रूप ?

Story of "rup? " Is black women .. stroy, she is face many problems in our society, only by colour of our body ...

कथा काल्पनिक आहे. ह्या कथेतील पात्रांचे नाव , स्थान , जुळून आले तर केवळ योगायोग समजावा . ह्या कथेचा उदेश  कोणाचे ही मन , भावना दुखावण्याचा नाही .

 

संध्याकाळची वेळ असते  आकाशात  पक्ष्यचा किलबिल करणायचा आवाज सुरू असतो . काही लहान  मुलं घासरणी वरून घसरत आनंदी होत असतात तर काही भित असतात तर त्याचे आई वडील त्यांची भीती दूर करण्याच्या प्रयत्न करत असतात. तर काही झोपाड्यावर  झोका घेत आनंदी असतात .  असंच दर रविवारी बागेत  होत असत.
आई बग ना त्या काकू मला काळी मनाली ... आणि मला त्या झोपाड्यावरुन  उठवल .  प्राची रडत रडत तीच्य आई जवळ येत सागते . ..
कोणत्या काकू प्राची.... सोना आणि त्यात रडण्यच काय कारण दुसऱ्या  ठिकाणी खेळायचे त्यात काय त्याचा बाळ लहान आहे ना म्हणुन तुला उठ म्हणाले असतील. जा तु घसरणीवर वर घसर बरं त्या लहान घसरणीवरून घसर ok आणि सांग कोणत्या काकु म्हणाले बरं. .... मी बोलते त्याच्या सोबत मग थोड्या वेळाने तु झोका घेशील. ... मानसी प्राची ला प्रेमाने आणि तिचे डोळे पुसत समजावत बोलत असते.
त्या काळी साडी घालून आहेत ना त्या काकु म्हणाले..- प्राची
आता पण प्राची रडत असते .......
आता काय झालं माझ्या सोन्याला रडण्यासाठी ... - मानसी
आई त्या मला काळी म्हणाल्या ... - प्राची रडत रडत बोलत असते.
तर काय झालं तु त्यांना थँक्यू मनायच  आणि असं रडायचं नाही तु स्ट्रोंग गर्ल आहे ना .... - मानसी
हो मी खूप स्ट्रोग गर्ल आणि गुड गर्ल पण आहे ..- प्राची
दॅट्स माय गर्ल ,जा तिकडे ,आता तू खेळ मी बोलते त्याच्यासोबत ..- मानसी
प्राची थोडी वेळ शांत राहून आणि मग घासरनी वर घासरायला निघून जाते. पण मानसी मात्र खूप दुखावली असते . कारण तिच्या साठी ह्य गोष्टी नवीन नावत्या पण प्राची साठी त्या नवीन होत्या आणि तिला ह्या साठी मानसी ला तयार करायच होत.

मानसी रंगाने सावडी पण चेहरा मात्र रेखीव. लांब घनदाट केस . सळ पातळ. तशीच तिची मुलगी प्राची अगदी तिची कार्बन कोपी . जी आताच पहिली वर्गात गेली अगदी लाड येण्यासारखी सहा वर्षाची . दर रविवार प्रमाणे मानसी प्राची ला बागेत फिरायला घेऊन आली . पण आज बागेत ते घडल जे मानसी अगदी लहान पणापासून एकत आहे . पण आज ते तिच्या बाबतीत न घडता तिच्या काळजाच्या तुकडेच्य बाबतीत म्हणजे तिच्या मुली प्राची च्या बाबती त घडल आणि ते तिला सहन नाही झालं . म्हणून ती आता निश्चय करते की आता उत्तर दाययच खूप एकल आतपर्यंत . हा रंग आम्ही स्वतः नाही आणला तो देवाने दिला त्यात आमची काय चूक . तशीच मानसी मनाला थोड घट्ट करत आणि मोठा श्वास घेत त्या बाई कडे जाते .
अहो ताई झालं काय तुमच्या मुलाचं झोका घेऊन झाल असेल तर माझ्या मुलीला झोका घेऊ देता काय. - मानसी
हो हो झाल बोलवा तुमच्या मुलीला बसा मणा - ती बाई
तशीच मानसी प्रचीला आवज देऊन झोपाड्यावर बसुऊन  झोका देते .
ही तुमची मुलगी आहे काय - ती बाई.
हो माझीच लेक आहे. मगाशी तुम्ही हीला काळी मणुन हाकलून दिले ईथुन . ... मानसी थोडी टोचून बोलयसारखी बोलते.
अहो नाही ताई ती ऐकत न्हवती आणि माझा मुलगा खूप रडत होता मणून मनाली मि ...- ती बाई एकदम काहीही वाईट न बोलेसरखी बोलत असते.
ठीक आहे ती ऐकत नव्हती लहान आहे ती पण तुम्ही तर समजदार शिकलेल्या आहात तरी सुध्दा तुम्ही तिला तुस्त पणे काळी मनालात ताई तुम्ही तिला काळी मनालत त्याच काही नाही हो ती जी आहे ती आहे पण ज्या प्रमाणे तुम्ही मनलत ते वाईट आहे तिला नाही कळत हो ते. - मानसी
वो बाई मला इथे काही तुमचं प्रवचन नाही आयकायच आहे एकत आहे मनुन काही काय माझी शिक्षण वयग्रे काळात आहात. .... आणि तुमची मुलगी काळी आहे तर काळी च म्हणणार ना .... - ती बाई एकदम रागात बोलत असते.
हो आहे ती काळी त्यात काय... आहे तिचा रंग काळा देवाने दिला तिला .. आणि तुम्ही तिच्या काळया रगाचं अपमान करत आहात पण हे विसरू नका की हाच काळा रंग तुमच्या या गोऱ्य पान शरीराला सुंदर दाखवत आहे .. हीच काळी साडी ने तुम्ही आणखीन सुंदर दिसत आहत.... आणि काळ्या रंगाचे अपमान करत आहात. जाऊ द्या हो तुम्ही वरून किती ही गोऱ्या असलेल्या ना तरी तुमचं मन आतून काय आहे ना हे दिसत....- मानसी एकदम संतापून बोलते.
त्या बाई ला काय बोलावं काही सुचत नाही आणि ती पाय आपट आपल्या मुलाला घेऊन निघून जाते. ..... पण मानसी मात्र फार दुखवली असते आणि तिच्या डोळ्यांतुन अश्रु बाहेर येताच ती पदराने पुसून टाकते जणू तिला तिचा भूतकाळ आठवलं ......
हेच सगळ दुरून एक पुरुष संभाषण ऐकत आणि पाहत असतो... तो तर अवाक होऊन मानसी ला पाहतच राहतो .... आणि त्याने तिच्या डोळ्यात आलेल्या अश्रु ना सुध्दा पाहिले असते.... जणू त्याचं मन त्याला सागत असते जाऊन ... बोलावं का हा इतका राग स्वतच्या च रंगचा का इतका संताप आणि अश्रु.... त्याला काहीच कडत नाही ... म्हणून तो विचार करतो एकदा बोलावं का ... पण काय विचार करतील त्या एकतर त्या लग्न झालेल्या ... अनोळखी पुरुषा सोबत कशे बोलतील .... तरी सुद्धा तो मन घट्ट करून बोलण्यासाठी जात असतो तेव्हाच त्याचा फोन वाजतो आणि तो फोन वर बोलण्यात मग्न होतो ... थोडावेळ बोलुन झाल्यावर ...तो पुन्हा समोर जातो तर काय बगतो तर मानसी तिथे नसते आणि बाजूच्या झोपाड्याकडे बघतो तर तिथे तिची मुलगी पण नसते त्या दोगि गेल्या असतात... त्याला समजत आणि तो मनात खूप नाराज होतो पन निश्चय करतो काहीही झाल तरी आपण एकदा तरी बोलावं त्याच्यासोबत ... आणि तो पुडच्य रविवार ला नक्की बोलू ...म्हणून घरी निघून जातो. .....
घरी आल्यावर सुध्दा त्याचं मण मानसी चाच विचार करत असते .. त्याला काही सुचत नाही की काय करावं .. तो आता फक्त रविवार ची वाट पाहत असतो आणि जेवण करून झोपी जातो.
असेच काही दिवस निघून जातात आणि पुन्हा रविवार येतो .. आणि आज तो बागेत लवकर येतो आणि मानसी आणि प्रचीची वाट पाहत असतो पण त्या दोघही आलेल्या नसतात तो सणध्याकाडच्या सात वाजता पर्यंत वाट पाहत बसला असतो पण त्या काही आलेल्या नसतात त्याला फार दुःख होतो ... आणि तो निराश मनाने घरी नघून जातो ... त्याला वाटत त्याची भेट होणार की नाही ... म्हणून तो विचलित झालं असतो ... अचानक तो विचार करतच असतो तर त्याची आई त्याचं रूम मध्ये येते....
विवेक आत येऊ का ....- त्याची आई
अग एना त्यात काय विचऱ्यच - विवेक
काय झालं कामच फार टेन्शन आहे का खूप टेन्शन मध्ये दिसतो काही दिवसापासून खुप विचारात हरवलेला असतो ... - विवेकची आई
नाही ग काही टेन्शन वैगरे नाही बस असच...   तू बोल काही काम होत का .. - विवेक
काही काम नाही तुला सागायला आली होती आम्ही उदय गावाला जाणार आहोत .. तुझे बाबा मनाले काही शेती ची कामे आहेत ते संपवायची आहेत ..... - विवेकचा आई
अग कितीदा सागु तुम्हाला आता काम करायची काही गरज नाही तरी सुध्दा बाबा आणि तू काही एकत नाही.. - विवेक
तस नाही रे आम्ही पुराणे लोक आमचं मण शेती आणि गावातच असते म्हणून जेव्हा पर्यंत हाथ पाय चगले आहेत करू दे आम्हाला ज्या दिवशी नाही होणार तर येऊ आणि कायमचे तुझ्या जवळ ... - आई
ठीक आहे जस तुम्हाला वाटत करा पण काळजी घ्या ठीक आहे... आणि जास्ती दगदग नका करू... - विवेक .
ठीक आहे बाबा आता झोप आणि जास्ती टेन्शन वैगरे घेऊ नको.. - आई
आई विवेकच्या रूम बाहेर येतात आणि विकेक पुन्हा मानसी च्य विचारत झोपी जातो..... आणि ती ची भेट केव्हा होईल ह्याचं विचारत असतो....
क्रमशः

🎭 Series Post

View all