रूप ? भाग ७

I am reder , but I try something write

मानसी च लग्न थोड सध्या पद्धतीने पार पडत साखरपुडा पणं लग्नाच्या दोन तसा आदी केला जातो  .. आणि आता बिदाई ची वेळ असते.. मानसी एकदा पूर्ण घर पाहते तिला तिच्या आईसोबत घालवलेले क्षण आठवतात तसेच  तिच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागतात .. आत्या सोबत चे दिवस आठवतात , ह्या घरात मिळालेले दुःख , अपमान ,आनंद सगळ आठवते आणि रडते असते  .. आत्या तिचे डोळे पुसून समजावते आणि मानसी ला घेऊन  बाहेर येते.. आणि येऊन  अजय च्या  बाजूच्या  खुर्ची वर बसते मग  पाचा सुहागन बाया तिची वोटी भरतात .. आणि खूप सारे आशीर्वाद देतात तेव्हा पणं मानसी ला आई आठवते आणि अश्रु चे थेंब तिच्या भरलेल्या वोटीत पडते .. आणि ती तीची वोटी भरलेला पदर बंद करते .. जणु तिने  तिच्यासाठी ह्या घरचे दरवाजे  बंद केले.
आत्या जवळ येऊन तिच्या जवळचे वोटीतले सामान काढून एका कापडात बाधून तिच्या जवळ देते.. आणि मानसीला मिठी मारून रडायला लागते .. कारण आता आत्याची जी एकमेव रक्षक होती तिला समजून घेणारी ती आज आपल्या घरी जात असते .. मानसी च पणं तसच असते आई गेल्यानंतर तिला आत्यानेच सांभाळलं होतं म्हणून ती पणं रडत असते.. मानसी एकदा केशवरावानकडे पाहते पणं तिच्या डोळ्यातून त्यांच्यासाठी एकही अश्रू पडत नसते आणि ती शांत राहून त्यांचे पाय पडते .. आजीच पणं तसच असते आणि ती त्यांचे पणं पाय पडून दूर होते .. प्रदिपशी तर तिचा कधी जास्ती संपर्कच आला नसतो कधीच तो तिच्या सोबत मोठा भाऊ म्हणून बोलला नव्हता म्हणून ती त्याच्या कडे पाहत सुध्दा नाही .. आणि ती अजय सोबत येऊन गाडीत बसते आणि आता आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करते..
थोड्याच वेळात गाडी अजयच्या घरासमोर येते.. मानसी गाडी बाहेर येते.. आणि घराकडे बघते घर अस खूप मो्ठं नाही पणं तिच्या घरापेक्षा थोड मोठ्च असते.. ती अजय सोबत घरात येते .. सासूबाई घरात येताच त्याच्या रूम मध्ये जातात .. त्याच्याच मागे मागे सासरे पणं जातात .. ननद लग्नझलेली असते ती पणं आपल्या नवऱ्याला आणि मुलाला घेऊन आत जाते .. मानसी ला काही समजत नाही काय होत आहे आणि ती शांत पने अजय कडे बघते तो काहीच बोलत नाही आणि तो पणं आत जात असतो तसाच त्याचा पाय थांबतो आणि तो अडखतो कारण त्याचा दुपट्टा मानसीच्या पदरशी गाठ बंदला असतो.. आणि तो थोडा मनावर कंट्रोल करून मानसी ला म्हणतो
आत जायचं काय की इथेच रात्र भर थांबायचं आहे.. - अजय
हो हो म्हणून मानसी त्याच्या सोबत आत जाते .. आणि दरवाज्यात येताच .. एक आजीबाई त्यानं अडवते
थांबा अस आत नाही यायचं ..- आजी
काय आहे मंदा आजी खूप थकल्यारक वाटत आहे मला आराम करायचं आहे आत जाऊ दे..- अजय
हो हो जाऊ देते दोन मिनिट - मंदा आजी

आजी इतकं बोलुन दोघांचे ओक्षण करते मानसी ला तांदळाच्या गळु वर पाय मारून आत यायला सांगते मानसी पणं तसच करत घरात येते घरात येताच अजय त्याचा दुपट्ट काढून मानसी कडे देतो आणि आपल्या रूम मध्ये निघून जातो.. मानसी घरात येते पणं घरात काहीही लग्नासारखे वाटत नसते,  कोणी पाहुणे नाही, सजावट नाही, जसे नेहमी राहते तसच काही असते.. आणि ती एकसारखी घरात बघत असते तशीच मंदा आजी तीच्यकडे पाणी घेऊन येतात आणि म्हणतात....
काय घर बघत आहेस .. लग्न घर असल्यासारखे नाही वाटत असेल तुला  - मंदा आजी
मानसी आजी कडे एकटक प्रश्नार्थक नजरेने पाहते आणि पाणी घेते आणि पिहू लागते ... आणि आजी पुन्हा बोलायला लागते..
जाऊ दे तुला काही सांगायची गरज नाही हळु हळू तुला सगळं माहिती होईलच .. पणं आता जे सांगत आहे ते अयाक, चल ये माझ्यासोबत स्वयंपाकघरात .. - आजी
जशी आजी स्वयंपाकघरात ये म्हणते मानसी ला मनात विचार येतो आताच तर घरात आली आहे कपडे पणं नाही बदलेले आणि स्वयंपाकघरात .. तिला काही समजत नाही आणि ती मंदा आजीच्या मागे जाते..

आता जे जे सांगत आहे ते सगळ नीट कान लाऊन ऐक - मंदा आजी
आजी तिला स्वयंपाकघरातील सर्व गोष्टी सांगत असतात कुठे काय ठेवलं आहे ते , उद्या काय करायचं आहे ते सांगतात .. सगळ व्यवस्थीत सागितल्या नंतर तिला रूम मध्ये जा म्हणून सांगतात .. आणि तिला दुरूनच रूम दाखवत म्हणतात त्या रूम मध्ये... अजयची आहे तिथेच जा..
मानसी ला काय होत आहे काहीच कळत नसते तिला बधीर झाल्या सारखं वाटत आणि ती आजी ला विचारते
आजी हे काय होत आहे मला काही कळत नाही पणं तुम्ही म्हणालात की हळु हळु माहिती होईल ते ठीक आहे पण स्वयंपाकघरातील गोष्टी का सांगत आहात तुम्ही उद्या राहणार अाहत ना.. तेव्हा पणं सांगु शकत होता आता येवढ्या रात्री सांगायची गरज का ? - मानसी
मी उद्या सकाळी च गावी जाणार आहे , म्हणून आताच सगळ सागितलं तुला उगाच काही कळल नाही कळल म्हणून .. ..
आणि तुला प्रश्न पडल असेल की मी कोण.. तर अस आहे मी अजयला लहानपणा पासून सांभाळलं त्याची आईची तब्येत बरी राहत नसल्याने अजयच्या बाबा नी मला त्यांच्या गावातून  सांभाळण्यासाठी आणल होते त्यांच्या आणि आमच्या घरचे संबंध चागलं असल्याने मी पणं आली होती .. तर जितकी त्याची आई आहे तितकीच मी पणं आहे आणि तो मोठा झाला  शिक्षणासाठी बाहेर गेला म्हणून मी पणं गावी निघून गेली त्याचं लग्न आहे म्हणून आली होती.. जीव होता माझा खूप त्याच्यावर म्हणून आली .. आणि आता माझी मुलं आहेत नातवंड आहेत तर मला इथे नाही करमत .. म्हणून मी गावी राहते.. ठीक आहे.. जा आता तू पणं आराम कर मी पणं झोपते उद्या लवकर उठायचं आहे मला . - आजी  बोलुन झोपायला निघून जातात .. आणि मानसी पणं तिची बॅग घेऊन अजयच्या रूम मध्ये येते अजय झोपला असतो .. मानसी ला आता पणं काही तरी चुकत आहे वाटत पणं उद्या बोलेल म्हणून ती बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलते आणि बाहेर येऊन बाजूच्या सोफ्यावर झोपते..
सकाळ होते मानसी लवकर उठून आंघोळ करून केस पुसत असते तसच अजय उठतो आणि त्याचं लक्ष मानसी कडे जाते  पण तो तिच्याकडे लक्ष न असल्यासारखा बघून न बोलता आंघोळीसाठी निघून जातो .. थोड्यावेळात बाहेर येऊन आरश्यासमोर तयारी करत असतो...
तशीच मानसी अजय ला बोलते..
अजय मला तुमच्या सोबत थोड बोलायचं आहे - मानसी थोडी खांभिर पने बोलते..
काय बोलायचं आहे लवकर बोल मला वेळ नाही - अजय रागात बोलतो .. आणि केस करत असतो..
आता मानसी ला थोड काही काही समजत असते की काही तरी झाल आहे म्हणून हे लोक माझ्यासोबत अशी वागत आहेत .. आता विचारलंच पाहिजे.. इतकं मनात बोलुन मानसी पुन्हा बोलायला सुरुवात करते..
अजय हे काय होत आहे घरची लोक माझ्यासोबत अशी का वागत आहे.. मला काहीही समजत नाही .. आणि कल रात्री मी त्या आजीला विचारली तर त्यानी पणं काही सागितलं नाही .. आणि आज सकाळीच त्या गावी निघून गेल्या..- मानसी
अरे व्वा तुला काहीच माहिती नाही .. नवल आहे तुझ्या बापाने सागितलं नाही तुला काहीही .. - अजय रागात बोलतो
काय सागितलं नाही मला स्पष्ट पने सांगा काय सुरू आहे आणि काय नाही सागितलं माझ्या बाबांनी..- मानसी थोडी आश्चर्य चकित होऊन विचारते..
तुला खरच अयकायच आहे तर आयक .. तुझ्या बापासारखा माणूस नाही पहिला मी आजपर्यंत .. काय मस्त खेळ खेळतो यार खरच मानल पाहिजे.. तुझा भाऊ काही कामधंदा नाही करत माहिती आहे ना तुला .. आणि अचानक बिझिनेस सुरू केला त्याने ते पणं एका महिन्यात .. बापरे .. आणि तुझ्यासारख्या कुरूप आणि काळ्या मुलीचं लग्न लाऊन दिलं  ते ही येवढ्या हँडसम मुलासोबत .. बापरे काय मस्त ना.. म्हणून तो मुनिम आहे मस्त adjustment करतो. -- अजय खूप रागात तुस्ट पने बोलतो..
बघा अजय मला तुम्ही काय बोलत आहात काही कळत नाही आहे प्लीज थोड स्पष्ट बोला .. - मानसी थोडी रडकुंडीला आल्या सारखी बोलते.
अच्छा स्पष्ट बोलू काय ठीक आहे तर अस आहे ,तुझ्या बापाची शहरात सुभाष नगर  जवळ जागा होती.. मला हवी होती बिझिनेस साठी नवीन ऑफिस सुरू करायचा होता तिथे .. म्हणून तुझ्या बापाकडे आलो होतो .. विकता का म्हणून तर तुझा बाप हो म्हणाला .. मला फार आनंद झाला होता .. पणं तुझ्या बापाला माहिती होत की मला त्या जागेची खूप गरज आहे म्हणून त्याने एक शर्त ठेवली की जागा देतो पणं पैसे तर द्यवेच लागतील आणि माझ्या मुलीसोबत लग्न पणं करावं लागेल .. मान्य असेल तर बोला म्हणे.. मला काहीही कळल नाही काय बोलावं पणं ती जागा मला हवी होती म्हणून मी हो मनालो आणि चाळीस लाख रुपये तर दिलेच दिले आणि तुझ्या सारख्या काळ्या कुरूप  मुलीसोबत लग्न पणं केले.. कारण तुझ्या बापाला चागलच माहिती होत की तुझ्यासोबत कोणीही लग्न करणार नाही .. त्याला तुझ्यापासून सुटका हवी होती म्हणून माझ्या गळ्यात बांधले तुला.. मागे तुला तो सरपोदर चा मुलगा पाहायला आला होता कसा होता तो काळा पणं मुलगी गोरी शोधत होत आणि मिळाली पणं त्याला .. आणि तुला पाहताच नाही मनाला होता.. मस्त ना मानल पाहिजे तुझ्या बापाला ... खपवली तुला बरोबर नाही तर मीच काय ह्या जगात कोणीच तुला पसंत केली नसती.. - अजय रागात सगळ बोलुन रूम मधून बाहेर जातो.. मानसी तर पूर्ण पने खचली असते तिला आता स्वतचाच राग येत असतो आणि ती आरश्यासमोर स्वतःला बघून खूप रडत असते.. अजय चे शब्द जणू तिच्या ह्रदयावर घाव केले असावे त्याचे काळी कुरूप बोलणे तिला वारंवार आठवत होते.. तिने जो विचार त्याचा केला होता त्या मधला तो  नव्हता  .. आई चे शब्द जणू तिला खोटे वाटायला लागले होते.. तुझ्या तुझ्या रंगावर नाही तुझ्या मनावर प्रेम करणारा येईल.. आणि ती रडत असते पणं आज तिला समजावून सांगणारी  तिला समजून घेणारी आत्या नसते.. आणि ती रडतच असते आणि अचानक सासूबाई जोरजोरात आवज देतात.. ती धावतच बाहेर येते..
झाल असेल मेकअप करून तर कामाला लागा .. तुझ्या कारणाने माझा अजय उपाशीच गेला .. आणि माझी मुलगी पणं .. जा चहा कर नाष्ता बनव .. - सासूबाई बोलुन त्याच्या रूम मध्ये निघून जातात.. मानसी ला फार दुःख होतो सासूचे बोलण अयकुण .. आणि ती रडत रडतच कामाला लागते.. नाश्ता बनवते , चहा करते आणि सासू सासर्याना नेऊन देते आणि स्वयंपाकाला लागते.. आणि तिला आठवते मंदा आजी आणि ती मनातच म्हणते की ह्या साठी काल त्यानी मला सगळ सागितलं..  . आणि ती विचार करता करतच स्वयंपाक करते..  दुपारी सगळ्यांना जेवन वाढते अजय पण जेवन करायला आला असतो आणि जेवन करुन तो निघुन जातो. ती पण सगळी कामे करून जेवन करते.... पण तिला संध्याकाळ झाली असते.. आणि ती पुन्हा रात्रीचा स्वयंपाकाला लागली असते.. रात्री च जेवण बनून, जेवण वाढून .. देते आणि हे सगळ आवरता आवरता  तिला रात्रीचे  नऊ वाजले असतात पणं अजय आला नसतो.. म्हणून ती त्याची वाट बघत असते आणि काही वेळाने तिला सुध्दा थकल्यासारखे वाटते म्हणून ती पणं जेवण करून झोपायला रूम मध्ये निघून जाते.. अजय रात्री अकरा वाजता येतो आणि तो डायरेक्ट रूम मध्ये येतो.. मानसी झोपलेली असते.. आणि आज ती बेडच्या एका बाजूला झोपलेली असते कारण सोफा लहान असल्यामुळे तिला तिथे झोपता येत नव्हते काल ती कशी तरी झोपली होती.. म्हणून आणि बेड हा डबल बेड असल्याने तो मोठा असतो.. म्हणून ती एका बाजूला झोपली असते.. अजय थोडा दारू पिहून आला असतो.. आणि येऊन तो मानसीच्या बाजूला पडतो.. आणि एकटक तो मानसी ला डोक्यापासून ते पायापर्यंत पाहत असतो.. जणू त्याची पुरुषी नजर तिच्या शरीराला निहारत  असते.. ..
क्रमशः

🎭 Series Post

View all