रूप ? भाग १३

I am reader I try something write..

क्या,रे तेरी लाडकिने तो रात भर मुझे सोने नही दिया, कभी कभी तो रात को सोती मै उस्मे भि तेरी लडकी ने पुरी रात की अयसी की तैसी कर दी  , ये ले पकड दुध पीला इस्को मै कुछ ले कर आती तेरे लिये खाणे को!..- इतकं बोलुन ती मुलगी जरा रागातच रूम बाहेर पडते.
मानसी एका छोट्या पलंगावर बसली असते ती आताच थोड्यावेळा आदी झोपून उठली असते , ती झोपेतून उठते तर ती जागा तिला नवीन वाटत असते तिने कधीच असली जागा पाहिली नसते , ती रूम निहारत असते रूम तशी थोडी मोठी असते थोडी झगमग सजवली असते , काही हिरोइनच्या अर्ध नग्ण फोटोज् तिथे लावले असते तिला ते पाहून थोड विचित्र वाटते, ती पाहतच असते तर तिची मुलगी जोरजोरात रडायला लागते , तशीच मानसी विचारातून बाहेर येऊन आपल्या मुलीला छातीशी लाऊन दुध देते आणि ती चिमुकली रडण बंद करते , दुध पिहु लागते तिच्या चिमुकलीला खूप भूक लागली असल्या कारणाने ती पटकन शांत होऊन दुध पित असते. मानसी ला ह्या जागे बद्दल काहीच कळत नसते आणि त्यातच तिचं डोकं फार दुखत असते तिला समजतच नसत की मी इथे आलीच कशी. तशीच तिच्या तोंडातून एक नाव बाहेर पडत "रमा ताई " . तशीच ती मुलगी जी रागात बाहेर गेली होती ती मानसी साठी पोहे घेऊन रूम मध्ये येते.

शांत हो गई लगता है , बहोत भूक लगी होगी तेरी लडकी को - इतकं बोलुन ती मानसी ला पोह्यांची प्लेट देते आणि स्वतः आरश्यासमोर जाऊन केस करत असते  , मानसी प्लेट घेते आणि  त्या मुलीला थोडा वेळ पाहतच राहते. ती दिसायला खूप  सुंदर असते, गोरी गोरी, सड पातळ उंच बघताच क्षणी कोणाच्याही मनात भरेल अशी.. मानसी तिच्या कडे पाहत असते तशीच ती आरश्यातुन मानसी कडे नजर उचलून पाहते आणि आपले भोये उचलून इशाऱ्यनेच थोड हलकासा स्मिथ करून काय ?   विचारते, मानसी तशीच तंद्री तून बाहेर येते , आणि प्लेट बाजूला ठेऊन तिला म्हणते,
'ताई '- मानसी जस ताई म्हणते ती मुलगी तिला थांबत बोलते
"नाज " नाज नाम है मेरा ,  याहा कोई रिश्ता नही बनाना , नाज बोलणा ठीक है बोल अब ,
मानसी तिचं बोलणं आयकूण थोडी घाबरते तिचं बोलण्याच टोनिग थोडा वेगळाच असतो तिला यातलं काहीच कळत नाही आणि ती थोडी धीर एकटून म्हणते
रमा ताई कुठे आहे - मानसी
कोण रमा ताई , मुझे नही पता मुझे शांता बाई ने इस रूम मे तुझे लेकरं आणे को काहा तो मै लेकरं आई - नाज  इतकं बोलते तसच तिला कोणीतरी बाहेरून आवज देण्याचा आयकू येतो आणि ती मानसीला म्हणते देख तू ये खा ले अपन बाद में बात करते इतकं बोलुन ती रूम बाहेर जाते
मानसी ला समजतच नसत काय होत आहे , आणि आता तिची चिमुकली पणं झोपली असते , तशीच मानसी काल रात्री काय झालं आठवण करते की चोकात आल्यानंतर तिला रमा ताई कशी भेटली.
...............
मानसी चौकातून थोडी पुढे येत बस स्टॉप वर येते , सगळी लोक आप आपल्या बस ने घराकडे जात असतात तर काही लोक आप आपली दुकाने बंद करण्याची तयारी करत असतात. पणं मानसी तिथे येऊन एका बाकावर बसते आणि बस स्टॉप वर होणाऱ्या हालचाली बघत असते , मनात एकच विचार जायचं कुठे , माहेरी जाण्याचा विचार येतो तिच्या मनात पणं तिथे कोण तिला अपणावणार उलट तिचाच दोष काढून तिला घराबाहेर काढले असते.. म्हणून ती माहेरी जाण्याचा विचार मनातून काढून घेते . आणि तिथेच बसली असते , आता तिला भूक पणं लागली असते पोटात फार आग होत असते , ती ओली बाळंतीण असते , त्यात तिची मुलगी दुध पेत असल्या कारणाने तिला खूप भूक लागली असते , तिला वाटते समोर एक वडा पाव च्या दुकानात जाऊन वडा पाव घेऊ पणं तिच्या कडे पैसे नसतात , आणि ती तशीच त्या दुकानाकडे पाहत बसली असते .
रात्रीचे दहा वाजून गेले असतात त्यात बस स्टॉप वरची गर्दी  पणं कमी झाली असते , मानसी पुन्हा मनात विचार करते किती वेळ बसायचं इथे , पणं दुसर मन म्हणते पणं जायचं कुठे , आणि कुठे जायचं म्हटलं तर पैसे नाहीत. आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात , ती रडता रडता आपल्या मुलीकडे बघते , तिची चिमुकली तिच्या दोन डोरल्याच्या मंगळसूत्रा सोबत खेळत असते , आणि मानसी ते मंगळसूत्र हातात घेते आणि अश्रु पुसत मनात म्हणते , काय अर्थ ह्या मंगळसूत्राच ज्यात नवरा नाहीच तर हे मंगळसूत्र पणं काय कामच.
आणि ती एकदा डोळे मिटून मोठा श्वास घेते, अजयने तिच्या गळ्यात जेव्हा मंगळसूत्र घातलं होत तो दिवस आठवण करते , मग तिला थोडावेळापुर्वी घराबाहेर काढलेलं क्षण आठवण करते आणि जोरात मंगळसूत्र तोडते , आणि उठून उभी होऊन ती जवळच्या सोनाराच्या दुकानात जाते , तो दुकान बंद करत असते मानसी त्याला थांबत ते.. मंगळसूत्र विकायचं आहे म्हणून म्हणते पणं तो दुकान बंद करत आहोत तर उद्या या म्हणतो पणं मानसी त्याला विनवणी करते तेव्हा तो तिच्या वर थोडी दया दाखवून मंगळसूत्र घेतो आणि ते थोड हलक असलेल्या कारणांनी त्याचे फक्त दोन हजार रूपे देतो... पणं ह्या क्षणी तिला ते पणं खूप असते ती पैसे घेते आणि वडापावच्या दुकणावरून वडा पाव घेते एक पाण्याची बोत्तल घेते आणि पुन्हा त्या बाकावर येते तिथे बसून ती दोन वडापाव खाते, अर्ध बोत्ताल पाणी पिते तेव्हा तिला थोड बर वाटायला लागते , पोटाची आग कमी झाली असते . आणि ती आता तिथेच बसली असते , आता हळूहळू सगळी दुकाने पणं बंद व्हायला लागतात . पणं मानसी मात्र तिथेच बसली असते तिला मनात एकच विचार येतो जायचं कुठे . तेव्हाच जिथे ती बसली असते तिथे, तिच्या जवळ एक बाई येते , आणि तिच्या बाजूला बसते , मानसी तिला बघताच बोलते
रमा ताई तुम्ही - मानसी थोडी आश्चर्यचे भाव आणत बोलते.
रमा ताई ही मानसीच्या माहेरची बाई तिच्या घरामागे राहायची ती पणं लग्न होऊन ह्याचं शहरात आली होती . ती मानसीला बस स्टॉप वर इतक्या रात्री एकटी बसली पाहून तिच्या जवळ येते.
हो , पणं तू काय करत आहेस इतक्या रात्री इथे - रमा
मानसी ला काय सांगावं आणि काय नको काही समजत नसत पणं तिला वाटते रमा ताई तिला थोडी मदत करतील ह्या आशेने ती , थोडी रमा ताई ला बघून रडायला लागते तशीच रमा तिचे डोळे पुसत बोलते.
काय झालं मानसी का रडत आहेस साग मला काय झालं आणि तू इतक्या रात्री ह्या छोट्याश्या मुलीला घेऊन इथे काय करत आहेस साग बघू - रमा
मानसी रडता रडत रमा ताई ला सगळ सागते अजय ने तिला कस घराबाहेर काढलं सासूबाई काय बोलली सगळ सगळ सगते , रमा ताई ला सगळ आयकुन फार वाईट वाटत आहे असं बोलते आणि तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला धीर देते आणि म्हणते.
जे झालं ते विसर आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर , आणि चल माझ्यासोबत माझ्या घरी - रमा
मानसी ला रमा ताई च बोलण आयकून मनात फार चागलं वाटते की आपल्या ला कोणी मदत करत आहे , त्यात ती तिच्या ओळखीची असल्याकारणाने तिला फार आनंद होतो आणि आता तिच्या कडे काही मार्ग नसल्याकारणाने ती रमा ताई सोबत तिच्या घरी जायला तयार होते .
रमा ताई जवळच्या एका आटो वाल्याला घेऊन येते आणि तिला , आणि तिच्या मुलीला घेऊन बसते , थोडा वेळ ती तिच्या सोबत बोलते तिला धीर देण्याचा नाटक करते आणि तिला म्हणते.
अग बाई एक गोष्ट तर विसरली मी हे घे प्रसाद , गणपतीच्या मंदिरातून आणला आहे - रमा मानसीला प्रसाद देत बोलते
मानसी ला घ्यावं की नाही मनात विचार येते, पणं प्रसाद म्हंटल्यावर नाही पणं म्हणणं बरोबर नाही अस वाटेत , पणं मनात विचार येते की ही तर माझ्या माहेरची आहे आणि ओळखीची  पणं आणि आता मला मदत पणं करायला तयार आहे म्हणून ती प्रसाद घेऊन देवाचं नाव घेऊन खाते त्यात तिची परिस्थिती अशी असते की देवाच्या नांवाने ती काही पणं घेऊ शकत होती . तिला प्रसाद खाल्यावर काही वेळाने तिचं डोकं खूप भारी , जड वाटायला लागते आणि ती काहीच वेळात बेशुद्ध होते .
.........
"खाड" जोरात दरवाज्याचा आवाज होतो मानसी तिच्या विचारातून बाहेर येते , समोर शांता बाई आणि नाज असते दोघीही तिला बघून स्मिथ करत असतात .
शांता बाई अंगावर झगमग झगमग साडी , गोरी गोरी , ओठांवर लाल लाली,थोडी जाड , जास्तीत जास्त चाळीस पंचेचाळीस वयाची तिला बघूनच मानसी ने मनात अंदाज बांधला की ही बाई कोण आहे आणि ती जरा तिच्या कडे बघून  तोंड मुरडते. तिला बघून शांता बाई बोलते
काय ग कशी आहेस बाळ कस आहे - शांता बाई तिच्या जवळ येऊन बोलते
मानसी तिच्या बोलण्यावर काहीच उत्तर देत नाही, आणि तिला म्हणते
रमा ताई कुठे आहे - मानसी थोडी घाबरली असते पणं तसं ती दाखवत नाही
तिच्या बोलण्यावर शांताबाई थोड्या हसतात आणि म्हणतात
बघ तुला आता पर्यंत सगळ समजलच असेल , तुला काही स्पेशल सांगणार नाही आणि तुला इथे ती रमाच विकून गेली आहे समजल तर तू आता माझी प्रॉपर्टी आहेस जे मी सांगेल तेच करावं लागेल - शांताबाई थोड्या मोठ्या आवाजात थोड्या स्पष्ट डटावत बोलतात
मानसी ला विकून गेली आहे अस म्हणटल्यावर धक्काच लागतो आणि आता तिला कळल असते की ही जागा आहे स्त्री देह विक्रीची म्हणजे वेश्यांचा बाजार . आणि आता तिला रमा ताई ने दिलेला प्रसाद आठवतो , आणि ती रमा ताई ला मनात म्हणते की विश्वास घात केला, मी आपली समजून परिस्थिती सांगितले आणि तिने माझ्या परिस्थितीचा फायदा उचलला ,  आणि तसच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागतात ,
हे आता इथे रडायचं नाही बघ जे झाल ते विसरून जायचं मला रमा ने सगळ सागितलं आणि मी समजू शकते तुझी परिस्थिती म्हणून तुला मी घेतली.. मी तर नाही मनाली होती तुला कारण तुला कोणताच कस्टमर नाही मिळेल कारण तू काही तितकी सुंदर नाही , पणं तू एक स्त्री आहेस तर कोणी सस्ते कस्टमर आले की भागवतील तुला कळलं - शांता बाई तिला थोड समजवण्याचा प्रयत्न करतात तिचा ब्रेन वॉश करण्याच्या प्रयत्न करतात तिला काही काही गोष्टी सांगतात पणं मानसी च त्या कडे काहीच लक्ष नसते ती आपल्याच विचारत असते  .  मानसी आपल्या मुलीला घेऊन त्या पलंगावर बसली असते मनात अनेक विचार येतात मुलीला बघून काहीही विचार येतात . ती तशीच बसून असते तशीच शांताबाई उठून उभ्या होतात आणि नाज ला म्हणतात
नाज इस्की जीम्मेदारी तेरी आज एक नया कस्टमर हैं बात हुई हैं मेरी तो इसको अच्छा रेडी कर श्याम को आती मै.. इतकं बोलुन शांता बाई त्या रूम बाहेर जातात .
क्रमशः

🎭 Series Post

View all