Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

रुचिरा एक प्रेमकथा.. भाग २

Read Later
रुचिरा एक प्रेमकथा.. भाग २


भाग २..

शीर्षक:- रुचिरा एक प्रेमकथा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

टिम:- सातारा, सांगली.


पण इकडे मात्र त्या मुलाकडची मंडळी अजून देखील रुचिराच्या घरच्यांना तिला लग्नासाठी अजून देखील फोर्स करत होते. पण रुचिराचा मात्र नकार कायम होता.

त्यातच एक दिवस कोणीतरी मुद्दामहून एका अनोन नंबर वरून रुचिराचे कोणा सोबतचे तरी काही नको त्या अवस्थेतील फोटो एडिट करून त्या मुलाला पाठवले.

ते फोटो पाहून तो मुलगा आणि त्याची आई रुचिराच्या घरी आले. घरी येऊन त्यांने ते फोटो सर्वांना दाखवले.

ते फोटो पाहून रुचिरा सकट घरातील सर्वांना धक्काच बसला होता.

"रुचिरा, हा सगळा काय प्रकार आहे लाज वाटते का तुला, अग ऋग्वेदच लग्न झाल आहे, अन् तु त्याच्याशी अस नाते ठेवते थोडी तरी लाज बाळग," राजश्री रागाने रुचिराला बोली.

"वहिनी हे सगळं खोट आहे कोणी तरी मुद्दाम असे केले आहे," रुचिरा रडत म्हणाली.

"म्हणजे तुला नक्की काय म्हणायच आहे, तुला याला ओळखत नाहीस का," त्या मुलांची आई रुचिराला रागाने विचारते.

"मी ओळखते ह्याला हा ऋग्वेद आहे," रुचिरा बोलत होतीच की तो मुलगा मध्येच रुचिराच्या बाबांना बोला

"बघा तुमची मुलगी स्वतःच कबुल करतीय की ती ह्या मुलाला ओळखते, म्हणजे हे फोटो देखील खरेच असणार," तो मुलगा रागाने म्हणाला.

त्या मुलाची आई देखील रुचिरा आणि तिच्या घरच्यांना बरेच काही  अपमानास्पद बोलून तिथून निघून गेली.


सत्याची पडताळणी न करता आज रुचिरा वर नको ते आरोप लावल्यामुळे रुचिराला चांगलाच मानसिक धक्का बसला होता.


"रुचिरा आज पासून तु इथे राहायचे नाही, निघून जा आमच्या घरातून," राजश्री तिला घराबाहेर धकलत बोली

"राजश्री बहिण आहे ती माझी, मी बघतो काय करायच चल आत" म्हणत राघव तिला घेऊन त्याच्या खोलीत निघून गेला. त्याच्या मागोमाग, सर्वजण आपापल्या खोलीत निघून गेले.

रुचिरा देखील रडत तिच्या रुममध्ये निघून गेली.

त्या दिवसानंतर ह्या गोष्टी मुळे घरातले सर्व वातावरण खूप बदले होते. रुचिराच्या आई बाबांन तर धक्काच बसला होता.
राघव देखील काहीच कळत नव्हते, त्यातच राजश्री मात्र त्याच्या मनात रुचिरा बद्दल राग निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती.

तर समीरा कश्याचीच पर्वा न करता, सरळ बिझनेस ट्रिप साठी काही दिवस निघून गेली. जणू तिला याचा काहीच फरक पडत नाहीय.

रूचिराला मात्र सगळ्यांना समजावायचा प्रयत्न करत होती पण तिच कोणीच ऐकून घेत नव्हत. तिने बरेचदा आपल्या बाबांशी बोलण्याचा देखील प्रयत्न केला पण ते तिला बघताच तिथून निघून जायचे.

नेहमी प्रत्येक गोष्ट ऋग्वेदला सांगणाऱ्या रुचिरा यावेळी त्याला काहीच सांगितले नव्हते. सध्या तर तिने अभ्यास बिझी असल्याचे सांगून ऋग्वेदशी बोलण देखील आता थोड्यास कमी सोडून दिल होत.

पण घरी राजश्री मात्र रोज तिला येता जाता वाटेल तस अपमानास्पद बोलायची. ते शब्द रुचिरा खुप लागायचे. यामुळे मात्र रूचिराला डिप्रेशन मध्ये जायला लागली होती. तिने आता काॅलेजला जायचे देखील कमी केले होते.

एके दिवशी दुपारी घरी फक्त रुचिरा आई आणि राजश्री असताना.
ऋग्वेद अचानक घरी आला. बरेच दिवसांपासून रुचिरा न भेटल्या मुळे तो तिला भेटायला घरी आला होता.

नेहमी हसतमुखाने स्वागत करणाऱ्या रुचिराच्या आईने ह्यावेळी मात्र ऋग्वेदला बघून तोंड वाकडे करून आत निघून गेली.

नेमकी त्याच वेळी रुचिरा पाणी पिण्यासाठी बाहेर आली होती. ऋग्वेदला आलेला बघून तिला खुप रडायला येत होत.

ती भरलेल्या डोळ्यांने त्याच्या कडे बघत होती.

हे बघून राजश्रीला बोलायला चांगली संधीच मिळाली होती.

आज ऋग्वेद समोर देखील रोजच्या पेक्षा कैक पटीने जास्त राजश्रीने रुचिराचा आणि त्याच बरोबर ऋग्वेदचा देखील तिने अपमान केला, त्याच वेळी रुचिराचे बाबा देखील घरी आले, पण काहीच न बोलता ते त्याच्या रुममध्ये निघून गेले.

ऋग्वेदला तर हे सगळ ऐकून चांगलाच धक्का बसला होता. तो देखील आता चांगलाच रागाला आला होता.

तो राजश्रीला काही बोलणार इतक्यात रुचिराने त्याला नजरेनेच नाही म्हणून खुणावले, त्यामुळे तो गप्प पणे तिथून काही न बोलता निघून गेला.

रुचिराच्या ह्या फोटोज् मुळे राजश्रीच्या माहेरील लोक तिची खिल्ली उडवायचे, शिवाय त्या मुलांची आईने राजश्रीला देखील बरेच काही सुनावले होता, याचा राग  ती बिचाऱ्या रुचिरा वर काढायची.


पण दुसऱ्या दिवशी मात्र तो रुचिराच्या कॉलेज समोर तिचीच वाट बघत थांबला होता. त्याला माहिती होत रुचिरा आज काही करुन कॉलेजला येणार कारण आज कॉलेज मध्ये वकृत्व स्पर्धा होत्या, आणि त्याची तयारी रुचिरा खुप आधी पासून करत होती.
आणि झाले देखील तसेच होते आज आठ-दहा दिवसांनी रुचिरा कॉलेजला आली होती.

काॅलेज सुटल्यावर रूचिराला बघताच तो तिच्या जवळ गेला.

"रुचिरा का तु हे सगळ माझ्या पासून लपवलस, अग काल वहिनी किती नको नको ते बोलत होत्या तिला, आणि तु पण ऐकून का घेतलस," ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद सांगून दमले रे घरच्यांना, त्यांना कोणालाच माझ्या वर विश्वास नाहीय," रूचिराला रडत म्हणाली.

"हे कधी आणि केव्हा झाल हे सगळं मला सांग पटकन", ऋग्वेद म्हणाला, तस रूचिराने त्याला सगळ घडल तस सांगून टाकल.

"रूचिराला तु आधीच का हे सगळं का नाही सांगितल", ऋग्वेद चिडत बोला.

"कोणत्या तोंडाने सांगणार होते, आधीच तु स्वतः राधा वहिनीच्या जाण्यातून आताशी सावरला होतास, म्हणून मी काही नाही बोले" रूचिराला म्हणाली.

"मला सांगा तु मुलगा कोण आहे, मग बघतोच मी त्याला", ऋग्वेदला त्या मुलांचा खुप राग आला होता.

"जाऊ दे ना, अस ही मला आता बोलणी ऐकायची सवय झाली आहे रे, आणि काहीही केल तरी एकदा जो ठपका लागला आहे तो पुसला जाणार नाही ना",रुचिरा खिन्नपणे हसत म्हणाली.

"अंग पण", ऋग्वेद काही बोलणार इतक्यात रूचिराला बोली.

"ऋग्वेद मला फक्त एक मदत कर, आता मी तिथ नाही राहू शकत, माझ्या साठी एखादा जॉब बघ म्हणजे मला त्याच्यातून निघून जाता येईल", रूचिराला म्हणाली.

"माझ्या घरी चल तिथे राहा",ऋग्वेद म्हणाला.

"नको घरच्यांना अजून एक कारण मिळेल बोलायला", रुचिरा म्हणाली.

"ऋग्वेद काही तरी विचार करत म्हणाला, रुचिरा तु माझ्या घरी चल, तिथे तुला कोणी काय बोलणार नाही", ऋग्वेद म्हणाला.क्रमशः...


✍अमृता

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//