रूपं ? भाग १७ अंतिम भाग

I am reder I try to something write.. thank you for reding

"जीवनाच्या या वाटेवर अनेक लोक मिळाली....
पण त्यात तू मनाला भाळुन गेली.....
तुझ्यातला खरेपणा, साधेपणा, तुझी निरागसता.. आठवून आठवून प्रेमात पडत गेलो.....
प्रेमाच्या या वाटेवर... तुझ्यात अडकत गेलो..

जशी काळ्या रात्रीत चांदनी दिसते शोभूनी... तशीच तू माझ्या आयुष्यात दिसतेस शोभूनी...
तूच आहेस प्रीत माझी... तूच आहेस गीत माझे..
प्रेमाच्या या वाटेवर.. शब्द वीणा सुचलेले गीत आहेस..

जशी समुद्राला वाट असते किनाऱ्याची.. तशीच वाट मला होती तुझी..
प्रेमाच्या या वाटेवर.. वाट तुझीच होती... वाट तुझीच होती वाट तुझीच होती..............."
.............
Happy Birthday... My beautiful wife... And my love....
बापरे... साहेबांना .. कविता पणं येते करता.. मला तर माहितीच नव्हते... - मानसी..
हो तर वाचन प्रेमी आहे मी.. पणं आज वाटल काही दोन ओळी बायको साठी लिहाव्या.. म्हणून पहिल्यांदा काही स्वतः हून थोड  शब्ध मांडण्याचा प्रयत्न केला.. आवडली नाही काय तुला कविता.. - विवेक जरा नाराजीच्या स्वरात बोलतो....

मानसी विवेकची वाट पाहत बाल्कनीत रात्रीच्या वेळी उभी असते.. आणि थोडी नाराज पणं असते..  कारण विवेक रात्री उशिरा आला होता म्हणून आणि  उद्या मानसीचा birthday होता तर तिला त्याने रात्री बारा लाचं wish कराव अशी इच्छा होती  म्हणून... 
पण विवेक ला अर्जंट मीटिंग मध्ये जावं लागलं त्यामुळे त्याला घरी यायला उशीर झाला होता ... आणि तो रात्री बारालाच घरी आला होता..
विवेक ला माहीत असत मानसी नाराज असेल.. म्हणून तो हळुच रूम मध्ये येतो... आणि मानसीला मागून येऊन मिठी मारत  हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवत तिच्या साठी कविता म्हणतो..
तो रूम मध्ये येतो तेव्हा मानसीला त्याच्या येण्याची चाहूल लागली असते.. तरी सुद्धा ती बाल्कनीत तोंड फुगऊन बसली असते.. पणं विवेकच्या कवितेने तिची नाराजगी दूर झाली असते.. पणं तस ती दाखवत नाही...

साग ना मानसी आवडली नाही काय कविता..  - विवेक आतापन मानसीला मिठी मारून असतो आणि तिला लहान चेहरा करून विचारत असतो..
मानसी थोड भाव खात काहीच बोलत नाही... आणि बाहेर बघत असते..
सॉरी अगदी मनापासून सॉरी ... पण खरच मीटिंग खूप इंपॉर्टन्ट होती म्हणून... गेलो... - विवेक
आता तो इतका सॉरी म्हणत आहे म्हणून मानसी ला कस तरी होत आणि ती त्याचं काम कस आहे हे जाणून होती म्हणून ती पणं जास्ती वेळ नाराज न राहत मागे फिरून त्याच्या गळ्यात हात घालुन.. नजरेत नजर मिळून.. बोलते...
अप्रतिम.. खूप सुंदर my handsome husband.. and my life...
Thank you so much.  - मानसी इतकं बोलुन ती विवेकच्या डोळ्यात हरवून जाते आणि फक्त त्याला सुंदर स्मिथ करत बघत असते...
तसच विवेक तिची तंद्री तोडत म्हणतो... मॅडम मी केक आणला आहे तो कट करू काय.. नाही तर तो असच वितळून जाणार..
तशीच मानसी तिच्या तंद्री तून बाहेर येते  आणि विवेकच्या गळ्यातून हात काढून बोलते...
सॉरी सॉरी ते मी ... - मानसी थोडी ओशाळल्या  सारखी होते आणि लाजून ती रूम मध्ये येते...
तसच विवेक पणं स्मिथ करत रूम मध्ये येतो.. आणि तिला लाजलेल पाहून थोड हसतो आणि विषय बदलत बोलतो..
मी पिल्लू ला घेऊन येतो.. आईच्या रूम मध्ये झोपली ना ती.. नंतर केक कट करू...- विवेक
नाही नको असु द्या उशीर झालं आहे आणि ती झोपली आहे .. उगाच उठेल आणि रडेल .. आणि आई बाबांची पणं झोप मोड होईल .. उद्या भरवु तिला केक आता असु द्या..
Ok -  विवेक
तसच विवेक केक घेऊन बाल्कनीत येतो आणि मानसीला पणं बोलवतो... आणि दोघेही बाहेर झोपाळ्यावर बसून केक कट करून एकमेकांना भरवतात... तसच मानसीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येतात...
काय झालं आवडला नाही काय केक...? - विवेक
काही पणं काय तुम्ही पणं.. केक खूप छान आहे - मानसी
मग काय झाल रडत का आहेस - विवेक
आज पहिल्यांदा आयुष्यात केक कट केला... कधी कोणीच इतक्या प्रेमाने काहीही माझ्यासाठी सेलिब्रेट नाही केलं - मानसी
प्लीज मानसी आता सगळ विसर मी आहे ना आता ... तर आत्ता प्रत्येक गोष्ट मला तुझ्यासाठी करायची आहे ... - विवेक
बरं... नाही रडत.. असो तुम्हाला भूक लागलेली असेल..
तुम्ही बसा मी इथेच जेवण घेऊन येते.. - मानसी
तसच विवेक तिचा हात पकडुन तिला थांबवत म्हणतो..
मी आलो आहे जेवण करून - विवेक
काय आले आहात.. सागायला पाहिजे ना मग.. बर ठीक आहे रात्र खूप झाली आहे दमला असाल झोपा आता - मानसी
तसच विवेक तिचा हात पकडुन तिला झोपाळ्यावर बसवत बोलतो..
आज तुझ्यासाठी आणि माझ्या साठी पण खूप सुंदर रात्र आहे आणि मला फक्त तुला पाहायच  आहे... ह्या रात्रीत ... इतकं बोलून तो  तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि  बोलतो...
तुला माहिती आहे आज तू माझ्या आयुष्यात आहेस कारण फक्त त्या एका व्यक्ती मूळ जर ते नसले असते... तर तू मला लग्नाला कधीच होकार दिला नसता...
तशीच मानसी त्याच्या केसात हात फिरवत बोलते...
हो बरोबर आहे तुमचं आणि त्यांच्याच मुळे मला माहेर आणि सासर दोन्ही मिळाले... - मानसी
इतकं बोलून दोघेही त्यांच्या भूतकाळात विचारात हरवतात.. कसे दोघेही एक झाले...
***********
मानसी आता तुला सगळ कळल आहे ... बघ अजय ने इतकं सगळ करून सुध्दा त्याने लग्न केलं आणि पुढे निघाला... आणि त्याला त्याच्या कर्माची फळ सुद्धा मिळाली ... आणि त्यालाच नाही तर त्याच्या आईवडिलांना देखील ...
आणि तू मात्र तिथेच अडखून आहेस ... मानसी प्लीज होकार देऊन दे ग लग्नाला... - आरती मानसीला समजावत बोलते..
आरती हो त्याला मिळाली त्याच्या कर्माची फळ .. पणं मला नाही करायचं लग्न मी आनंदी आहे ... आणि आता तो विषय बंद कर आरती ... झाल आता खूप.. - मानसी इतकं बोलुन ती आपल्या कामाला लागते...
आरती पणं तिला समजाऊन थकली असते... म्हणून ती पणं आता जास्ती काही न बोलता आपल्या घरी निघून जाते...
दोन तीन आठवडे आरती मानसीला काहीच बोलत... नाही आणि स्वतः जाऊन विवेक आणि त्यांच्या आई वडिलांना मानसी काय म्हणत आहे म्हणून सांगते..
आणि त्यांना विश्वास शिंदे बद्दल पणं सांगते त्यांनी जे सागितलं सगळ ती विवेक आणि त्यांच्या आईवडिलांना सांगते..
विवेक तर सगळ अयकुंन कधी मानसीच्या बोलण्यावर भाऊक होतो तर अजय च नाव आयकूंन रागही येतो.. पणं तो सगळ शांत पने अयकुन घेतो.. आणि म्हणतो..
असु द्या आरती ताई... जर त्यांची इच्छा नसेल तर आपण त्यांना फोर्स नाही करत... सोडा आता तुम्ही पणं - इतकं बोलुन विवेक नाराजितच आपल्या रूम मध्ये जायला निघतो... तसेच त्यांचे वडील म्हणतात...
एक मिनिट विवेक... - विवेकचे बाबा..
तसच विवेक थांबतो... आणि प्रश्नार्थक नजरेने त्यांच्या कडे बघतो...
आधी बस मी काय म्हणते... अयकुंन घे - विवेक चे बाबा
विवेक ला तर काहीच इच्छा नसते आणखी काही बोलायची पणं बाबांचं अयकुंन घ्यावं म्हणून तो पुन्हा सोफ्यावर बसतो आणि म्हणतो..
काय झालं बाबा.. - विवेक
आधी शांत पने अयकुन घे नंतर विचार कर आणि साग मला.. इतकं बोलुन ते बोलायला सुरुवात करतात..
मी काय म्हणतो जर.. आपण जाऊन विश्वास शिंदे यांना भेटलो तर ते समजूत काढतील मानसीची .. ती त्यांना आपल भाऊ मानते तर ती नक्की त्यांची गोष्ट आयकेल.. - विवेक चे बाबा..
जसे ते सगळ्यांना सुचवतात विश्वास यांच्या बद्दल तर सगळ्यांना त्याचं म्हणेणे पटल असते.. विवेक तर खूपच खुश झाला असतो... आणि ते आजच आपण त्यांना भेटू म्हणून म्हणतो... तसेच सगळे त्याच्या गोष्टीवर सहमती दर्शवत.. होकार देतात.. आणि आरती तसच विश्वास यांना कॉल करून कडवते की ते आज येणार आहेत म्हणून आणि ते पणं आरतीला अॅड्रेस पाठवतात.. आणि या म्हणतात..
आरती पणं आनंदी होऊन घरी निघून जाते... घरी आल्या आल्या ती ही बातमी आपल्या नवऱ्याला म्हणजे भूषण ला देते.. तो पणं फार खुश होतो.. आणि म्हणतो..
पण आरती मानसी ताई ला कस नेणार ती तर विवेक च नाव आयकुन यायला नकार देईल.. - भूषण
त्याचं टेन्शन नको घ्या मी सगळ प्लान केला आहे तिला कसं न्यायचं आहे तर.. - आरती..
बरं ठीक आहे तू जा आणि मानसी ताई ला यायला तयार कर मी गाडी सागून येतो.. - भूषण
अहो असु द्या विवेकजी नी पाठवली आहे गाडी तुम्ही फक्त तयार व्ह्या मी येते मानसीच्या घरून.. - इतकं बोलुन आरती  मानसी कडे येते.. मानसी आताच कंपनी मधून आली असते आज शनिवार असल्या कारणाने मानसी आज घरी लवकर आली असते...आल्या आल्या ती घरातील आवरा आवर करत असते.. प्राची पणं शाळेतून आली असते.. तशीच आरती तिच्या कडे येते..
मानसी आहेस ना घरात..- आरती
हो आहे ना.. ये ... आणि काय आरती मॅडम कशी काय आज ह्या वेळेवर इकडे.. - मानसी थोडी हस्त बोलते..
तुला काही सगायच होत.. म्हणून आली - आरती जरा नाराजित असल्यासारखी बोलते.. (पणं खर तर ती नाटक करत असते.. )
का काय झालं आरती तू का इतकी नाराज आहेस आणि काय सांगायचं होत - आरती जरा काळजीत बोलते..
अग ते ह्यांची ना नोकरी गेली ग.. - आरती इतकं बोलुन रडायला लागते..
तशीच मानसी तिच्या जवळ येते.. आणि काळजीने तिला म्हणते... काय नोकरी गेली पणं कशी काय .. काय झाल मला नीट साग आणि आधी रडण बंद कर - मानसी
मला नाही माहिती कशी काय आणि हे ही  मला काही सांगत नाही आहेत फक्त ते दादा आले होते ना विश्वास शिंदे त्यांना भेटायचं आहे म्हणतात... ते वकील आहेत ना म्हणून - आरती आता पणं रडत रडत सांगत असते...
आरती तू आधी शांत हो बर ... सगळ नीट होईल आपण बोलू विश्वास दादा सोबत.. - मानसी
बोलू नाही मानसी आजच जायचं आहे म्हणत आहेत हे त्यांना भेटायला.. म्हणून तुझ्या कडे आली होती - आरती
काय आजच भेटायचं आहे.. पणं आज .. बर ठीक आहे मी तुला अड्रेस देते तुम्ही जाऊन या.. - मानसी
मानसी मला माहिती आहे ग अड्रस त्यांनी दिला होता ना मागे तेव्हा मीच नोट केला होता.. पणं माज एकच म्हणणे आहे तू आली असती सोबत तर बरं झालं असत - आरती
काय मी येऊ सोबत ... - मानसी
हो मानसी बर दिसेल ग.. तू आली तर आणि तू तर त्यांना ओळखते आम्ही तितके जास्ती नाही ओळखत म्हणून -
यावर मानसी थोडा विचार करते.. आणि जायला तयार होते...
तशीच आरती खूप खुश होते आणि घरी निघून येते..
आणि आल्या आल्या भूषण ला कल्पना देते की काय करायचं आहे म्हणून.. ते पणं थोडे हसतात.. आणि होकार देतात..
काहीच वेळात ते सगळे रेडी होऊन विश्वास यांच्या घरी जाण्यास निघतात..
आरती विवेक ला कॉल करून कडवते की तुम्ही पणं निघा म्हणून .. आणि इकडून विवेक पणं आपल्या आई वडिलांना घेऊन विश्वास याच्या घरी जाण्यास निघतात..
काहीच वेळात दोन्ही गाड्या विश्वास यांच्या घरी पोहचतात..
मानसी तर तिथे विवेक आणि विवेकच्या आई वडिलांना बघून शॉक होते.. आणि हळुच  आरती ला म्हणते..
आरती हे काय करत आहेत इथे - मानसी
आरती पणं थोड हस्ते.. आणि जरा बिचकत बोलते..
मला काय माहिती ग काय करत आहेत ओळखत असतील ते यांना.. आता इतके मोठे अधिकारी आहेत तर असेलच ओळख आपल्याला काय चल आपण आत जाऊ.. - आरती
मानसी पणं जास्ती काही न विचारता आत मध्ये जाते..
आत मध्ये विश्वास यांनी खूप सुंदर सगळ्यांचं स्वागत करतात.. त्यात त्यांची बायको असते.. दोन मुलं असतात.. त्यांचे भाऊ आणि त्यांची भावाची बायको पणं असते.. सगळे मानसीला बघून खूप आनंदी होतात..
या या सगळे तुमचीच वाट पाहात होतो..  - विश्वास
नमस्कार - विवेक चे बाबा
नमस्कार - विश्वास
मानसी जाऊन विश्वास यांना मिठी मारते.. ते पणं मानसीला मिठी मारतात..
तसेच विश्वास सगळ्यांना मानसीची ओळख करून देतात.. आणि बाकी सगळ्यांची पण
काहीच वेळात.. सगळे बसले असतात.. चहा नाश्ता झाल्यावर आरतीच मुद्द्याला हात पकडून बोलायला सुरुवात करते ...
आणि विश्वास यांना विवेक बद्दल ओळख करून देते.. त्यांना मानसी आणि विवेकच्या लग्नाबद्दल सांगते ..
तशीच मानसी जरा जोरात बोलते..
आरती काय आहे हे तू मला या साठी इथे आणल आहेस.. - इतकं बोलुन मानसी रागातच उठून उभी होते..
तसेच विश्वास मानसीला शांत करत म्हणतात..
मानसी आधी तू शांत हो बर आधी आपण बोलू नंतर काय ते बघू - विश्वास
नाही दादा मला नाही बोलायचं आहे आता काहीच - मानसी इतकं बोलुन बाहेर आपल्या मुलीला घेऊन निघत असते..
तसच विश्वास तिला हात पकडून खाली सोफ्यावर बसवतात आणि म्हणतात..
मानसी मला आरती ने आधीच विवेक बद्दल मोबाईल वर कळवल होत म्हणून मीच तिला हा प्लान करायला लावला.. आणि तुला इथे घेऊन यायला सांगितलं.. आता तू आधी माज शांत पने अयकुन घे नंतर काय ते विचार कर.. - विश्वास..
मानसी जरा नाराज असते आणि ती फक्त आरती कडे रागात बघत असते.. आणि विश्वास यांना म्हणते..
दादा जर आरती ने सगळ सागितलं आहे तर माझा डिसिजन पणं सागितलं असेलच - मानसी
हो सागितलं आहे पणं आता मी काय म्हणते ते अयकुन घे जरा.. इतकं बोलुन ते सरळ मुद्द्यावर येतात आणि म्हणतात
बघ मानसी मला तू जर मोठा भाऊ मानत अशशिल तर तू विवेक यांना आपल्या आयुष्यात जागा दे.. मला माहिती आहे तुला लग्नाला घेऊन खूप वाईट अनुभव आहे .. पणं सगळेच अजय सारखे नसतात.. मानसी काही विवेक सारखे पणं असतात.. आणि आता जर काही झाल तर तुझ्या पाठीशी तुझा हा मोठा भाऊ आहे.. हे लक्षात ठेव.. किती दिवस अशी एकटी जगणार आहेस .. आणि हो तू जगशील ही  .. पणं त्या चिमुकली च काय तिला तर आहे ना गरज बापाची तू किती ही म्हणालीस तरी तिला वाटेलच मला सुद्धा बाबा मिळो.. मानसी मी काहीही जास्ती बोलत नाही मला माहिती आहे तू समजदार आहेस तुला चागलं वाईट कळत .. पणं मला विवेक आणि त्यांच्या कुटुंबावर विश्वास आहे ते तुला आनंदी ठेवतील..
मला सुद्धा वाटत मानसी तुझ चागलं ह्याव .. अजय ने जे प्रेम तुला नाही दिलं ते तुला मिळो.. खूप सहन केलस मानसी.. आता आणखी नाही .. आज पासून तू माझ्या घरची मुलगी आहेस माझी बहिण आहेस मंदा आई ची मुलगी.. आणि आता हे तुझ माहेर आहे .. आणि मी तुझा मोठा भाऊ आहे जो नेहमी तुझ्या सोबत असेल.. - विश्वास
इतकं आयकल्यावर मानसीला भरून आलं असते.. आणि ती तशीच घडाघडा रडायला लागते.. तसेच विश्वास तिला मिठी मारतात.. आणि म्हणतात.. आता आहे ना माझी लहान बहीण लग्नाला तयार..
तशीच मानसी जरा लाजून मनेनेनच होकार देते..
तसेच विश्वास आपल्या बायकोला तोंड गोड करा म्हणून सांगतात..
त्यांची बायको पणं आनंदात लाडू घेऊन येते... तशीच प्राची जिला काहीही कळल नसते.. पणं सर्व खूप आनंदी आहेत म्हणून ती समोर येऊन म्हणते..
मीच भरवणार सगळ्यां लाडू.. - प्राची
तसेच सगळे खदखदून हसायला लागतात... आणि प्राची सगळ्यांना आनंदात लाडू भरवते...
..........
काहीच दिवसात... दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने मानसी आणि विवेक च कोर्ट मॅरेज होते.. आणि विवेक प्राचिला लिगली अपणवतो... प्राची पणं आधी विवेक शी नाराज असते.. की ते इतके दिवस त्यांच्या सोबत नव्हते म्हणून पणं नंतर तिला बाबा मिळाले म्हणून खूप खुश असते...
............

वर्तमान...
दोघेही विचारातून बाहेर येतात...
विवेक रात्र खूप झाली बाहेर थंडी पणं वाढली आहे आत चला - मानसी इतकं बोलुन उठत असते...
तसच विवेक तिचा हात पकडुन थांबवता आणि स्वतः उभा होऊन मानसीच्या खूप जवळ येतो..
मानसीला त्याचं अस जवळ  येणे आवडत पणं तस ती  दाखवत नाही.
आणि थोडी लटक्या रागात म्हणते..
काय आहे विवेक झोप नाही आली काय - मानसी
नाही झोप तर उडाली आहे..- विवेक आणखी तिच्या जवळ येऊन बोलतो आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो..
मानसी तर लाजून चूर झाली असते.. तिचं अस लाजन विवेक ला आणखी खुश करत असते...
विवेक हळुच  तिच्या हनुवटी वर करतो आणि मानसीच्या डोळ्यात बघतो.. त्यात त्याला फक्त त्याच्या साठी असलेलं प्रेम दिसत ... मानसी पणं विवेकच्या डोळ्यात बघते.. आणि
दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात.. आणि केव्हा दोघेही एकमेकांच्या खूप जवड येतात.. आणि  दोघांचे ओठ एकमेकात केव्हा  गुंतत जातात.. त्यांना कळत नाही ...  आणि दोघेही आज एकमेकांमध्ये खरया अर्थाने पतिपत्नी झाले असतात.. कारण गेली गेली दहा महिने विवेक ने मानसीला स्पर्श केला नव्हता.. जेव्हा पर्यंत ती स्वतः त्याला मनातून अपणवत नाही तेव्हा पर्यंत तो तिला हात सुद्धा लावणार नाही अस ठरवल होत.. पणं आज मानसीने त्याला मनाने तर अपनवलच होत आणि आज शरीराने सुद्धा..
*****************""
मानसी जिला खूप समजून घेणारा व्हेक्ती हवा होता एक प्रेमाचा स्पर्श हवा होता.. तिच्या इच्छेनुसार तो आज तिला मिळत होता ... ....
.......
समाप्त...

🎭 Series Post

View all