ऋणानुबंध भाग ३ (मराठी कथा : marathi story)

Intoduction of family

      मागील भागाचा सारांश: आपण पहिल्या भागात बघितलं की स्वराने सारंगला तिच्या पप्पांची ओळख करून दिली तर दुसऱ्या भागात स्वराने आईची, तिच्या स्वभावाची ओळख करून दिली. 

सारंग--- स्वरा तुझ्या आई पप्पांच जेवढं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, एका खेडेगावात राहून मुलींना एवढं शिकवणं, त्यांची व्यवस्थितरित्या जडणघडण करणे हे कौतुकास्पद आहे. 

स्वरा--- आता राहिल्या त्या माझ्या बहिणी आणि माझा भाऊ. आपण आपले मित्र मैत्रिणी निवडू शकतो पण बहीण भाऊ निवडण्याचा अधिकार आपल्याला नाही. बहीण भाऊ हे असे नाते आहे जे आपला जन्म झाल्याबरोबर किंवा त्यांच्या जन्म झाल्यावर कायमस्वरूपी जोडले जाते. 

         या जगात आईनंतर आपली सगळ्यात जास्त काळजी करणारी व्यक्ती म्हणजे आपली बहीण असते. मी खूप नशीबवान आहे की मला अश्या बहिणी भेटल्या. माझी सगळ्यात मोठी बहीण माझ्यासाठी आदर्श आहे, ती शिकली, ती पुढे गेली म्हणून आम्हालाही पुढे शिकता आलं. माझ्या दोघीही बहिणी खूप चांगल्या आहेत, त्या मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात, काही अडचण आली तर ती सोडवायला मदत करतात. माझी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्या माझी पुरेपूर मदत करतात.

        अस नाही की आमच्यात मतभेद होत नाहीत किंवा भांडण होत नाही पण आमच्या सर्वांत एक unsaid promise आहे, आमच्यापैकी कुणालाही कुठल्याही प्रकारची अडचण आली की बाकीचे सर्व त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहतात. आई पप्पांनंतर माझ्या जवळच कोणी असेल तर त्या माझ्या बहिणी आणि भाऊ. 

         माझ्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आला किंवा अशी एखादी परिस्थिती असेल की ज्यावेळी मला काय करायचं सुचत नसेल त्यावेळी मी माझ्या बहिणींशी त्या संदर्भात बिनधास्त बोलू शकते, त्या ती परिस्थिती कशी हाताळायची हे व्यवस्थितपणे समजावून सांगतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजू व्यवस्थित दाखवून देतात, त्यामुळे मला निर्णय घेणे सोपे जाते.

           आम्हा तिघींचेही स्वभाव विभिन्न आहेत म्हणजे एकाच परिस्थितीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो पण हेतू मात्र एकच असतो. समजा माझ्यात आणि तुमच्यात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला आणि मी ते माझ्या बहिणींना सांगितले तर दोघींचीही प्रतिक्रिया वेगवेगळी असेल म्हणजे एकजण शांततेत प्रतिक्रिया देईल तर दुसरी चिडून प्रतिक्रिया देईल पण दोघींचा हेतू एकच असेल तो म्हणजे मी सुखात रहावे.

             शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही काही वर्षे घरापासून दूर रहायला होतो, तेव्हा माझ्या बहिणी नोकरी करायच्या आणि मी कॉलेजला होते. आम्ही तिघी सोबत राहत होतो. मी घरातून साडेपाचला बाहेर पडायचे ते रात्री नऊला घरी परत यायचे, कॉलेज, क्लास यामुळे एवढा उशीर व्हायचा. माझ्या दोघी बहिणी एवढ्या सकाळी उठून मला डबा करून द्यायच्या आणि त्यापैकी एकजण मला क्लास पर्यंत सोडवायला यायची, अस दोघींनी सतत दोन वर्षे केलं. हे सर्व त्यांनी केलं तर का की माझं स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून. या सर्वाच महत्त्व मला त्यावेळी कदाचित कळलं नसेल पण आत्ता मात्र ह्या गोष्टीची मला पुरेपूर जाणीव आहे. त्यांनी माझ्याकरीता खूप काही केलं आहे. मला एकच खंत आहे की या सर्वासाठी मी त्यांना कधीच थँक्स म्हणाले नाही आणि आता जरी म्हणायला गेले तरी त्या लगेच म्हणतील की ही फॉर्मलिटी कशासाठी?

         अस म्हणतात की लग्न झाल्यावर मुली परक्या होतात, त्यांची कर्तव्ये बदलतात, त्या माहेरापासून, माहेरच्या लोकांपासून दूर जातात. माझ्या बहिणींनी लग्न झाल्यावरही माहेर व सासर यामध्ये खूप छान रित्या समतोल राखला आहे. लग्न झाल्यावरही मला कधीच त्या परक्या वाटल्या नाही म्हणजे त्यांनी ते जाणवू दिलं नाही. अस कधीच होत नाही की मी त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागितली आणि ती मला मिळाली नाही.

         माझ्या बहिणींकडून मी कळत नकळत खूप काही गोष्टी शिकत आहे. लग्नानंतर त्यांनी घर आणि नोकरी याचा समतोल खूप छान राखला. लग्नानंतर नोकरी करताना, घर सांभाळताना काय काय अडचणी येतात, त्यांना सामोरे कसे जायचे हे मी त्यांच्याकडून शिकले आहे. कुठल्या परिस्थितीत शांत रहायचं, कुठल्या परिस्थितीत चिडायचे किंवा नाती कशी जपायची हे सर्व मी त्यांच्याकडूनच शिकले आहे. मी माझ्या आई पप्पांच्या घरानंतर जर कोणाच्या घरी कधीही आणि कितीही दिवस निःसंकोचपणे राहू शकत असेल तर ते म्हणजे माझ्या बहिणींच्या घरी.

          मी माझ्या बहिणींकडे गेल्यावर मला हातात आयता चहा, जेवण मिळते. माझ्या आवडीचे पदार्थ करून त्या मला खायला घालतात. मला हॉटेलमध्ये जेवायला, बाहेर फिरायला आवडतं तर त्या मी त्यांच्या घरी गेल्यावर बाहेर फिरायला, जेवायला घेऊन जातात. 

          कस आहे ना, मला मैत्रिणी आहेत म्हणजे अगदी जवळच्याही आहेत पण मला वाटेल तेव्हा मी त्यांना फोन करू शकत नाही कारण बहुतेक जणींची लग्न झालेली आहेत आणि लग्नानंतर मुलीच आयुष्य बदलते, प्रायोरिटीज बदलतात मी ते समजू शकते. माझ्या बहिणींना मी कुठल्याही वेळी कधीही फोन करू शकते म्हणून आपल्याला एक तरी बहीण असावी.

        माझ्या बहिणी माझे वाढदिवस खूप उत्साहात साजरे करतात. दिवाळीला, वाढदिवसाला खूप सारे गिफ्ट्स देतात. माझ्या बहिणी खूप खूप चांगल्या आहेत. I feel very lucky to have sisters like them.

         मला एक गोष्ट माहीत आहे किंवा मला खात्री आहे की माझ्या आयुष्यात कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी माझ्या आई पप्पांनंतर माझ्या बहिणी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या असतील.

         मी बहीण या विषयावर खूप सुंदर लेख वाचला होता,

A sister is someone, who loves u from heart. No matter how you argue, you can't be drawn apart. More than ur mother, ur sister knows, when u have been good and bad. I may not been so expressive to show how much I love you, but I just want you to know that I love you to the moon and back. 

©®Dr Supriya Dighe

          

       

🎭 Series Post

View all