Mar 01, 2024
प्रेम

रूपं ? भाग १२

Read Later
रूपं ? भाग १२

मानसी च सिजार करून डॉक्टर सुलभा काही तासात बाहेर येतात आणि अजय ला हस्त म्हणतात.
congratulation मिस्टर अजय तुम्हाला बेबी गर्ल झाली आहे , नर्स आणत आहे बेबी ला तुम्ही इथेच थांबा ok येते मी - डॉक्टर सुलभा इतकं बोलुन आपल्या केबिन मध्ये जातात , अजय ला खूप आनंद झाला असतो कि तो पिता झाला आहे याचा त्याची आई आणि वडील पणं आनंदी असतात आणि मुलीला बघण्यासाठी खूप आतुर असतात, 
काही वेळात नर्स त्या छोट्या चिमुकलीला अजयच्या हातात देतात आणि निघून जातात , अजय त्या चिमुकलीला बघतो ती डोळे बंद करून असते , तिला बघतो तर खरा पण आता पर्यंतचा जो आनंद होता त्याच्या चेर्यावर तो आईच्या बोलण्याने कुठे तरी गायब झाला असतो.
अजय हीचा रंग बग लालसर आहे म्हणजे ही नक्की काळी आहे काही दिवसात बघ नुसती आपल्या आई सारखी दिसेल आणि आपल्या डोक्याला ताप कोण म्हणेल रे तुझी मुलगी आहे म्हणून , सगळी लोक हसतील आता बायको अशी आहे म्हणून हस्त होते आता मुलगी अशी आहे म्हणून हसतील आणि जसा त्या मानसीच्या बापने फसवल ना आपल्याला तसच तुला सुध्दा उद्या चालून कोणाला असच फसवाव लागेल, ही अशी कामे तिच्या बापाला जमतात आपल्याला नाही कळलं ,  मुलगा असला असता कसाही तर चालल अस्थ पणं ही तर मुलगी आहे वरून काळी नुसता खर्च , आणि वरून  ती काळी डोक्यावर आहे , आणि आता ही पणं - सासूबाई त्या चिमुकलीला पाहतच सगळ एका दमात बोलतात आणि त्या चिमुकलीला हातात न घेताच बाहेर येतात.  त्यांच्याच मागे त्यांचे वडील देखील आपल्या बायकोच्या बोलण्यावर सहमती दर्शवत ते पणं बाहेर येतात अजय एकदा पुन्हा त्या चिमुकलीला बघतो आणि कुठेतरी त्याला त्याच्या आई च म्हण पटल असते म्हणून तो पणं त्या चिमुकलीला मानसी जवळ नेऊन ठेवतो , मानसी शांत झोपली असते बेशुध्द असते तो तर मानसीला एकदा पणं बघत नाही आणि डायरेक्ट बाहेर येतो काऊंटर वर जाऊन सगळ ऑनलाईन पेमेंट करतो आणि आई बाबा ना घेऊन घरी येतो..

मानसी पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये असते अगदी टाके तुटे त्या दिवसापर्यंत कारण ती फार कमजोर असते म्हणून, कारण डॉक्टर ला माहिती होत ही घरी गेली की हीची कोणीच काळजी घेणार नाही हे त्यांनी त्याच दिवशी बघीतल होत म्हणून त्यांनी तिला हॉस्पिटल मध्येच राहण्याचा सल्ला दिला आणि ती राहिली देखील पणं ह्या पंधर दिवसात तिला घरून कोणीच पाहायला सुध्दा आलं नव्हतं तिला नवल वाटत होत की कोणी का नाही आले म्हणून तिने डॉक्टरांना विचारल होत अजय बद्दल पणं त्यांना यातल काहीच माहिती नसल्याचे त्यानी सागितलं , मानसी वारंवार आपल्या मुलीला बघून फार आनंदी व्यायची तिला दूध पाजायच्या वेळी तिला तिच्या आईची फार आठवण येत असे पणं मुलीला बघून तिला जणू तिची आईच आहे अस वाटत असे आणि ती फार खुश होती.
आज तिला सुट्टी होणार होती , तिला वाटत होत आज अजय तिला घ्यायला येईल म्हणून ती दरवाज्याकडे टक लाऊन अजयची वाट पाहत होती. पणं , सकाळची संध्याकाळ झाली पणं अजय काही आला नाही , आणि ती आता  स्वतचं सर्व आवरत होती तिने साडी नेसली ज्या दिवशी तिला हॉस्पिटल ला आणल होत तेव्हाच तिच्या सासूने घाईतच मानसी ची साडी घेतली होती , आणि तिने तिचं साडी नेसली , आणि हॉस्पिटल मध्ये रूल होता की ज्याला पणं मुलगी होते त्यांना डॉक्टर सुलभा त्या बाळाला कपडे गिफ्ट देतात तेच कपडे तिने आपल्या मुलीला घातली, आपल्या मुलीला  आणि काही सामान घेऊन ती  डॉक्टर सुलभाच्या केबिन मध्ये येते.
ये ,बस  मानसी कशी आहे बाळ कस आहे - डॉक्टर सुलभा
ठीक आहे मी आणि बाळ पणं - मानसी
बर आता काळजी घे स्वतची आणि बाळाची पणं ओके काही चेकप्स आहेत ते करायला येशील बरोबर आणि औषदी पणं घे बरोबर - डॉक्टर सुलभा
हो घेते मी काळजी ,- इतकं बोलुन मानसी थोडी शांत होते आणि डॉक्टर ला थोड हळुच विचारते, डॉक्टर तुमचं बिल पेड झाल काय नाही म्हणजे अजय आले नाही आहेत ना .- मानसी
हो हो बिल झाल पेड - डॉक्टर सुलभा
बरं डॉक्टर येते मी - इतकं बोलुन मानसी केबिन बाहेर येते आणि डायरेक्ट घराकडे निघते
ती घराकडे तर निघते पणं जायचं कसं हा प्रश्न तिला पडतो कारण अजय तिला घ्यायला आला नसतो आणि तिच्या कडे पैसे पणं नव्हते रिक्षा करून जायला, म्हणून ती हॉस्पिटलच्या बाहेर येऊन एका बाकावर बसते. सूर्य मावळायला सुरुवात झाली असते , आता तिला अस्वस्थ वाटायला लागत त्यातच मानसी ची चिमुकली रडायला लागते , मानसी तिला शांत करण्याच्या प्रयत्न करते पणं ती काही शांत होत नाही . म्हणून ती मागे पालटून पदर खांद्यावर घेऊन ती त्या चिमुकलीला दुध देते आणि तशीच ते बाळ दुध पीहुन शात होत आणि झोपी जाते  . मानसी ला बाळ शांत झोपलेले पाहून थोड बर वाटत. पणं मनात एकच प्रश्न तोच की जायचं कस. 

आता अंधार पडायला लागला असतो त्यात तिचा मोबाईल पणं घरी असल्याकारणाने ती अजय ला फोन पणं करू शकत नव्हती म्हणून ती तिथेच बसली असते पणं तिला वाटत की किती वेळा पर्यंत बसायचं म्हणून ती आता आपल्या मुलीला घेऊन पाई च जाण्याचा निर्णय घेते आणि उठून पाई जायला लागते  . तशीच त्या हॉस्पिटल ची नर्स जी पंधरा दिवस तिच्या जवळ होती ती तिच्या सुकुटी ने घरी जात असते तिची नजर मानसी वर जाते ती मानसीला थांबवत बोलते,
अरे मानसी ताई तुम्ही पाई का जात आहात अजय दादा नाही आले काय ? - नर्स
नाही ते त्यानं थोड काम होत तर नाही आले ते तर मी जाते म्हणटल - मानसी खोट बोलत असते पणं कोणाला काही नको सांगायला म्हणून ती शांत पने बोलते
अच्छा काही हरकत नाही मी सोडते तुम्हाला मी पणं त्याचं रस्त्याने जाते .- नर्स
नाही नको मी जाईन तुम्हाला वेळ होईल - मानसी नम्र पने बोलते
काय ताई तुम्ही पणं मी नेहमी ह्याचं वेळेवर जाते आणि तसंही लहान बाळ आहे तुमचं आणि अंधार पण झाला आहे सोडते मी या बसा- ती नर्स अगदी शांत पने बोलते
बर ठीक आहे - इतकं बोलुन मानसी तिच्या गाडी वर बसते थोड्याच वेळात गाडी मानसीच्या घराजवळच्या चौकात येतेच मानसी तिला गाडी थांबवायला सांगते.
इथेच सोडा मला मी जाते इथून आणि थँक्यु सो मच मला इत पर्यंत सोडण्यासाठी - मानसी
अरे त्यात काय , पणं जाल ना तुम्ही इथुन की समोर सोडू - नर्स
नाही नको मी जाते - मानसी
इतकं बोलुन मानसी त्या नर्स ला बाय म्हणून घराकडे निघते ती नर्स पणं तिच्या चिमुकलीचा पापि घेऊन निघून जाते , मानसी थोड अंतर चालून घरी येते .

घरी येताच बघते तर  सगळे बाहेर हॉल मध्येच बसले असतात मानसी घरात येताच सगळे तिच्या कडे तुसट नजरेने पाहत असतात तिला मात्र यातलं काहीच कळल नसत म्हणून ती पणं शांत राहून आपल्या रूम मध्ये जातच असते की सासूबाई तिला तिथेच थांबत म्हणतात.
तुला अजय शी घटस्फोट घ्याचा आहे मला अजय सांगत होता - सासूबाई जरा आवाज चढुन बोलतात.
मानसी ला घटस्फोट शब्द अयकुनच थोड विचित्र वाटते म्हणून ती शांत पने म्हणते.
मी कधी म्हणाली की मला घटस्फोट हवा आहे म्हणून - मानसी थोड धीर एकटाऊन बोलते .
तसच अजय जोरात रागात मधाताच बोलतो
काय तू नाही म्हणाली तूच म्हणत होती ना की मी इथून जाईल आणि तुला डिव्होर्स पणं देईल आणि आता नाकारत आहेस - अजय
आता मानसी ला तिची अजय सोबतची पहिली रात्र आठवते की तिने त्याला काय बोलली होती आणि त्याचे शब्द सुध्दा काय झालं होत सगळ तिला आठवते आणि तिच्या डोळ्यातून अश्रु वाहायला लागतात तशीच ती पणं जरा रागातच आवज चढुन बोलते
हो मी बोलली होती पणं तूच म्हणाला होता ना की तुला नाही हवा डिव्होर्स आणि आता तुला घटस्फोट हवा आहे.. आणि मला साग जे काही झाल आपल्यामध्ये ते त्याचं रात्री पासून सुरुवात झाली ना आणि आता हाच तो अंश आहे माझ्या हातात - मानसी आपल्या चिमुकलीला पाहून बोलते
हे ते मला काही माहिती नाही हे घे डिव्होर्स पेपर्स साइन कर आणि निघ इथून आताच्या आता - अजय
अजय हे काय बोलत आहेस तू डिव्होर्स ते पणं आता नाही अजय मी नाही देऊ शकत आपली मुलगी आहे तिच्या आयुष्याचा  तरी विचार कर - मानसी रडत रडत बोलत असते
हे ती काळी माझी मुलगी नाही कळल आणि मला आता तुझ्या सोबत नाही राहायचं आहे निघायचं इथून - अजय तिच्या कडे पेपर्स देऊन बोलतो
मानसी ला अजय च स्वतच्या मुलीला काळी बोलण्याचा फार राग येतो आणि  तिला आता सगळच समजायला लागत की का हा घस्फोट मागत आहे कारण ह्या सगळ्यां मुलगी काळी नको आहे म्हणून आणि ती जरा मनात विचार करते आणि एकदा स्वतच्या मुलीला बघते , मग अजय आणि सर्वांकडे जरा रागातच बघून ती पेपर्स वर साइन करते आणि खूप रागात बोलते
दिला तुला डिव्होर्स हे घे, - इतकं बोलुन ती पेपर्स अजयच्या तोंडवर मारते आणि म्हणते मला  एक कळत नाही रे स्वतच्या मुलीला काळी म्हणण्याच्या वेळी जीभ कशी नाही झडली रे तुझी , पणं जाऊ दे तू तसा ही बाप म्हण्याच्या लायकीचा नाही आहेस , मी माझ्या मुलीसाठी सक्षम आहे तिला जन्म देऊ शकते तर तिचं पालनपोषण पणं करू शकते कोणाची गरज नाही मला आणि माझ्या मुलीला. आणि माझ्या मुलीला  काळी म्हणण्याचा कोणाला ही अधिकार नाही कळल तुला , - इतकं बोलुन मानसी त्याच वेळी
अजय च घर सोडते , घर तर ती सोडते पणं तिला स्वतः ला माहिती नसत की जाणार कुठे पणं मनात निश्चय तिने केला असतो आणि ती घराबाहेर येते , रात्रीचे नऊ वाजले असते ती बाहेर आपल्या मुलीला घेऊन येते ,तिने अजयच्या घरून काहीच घेतले नसते फक्त अंगावर एक साडी असते . आणि ती तशीच बाहेर चौकात येते .
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Renu

Student

//