संस्कार बालपणीचे

every child is god's gift...

आई -"The Dominant & Powerful Person"

"बालपण"

आईपण कधी चालू होते,अस म्हणल्यावर नक्कीच  डोक्यात विचार येतो ना,पण खर तर आई होण्याची जेव्हा मनाची तयारी होते तेव्हा पासूनच आईपणाचे वेध चालू होतात.

"मी माझ्या बाळाला हे करेल,ते करेल ,त्याला पौष्टिक खावू घालेन,बाहेर जाताना परी सारखी नटवून घेऊन जाईल,अशी फ्रॉक घेईन तो गॉगल घेईल,असे शूज हवेत आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो खूप चांगला माणूस असेल.",अस सगळ्यांच्या डोक्यात नसेल आल तरच नवलं!

आपली मुले म्हणजे आपले सर्वस्व असते मग त्यांना आई म्हणून काय काय आपण शिकवले,जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगितल्या ना,नक्की !

आई बद्दल कोणी काय सांगणार,शब्दांचा सागर वाहायला लागतो,त्या माऊलीच्यात ताकदच असते एवढी,तीच माऊली आपले आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते तर दुसरीकडे तीच भूमी उद्ध्वस्त करणारे भामटे पण निर्माण करू शकते.म्हणूनच,थोडे थांबून,शांत होऊन ,हलकाच थोडा विचार करून,कस वाटले तुम्हाला ,थोडसं डोक जड झाल्यासारखे वाटत असेल ना! 

कस होते ,अगोदर अगदी संस्कार न कळतपणे आणि जबाबदारीने होयचे ,घरात मोठी माणसे असायची त्यांची मदत होयची ,नातेवाईकांकडे जाण-येण असायचे त्यामुळे सगळ्या गोष्टी अगदी सहज जमायच्या पण आता तस होत नाही.

"बाबा कधी घरी येतील ग आई" जीवा ने विचारले.

"का रे,आज चक्क बाबा" आई म्हणते.

"हम्म,फोन पाहिजे होता तुझा डाटा संपला ना विडिओ पाहून पाहून म्हणून म्हणले ",जीवा उत्तरला.

तुम्हीच सांगा ,हे वाचून किती लोकांच्या मनात डोक मिनिटात गार पडले.

जीवाला बाबांची काळजी नाहीतर त्याला फोन ची वाट पाहतोय.

अस,होयला नको असचं वाटले ना!

मग त्यासाठी काय करायचे,हे पण तर आपण शिकवलेले आहे ना!

कधी कधी नकळत पणे म्हणतोच की,बाबा आले की घे त्यांचा फोन.

मग आपणच शिकवलेले चुकीचे कसे झाले.

म्हणूनच आई होण,खूप जबाबदारीचे आणि खूप कृतीशील काम आहे,ते उत्तमरीत्या करण म्हणजे संस्कार आहेत.

असे संस्कार जे त्यांच्या सोबत आयुष्यभर सोबत राहणार आहेत.

अशी गोष्ट नक्कीच त्यांना आपल्याला द्यायला आवडतील ना!

सगळ्यात महत्वाचे म्हणजे सुरवात आपण करुयात म्हणजे की,आपल्या पाल्याबद्दल एक ही शब्द नकारार्थी बोलायचं नाही आणि दुसर्‍यांना तर अजिबातच सांगायची गरज नाही की 'तो जेवतच नाही,काही ऐकतच नाही,सारखे मारतो,खूपच त्रास देतो,नको नको झालाय आणि बरच काही.'

ज्यावेळी मुले त्यांच्या कानावर नेहमी ऐकत राहतात ते पण त्यांच्याच आईच्या तोंडून तर मग त्यांना तर ते अजूनच खूपच खर वाटणार नाही का आणि त्यांना घट्ट मनाशी पकडून ठेवणार ना!

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच जीवाला कोणतेही वाईट लेबल लावू नका,तुम्ही स्वत:.

तुमचे लेबल त्यांना त्यांची ओळख वाटते आणि ते तेच करतात.

तुम्हाला ते कस हव आहे,कस असले पाहिजे,याचा विचार करा आणि त्याला प्रोत्साहित करा.आता तो नाही चपळ,पण पाहिजे ना तसा म्हणून त्याला सारखे म्हणत रहा,' तू खूप चपळ आहे,तुझी सगळी कामे तू खूप लवकर आवरतो'.

तो तस वागत नसताना पण तो कसा असावा,हे बोलन तस कठीणच,ते करताना स्वत:च्या रागावर तर नियंत्रण राहायला पाहिजे,आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रोज करायचे आहे जो पर्यन्त तो खरच चपळ होत नाही आणि त्याचा आत्मविश्वास वाढत नाही तो पर्यन्त. साहजिकच त्यासाठी संयम खूप मोठा रोल निभावणार आहे. लेबल चांगलच लावयाचे आहे कारण ती त्याची ओळख असते,आणि ती लेबल पालकच लावतात म्हणून ती अजून अग्र स्थानी असतात.

तर,पाल्याच्या सभोवती फक्त आता चांगले बोला,त्यांची स्तुति करा ,त्यांना प्रोत्साहन द्या पण वाईट नको.

लहान मुले मातीचा गोळा असतो,जसा आकार देऊ तसा तो घडत असतो,कारण त्याचा . घडवणारा कुंभार स्वत: आई असते. 

 

Click to Read More....