रुचिरा एक प्रेमकथा

रुचिरा आणि ऋग्वेद यांच्या अनोख्या नात्याची कथा
शीर्षक:- रुचिरा

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

टिम:- सातारा, सांगली.

ही कथा आहे रुचिरा आणि ऋग्वेद यांच्या अनोख्या नात्याची.

रुचिरा आपल्या कथेची नायिका आणि ऋग्वेदची आपल्या कथेच्या नायकाच्या सख्ख्या मामाची तीन नंबरची लेक, रुचिरा एका सधन संस्कारी कुटुंबातील एक मुलगी,तिच्या घरचे वातावरण तसे कडक शिस्तीचे होते, तिची आजी आणि वडील तर खुप जास्त शिस्त प्रिय होते.
पण रुचिरा मात्र त्यांना पुरून उरेल असा नमुना होती. एक नंबरची आगाव जे ही, खोड्या काढण्यात पटाईत, पण तशीच अभ्यास देखील पटाईत होती.
स्वभावाने दंगेखोर, चुळबुळी, नटखट होती, पण तशीच दयाळू, सालस समजस देखील होती.

तिला एका थोरला भाऊ राघव आणि एक थोरली बहिण समीरा अशी दोन भांवड होती.

पण दोघेही तिच्या पेक्षा जवळपास सात आठ वर्षांने मोठे होते, त्यामुळे ते नेहमी आपल्या मित्र मंडळीत किंवा अभ्यासत गुंतलेले असायचे. आई तिच्या रोजच्या घरकाम, आजी तिच्या भजनी मंडळ पोथी पुराण यांत गुंग असायची.

त्यामुळे नंतर नंतर रुचिरा एकलकोंडी झाली होती, त्यानंतर ती कायम तिच्याच विश्वात तल्लीन राहायची. यामुळे तीच घरातील जास्त कोणाशी पटायच नाही, त्याच बरोबर घरातले तिच्याशी पटवून घ्यायचाच प्रयत्न करायचे नाहीत,
त्यामुळे रूचिराला देखील आपल्याच घरात नको वाटायचे.

पण ह्या सगळ्यात एक गोष्ट जमेची होती. ती म्हणजे रुचिराची आत्या.
त्यांना मुलीची खुप हौस पण नशीबाने त्यांना दोन्ही मुलगेच होते.
म्हणून त्या आपल्या भावाच्या दोन्ही मुलींनचा लाड करायच्या पण समीरा स्वभाने जरा शिष्ट होती, त्यामुळे तिला आत्या आवडायची नाही, तर त्या उलट रुचिरा होती, तिचा तिच्या आत्यावर मात्र खुप जीव होता. यामुळे आत्या देखील लावायची रुचिराला तितकाच जीव लावायची.

आत्याची दोन्ही मुल म्हणजे श्लोक आणि ऋग्वेदची देखील रुचिरा खूप लाडकी होती. दोघेही रुचिरा सुट्टीत आत्याकडे गेली की तिचे खुप लाड पुरवायचे. त्यामुळे रूचिराला आपल्या घरापेक्षा आत्याच्याच घरी जास्त आवडायच.

श्लोक अभ्यासाच्या बाबतीत जरा सिरीयस असल्यामुळे तो थोडा सिनसीयर होता, त्याच ध्येय क्लीअर होत. पण ऋग्वेद अगदी उलट आगाऊ, दंगेखोर, खोड्या काढण्यात पटाईत पण ह्याच आणि रुचिराच खुप पटायच जणू दोघे एकमेकांनचे बेस्ट फ्रेंड झाले होते.

काळ पुढे जात राहिला सगळे आपल्या आपल्या क्षेत्रात प्रगती करत यशाची शिखर चढत होते.

राघव आता डॉक्टर झाला होता. त्याच लग्न राजश्री सोबत झाल होत. ती देखील डॉक्टर होती.
समीरा देखील एका कंपनीत कामाला लागली होती, तिच्या साठी स्थळे पाहायच सुरू होत.
रुचिरा देखील आता ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला शिकत होती.

पण ऋग्वेद आणि तिच नात मात्र पुर्वी पेक्षा खुप स्ट्रॉग झाल होत, प्रत्येक निर्णय ती ऋग्वेदला विचारुन घ्यायची, तिच्या आयुष्यात ऋग्वेदसाठी एक वेगळी जागी होती. जी कोणीच घेऊ शकत नव्हत.

अश्यातच एकदा एक दिवस एक मुलगा समीरा पाहायला आला. तेव्हा घरातील सर्व जण तिथे उपस्थित होते, रूचिरा देखील तिथेच होती.

रूचिरा तिथे पाहून मुलांकडच्या मंडळींनी समीरा पसंत न करता डायरेक्टर तिथेच रुचिराला लग्नासाठी मागणी घातली.

खर तर त्या मुलांचा फोटो पाहताच समीराने आपला होकार घरी कळवला, यावरून हे स्पष्ट होते की तिला तो मुलगा आवडला आहे.

पण अचानक रूचिरा घातलेल्या मागणी मुळे सर्व जण गोंधळले होते.
पण बाबांनी आम्ही तुम्हाला नंतर कळवतो म्हणून विषय अटोपता घेत त्या मंडळीना सध्या पाठवून दिले.

ते लोक जाताच रुचिराने लग्नासाठी स्पष्ट नकार दिला कारण तिला शिकून तिची स्वप्न पूर्ण करायची होती, तिचे ध्येय तिला साध्य करायचे.

तिने नकार दिल्यामुळे घरातील सर्वानी तो विषय तिथ थांबवत मुलाकडे नकार कळवयाचे ठरवले.

पण तिथे समीरा मात्र चांगलीच खवळलेली होती, कारण रूचिराला तिच्या पेक्षा प्रत्येक गोष्टीत उजवी होती. त्यात बाहेर जाईल तिथे रुचिराच कौतुक व्हायच, किंबहुना समीरा तिच्या स्वभावामुळे मागे राहायची, आणि यामुळे मात्र कायम समिराचा जळफळाट व्हायचा. रुचिरा बद्दल तिच्या मनात द्वेष निर्माण झाला होता.

त्यात आता देखील समीरा डावली गेल्यामुळे आज ती चांगलीच दुखावली गेली होती.

तर दुसरीकडे म्हणजे आपल्या नाटकाकडे..

श्लोक आता एक नामांकित डॉक्टर झाला होता. त्याची जोरदार प्रॅक्टिस चालू होती,पण भूतकाळातल्या एका घटनेमुळे मात्र लग्नापासून दूर राहत होता, त्याची आई त्याच्या मागे लागून थकली होती, पण हा काही केल्या लग्नासाठी तयार होत नव्हता.

तर ऋग्वेदने लॉ करून स्वतःची फर्म सुरू केली. तो देखील सुरुवातीला लग्नासाठी नाही म्हणत होता, पण त्याच्या आईने खुप गळ घालून त्याला तयार केले, यासाठी त्यांनी रुचिरानेच त्यांना खूप मदत केली होती.
कारण ऋग्वेद सहसा रुचिराचा शब्द डावलत नसे, म्हणून आईंनी रुचिरा तर्फे ऋग्वेदला लग्नासाठी तयार केले होते. आणि आई आणि रुचिराच्या हट्टापाई शेवटी ऋग्वेद लग्नाला तयार देखील झाला होता.

त्यानंतर लगेच ऋग्वेदच्या आईने त्याला साजेशी मुलगी शोधून त्याच लग्न ठरवले होते. राधा ऋग्वेदची बायको शांत आणि समजंस होती, आणि लग्नानंतर तर आता ऋग्वेद बरोबर राधा सुध्दा रुचिराची बेस्ट फ्रेंड झाली होती.


ऋग्वेद आणि राधाच लग्न थाटामाटात झाल, ते त्याच्या आयुष्यतले सोनेरी दिवस आनंदाने भरभरून जगत होते. पण ऋग्वेदच्या लग्नाचा ऋग्वेद आणि रुचिराच्या मैत्री वर काहीच फरक पडला नाही. उलट दिवसेंदिवस ती अजूनच घट्ट होत चाली होती.

त्यात आणखीन एक जमेची बाजू म्हणजे ऋग्वेद घरचाच असल्याने कधीच कोणी त्याच्या मैत्री रुचिराच्या घरचे देखील कोणी काही बोलत नसे.

त्यातच राधा अन् ऋग्वेद च्या आयुष्यात एक गोड परी देखील आली होती , पण डिलिव्हरी च्या वेळी कॅम्पलिकेशन आल्या मुळ  राधा मात्र ऋग्वेद आणि छोट्या परीला एकट टाकून ह्या जगातून गेली होती.

ऋग्वेदला ह्याचा खुप मोठा धक्का बसला होता, कारण ऋग्वेद राधा वर मनापासून प्रेम जे करायचा, पण रुचिराने त्यावेळी त्याला खूप मानसिक आधार तिला होता. त्याला त्या सर्वातून बाहेर पडायला खूप मदत केली होती. राधा गेली ह्या धक्क्यातून रुचिरा मुळे कालांतराने ऋग्वेद थोडाफार सावरला होता.


क्रमशः...


✍अमृता


🎭 Series Post

View all