होत पणं का नाही तर कोण मागेल हिला तर माहिती नाही आमच्याच डोक्यावर आहे वाटत..- केशव एकदम तूस्त पने म्हणतात..
आणि बाजूला बसलेली आजी पणं हसत असते.. रूपा आणि मीना ला फार राग आला असतो पणं वाद नको म्हणून त्या दोघी पणं शांत रहातात..
×××××××
समोर काय झालं मानसी च आणि तिच्या आई च.. - विवेक.. म्हण लावून ऐकत असतो.. आणि  समोर काय झालं ऐकण्यासाठी आतुर असतो..
अहो सर रात्र खूप झाली एक वाजला झोपा आता जाऊन नंतर सांगेन..मानसी
विवक वॉच कडे बागतो आणि हो म्हणून रूम मध्ये झोपायला जातो.. पणं त्याला काही आता झोप लागणार नसते.. त्याच्या विचारत आता फक्त आणि फक्त मानसी असते.. आणि तो विचार करतच झोपी जातो...
क्रमशः

🎭 Series Post

View all