Jan 19, 2022
नारीवादी

रूप ? भाग १४

Read Later
रूप ? भाग १४

मला वाटल नव्हत मानसी अजय इतका नीच आणि वाईट माणूस असेल अरे त्याला घटस्फोट घ्यायचा होता तर दुसऱ्या दिवशी बोलयचा ना रात्री कोण एकट्या बाई ला घराबाहेर काढत . आता तू काळजी नको करू तू आता इथेच रहायचं माझ्या जवळ . - आरती
मानसी आरतीच्या गळ्यात बिलगून रडत असते . जवळच तिची मुलगी पाडण्यात झोपली असते .
आरती तू मला भेटली नस्तीस तर काय झालं असतं ग माझं कुठे गेली असती ग मी भीती वाटते होती की पुन्हा कोणी मला तिथेच त्याचं जागेवर नेल तर मला पुन्हा त्या मुलीसारखी व्यक्ती मिळालेली असती काय ? .  - मानसी हुंदके देत आरती जवळ रडत असते आणि काय काय झालं सगळ सागत असते .
पणं मानसी तू त्या जागेतून कशी बाहेर आली आणि कोणती मुलगी होती जिने तुला तीथुन बाहेर काढलं ?. आणि तू इथे ह्या शहरात आली ? - आरती

आता मानसी सगळ पुन्हा त्या जागेचा विचारत जाते आणि आरती ला सगळ पूर्ण पने सागत असते ती कशी बाहेर आली .
---++++
नाही मी नाही राहणार इथे प्लीज मला जाऊ द्या इथून मी तुमच्या पाया पडते . - मानसी नाजच्या पाया पडत रडत असते . आणि मला इथून जाऊ द्या म्हणून विनवणी करत असते . पणं नाज तिचं काहीच अयकुन घेत नाही आणि तिला दूर ढकलून बाहेर जात असते . मानसी तिथेच खाली बसून रडत असते.
नाज दरवाजा पर्यंत जाते आणि एक नजर ती मानसीच्या मुलीवर टाकते ती निरागास्त झोपलेली पाहून तिला छान वाटते . ती तिच्या जवळ जाते आणि त्या चिमुकलीचा कपाळावर पापी घेते . आणि तिच्या निरागस चेहऱ्यकडे पाहत असते . मानसी च त्या कडे लक्ष नसते ती खाली बसून फक्त रडत असते .
नाज पाहत पाहत तिच्या मनात काही विचार येते आणि ती मनात म्हणते की ही बाई तर सुशिक्षित वाटते आहे . मग ही इथे कशी . आणि ती रमा तिला इथे विकून गेली मला काहीच समजत नाही आहे . कदाचित तिने हीचा परिस्थितीचा फायदा तर नाही उचलला ना . - नाज मनात विचार करते आणि उठून मानसी जवळ येते तिला उभी करून बेड वर बसवते तिला पाणी देते आणि म्हणते .
देख क्या नाम बोली तू मानसी , हा तो मानसी मुझे नहीं मालूम तुम्हारे साथ क्या हुआ लेकिन शांता बाई ने उस रमा को पैसे दिए हैं तो वो तुझे यहां से जाने नहीं देगी अगर तुझे जाना है तो तुझे उसके पैसे देना पड़ेगा तभी तू जा सकती है । और बोलते है एक बार जो कोई इस जगह आता है वो यहां से वापस नहीं जा सकता । तो जो है अब उसे तू अपना ले और शांत रह! - नाज तिला समजावत बोलते
मानसी ला काय बोलावं नी काय नको समजत नसत पणं ती तिला म्हणते माझ्या कडे एक रुपया पणं नाही आहे जे होते त्या रमा ने काढून घेतले माझ्याकडून आता माझ्या कडे काहीच नाही आहे . ती शांता बाई तर मला नाही जाऊ देऊ शकत पणं तुम्ही तर माझी मदत करू शकता ना .. तू पणं एक स्त्री आहेस माझ्या पेक्षा जास्ती तुणे सहन केले आहे तुला जास्ती कळते . मग तू कशी एका स्त्री ला ह्या जागेत रहा म्हणू शकतेस ज्यात तू एका स्त्री च जीवन बरबाद नाही करत आहेस तर दोन स्त्रियांचे जीवन बरबाद करत आहेस माझं तर होतच आहे त्यात माझ्या मुलीचे पणं . - मानसी नाज जवळ रडत रडत बोलत असते
नाज ला आता काहीच सुचत नाही आणि ती सुध्दा आता विचार करत असते . -
आणि म्हणते तू मुझे अच्छे से बता तू यहां आई कैसे ? पुरा बता - नाज
आता मानसी ला नाज कडूनच काही अपेक्षा होती म्हणून ती लहान पणा पासून ते... अजय सोबतचे लग्न तिने काय काय सोसले सासू काय बोलली , तिच्या मुलीचं जन्म , अजय ने तिला घरा बाहेर कसं कळाल , बाबांनी कस तिला आयुष्यातुन  बाहेर काढलं .. रमा कशी भेटली आणि ती इथे कशी आली सगळ ती नाज ला सागत असते .
इतकं सगळ अयकुन नाजच्या पणं डोळ्यातून अश्रू बाहेर येतात . आणि ती तशीच मानसीला म्हणते..
ऊठ चल मेरे साथ और साथ में अपनी लड़की को भी ले - नाज पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणते ..आणि ती मानसी आणि तिच्या मुलीला घेऊन बाहेर येते ...
बाहेर येताच समोर शांता बाई उभी असते आणि ती नाज सोबत मानसीला पाहून थोड स्वशयाने  विचारते ..
नाज कहा ले जा रही इसको - शांता बाई
नाज़ समोर शांता बाई ला पाहून थोडी घाबरते आणि पूर्ण धीर एकवटून म्हणते..
अरे शांत आका इसको मै थोड़ा पार्लर से लेकर आती शाम को थोड़ी अच्छी दिखना चाहिए ना इसलिए पहलीबर है ना इसका भी तो थोड़ी ठीक दिखना चाहिए - नाज़
अच्छा ठीक है लेकिन जल्दी आजाना , और इसको लेकर जा इसकी लड़की को कहा ले कर जा रही उसे रख यही शोभा देख लेगी - शांता बाई
नाज़ ला आता थोड़ा घाम फुटायाला लगतो जशी शांता बाई तिच्या मुलीला इथेच ठेवायला सांगते तर... तरी सुध्दा ती थोडा विचार करते आणि ती पटकन नजर चुकवत त्या लहान चिमुकलीला जोरात चिमटा काढते ... तशीच ती चिमुकली जोर जोरात रडायला लागते ... आणि ती शांता बाई ला म्हणते..
देख ना अक्का कितनी जोर से रो रही है यहां रहेगी तो सबको परेशान करेगी हम साथ में लेकर जाते , किसीको कोई परेशानी भी नहीं होगी और हा जलदिच आजाएगे यही पास वाले पार्लर में जा रही मैं - नाज़
त्या चिमुकलीचा रडण्याचा आवाज ने शांता बाई पणं थोड्या चिडतात आणि त्या दोघींना जाण्यासाठी परमिशन देतात आणि निघून जातात ...
मानसी नाज आणि तिची मुलगी बाहेर येऊन आटो मध्ये बसतात आणि ते डायरेक्ट रेल्वे स्टेशन वर येतात मानसीला ला तर काहीच कळत नाही की ते रेल्वे स्टेशन ला का आले .. आणि ती नाज ला वारंवार विचारत असते पणं नाज तिला शांत रहा म्हणून म्हणते आणि तिच्या साठी तिकीट घेऊन येते आणि नेऊन तिला बरोबर ट्रेन मध्ये बसवते आणि म्हणते...
सुन अब ,,,,ये तेरी टिकट अब यहां से तुझे जहा जाना है तू जा सकती मै ने मेरा काम कर दिया और यहां कभी लौट कर मत आना अपनी बेटी को बहोत पढ़ाना और बड़ी बनना ठीक है! दस मिनिट में ट्रेन शुरू हो जाएगी ,,, ये ले कुछ पैसे है काम आयेगे तुझे - नाज़ मानसी ला पैसे देत बोलते ..
मानसीला आता सगळ समजून जात आणि ती तशीच आपल्या मुलीला घेऊन नाज ला गळ्याला बिलगून रडायला लागते ... आणि तिच्या सोबत नाज पणं रडायला लागते आणि तिला दूर करून नाज तिला समजावते आणि तिच्या मुलीचं पापी घेऊन जात असते .. तशीच मानसी तिचं हात पकडून म्हणते ...
शांता बाई ला काय सांगणार ? - मानसी
नाज थोडी हस्ते आणि म्हणते , तू उसकी चिंता मत कर मै संभाल लुगी तू अपना और अपनी लड़की का ध्यान रख ठीक है बाय जा तू। - नाज
इतकं बोलुन नाज ट्रेन बाहेर येते , आणि तशीच ट्रेन हॉर्न देते आणि सुरू होऊन रुडा वरून हळुवारपणे चालायला लागते आणि मानसी तिला खिडकीतून पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत बाय करत असते आणि तशीच नाज सुध्दा तिला बाय करत असते , ट्रेन दूर पर्यंत नाहीशी होत पर्यंत दोघीही एक मेकांना पाहत असतात आणि काहीच वेळात ट्रेन रेल्वे स्टेशन मधून बाहेर येते ...
आणि आता मानसी मनात विचार करते , आज तिने दोन स्त्रिया पाहिल्या होत्या आपल्या समाजातील ,,
पहिली ती जी जिच्या वर मनापासून विश्वास ठेवला जिला ह्या समाजात बाहेर चागलं समजतात रमा तिने मानसीला विकली होती फक्त काही पैस्यासाठी ,, आणि दुसरी ती जीच ह्या समाजात काही अस्तित्व नाही जिला तुझ्झ समजल जात वेष्या  म्हणटल जात जिला समाजात राहण्याच्या अधिकार नाही ती नाज आज तिने तिला नवीन आयुष्य दिलं तिला त्या ठिकाापासून बाहेर काढलं जिथून बाहेर निघणे खूप कठीण होते , आणि मानसी मनात हाच विचार घेऊन ती एका नवीन शहरात येते .. काहीच तासात ती येते खरी पणं आता जायचं कुठे हाच प्रश्न तिला पडतो आणि मनात एकच भीती पुन्हा  तशीच बाई मिळाली तर रमा सारखी म्हणून ती आता सावध झाली होती आणि ती ट्रेन बाहेर येऊन ती रस्त्या वर येते खूप गर्दी असते रस्त्यावर.. पणं तिला आता जायचं कुठे हाच प्रश्न सतावत असतो म्हणून ती रस्त्यावर चालत चालत ती एका गणपतीच्या देवळात येते तिथे काही प्रसाद देत असतात आणि तिला त्या प्रसादा वरून रमा ची आठवण होते आणि ती ते प्रसाद न घेताच मंदिरात एक कोपऱ्यात बसली असते ..
+++++++
अस झाल आरती आणि मग तूच मला त्या मंदिरात तू भेटली आणि तुला पाहताच मला खूप बरं वाटलं आणि तेव्हाच आठवलं की हे तेच शहर आहे जिथे तुझ लग्न झालं इथेच दिलं तुला ... - मानसी
अग हो पणं एकदा मला फोन तरी केला असता अग मी गरीब नक्कीच आहे पणं तुझी मदत नक्की केली असती मी..- आरती
जे झाल ते झाल बर झाल त्या नाज ने तुला मदत केली देव तिला आशीर्वाद देवो ... आता तू कुठेच नाही जायचं इथेच राहायचं .. - आरती
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Renu

Student