रूप ? भाग १६

I am reader I try to something write

मानसी हे काय आहे तू का नकार देत आहेस लग्नाला .. मला कळतच नाही आहे... इतका चागलं मुलगा आहे आणि  त्याच्या कुटुंबातील लोक पणं छान वाटली .. तुला तुझ्या भुतकाळा सोबत स्वीकारायला तयार आहेत .. मग का नकार देत आहेस..
मानसी.. आजच्या जगात फार कमी लोक असतात जे एखाद्या मुलीला तिच्या भुतकाळा सोबत स्वीकारतात..- आरती मानसी ला थोड रागात तर थोड समजावत बोलत असते..
आरती प्लीज मी तुला आधीच सागितलं आहे मला लग्न नाही करायचं आहे .. आता तो विषय बंद प्लीज - मानसी जरा रागातच बोलते आणि भाजी चिरायला घेते..
पण का नाही करायचं आहे लग्न.. हे तर साग .. आणि आज तुला सागावच लागेल गेली एक महिना तू हेच म्हणत आहेस मला लग्न नाही करायचं .. - आरती
तुला अयकायच आहे मला लग्न का नाही करायचं आहे तर आयक् आता... - मानसी पणं जरा आवाज चढून बोलते..
आणि बोलायला सुरुवात करते..
आरती मला आता भीती वाटते ग लग्नाची .. पुन्हा नवीन संसार उभा करायची .. माझ्यात नाही आहे आता इतकी हिम्मत की मी नवीन नाती नवीन लोक सांभाळु .. त्यात इतका वाईट अनुभव आहे लग्नाला घेऊन की आता पुन्हा त्यात पडायची ताकद नाही माझ्यात.. कशी बशी मी त्यातून बाहेर पडली आता नाही जायचं त्यात मला पुन्हा .. मी आनंदी आहे माझ्या मुली सोबत.. - मानसी जरा रडत समजावत बोलते......
इतकं आयकल्या नंतर आरतीच्या पणं डोळ्यातून अश्रु बाहेर येतात.. आणि ती मानसी जवळ येऊन तिला मिठी मारते.. आणि थोडा धीर एकटाऊन .. पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करत बोलते..
मानसी मी समजू शकते ग .. तुझी भीती पणं ह्या जगात सगळेच पुरुष सारखे नसतात.. काही विवेक जी सारखे पणं असतात.. ज्यांच्या साठी रंग, रूप सुंदरता या पलिकडे पणं एक सुंदर मन आणि निस्वार्थ भावना बघणारे ... आणि तुला खर सांगू मानसी विवेक जी ते पुरुष आहेत जे तुझ्या रंग रूपा वर प्रेम करणारे नाहीत तर तुझ्या मनावर प्रेम करणारे आहेत .. आणि त्यांचं प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसत मानसी..
जशी आरती बोलते की तुझ्या रंगा रूपा वर नाही तुझ्या मनावर प्रेम करणारे आहेत तशीच मानसीला ला तिच्या आई चे शब्द आठवतात.. तुझ्या रंगा वर नाही तुझ्या मनावर प्रेम करणारा व्यक्ती मिळेल .. आणि तिच्या डोळ्यातून अश्रु निघतात.. ..
असच बोलता बोलता तेव्हाच दराची बेल वाजते... आणि आरती दार उघडायला जाते..
आत येऊ काय ? - एक पुरुष
हो या पण आपण कोण ? - आरती
तशीच मनासी आरती ला विचारत किचन बाहेर येते..
आरती कोण आहेत ग ? - मानसी
मी विश्वास शिंदे.. - तो पुरुष
विश्वास शिंदे.. मी ओळखले नाही तुम्हाला.. - मानसी जरा बिचकत न ओळखत असलेला व्यक्ती सोबत जसे बोलतो तशी बोलत असते...
हो तुम्ही मला नाही ओळखत पण मी ओळखते तुम्हाला.. - विश्वास शिंदे..
मानसी आणि आरती एकमेकांकडे जरा प्रश्नार्थक नजरेने बघतात...
अरे सांगतो सांगतो सगळ सांगतो आधी मी बसू काय इथे .. आणि मला एक ग्लास पाणी मिळेल.. - विश्वास शिंदे जरा स्मिथ करत बोलतात..
हो हो बसा ना मी पाणी घेऊन येते..- मानसी पणं थोड चाचरत बोलते आणि पाणी घेऊन येते..
विश्वास शिंदे पणं बसून पाणी पितात... आणि.. मानसी आणि आरती ला पणं बसायला सांगतात आणि बोलायला सुरुवात करतात..
मानसी आणि आरती पणं बाजूच्या खुर्चीवर वर बसतात आणि प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्या कडे ते काय बोलतायत ते आयकण्यासाठी आतुर असतात..

हा तर मी आहे विश्वास.. मंदा आजी चा  मुलगा.. - विश्वास
जसे ते सांगतात की ते मंदा आजी चा मुलगा आहेत तशीच मानसी आश्चर्य चकित होऊन त्यांच्या कडे बघते आणि ती बोलतच असते तशेच ते तिला बोलू न देता स्वतचं बोलतात..
हो हो मला माहिती आहे तुम्हाला आश्चर्य होत असेल मी इथे कसा आणि मला इथला पत्ता कोणी दिला.. बरोबर.. सगळ सांगते तुम्ही आधी शांत पने आयकुंन घ्या..
मानसी ताई मला सगळ कळल आहे अजय आणि त्यांच्या आई ,वडील  कशे वागले .. खरच मला पणं आधी विश्वास नाहीच झालं की इतके शिकले सवरली माणस अशी वाघतिल पणं काय आहे ना माणूस कितीही शिकला पणं जर त्याने कधी बदल करण्याचे प्रयत्न नाही केला तर त्याच्या शिकण्याचा काहीच अर्थ नसतो... असो सोडा ते त्यांनी जे केल त्यांची शिक्षा नियतीने बरोबर दिली.. - विश्वास..
काय !..  शिक्षा मिळाली ... मला कळल नाही दादा .. काय झाल आहे मला नीट सागा ना प्लीज - मानसी जरा बिचकत बोलते..
हो हो सांगते तुम्ही जरा शांत व्हा आधी.. - विश्वास इतकं बोलुन सांगायला सुरुवात करतात..
ताई जेव्हा तुम्ही ते घर सोडलं त्याच्या सहा महिन्याने अजयच्या आई वडिलांनी अजय च एका सुंदर आणि श्रीमंत घरच्या मुलीसोबत लग्न लाऊन दिलं.. आम्ही ही गेलो होतो लग्नाला.. पणं मंदा आई नव्हती आली.. तेव्हा आई ने तुमच्या प्रती आम्हाला कल्पना दिली होती पण मला वाटल काही झाल असेल .. म्हणून आम्ही पणं काही जास्ती विचार न करता.. लग्नाला गेलो.. आणि परत आलो.. आल्यावर आई ने आम्हाला सगळ सागितलं की अजय ने तुमच्या सोबत का लग्न केलं म्हणून.. तेव्हा कळलं की काय झाल असेल तरी सुद्धा पूर्ण माहिती नव्हती माझ्या कडे.. म्हणून आई ने मला तात्काळ तुमच्या माहेरी पाठवलं पणं तिथे गेल्यावर त्यांना सुद्धा काहीही माहिती नव्हत तुमच्या बद्दल म्हणून मी घरी परत आलो.. खूप माहिती काढण्याच्या प्रयत्न केला आई ने तुमच्या बद्दल... आणि जाऊन अजय ला आणि अजयच्या आई वडिलांना देखील तुमच्या बद्दल विचारल त्यांना सुद्धा काहीही माहिती नाही म्हणून सागितलं...  आणि आई ने त्या वेळी अजय ला खूप काही बोलली आणि खूप भांडण केलं.. आणि त्याच भांडणात त्यांची आई म्हणाली..
मंदा आई ला.. सुद्धा तू कोणी नाही आमची आणि तिचा पणं अपमान करून घरून हाकलून टाकल.. त्या दिवसानंतर आई ने कधी ही त्या घरात पाऊल टाकलं नाही ना आम्ही..
एक दिवस असच मला कॉल आला की अजय चे वडील अचानक हृदयाच्या धक्याने वारले.. मंदा आई ने जाण्यास नकार दिला तरी सुद्धा मी गेलो बाबांचे खूप चागले मित्र होते म्हणून... आणि अंतीमसंस्कर करून घरी परतलो.. त्यानंतर पुन्हा एकदा बातमी आली की अजयच्या आई ला लखवा मारल.. तर त्यांच्या मध्ये त्यांनी आपला शरीराची डावी बाजू हरपून बसले.. आणि ते ना चालू शकत आता ना बरोबर बोलू शकत.. - विश्वास शिंदे..
बापरे इतकं सगळ झाल ... आणि होणार ही का नाही जर तुम्ही दुसऱ्यांचा वाईट केलं तर आज ना उद्या तुम्हाला त्याची शिक्षा नक्की मिळते... हे मात्र सिद्ध झालं.. - आरती थोडी रागात तर थोडी खुश होत बोलते...
पण दादा मंदा आजी कुठे आहेत मला भेटायचं आहे.. - मानसी डोळ्यात अश्रू आणून विश्वास यांना विचारते..
ताई मला माहिती आहे तुम्हाला भेटायचं असेल पणं काय आहे ना आता त्या ह्या जगात नाहीत.. त्यासाठीच मी आलो आहे .. आई ने मला खूप विश्वासाने म्हणाली की जेव्हा मी ह्या जगात नसेल तेव्हा माझ्या ह्या हातातल्या पाटल्या मानसी ला जेव्हा कधी भेटशील तर देशील.. म्हणून फक्त ह्या देण्याकरिता मी आलो होतो.. - विश्वास
जसे विश्वास सागतात मंदा आजी नाहीत तशीच मानसी घडाघडा रडायला लागते.. आरती तिच्या पाठीवर हात ठेऊन तिला शांत करत असते.. 

ताई तुम्ही शांत व्हा आधी जे झाल ते झाल आई च वय पणं झाल च होत.. पणं आता तिने जे तुम्हाला तिची आठवण म्हणून दिलं आहे ते स्वीकार करा... - विश्वास पाटल्या देत बोलतात...
दादा मला नको आहे हे.. तुम्ही इथपर्यंत आले तेच खूप झाल.. आणि मंदा आजी ने जितकं माझ्या साठी आटापिटा केला तितकच खूप आहे... मला नाही हवं आणखी काही..- आरती नम्र  पने बोलते...
ताई हे मी नाही देत आहे फक्त जी आई ची आखरी इच्छा होती ती पूर्ण करत आहे बस.. आणि मला वाटल पणं न्हवत की आपली कधी भेट होईल .. पणं ह्या आरती ताईच्या आई कडून तुमचा पत्ता मिळाला.. मला कामानिमित्त तुमच्या माहेरी गेलो तेव्हा यांचे वडील आणि आई मला भेटले तेव्हा त्यांनी मला गुपचूप सागितलं.. आणि कोणाला पणं नको सागा म्हणून वचन बद्ध पणं केलं... पण मला तुम्हाला भेटायचं होत आणि आईची इच्छा पणं पूर्ण करायची होती म्हणून आलो... आता तुम्ही ... नाही नको म्हणा घ्या ह्या पाटल्या ... -  विश्वास पुन्हा पाटल्या देत बोलतात..
आरती मानसीला धीर देते आणि पाटल्या घ्यायला सांगते.. मानसी च पणं आता नाईलाज झाल्याने आणि विश्वास यांनी खूप आग्रह केल्या ने ती त्या पाटल्या स्वीकार करते...

तशीच प्राची जी बाहेर खेळत असते ती घरात येते.. आई आई करत..
तसेच विश्वास तिला बघतात.. ती दिसायला मानसी सारखीच असते.. त्यांना वाटते की मानसी ने दुसर लग्न केलं आणि त्यांचीच ही मुलगी आहे म्हणून ते तिला विचारतात..
ताई तुमचे मिस्टर कुठे आहेत .. - विश्वास..
जसे ते तिला मिस्टर कुठे आहेत विचारतात तशीच मानसी त्यांच्या कडे अवाक होऊन पाहतच राहते.. आणि खूप धीर एकटून बोलते.. दादा मी लग्न नाही केलं.. - मानसी
तसेच विश्वास आश्चर्य चकित होऊन विचारतात.. तर ही मुलगी अजयची आहे.. - विश्वास
मानसी पणं थोड स्वतः ला खंबीर करत बोलते... नाही ही फक्त माझी मुलगी आहे फक्त माझी.. - मानसी
पण विश्वास सगळ समजून जातात.. आणि ते म्हणतात..
काय केलं अजय तू.. इतकी गोड मुलगी आणि बायको सोडला तुने.. फक्त रंग काळा आहे म्हणून .. लोक  हसतात.. म्हणून खरच कीव येते रे तुझ्या वर खरच... जो स्वतच्या मुलीला तिच्या रंगावरून नाकारतो.. - विश्वास..
असो दादा मी चहा करते.. तुम्ही बसा.. - मानसी...
तशीच आरती आत मधून बाहेर येत बोलते तू बस मानसी चहा झाला आहे.. घ्या दादा.. - आरती स्मिथ करत चहा देते...
ताई एक बोलू तुम्हाला.. - विश्वास
हा बोला ना.. - मानसी
अजय ने आणि त्यांच्या आई वडिलांनी इतक्या गोड मुलीला स्वीकारला नाही ... पण खरच देव बघतो सर्व .. आज कळलं मला ज्या घराणे ह्या मुलीला आणि तिला जन्म देणाऱ्या आई आणि स्वतच्या रक्ताला नाही स्वीकारलं.. तिथे त्या दिवसा नंतर कधीच पाळणा हलला नाही .. सहा वर्ष झाली अजयच्या लग्नाला पणं तो कधीही बाप होऊ शकणार नाही अस डॉक्टर म्हणाले.. एका अॅक्सीडेन्ट मध्ये  अजय ने बाप बनायचं सैभाग्य  हरवलं.. - विश्वास..
मानसी ला तर शॉक बसतो.. आणि ती काही बोलणार तेव्हाच तिला ती रात्र आठवते.. जेव्हा अजय ने स्वतच्या मुलीला काळी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता.. आणि घराबाहेर काढलं होत... आणि ती आठवण करून जरा शांत होते..

चला ताई निघतो मी .. - विश्वास..
दादा थांबा ना.. मी स्वयंपाक केला आहे जेवण करून जा.. - मानसी
नाही ताई आता नको नंतर कधी तुझी भेट झाली आणि आईची ईच्छा आज पूर्ण झाली तेच खूप झाल.. हा घे माझा नंबर .. कधी गरज पडली तर हक्काने फोन कर.. दादा म्हणालीस ना.. तर भावा ला विसरू नको.. - विश्वास..
जसं ते तिला भाऊ आहे तुझा अस म्हणतात.. तसच मानसीला प्रदीप ची आठवण होते ज्याने तिला कधीच बहीण म्हणून स्वीकारलं नाही.. आणि तिला गयवरुन येत आणि ती विश्वास यांना घट्ट मिठी मारते..
ते पणं तिला घट्ट मिठी मारतात आणि प्राची ला खाऊ साठी काही पैसे देतात.. मानसी नको म्हणत असते तरी सुद्धा.. आणि ते प्राची च थोड लाड करून आपल्या प्रवासाला निघतात...

क्रमशः

🎭 Series Post

View all