रूप ? भाग १०

I am reder , I try something write..

त्या दिवसानंतर अजय ने मानसीला चार पाच दिवस हात नाही लावला आणि बोलला पणं नाही.. पणं त्याला मानसीची सवय झाली होती आता त्याल झोप पणं लागत नवती म्हणून तो काही दिवस शांत राहून पुन्हा काही ना काही कारणावरून भांडण करून तिच्यावर रागात तुटून पडायचा .. आता मानसी ला हे सगळ सहन करन असह्य झालं होत. पणं ती सागेल तरी कोणाला ना तिची कोणी जवळची मैत्रीण होती ना बहीण ना आई, आत्या होती पणं तिला कस सांगणार माहेरी जाण्यास नकार होता आणि आत्या पणं दुखीच असलेल्या कारणांनी तिला आणखी दुखवायचं न्हवत म्हणून मानसी सगळ सहन करत होती.. वरून तिला घराबाहेर जाण्यास पणं मनाई होती .

अस करता करत त्याच्या लग्नाला सहा महिने उलटून जातात .. आणि एक दिवस मानसीच्या वडिलांचा फोन येतो की आत्या ची तेबेत खूप बिगळली आहे आणि ती वारंवार मानसीला आठवण करत आहे म्हणून तिला घरी बोलवण्यात येत . अजयच्या आईची इच्छा नसते की मानसी ने तिथे जावं पणं अजयच्या वडिलांच्या बोलण्यावरून तिला एका दिवसासाठी पाठवण्यात येत.. आणि मानसी माहेरी जाते..
तिथे जाताच ती आत्याच्या रूम मध्ये जाते आत्या आखरी श्वास मोजत असते तिला फक्त माणसीची वाट होती कदाचित आणि ती मानसीला डोळेभरून पाहून आपले श्वास सोडते .. तशीच मानसी जोरजोरात रडायला लागते .. आणि आता सगळे जे रूम बाहेर होते ते आत येतात .. आणि बघता आत्या गेली असते मानसी साठी आई गेल्यानंतर हा दुसरा धक्का असतो कोणी खूप जवळची व्यक्ती जाण्याचा..

अजय मानसी ला घेऊन आला असतो पणं आता आत्या गेली म्हणून तो तिथेच थाबतो .. आणि त्याच्या आई वडिलांना कळवतो .. त्याच्या आईची इच्छा नसते की मरनाला यावं पणं लोकांच्या लाजे साठी ते आणि त्याचे पती येतात ..
सगळी अंतिमसंस्कर  करून झाल्यावर  अजयची आई मानसी आणि अजयला घरी चालण्यासाठी बोलते मानसी ची ईच्छा असते की तिसरा दिवस करून जाऊ पणं सासूबाईंच्या पुढे तिचं काही चालत नाही आणि आता तिला पणं माहेरी एक मिनिट पणं राहवस वाटत नव्हते, कारण तिथे तिला प्रेम करणारी व्यक्ती नसते म्हणून ती पणं सासुसोबत जायला तयार होते.. अजय, मानसी, अजयची आई, वडील सगळे निरोप घेऊन गाडीत येऊन बसतात . आणि अजय गाडी सुरू करुन घराकडे जाण्यास निघतो..

थोड्या दुरीवर गाडी येताच मानसी ला उलट्या व्यायलं लागते .. सासूबाई जोरात मानसी वर खेकसत म्हणतात,..
काय ग तुला गाडी भावत नाही तर सागायच ना तुला बस ने पाठवलं असत.. उगाच गाडीत वास वास करत आहेस..- सासूबाई
आई मला गाडी भावते येताना पणं मी कार मध्येच आली ना पणं तेव्हा काही नाही झाल मला..- मानसी थोडी हळु हळु बोलत असते..
तिला आता चाग्लाच त्रास वाटायला लागतो.. आणि ती अजयला गाडी थांबवायला सागते.. पणं अजय घर थोड जवळच आल आहे म्हणून तिला म्हणतो आणि गाडी काही थांबवत नाही . तशीच मानसी ला आता गरगरायला पणं लागत , पोटात मळमळायला होत असते वारंवार उलट्या होईल म्हणून तिला वाटत असते .. म्हणून ती गाडीचा काच खाली करते आणि बाहेरून येणाऱ्या सुंदर हवेने तिला थोड बर वाटायला लागत .. मानसी आणि मानसीची सासूबाई मागच्या सीट वर बसल्या असतात .. तशीच सासू बाई तिला जोरात रागवत म्हणतात.
ये बाई एसी सुरू आहे ना तरी काच खाली केला डोळ्यात कचरा जात आहे माझ्या बंद कर ते.. - सासूबाई
मानसी ला सासूबाईंचा फार राग येत असतो पणं तिला आता त्यांच्या सोबत इथे काही वाद नको म्हणून ती शांत राहते वरून तिला बर पणं वाटत नसत, तिच्यात आता भांडण करण्याची ताकत नसते म्हणून ती शांत राहून जशी सासू सांगत आहे ते करते.. 
थोड्या दुरी वर आल्यावर मानसी चक्कर येऊन सासूच्या खांद्यावर डोकं टाकते तशीच सासू तिला म्हणतात..
ये झोप येत आहे तर डोकं तिकडे कर खानदा दुखेल माझा म्हणून जोरात तिच्या डोक्याला धरून दूर करतात तशीच मानसी च डोकं अजयच्या ड्रायव्हिंग सिट वर आपटत तशीच सासूबाई थोड्या घाबरतात आणि तिला सरळ करत मागे टेकवतात आणि म्हणतात
अजय बघ हिला काय झालं तर, उठत नाही आहे ही - सासूबाई
सासूबाई तिला उठवण्याचे प्रयत्न करतात पणं ती काही उठत नाही तिच्या डोळ्यावर  पाणी मारतात तरी सुद्धा  ती काही प्रतिसाद देत नसते .आता सासूबाई ला चागलिच भीती वाटायला लागते.. तसेच मानसी चे सासरे जे नेहमी आपल्या बायकोची आयकतात आणि फार कमी बोलतात ते आपल्या बायकोला थोडे समजावतात आणि अजय ला म्हणतात..
अजय मी काय म्हणतो तिची तब्येत चाग्लीच बिघडली आहे एक काम कर इथे जवळच हॉस्पिटल आहे तिथे नेऊ.. नाही तर काही बर वाईट झाल तर.. - अजय चे वडील..
अजयच्या वडिलांच्या बोलण्यावर जी सासू चागलीचं घाबरली असते ती पणं होकार दर्शवते आणि अजय पणं ठीक आहे म्हणून गाडी हॉस्पिटल कडे वढवतो .. आणि थोड्याच वेळात गाडी हॉस्पिटल समोर येते.. अजय कार बाहेर येतो आणि मानसी ला उचलून आत हॉस्पिटल मध्ये नेतो आणि मागे त्याचे आई आणि बाबा पणं येतात . अजय मानसी ला स्ट्रचर वर ठेऊन डॉक्टर कडे जातो..
डॉक्टर तिला चेक करण्यासाठी आत घेऊन जातात .. आणि मानसीला चेक करून बाहेर येतात..
तसच अजय डॉक्टर ला विचारतो..
काय झालं डॉक्टर काही सीरियस आहे काय ? - अजय..
नाही, काही सीरियस नाही आहे कोणत्या डॉक्टरांची औषध सुरू आहे तुम्ही चिठी आणली आहे काय.? - डॉक्टर
काय चीठी , औषध मला काही समजले नाही डॉक्टर - अजय थोड गोंधळुन बोलतो आणि त्याचे आई वडील पणं आश्चर्य चकित होऊन एकमेकांन कडे पाहत असतात .. तेव्हाच नर्स मानसीचा हात पकडुन तिला बाहेर घेऊन येते .. आणि डॉक्टर सगळ्यां कडे थोड प्रश्नार्थक नजरणे पाहत म्हणतात..
अहो तुम्हाला काही माहिती आहे की नाही तुमच्या मिसेस प्रेग्नेंट आहेत एक महिना उलटून गेला आहे - तसेच सगळे मानसी कडे प्रश्नार्थक नजरेने पाहतात मानसी ला सगळ समजून जाते आणि ती सगळ्यां समोर म्हणते
प्लीज अजय आई बाबा मला असे का बघत आहात मला पणं नाही माहिती होत की मी प्रेग्नेंट आहे मला पणं आताच कळल - मानसी केविलवाणा चेहरा करून बोलते
तशीच डॉक्टर थोड समजून प्रेमाने बोलते
ठीक आहे होत कधी कधी नाही कळत कोणा कोणाला पणं आता काळजी घ्या तिची खूप कमजोर आहे ती ब्लड चे पणं प्रमाण कमी वाटत आहे , काही टेस्ट लिहून देते ते करून घ्या आणि मला पुढच्या सोमवार ला दाखवा आणि औषधी लिहून दिली आहे ते बरोबर घ्याचे .. ठीक आहे आणि काही लागलं तर कळवा मला हा माझा नंबर आहे - डॉक्टर
ठीक आहे , डॉक्टर सुलभा बरोबर - अजय
हो डॉक्टर सुलभा.. नेहमी बरोबर चेकप ला घेऊन या बर, आणि तू काळजी घे आणि भरपूर पाणी पि ok - डॉ सुलभा मानसी आणि अजय सोबत बोलुन केबिन बाहेर निघून जातात
डॉक्टरच्या गेल्यानंतर सासूबाई मानसी ला म्हणतात काय ग दिवस गेले तरी तुला कसं नाही कळल हा - सासूबाई
आई खरच मला नाही जाणवलं - मानसी
तशेच सासरे मधातच बोलतात
ठीक आहे ठीक आहे आता आपण आधी घरी जाऊ नंतर बोलू बर..- सासरे
सगळे त्याच्या बोलण्यावर सहमती दर्शवुन पुन्हा गाडीत येऊन बसतात आणि थोड्याच वेळात घरी येतात.. घरी आल्यावर सासू सासरे  थोडे आनंदी दिसतात तशीच सासूबाई आपल्या मुलाला म्हणते
अजय तू बाप होणार आहेस , मला तर विश्र्वासच नाही होत आहे माझा मुलगा इतका मोठा झाला - सासूबाई
मानसी किचन मध्ये पाणी आणायला गेली असते पणं तिला सगळ बाहेरच बोलण अयकु येत असते.. आणि ती पणं खूप आनंदी असते आणि ती वारंवार आपल्या पोटावर हात ठेवत असते आणि मनात विचार करते की आजचा दिवस पणं काय घेऊन आला आहे ना एककिकडे आनंद आहे आणि एकीकडे दुःख आज आत्या हे जग सोडून मला सोडून गेली आणि आजच नवीन जीव माझ्या उदरात आहे हे मला माहिती पडल , आज खूप जवळची व्यक्ती मला सोडून गेली आणि तितकीच जवळची व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यात आली खरच देव आणखी काय काय दाखवणार आहे माहिती नाही .. मानसी विचारच करत असते तशीच सासूबाई तिला जोरात आवज देऊन बोलवतात तशीच मानसी भानावर येते आणि सगळ्यांसाठी पाणी नेते ..

इकडे अजय आईच्या बोलण्यावर थोड हसुन देतो आणि थोड एकनजर मानसी कडे बघतो मानसी थोडी दुखी तर थोडी आनंदी दिसत असते..  आणि तो समजून जातो आणि तिच्या कडचे पाणी घेऊन पितो..
तेव्हाच आई बोलते
मी काय म्हणते काहीही झालं तरी मुलगा व्हायला पाहिजे , एकदम माझ्या अजय सारखा गोरा गोमटा - अजयची आई
मुलगाच होईल हे आपण नाही ठरऊ शकत ना  मुलगी झाली तर - सासरे आपल्या बायकोला म्हणतात
मुलगी झाली तरी काहीच हरकत नाही पण माझ्या अजय सारखीच व्यह्याला पाहिजे एकदम गोरी गोरी कोणी पणं बघता क्षणी म्हणायला पाहिजे की अजयची मुलगी आहे म्हणून - आई
सगळ्यांच्या बोलणे ऐकून मानसी ला फार वाईट वाटेत आणि आता तिच्या मनात पुन्हा नवीन विचारांनी  घर केल असते आणि ती त्यांच्या कडे एक नजर पाहून किचन मध्ये चहा करायला जाते..
क्रमशः

🎭 Series Post

View all