रूप ? भाग ९

I am reder but I try something write ..

दिवसेंदिवस जात असतात.. अजय दरोज रात्री मानसी वर तुटून पडायचा .. तो आपला थकवा काडण्यासाठी मानसीच्या शरीराचा उपयोग करायचा. मानसी मात्र सगळ शांत पने सहन करायची.. कारण ती हतबल झाली होती.. एक दिवस अजय आणि प्रदीप मध्ये जमिनीला घेऊन खूप भांडण झाले असल्याने प्रदीप ने आणि त्याच्या वडिलांनी मानसी सोबत सगळी नाती तुटली म्हणून स्पष्ट केले तिला आता माहेरी येण्यास नकार दिला तू आमची कोणी नाही म्हणून दटावले .. आणि ते कायमचे तिच्या आयुष्यातून निघून गेले.. मानसी ने खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण कोणी काहीही आयकायला तयार नव्हतं..
मानसी ला कोणाशीच काही लेन देणं न्हवत पणं तिला आत्या हवी होती.. पणं आता तिला आत्या ला पणं भेटण्याची परवानगी नव्हती.. आणि ती दररोज आत्या साठी रडत राहायची.. पणं तिच्या अश्रूच कोणावरही काही परिणाम होत न्हवत उलट तिचाच सगळे अपमान करत अस्त..
असच करता करत  अजय आणि मानसीच्या लग्नाला दोन महिने उलटून गेले असते.. ह्या दोन महिन्यात अजयने मानसी ला शरीराने त्रास दिलाच होता आणि त्यापेक्षा जास्ती मनाला त्रास दिला होता कारण आता तो त्याचे राग थकवा फक्त आणि फक्त मानसी वर काढायचा अश्या परिस्थिती सासू बाई पणं मानसी शी चाग्लच खूप सारी कामं करून घेत असत.. तिला वारंवार काळी म्हणत. तिला घराबाहेर जाण्याला मना करत उगाच तुला पाहून लोकांच्या समोर आमची बदनामी होईल माझ्या मुलाला लोक हसतील म्हणून म्हणत..

एक दिवस असच सासुसासरे नातवाच्या वाढदिवसासाठी ते आपल्या मुलीकडे गेले होते. वाढदिवस दुसऱ्या दिवशी होता म्हणून मानसी आणि अजय दुसऱ्याच दिवशी जाणार होते सासू सासरे एक दिवसा आदी गेले होते.. सासूची इच्छा नव्हती की मानसी यावं पणं तिच्या मुलीच्या नवऱ्याने म्हणजे मानसीच्या नंदोयाने जबरदस्ती केली की मानसी ला घेऊन या म्हणून सासू आपल्या मुलाला अजयला सागून आली होती की उद्या हिला पणं घेऊन ये म्हणून.. आणि ते मुलीकडे निघून गेले. आता  घरात मानसी एकटी होती.. अजय ऑफिस ला गेला होता.. मानसी ला आज पोटात फार दुखत होत तिला पिरेड आला होता.. पणं ती आज खुश होती कारण घरात सासू नवती, तर घरातल्या कामच टेन्शन न्हवत म्हणून ती छान काम नंतर करेन म्हणून झोपी गेली .. आणि सायंकाळी सहा वाजता उठली तिला आता थोड बर वाटत होत आणि ती उठून स्वतसाठी छान चहा केला आणि आरामात टीव्ही पाहत तिने चहा पिला.. आणि थोड बर वाटत आहे म्हणून तिने भांडी घासली.. थोडे कपडे होते ते धुतले , झाडू लावली आणि तिला पोटात त्रास असल्यास तिने पोचा नाही लावला आणि सायंकाळी पुन्हा आंघोळ केली . तिने केस धुतले होते.. आणि ती केस पुसत असताना तिची नजर घड्याळं वर जाते.. रात्रीचे आठ वाजले असते आणि ती केसांना घाईतच कल्चर लाऊन किचन मध्ये येते कारण अजय नऊ वाजता येनायची वेळ झाली असते म्हणून ती पटकन स्वयंपाकाला लागते.. आणि पटापट स्वयंपाक करून घेते .. तिला आता आणखी पोटात दुखायला लागते.. थोडा थोडा वेळाने तिला पोटात जोरात दुखन सुरू होत असते.. तरी ती सगळ दुःखन दुर्लक्षित करून काम करते .. रात्रीचे नऊ वाजले असते पणं अजय काही आला नसतो. ती त्याची वाट पाहत बाहेर सोफ्यावर बसली असते.. पणं तो काही आला नसतो वाट पाहता पाहता तिला  अकरा वाजून जातात आता तिला पणं भूक लागली असते म्हणून आता ती स्वतःसाठी जेवायला घेतच असते की अजय घरात येतो. आणि रूम मध्ये जात असतो तशीच मानसी त्याला थांबत बोलते..
अजय फ्रेश होऊन या मी जेवण वाढते..- मानसी
मला नाही आहे भूक आलो आहे मी जेवण करून तूच करून घे - अजय थोडा चिडून बोलतो आणि रूम मध्ये निघून जातो.
मानसी ला माहिती असत काही तरी ऑफिस मध्ये बिनसलं असेल म्हणून ती जास्ती काही बोलत नाही आणि चुपचाप राहून स्वतचं जेवण करून घेते.. आणि सगळ किचन च काम आवरून रूम मध्ये जाते .. आत आल्यावर अजय बेड वर डोळे मिटून झोपला असतो.. त्याला अस शांत झोपलेलं पाहून मानसी मनात म्हणते.. असा शांत झोपलेलं किती सुंदर दिसतो ना हा नाही तर बापरे कसा वागतो.. जाऊ दे मी कशाला याची इतकी प्रशंसा करत आहे हा व्यक्ती केव्हा पणं बदलू शकतो काही सागता येत नाही.. असु दे मानसी जास्ती विचार नको करू बाथरूम मध्ये जा चेंज कर आणि शांत झोप .. इतकं बोलुन मानसी बाथरूम मध्ये जाऊन चेंज करून येते तिच्या पोटात आणखी दुखायला लागते तिला आता चागलाच त्रास व्हायला लागतो.. तिला काय करावं नी काय नाही समजत नसत .. आणि ती गटागत दोन ग्लास पाणी पिते तिला थोड बर वाटत आणि ती बेड वर अजयच्या बाजूला जाऊन पडते .. आणि तिला थोडीच वेळात झोप लागते .. अजय पणं शांत झोपलेलं असतो.. अर्द्यातासाने अजयची झोप उगडे आणि बघते तर मानसी छान शांत झोपलेली असते.. तो तिला बघतच राहतो तिच्या रेखीव चेहऱ्याला , सावडा रंग असून सुध्दा एक सकारात्मक तेज तिच्या चेहऱ्यावर असतो.. लांब केस, सडपातळ , उंच आणि तो तिला बघतच हळुच तिच्या मानेवर त्याचे बोट फिरवत असतो.. तशीच मानसी दाचुकुन जागी होते..

काय झालं दचकायला - अजय
काही नाही ते अस अचानक स्पर्श झालं तर दचकले.. - मानसी थोडी घाबरून बोलते..
हम्म ....- इतकं बोलुन अजय तिच्या जवळ येऊन तिच्या साडीचा पदर खाली करत असतो तशीच मानसी पदर घट्ट पकडून म्हणते..
प्लीज अजय आज नको आज माझी तयबीयत बरी नाही माझ्या पोटात फार दुखत आहे प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला - मानसी केविलवाणा चेहरे करून बोलते..
फक्त थोडावेळ काही नाही होत आणि त्यबेत जास्ती बिगडली तर उद्या तुला हॉस्पिटल ला घेऊन जाईल बर.. - इतकं बोलुन अजय तिचं समोर काहीही आयकात नाही आणि तिच्यावर तुटून पडतो.. मानसी त्याला नाही नाही म्हणत असते पणं तो काही तिचं अयकात नाही आणि आपला आनंद पूर्ण घेतो..आणि थकवा दूर करतो.. त्याला तिच्या दुखाशी काही लेन देणं नसत .. आणि थोड्यावेळाने तृप्त होऊन तो बाजूला होतो आणि झोपी जातो.. पणं मानसी तिच्या तर आता झोपण्याचा प्रश्न च नसतो तिच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रु गळत असते.. आणि ती रात्रभर रडत राहते.. स्वतलाच दोषी आहे म्हणून कोसत असते.. आणि मनात विचार करता करताच तिचा डोळा लागतो..

सकाळ होते मानसी थकलेली असते तिला काहीही करायची इच्छा नसते. तरी सुद्धा उठून ती फ्रेश होऊन नाश्ता बनवते.. तसाच अजय फ्रेश होऊन हॉल मध्ये येतो.. मानसी त्याला बघत पणं नाही आणि नाश्ता नेऊन देते.. आणि किचन मध्ये येऊन पुहणा कामाला लागते.. अजय समजून जातो की तिला त्याचा राग आला आला आहे आणि तरी त्याला त्या गोष्टच काही लेन देणं नसत तो नाश्ता संपवतो आणि ऑफिस साठी निघतच म्हणतो..
दुपारी तीन वाजता ताई कडे जायचं आहे रेडी रहा .. येतो ..- अजय इतकं बोलुन निघुन जातो..
मानसी त्याच्या बोलण आयकते आणि काहीही रिस्पॉन्स देत नाही आणि आपले काम करते.. सगळ घर आवरते आणि पूर्ण काम करता करता च तिला दोन वाजून जातात आणि वेळ निघून जाते तीन वाजता अजय येतो मानसी ची ईच्छा नसताना सुध्दा ती नंदेला वाईट वाटेल म्हणून  रेडी होऊन  बाहेर हॉल मध्ये बसून त्याची वाट पाहत असते.. तो येतो आणि रूम मध्ये जाऊन चेंज करून येतो आणि तिच्यासोबत जाण्याची इच्छा नसतात ना सुध्दा तिला चल म्हणतो.. आणि येऊन गाडीत बसतो मानसी पणं त्याच्या मागे येऊन गाडीत बसते..  थोड्याच वेळात ते अजयच्या ताईच्या घरी पोहचतात..
खूप सारे पाहुणे आले असतात अजयचे काही मित्र मैत्रिणी जे त्याच्या ताईला चागलं ओळखत असल्याने ते  पणं आले असतात .. अजय मानसी ला घेऊन आत येतो .. सगळे त्याला आणि मानसी ला पाहून एकदुसऱ्यच्या कानात काहतरी कुजबुजत असतात तर काही त्यांना पाहून हस्त असतात..
तशीच माणसीची सासूबाई त्याच्या जवळ येऊन मानसीला आत घेऊन जाते..
नाईलाजाने माणसीची ओळख सगळ्यांसोबत करून देत असते.. आणि काही बाया बसून काही काही बोलत असतात
तशीच मानसी उठून आपल्या नंदेच्या रूम मध्ये जात असते.. तिला भेटण्यासाठी .. तशीच ती दरवाज्यापर्यंत जातेच तर एक बाई तिच्या सासू ला म्हणते..
काय हो ताई मुलगी नाही मिळाली काय तुम्हाला तुमच्या मुलासाठी .. मला सागितले असते मी शोधून दिले असते छान सुंदर तुमच्या मुलाला शोभेल अशी .. तुमचा मुलगा किती सुंदर आणि बायको, कोण म्हणेल अजयची बायको आहे म्हणून - ती बाई
माणसीची सासू बाई काही बोलत नाही आणि फक्त थोड स्मित करत म्हणतात जसं नशिबात असेल तेच होते बाकी काही नाही इतकं बोलुन त्या उठून बाहेर येतात .. मानसी ने सगळ आयकाल असत तिला फार वाईट वाटत आणि तिच्या डोळ्यातून अश्रु चे थेंब बाहेर येत्तात आणि ती पदराने पुसून आत जाते..
थोडाच वेळात बर्थळे चा कार्यक्रम होऊन जातो आता सगळे जेवण करायला बसले असतात .. तशीच त्या बाईचा मुलगा आणि त्याची बायको आली असते आणि ते पणं जेवण करत असतात मानसी , अजय , आणि अजयचे आई बाबा, त्याचे मित्र मैत्रिणी पणं त्याच्याच बाजूला बसून जेवण करत असतात त्या बाईची सून मानसी सोबत छान बोलत बोलत जेवण करत असते.. मानसी ला मगाशी त्या बाई ने  बोलले शब्द आठवतात आणि ती आता उत्तर द्याच म्हणून ठरवते .. आणि तिच्या सुनेला म्हणते..
ताई किती सुंदर दिसता तुम्ही - मानसी स्मिथ करत बोलते
थॅन्क्स ताई - त्या बाई ची सून पणं स्मिथ करत उत्तर देते..
तशीच त्या बाईला आपल्या सुनेची स्तुती अयकुंन फार आनंद होतो .. पणं माणसीची सासू मात्र नाक मुरडतात कारण ती स्तुती मानसीने केली होती म्हणून ...
तशीच मानसी पुन्हा बोलायला सुरुवात करते .. त्या बाईचा मुलगा आपल्या बायको साठी पाणी आणायला गेला असतो तशीच मानसी वेळ पाहून म्हणते ..
पणं तुम्हाला पाहून कोणीही नाही म्हणणार की ते दादा तुमचे मिस्टर आहेत .. नाही म्हणजे तुम्ही इतके सुंदर आणि तुमचे मिस्टर तितके सुंदर नाही ना रंग पणं सावडा आहे त्यांचा .. मुलगा नाही मिळाला काय तुम्हाला .. मला सागितले असते मी शोधुन दिले असते तुम्हाला ... - मानसी त्या बाई कडे स्मित करत, पाहत बोलते..
काय हो ताई काहीही काय बोलता रंगाचं काय आहे मन कस आहे ते पाहव बाकी काही नाही ... - त्या बाई ची सून मानसी ला शांत पणे म्हणते.
सॉरी सॉरी मी मस्करी करत होते .. सहजच - मानसी आपली बाजू सावरत बोलत असते..
अरे काही नाही होत आणि तुम्हीच काय मला खूप लोक म्हणतात की तुला मुलगा नाही मिळाला काय म्हणून आणि ते काही सावडे नाही आहेत काळे आहेत .. तुमच्या रंग ला सावळा म्हणतात.. आणि तुम्ही पणं सुंदर आहात किती सुंदर बोलता तुम्ही अगदी तुम्हाला शोभेल असं निरागस - त्या बाई ची सून माणसीची स्तुती करत बोलते पणं त्या बाई ला मानसीचा फार राग आला असतो तिच्या मुलाला काळा म्हणल म्हणून आणि ती तशीच आपल्या सुनेला आणि मुलाला लवकर चला म्हणते.. वेळ होत आहे म्हणून .. आणि काही वेळात सगळे ते निघून जातात .. पणं मानसीच्या गोष्टीवर अजय चे काही मित्र आणि मैत्रिणीं हसायला लागतात पणं मानसीच्या सासूला खूप राग आला असतो .. आणि ती पणं अजय ला लवकर चल म्हणून म्हणते.. आणि मुलीचं निरोप घेऊन ते सगळे घरी येतात...
घरी येताच माणसीची सासू सगळ्यांसमोर मानसी ला म्हणते..
काय गरज होती तुला तिथे हुशारी करायची.. काय गरज होती तुला त्या बाईच्या मुलाला काळा म्हणायची.. - सासूबाई चांगल्याच चिडून बोलतात..
आई मी काही काळा नाही म्हणले मी फक्त उत्तर दिले .. तुम्हाला मनाली होती ना ती बाई की मुलगी नाही मिळाली का म्हणून तुमच्या मुलासाठी तर मी फक्त उत्तर दिले बाकी काही नाही..- मानसी पणं आता थोडी आवज चडून बोलायला सुरुवात करते..
काय चुकल त्या बाईच खरच तर बोलली जे आहे ते.. - सासूबाई
अच्छा खर बोलली आणि मी काय चुकीचं बोलली .. म्हणजे मुलगी काळी आहे तर तिच्या काळ्या रगांच तिरस्कार आणि मुलगा काळा आहे तर त्याचा मान वा हा कुठला न्याय.. - मानसी
ये मला काही न्याय वैगरे नको शिकवु समजली .. - सासूबाई
मी काही न्याय नाही शिकवत आहे समजल आणि मला कोणाला काही शिकवायच पणं नाही आहे - मानसी आता चाग्लीच चिडून बोलायला लागते तिच्यात आणि सासूबाई जोरजोरात भांडण व्यायला लागते .. अजय ला मानसीच्या फार राग आला असतो त्याचा आई चा अपमान होत आहे हे त्याला बाघवत नाही आणि तो जोरात मनासी वर हात उचलतो .. तशेच सगळे अवाक होऊन अजय ला पाहतच राहतात.. सासऱ्याना त्याचं मानसी वर हात उचलन पटत नाही आणि ते अजय वर थोडे रागावुन  रूम मध्ये निघून जातात पणं सासूला आनंद झाला असतो आणि ती हसतच रूम मध्ये निघून जाते..
मानसी पणं रडत रडत आपल्या रूम मध्ये येते.. तिच्याच मागे अजय पणं रूम मध्ये येतो.. आणि म्हणतो..
आई बरोबर म्हणत होती तुला काय गरज होती त्यांना काही बोलायची .. तू काळी आहे तर आहे आणि बरोबर बोलली ती तुझ्या पेक्षा कितीतरी पटीने सुंदर मुलगी मिळाली असती मला .. मजबुरी  होती माझी समजली.. - अजय खूप रागात म्हणतो..
अच्छा सुंदर मुलगी मिळाली असती तुला .. तर बघितला असता कशाला जमिनीच्या लालचीत पडला..
आणि सुंदर बोलतो .. दररोज रात्री तुला दिसत नाही की मी सुंदर नाही काळी आहे कुरूप आहे तेव्हा बरोबर मी तुझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर स्त्री दिसते.. बाकी वेळात जगातली सर्वात कुरूप हा तेव्हा नाही वाटत लाज माझी माझ्या शरीराची तेव्हा कसा थकवा दूर करतोस, मनाला येईल तसा आनंद घेतोस .. आणि लोकांसमोर तुला माझी लाज वाटेत.. - मानसी पणं आता आगीला पेटली असते जे तोडत येईल ते बोलत असते.. आणि जोर जोरात रडत असते..
अजय आणखीच तिच्या बोलण्यावरून चिडला असतो.. आणि आता त्याला मानसीचा फार राग आला असतो.. पणं त्याच्या कडे मानसीच्या शब्दाचे उत्तर नसते म्हणून तो रागातच घराबाहेर निघून जातो.. पणं मानसी तशीच खाली बसून जोर जोरता रडत असते आज अजयच्या घरात फक्त मानसीच्या रडण्याचा आवज असतो..
क्रमशः

🎭 Series Post

View all