Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ५ (शेवट)

Read Later
रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ५ (शेवट)

शीर्षक:- रुचिरा एक प्रेमकथा भाग ५..


राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा


टिम:- सातारा, सांगली. "रुचिरा तिला रुममध्ये नेऊन झोपव आणि तिच्या जवळच थांब, मी आलोच", ऋग्वेद म्हणाला. 


ऋग्वेदच ऐकून रुचिरा हातात झोपलेल्या त्या छोट्या परीला घेऊन आतल्या खोलीत निघून गेली. 


"ऋग्वेद अरे काय केलस हे", रुचिरा आत मध्ये गेल्या आई डोक्याला हात लावत सोफ्यावर बसली. 
पुढे.. 

ऋग्वेदच्या आई आईला तर ऋग्वेद च्या अश्या वागण्याचा चांगलाच धक्का बसला होता. 


तेवढ्यात श्लोक म्हणजे ऋग्वेदचा मोठा भाऊ तिथे आला. ऋग्वेदने आधीच त्याला झालेल्या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या, आणि त्याला ताबडतोब घरी देखील बोलवून घेतले होते. 


"श्लोक अरे बघ रे ह्या ऋग्वेदने काय केल", आई चिडून म्हणाली. 


"आई शांत हो, त्यांन काहीही चुकीच केल नाहीय", श्लोक म्हणाला. 


"श्लोक अरे, त्याच्या पेक्षा दहा वर्षांन लहान मुलीशी हा लग्न करून आलो म्हणतोय, ते पण  स्वतः एका मुलींची बाप असताना", ऋग्वेदची आई रागाने ऋग्वेद कडे बघत म्हणाली. 


"आई थोडा वेळ थांब, ऋग्वेदच तुला काय ते खर सांगेल", श्लोक म्हणाला. 


"ऋग्वेद खर काय आता तु आईला सांगून टाक, मी आलोच बाबांना घेऊन म्हणत", श्लोक एका खोलीतून व्हीलचेअर वर असलेल्या ऋग्वेदच्या बाबांना घेऊन हॉल मध्ये आला. 


"ऋग्वेद आता तरी बोल रे, जीव टांगणीला लागला आहे, का अस केलस", आई म्हणाली. 


सांगतो सगळ सांगतो ऐक... .. म्हणत आता पर्यंत घडलेला सर्व प्रकार ऋग्वेदने त्याच्या आईला सांगितला. "आई सगळ अस आहे, विनाकारण तिथे सगळे रुचिरा त्रास देत होते, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो", ऋग्वेद म्हणाला. 


"अरे पण ऋग्वेद तु तिला अस पण घेऊन येऊ शकला असतास ना, लग्न करायची काय गरज होती", ऋग्वेदची आई विचारले. 


"गरज होती, राजश्री वहिनी आणि समीराने सगळ्या नातेवाईकांना मध्ये माझे आणि रुचिराचे संबंध आहेत अस पसरवल आहे, आणि जर तश्या परिस्थिती मी तिला घेऊन इथे आलो असतो, तर काय झाले असते हे सांगायची गरज नाही तुला", ऋग्वेद म्हणाला. 


"अरे पण आपण बोलून, काही तरी मार्ग काढला असताना",ऋग्वेदची आई म्हणाली.


"आई आजपासून रुचिरा माझी बायको आहे, विषय संपला, आणि हे तुला मान्य नसेल मी तिला आणि परीला घेऊन इथून निघून जातो", ऋग्वेद म्हणाला. 


"ऋग्वेद रागात काहीही निर्णय घ्यायचे नसतात, अरे तुम्ही एकत्र कसे राहू शकाल ", ऋग्वेदची आई म्हणाली. 


"आई मी एकदा निर्णय घेतला आहे, आणि आता मी माघार घेऊ शकत नाही", ऋग्वेद म्हणाला. 


"अरे पण रुचिरा तिच काय तिच काय मत आहे, तिचा विचार केला आहेस का तु", ऋग्वेदची आई म्हणाली. 


यावय काही न बोलता ऋग्वेद उठून रूममध्ये निघून गेला. 


"श्लोक काय होऊन बसल रे हे सगळ, आता काय करायच", ऋग्वेदची आई डोळ्याला पदर लावत म्हणाली. 


"आई तु शांत हो, ह्या सगळ्या बेस्ट ऑप्शन म्हणजे थोडा वेळ जाऊ दे, मग बघू काय करायच", श्लोक म्हणाला. 

ऋग्वेद रूममध्ये आला तर रुचिरा गॅलरीत शुन्यात नजर लावून उभी होती, तर परी पाळण्यात झोपली होती. 


ऋग्वेद मागून जाऊन रुचिराच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती दचकली. 


"घाबरू नकोस मीच आहे, झालेल्या गोष्टीचा विचार सोड आता", ऋग्वेद म्हणाला. 


"सोपा आहे इतक्या लगेच विचार सोडण", रुचिरा म्हणाली. 


"रुचिरा तूच मला सांगितल होतस की, वेळ ही पूढ जात राहते, नात बदलत राहत काही साथ देतात तर काही साथ सोडतात, पण आपण पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे पुढे जात राहव, बरोबर ना", ऋग्वेद म्हणाला. 


(जेव्हा राधा गेल्यावर ऋग्वेदने स्वतःला कोंडून घेतल होत तेव्हा हेच सांगून रुचिराने परी साठी त्याला पुन्हा उभ व्हायला मदत केली होती.) 


"ऋग्वेद ते वेगळ होत", रुचिरा म्हणाली. 


"हो खूप फरक आहे, पण बोलण्याचा अर्थ तू लक्षात घे ना, नकोस अस मनात कुडत बसू, बोलून मोकळ हो", ऋग्वेद म्हणाला. 


"ऋग्वेद खरच हे विसरण सोप नाहीय रे, माझी काहीच चूक नसताना का वागले सगळे असे", रुचिरा म्हणाली. 


"रुचिरा तु स्वतः सिध्द कर त्याच्या समोर, आज ना उद्या सत्य सगळ्यांना समजेलच ना, तोवर असच राहून काही होणार आहे का", ऋग्वेद म्हणाला. 


"ऋग्वेद आपण लग्न करून चूक केली", रुचिरा म्हणाली. 


"रुचिरा लग्न झाले म्हणजे सगळ संपल अस नाही, तु स्वतःला सिद्ध कर, तुला तिथे राहायच नव्हत, माझी मदत पण नको होती, त्यात तुझ्या वर लावलेले आरोप्, तु एकटी राहू शकली असतीस एकटी", ऋग्वेद तिला विचारले. 


यावर काही उत्तर न देता रुचिराने खाली मान घातली. 


"रुचिरा तू हे लग्न मान्य नाही ना, तर माझी काही हरकत नाही, फक्त समाजासाठी आपण नवरा बायको असू, मी कधीच तुझ्या कोणतेच बंधन लादणार नाही, ठीक आहे", ऋग्वेद म्हणाला. 


ऋग्वेद मला अस म्हणायच नाहीय, मी तुझ्या पात्रतेची नाहीय रे, आपल्यात खुप फरक आहे, यु डिझर्व्ह बेटर् दॅन्", रुचिरा म्हणाली. 


"रुचिरा झालेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, पण तुला मान्य असेल तर आपल्या नात्याला एक संधी मात्र आपण देऊ शकतो", ऋग्वेद म्हणाला. 


" म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे आहे", रुचिराने विचारले. 


"रुचिरा असे ही आपण दोघांनी लग्न केले आहे, तर आपण हे लग्न निभावण्याचा प्रयत्न करु, जमले तर आयुष्य एकत्र घालव, नाही तर वेगळे होऊ", ऋग्वेद म्हणाला. 


यावर काही न बोलता रुचिरा शांतपणे उभी होती. 


"रुचिरा मला मान्य आहे आपण बेस्ट फ्रेंड आहोत, पण नात आपण जर पुढे नेल तर आयुष्यभर नवरा बायको न होता एकमेकांचे बेस्ट फ्रेंड राहू,"ऋग्वेद म्हणाला. 


"ऋग्वेद पण तु राधाला विसरून माझ्या बरोबर कस्", रुचिराने विचारल


"कोण म्हणल मी राधाला विसरलो आहे, रूचिरा राधा माझ पहिल प्रेम आहे, ती माझ्या मनात होती, आहे आणि मी मरेपर्यंत राहिल, त्याशिवाय परीच्या रुपाने देखील ती आपल्या सोबतच आहे", 


"ऋग्वेद मी तयार आपल्या नात्याला एक संधी द्यायला, पण.. " रुचिरा पुढे बोलायला काचरत होती. 


"डोन्टी वरी रुचिरा, तुझ्या मर्जी विरोध आपल्या काहीच होणार नाही, माझ्या कडून तुला प्रत्येक गोष्टीची मुभा असेल, मी तुझ्यावर कोणतीच बंधने लादणार नाही", ऋग्वेद म्हणाला. 


तेवढ्यात परीच्या रडण्याचा आवाज तस पटकन रुचिराने जाऊन तिला घेतले आणि रुम बाहेर गेली. देखील तिच्या मागे रुम बाहेर गेला. 


तर बाहेर आई कसली तरी यादी करत बसली होती, तर रुचिराला तिथेच बसून परीला खायला घालत होती. 


ऋग्वेद उद्या मी तुझ्या आणि रुचिराच्या लग्नाबद्दल पूजा ठेवत आहे, चालेल ना, आईंने त्याला विचारले. 


त्याने एक नजर रुचिरा कडे टाकत होकार दिला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी.. 


सकाळी पासून आईंची धावपळ सुरू होती. बऱ्यापैकी नातेवाईक आज ऋग्वेदच्या घरी जमले होते, रुचिराच्या घरचे सोडून. 


ऋग्वेद देखील तयार होऊन खाली बसला होता. थोड्याच वेळात रुचिरा आणि परी आवरून बाहेर आल्या.रुचिरा तिच्या साडीला मॅचिंग फ्रॉक परीला घातल्या. 


त्या दोंघीन कडे बघून कोणीही लगेच म्हणले असते की दोघीही मायलेकी आहेत. 


थोड्याच वेळात गुरूजी आले, पूजा संपन्न झाली, पूजेच्या वेळी देखील परी पुर्ण वेळ रुचिराच्या मांडीवर बसली होती. 


थोड्या वेळाने, ऋग्वेदचा एक चुलत भाऊ रुचिरा आणि ऋग्वेदला फोटो काढण्यासाठी फोर्स करु लागला. 


त्यानंतर सर्वाच्या आग्रह नंतर दोघेही फोटो काढायला तयार झाले. त्यावेळी श्लोक रुचिरा कडून परीला घेऊ लागला, तसे रुचिराने त्याला थांबवले, आणि परी सोबतच दोघांचे फोटो काढले. 


रुचिरा परीला घेऊन उभी होती, तर ऋग्वेदने पाठीमागून दोघींनी मीठीत घेऊन उभा होता, तर परी पहिल्यांदा आपल्या बोबड्या बोलात म्मम्म करत मम्मा म्हणत बोलण्याचा प्रयत्न करत होती, जे ऐकून रुचिराच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण तो एवलासा जीव देखील तिला आपली आई म्हणत तिला स्वीकारले होते. परीचे ते बोल ऐकून दोंघाच्या देखील चेहऱ्यावर हसु आले होते. 


आणि आता रुचिरा ऋग्वेद जोशी खऱ्या अर्थाने आपल्या नात्याला तयार झाली होती. 


तेवढ्यात श्लोकने त्या तिघांचा फोटो काढला ज्यात आता ते तिघेही एक परफेक्ट फॅमिली वाटत होते.समाप्त... 


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//