Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ३

Read Later
रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ३
शीर्षक:- रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ३

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

टिम:- सातारा, सांगली.
"नको घरच्यांना अजून एक कारण मिळेल बोलायला", रुचिरा म्हणाली.

ऋग्वेद काही तरी विचार करत म्हणाला, "रुचिरा तु माझ्या घरी चल", तिथे तुला कोणी काय बोलणार नाही, ऋग्वेद


पुढे...


"नाही ऋग्वेद माझा निर्णय झाला आहे, तु फक्त मला जॉब शोधायला मदत कर, बाकी काही नको", रुचिरा म्हणाली.

"रुचिरा अग तु एकटी कशी राहशील, प्लीज ऐक ना", ऋग्वेद

"कोणत्या नात्याने मी तुझ्या घरी येऊ,कारण जर तुझ्या कडे आले तर जे आरोप माझ्या वर लागले आहेत ते खरे आहेत असच वाटेल सर्वांना",रुचिरा म्हणाली.

"रुचिरा अग तुला आणि मला माहीत आहे आपल्यात फक्त निखळ मैत्री मग विषय संपला",ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद हे फक्त तुला आणि मला माहीत आहे, पण माझ्या घरच्यांच काय", रुचिरा म्हणाली.

"रुचिरा तुला माझ्या घरी यायच की नाही", ऋग्वेद म्हणाला.

"नाही यायचा मला", रुचिरा

"ठिक आहे, तुझ्या आणि माझ्या नात्या वर प्रश्नचिन्ह उभ केल आहे, तर मग चल आपण लग्न करु म्हणजे तु हक्काने माझ्या घरी येऊ शकशील, आणि कोणी काही बोलायचा पण प्रश्न येणार नाही आणि तुला तिथे रहावे देखील लागणार नाही", ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद डोक ठिकाण्यावर आहे का तुझ काय बोलतो आहेस", रुचिरा

"काय चुकीच बोलत आहे, तुला तिथे राहायच नाही, माझ्या घरी यायला पण तु विचारते कोणत्या नात्याने येऊ म्हणून लग्न कर माझ्या सोबत, म्हणजे सगळे प्रश्न सुटतील", ऋग्वेद अगदी सहजपणे म्हणाला.

"ऋग्वेद हे शक्य नाही", रुचिरा

"का शक्य नाही", ऋग्वेद

"ऋग्वेद समजून घे ना तु", रुचिरा काही बोलणार इतक्यात तिथे राघव आला, आणि त्याने खाडकन तिच्या कानाखाली मारली. हे इतक्यात झटक्यात घडले की रुचिरा आणि ऋग्वेद ह्या दोघांना काहीच समजले नाही.

"तुझी वहिनी जे काही बोलत होती खर आहे म्हणजे", राघव रागात म्हणाला.

"राघव अरे", ऋग्वेद काही बोलणार इतक्यात राघवने त्याला हात दाखवून शांत केले.

"ऋग्वेद आणि रुचिरा दोघे पण घरी चला, काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू आपण", राघव रागात म्हणाला.

सर्व जण रुचिराच्या घरी आले.

"रुचिरा अग काय आहे हा सर्व प्रकार  का हे अस वागत आहेस", राघवने रुचिराला रागाने विचारले.

"मी काहीच चुकीच वागले नाहीय, तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात", रुचिरा आज न घाबरता निर्भीडपणे सर्वांना म्हणाली.

"बास झाल रुचिरा आता पर्यंत एवढ सगळ झाल,बर ठीक आहे ऋग्वेद आणि तुझ्या मध्ये काही नात नाहीय, तर मग का भेटतलात तुम्ही असे बाहेर, सांग लवकर या सगळ्याचा आम्ही काय अर्थ घेऊ", आईने रुचिराला विचारले.

"आई अग तु तरी समजून घे ना,  का तुम्ही सगळे असे वागत आहात, आमच्या अस काहीच नाहीय", रुचिरा आपली बाजू मांडत म्हणाली.

" अच्छा असे काहीच नाहीय, तर मग ऋग्वेद तुझ्या काॅलेजपाशी काय करत होता", राघवने विचारले.

"राघव मी रुचिराला भेटायलाच गेलो होतो, पण आम्ही का भेटलो हे जाणून न घेताच तुम्ही सगळे गैरसमज करून घेत आहात", ऋग्वेद म्हणाला.

"तुम्ही भेटलात हे खरय, मग अजून काय हवे, का तुम्ही तुमच नात मान्य करत नाहीय", राघव म्हणाला.

"आम्ही का खोट बोलु, आमच्या फक्त मैत्रीच नात आहे, यापलीकडे काहीच नाही", ऋग्वेद म्हणाला.

"काय खर काय खोट हे आम्हीच आम्ही बघू", आई म्हणाली.

"ऋग्वेद भावजी तुम्हाला लाज कशी वाटत नाही ओ, अहो तुम्हाला एक मुलगी आहे, अन् तुम्ही रुचिरा बरोबर हिंडता, रुचिराला एक कळत नाही पण तुम्हाला तरी कळायला हवे होते", राजश्री मध्येच बोलत म्हणाली.

"वहिनी बास झाल, अग कस समजावून सांगू मी तुम्हांला सगळ्यांना की आमच्यात अस काही नाहीय",रुचिरा म्हणाली.

"रुचिरा तु आत जा मला घरच्या सगळ्यांन सोबत काही बोलायच आहे", ऋग्वेद

"ऋग्वेद पण..",रुचिरा काही बोलणार तेवढ्या

"रुचिरा मी सांगितले ऐक", ऋग्वेद म्हणाला.

"रुचिरा जा आता, मला पण ऋग्वेद बरोबर जरा बोलायचेच आहे", राघव म्हणाला.

"जे बोलायच ते माझ्या समोर बोलाना, मला पण कळु दे ना", रुचिरा म्हणाली.

तस राजश्री तिच्या हाताला धरून ओढत आत घेऊन गेली.

"इथेच थांबायच, आधीच आमच्या जीवा वर जगतेस हे विसरु नकोस, त्यामुळे आमच सगळ ऐकायच समजल", राजश्री म्हणाली

"राजश्री काय बोलत आहेस, मुलगी आहे ती आमची", आई मागून आत येत म्हणाली.

"काहीच चुकीच बोले नाहीय मी, आज पर्यंत सगळ केल ह्यांनी (राघवने) हिच्या साठी, पण हिला साध माझ्या भावाला होकार देता नाही आला हिला, माझ्या नवऱ्याच्या पैश्यांचे कपडे, दागिने वापरते, ते नाही दिसत का तुम्हाला", राजश्री रागाने म्हणाली.

"राजश्री खुप बोलत आहेस चल इथून", म्हणत आई तिथून निघून गेल्या. त्याच्या पाठोपाठ राजश्री देखील तिथून बाहेर गेली.

पण रुचिराच्या मनाला मात्र राजश्रीचे आताचे शब्द खुप लागले होते.

आजवर आपला भाऊ म्हणून हक्काने ती तिच्या राघव कडून हट्टाने लाड पुरवून घ्यायची, पण वहिनीने बोलण ऐकून तिला तोच भाऊ आता परका वाटू लागला होता.

तेवढ्यात बाहेर ऋग्वेद आणि राघवचा वाढलेला आवाज ऐकून आतमध्ये ती अस्वस्थ झाली होती.

"मामा, राघव तुम्हाला माझ्या आणि रुचिरा च्या बोलण्यावर विश्वास नाहीय ना, तुम्हाला सगळ्यांना अस वाटतय ना की आमच्यात काही तरी आहे, तर मग आम्ही दोघे ही लग्न करतो, मग तरी तुमच्या सर्वांचे समाधान होईल ना", ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद कळतय का तुला काय बोलतो आहेस", रुचिराचे बाबा म्हणाले.

"काय चुकीच बोल मी, आमच्या संबंध आहेत ना, मग तुमची का हरकत आहे", ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद भावोजी साक्षीच लग्न आम्ही ठरवल आहे, तुम्ही गेलात तरी चालेल", राजश्री मध्येच बोली.

"हो जाणारच आहे मी, पण रुचिराला इथून घेऊनच जाणार", ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद बास कर, मला माझी मुलगी तुझ्या सारख्या मुलाला द्यायची नाहीय, निघ तू", रुचिराचे बाबा म्हणाले.

"मी रुचिराला घेतल्या शिवाय इथून जाणार नाही काय करणार तुम्ही", ऋग्वेद म्हणाला.

"ऋग्वेद बास झाल, आधीच आम्हाला मनस्ताप होय आहे, रुचिराला तुझ्याशी मैत्री करू देण्याचा, त्यामुळे ह्या पुढे तिच्याशी संबंध न ठेवता निघून जा, माझ्या मुलींच्या आयुष्यातुन कायमचा", रुचिराची आई म्हणाली.

"माझे अन् रुचिराचे तर संबंध आहेत, काय बरोबर बोलतोय ना मी राजश्री वहिनी, मग मी घेऊन जातो ना रुचिराला म्हणजे तुम्हाला तिची लाज वाटायची नाही", ऋग्वेद म्हणाला.क्रमशः


✍अमृता..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//