ऋणानुबंध परत जुळले...

अतिशय सुंदर आरतीच समजूतदार आकाशशी लग्न ठरल, एकदम अनुरूप जोडा होता त्यांचा, दोघाही छान कमवते होते, आरती प्रमाणेच आकाशही अतिशय समजूतदार मुलगा होता त्यामुळे तिचे आई-वडील निश्चिंत होते, एक चांगला मुहूर्त बघून धुमधडाक्यात लग्न झालं,

आरती एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर च्या पोस्ट वर होती, एकुलती एक आरती आई वडिलांची खूप लाडकी होती, लहानपणापासून अभ्यासात अतिशय हुशार आरती ने वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नव्हता, जेवढी हुशार तेवढी शांत होती आरती, त्या दिवशी ऑफिस मध्ये आईचा फोन आला 


"आरती अग आज येता येईल का लवकर घरी"?,...... आई 


"हो येते आई, पण काय झालं आहे"?,...... आरती 


"घरी तुला बघायला पाहुणे येणार आहेत",..... आई 


अतिशय सुंदर आरतीच समजूतदार आकाशशी लग्न ठरल, एकदम अनुरूप जोडा होता त्यांचा, दोघाही छान कमवते होते, आरती प्रमाणेच आकाशही अतिशय समजूतदार मुलगा होता त्यामुळे तिचे आई-वडील निश्चिंत होते, एक चांगला मुहूर्त बघून धुमधडाक्यात लग्न झालं, 


लग्नानंतर आरती सासरी पोहचली, खूप छान स्वागत झालं तीच, आरतीची नणंद सारिका खूप चांगली होती स्वभावाने आणि हौशी ही होती, तिनेच हे सगळ अरेंज केलं होतं, 


नव्याची नवलाई संपली आकाशने ऑफिसला जायला सुरुवात केली, नणंद सारिका वापस गेली तिच्या घरी, घरात सासू सासरे आणि ती फक्त दिवस भर, आरतीला आता घरी करमायचं नाही, तिने लग्नासाठी एका महिन्याची सुट्टी घेतली होती, पण काय करणार दिवस भर उगीच ऑफिसचे कामे तिकडे वाढता आहेत,...... आरती विचार करत होती 


"आकाश मी माझी सुट्टी कॅन्सल करू का? खूप कंटाळा येतो घरात" ...... आरती 


"चालेल मला काही हरकत नाही, तू हो जॉईन ", .... आकाश बोलला 


रात्री जेवतांना आरतीने विषय काढला, "आई मी माझी सुट्टी कॅन्सल करते आहे", तशा सासुबाई आश्चर्याने आरतीकडे बघायला लागल्या, "अजून तर काहीही शिकवलं नाही मी तुला आरती, स्वयंपाकही तुला धड जमत नाही, आपल्या घरच्या रितीभाती शिकून घे, पुढे सगळं तुलाच करायचा आहे, ऑफिस ऑफिस काय करतेस " , 


"पण त्यात शिकण्यासारखं काय आहे, जसा सण येईल तसे तुम्ही कराल ते मी बघेलच, आणि स्वयंपाक हि जमेलच की सवय झाली की ".... आरती 


" अच्छा म्हणजे अजूनही मीच करायचा आहे का सगळ" ? ....... सासूबाई रागावल्या होत्या 


आरतीला सुचेना काय करावे ती आकाश कडे बघत होती 


" आई अगं जाऊदे आरतीला ऑफिसला नाही तरी तिचं पेंडिंग काम कोणी केल नसेल, उशिरा जॉईन झाली तर खूप काम असेल ऑफिसला, यायला खूप उशीर होईल तिला घरी, आता जर रेग्युलर गेली तर वेळेवर घरी येईल ती, आणि आता बाहेरच जग खूप बदलला आहे, खूप टार्गेट असतात, तिला घरी स्वस्थ बसवणार नाही" ,..... आकाश 


" तु जा ग ऑफिसला उद्यापासून ".... आकाश चे बाबा बोलले 


दुसऱ्या दिवशी आरती लवकर उठली, पटापट आवरलं, सगळं स्वयंपाक केला, आकाश होताच मदतीला, सगळं आवरून ती ऑफिसला गेली 


इकडे सासुबाई रागे भरलेल्या होत्या, मी नाही बोलली तरी कशा सगळ्या घराने तिची बाजू घेतली, त्यामुळे त्यांच्या मान सन्मानाला ठेच पोहोचली होती, त्या डीवचल्या गेल्या होत्या, 


आता त्यांनी आरतीला त्रास द्यायला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली, कुठलाही पदार्थ तिने केला की त्या नाक मुरडायायच्या, छोट्या छोट्या कारणांवरून आरतीला ऑफिसमधला सुट्टी घेण्याचा आग्रह करायचा, कुठलीही गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणेच व्हायला हवी हा त्यांचा हट्ट असायचा, प्रत्येक वेळी त्यांचा हट्ट पुरवणे आरतीला शक्य नसायचे, तिला मनातन खूप वाईट वाटायचं सासुबाईंनि कडून चांगल्या वागण्याची अपेक्षा तिला होती, तिला त्यांचा आधार वाटतच नव्हता


एक दिवस तिने आकाश जवळ मन मोकळं केलं आणि खूप रडून घेतलं, तेव्हाच नेमका सारिकाचा आकाशच्या बहिणीचा फोन आला होता 


"काय रे दादा काय झालं काय गोंधळ आहे"?.... सारिका विचारत होती 


आकाश ने सगळं सविस्तर सारिकाला सांगितला 


आईचं वागणं कसं बदललं आहे अचानक हे बघून सारिका आश्चर्यचकित झाली 


"तू काळजी करू नको दादा, मी बघते काय करायचं ते, तोपर्यंत तू आरती ची काळजी घे" ,..... 


दोन-तीन दिवसांनी सासुबाईंचे धावपळ सुरु झाली स्वतःहून त्यांनी आवरायला घेतल, रात्री जेवताना त्यांनी आरतीला सांगितलं की "तू आठ दिवसाची सुट्टी घे, माझी मुलगी सारिका येते आहे, तिचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं, इतर वेळी तुला ऑफिसचि कामे असतात मी नाही म्हणत नाही पण नणंदेच तुला व्यवस्थित करावे लागेल" ,...... सासुबाई 


आरती परत आकाश कडे बघत होती आकाशने डोळ्यानेच सांगितलं की काळजी करू नको, रूम मध्ये गेल्यावर तिने सांगितलं,...... " मला सुट्टी घेणं शक्य नाही, ऑफिस मध्ये इम्पॉर्टंट सबमिशन आहे, असं जर मी सारखी सुट्टी घेतली तर मला लवकरच ऑफिस मधून काढून टाकतील आणि या घरात मी दिवसभर सासुबाईं सोबत राहू शकत नाही" 


दुसऱ्या दिवशी आरतीने सकाळी लवकर आटपलं, नाश्त्यासाठी बनवून ठेवलं, जेवण बनवून ठेवलं आणि तिने ऑफिस साठी आटपायला घेतले 


" कुठे चालली आहेस तू आरती"? ....... सासुबाईंनी विचारले 


" आई मी ऑफिसला जाते आहे, तुमचं सगळं काम झालेला आहे, दुपारचं जेवण नाष्टा सगळ रेडी आहे",..... आरती 


"माझी मुलगी काही गार जेवणार आहे का? तुला मी सांगितलं ना सुट्टी घे असं".... सासुबाई ओरडत होत्या 


काहीही न बोलता आरती ऑफिसला निघून गेली 


दुपारून सारिका आली, आईला भेटली," काय झालं आई तुझा चेहरा का उतरला आहे "? 


" बघ ना तू एवढ्या दिवसांनी आली आणि आरती घरी नाही ",...... सासुबाई 


" काही होत नाही ग, तील ऑफिस मध्ये काम असेल आणि तू आहे ना, आकाशच्या लग्नाआधी होती का आरतीचे इथे, करु दे तिला तीच काम मग आपण दोघी आहोत" ,...... सारिका 


" पण तुला गार जेवावे लागेल ",...... सासुबाई 


" का आई तू स्वयंपाक करण बंद केला का आता?, असू दे मी करून घेईन पोळ्या".... सारिका बोलली, "घरी काय मला सकाळ-संध्याकाळ गरमागरम जेवण मिळतं का? आरती एवढे करून गेली तेच खूप आहे" 


जेवण गरम करून मायलेकी जेवल्या 


संध्याकाळी आरती आली सारिकाला आवडतं म्हणून आईस्क्रीम आणलं, लगेच कपडे बदलून ती स्वयंपाकाला लागली, 


" आरती इकडे ये लगेच काय कामाला लागली, माझ्याजवळ बस बोलू आपण दोघी, "........ सारिका 


" हो ताई पण स्वयंपाकाला उशीर होईल ना"?,. ..... आरती 


" करू ग आपण दोघी मिळून, तू कशी आहेस ते सांग, लग्नाच्या धावपळीत आपल्याला बोलायलाच मिळालं नाही".... सारिका 


दोघी नणंद भाऊजाईंनी खूप गप्पा मारल्या, त्यांच्यातल्या नात्यातली रेघ गळून पडली, अर्ध्यातासातच त्या जणू प्रिय मैत्रिणी असल्यासारख्या बोलत होत्या,  


" बाई बाई अजून स्वयंपाक झाला नाही का" ?.... सासुबाई कडाडल्या 


तशी आरती घाबरुन उभी राहिली 


"कशाला ओरडतेस ग आई"?, .... सारिका बोलली, "मीच बोलली आरतीला की बस माझ्या जवळ आपण बोलू जरा, लग्नाच्या धावपळीत बोलताच आलं नाही एकमेकींशी, तिचा स्वभाव खूप छान आहे" , 


"हो पण गप्पांनी पोट भरत नाही, स्वयंपाक वगैरे काही आहे की नाही" ,.... सासुबाई आरती कडे रागाने बघत होत्या 


" खिचडीच कर ग आरती, मी येते मदतीला", ...... सारिका आरती सोबत किचनमध्ये गेली 


आई रागाने हॉलमध्ये बसली होती, आकाश घरी आला, 


" काय झाल आई..... सारीका आली का" ?...... आकाश 


" हो आली आणि आरतीने तिला लगेच स्वयंपाकाला लावलं",...... सासुबाई 


" आई काय बोलतेस तू हे? मिच माझ्या मनाने आरतीच्या मदतीला गेली" .... सारिका बाहेर आली भावाला भेटली 


आकाश सांगत होता आई आता हल्ली असंच वागते आहे आरतीला नुसतीच पाण्यात बघते, 


"बोलू आपण यावर रात्री दादा", ..... सारिका 


सगळ्यांनी हास्यविनोद करत जेवण केले, आरती पहिल्यांदा सगळ्यांना एवढे खुश बघत होती, सारिका ने आवरायला मदत केली 


आरतीच्या आईचा फोन आला, ती बोलायला बाहेर गेली, 
हा चान्स बघून आकाशाने बोलला,.... "तू आईला समजाव सारिका" , 


सासुबाई सगळं ऐकत होत्या..... 


"काय चुकलं रे माझं, तुझ्या बायकोला फक्त ऑफिस शिवाय काहीही सुचत नाही",...... सासुबाई 


"आई आता हल्ली बाहेर कॉम्पिटिशन खूप असत, नोकरी म्हटलं की वेळ द्यावाच लागतो आणि पूर्वी पण तू करायचीसना काम आता थोडी मदत केली तर काय बिघडणार आहे, ठीक आहे नको करू मदत, आरती करते सगळं, मी बघितला आहे, पण नीट बोलत जा तिच्याशी, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात आली म्हणून तिच्याशी कसे वागायचं का? आई तू विचार कर जर मला असा त्रास माझ्या सासरी दिला असता तर तुला चांगलं वाटलं असतं का"?,..... सारिका....... " आरतीच्या आईला कसं वाटत असेल, त्या काय विचार करत असतील तुझ्याबद्दल, तू हे तुझं वागणं लवकर बदल नाहीतर याचे परिणाम वाईट होतील, दादा आणि पप्पा तुला काही बोलत नाही, तू वाईट वागू नकोस, नाहीतर ते सगळे एकत्र येतील आणि तू वाईट ठरशील",.... 


"हत्ती बनुन लाकडं तोडू नकोस, मुंगी बनवून साखर खा, नको तिच्या मागे लागून येवढं, ती बरोबर करते आहे काम थोडं ऍडजेस्ट कर, सासू आहे म्हणून खाष्ट वागायला पाहिजे का? तु आता तिला प्रेमाने वागवलं तर तुझ्या उतारवयात ती तुला नीट सांभाळेल",........" मी येणार नाही तुला सांभाळायला, तुझी सून कामाला येईल, आता तूच ठरव तुला कसं वागायचं आहे ते",....... सारिका खूप बोलली आई ला


सासुबाई रागाने आत निघून गेल्या 


आकाश सारिका कडे प्रेमाने बघत होता...... "थँक्यू सारिका खूप मोठा प्रश्न तू सोडवला आहे, छान समजावल आईला आता कशी वागते तिलाच माहिती" 


दुसऱ्या दिवशी सकाळी आरती डब्याची तयारी करत होती बघते तर सासुबाई किचन मध्ये आल्या 


"तू कर पोळ्या मी चहा आणि भाजीच बघते",..... सासुबाई 


आरतीच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही, हा बदल कसा काय घडला अचानक, तिला माहिती होत या परिवर्तना मागे सारीका ताईच आहेत


सात आठ दिवस सारिका माहेरी मजेत राहिली, आईचं बदललेलं रूप ती बघत होती तिला खूप आनंद झाला, सारिका जायला निघाली, 


मला बोलायच आहे ताई तुमच्याशी... आरती बोलली... "तुम्ही मला न सांगता येईल एवढ मोठ गिफ्ट दिल आहे, माझ्या परिवाराचा आनंद वापस दीला आहे, मी तुमची खूप ऋणी आहे, थँक यु व्हेरी मच, आधी नणंद म्हटलं की भीतीच वाटायची, घाबरूनच होती मी तुम्ही येणार होत्या तर, आता तुम्ही नणंद नाहीतर मैत्रीणच आहात, तुमच्या चांगल्या स्वभावातून मीही काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेन", 


दोघी एकमेकीच्या मिठीत समावल्या, सासूबाई हे आनंदाने दोघींकडे बघत होत्या, ऋणानुबंध पुन्हा जुळले होते, यावेळी कायमचे