रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ४

एक अनोळखी प्रेमकथा



शीर्षक:- रुचिरा एक प्रेमकथा.. भाग ४

राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा

टिम:- सातारा, सांगली.

"ऋग्वेद बास झाल, आधीच आम्हाला मनस्ताप होय आहे, रुचिराला तुझ्याशी मैत्री करू देण्याचा, त्यामुळे ह्या पुढे तिच्याशी संबंध न ठेवता निघून जा, माझ्या मुलींच्या आयुष्यातुन कायमचा", रुचिराची आई म्हणाली.

"माझे अन् रुचिराचे तर संबंध आहेत, काय बरोबर बोलतोय ना मी राजश्री वहिनी, मग मी घेऊन जातो ना रुचिराला म्हणजे तुम्हाला तिची लाज वाटायची नाही", ऋग्वेद म्हणाला.


पुढे...


रुचिरा रुममध्ये इकडून तिकडे अस्वथपणे फेऱ्या मारत होती. सध्या तीला खूप टेंशन आल होत.

"तुला कळतय का तु काय बोलतो आहेस, अरे तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून मी तुमच्या दोघांना कायम सूट दिली, पण तूच अस् करशिल ही अपेक्षा नव्हती",राघव रागाने म्हणाला.

"राघव आम्ही काहीही चुकीच केल नाहीय, पण उलट तुम्ही सर्व जण गैरसमज करून बसले आहात, आणि तुम्हा सर्वांच्या म्हण्या प्रमाणे आमच्या संबंध आहेत म्हणून आम्हाला लग्न करायचे आहे, बास झाले सर्वाचे समाधान", ऋग्वेद म्हणाला.

"पण आम्हाला कोणालाच हे लग्न मान्य नाहीय", राघव म्हणाला.

तशी रुचिरा रागात आतून बाहेर आली.
"मी सज्ञान आहे स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आणि मला ऋग्वेदशी लग्न करायचे आहे, आई बाबा मला फक्त तुमचा निर्णय हवा आहे, बाकीच्यांच मत काहीही असो मला आता त्याशी घेणेदेणे नाही", रुचिराने राघव कडे रागाने बघत तिच्या आईबाबांना विचारले.

"रुचिरा शांत हो, चिडून आणि भावनेच्या आहारी जाऊन काहीही निर्णय घेऊ नकोस, ज्याचा तुला नंतर पश्चात्ताप करावा लागेल", बाबा शांतपणे रुचिराला म्हणाले.

"बाबा मला का आणि कश्याचा पश्चात्ताप होईल, आणि इथे राहण्यापेक्षा मला ऋग्वेद बरोबर लग्न करण योग्य वाटतय", रुचिरा म्हणाली.

" रुचिरा शांत डोक्याने निर्णय घे, तुला खरच ऋग्वेद सारख्या मुला बरोबर संसार करायला जमणार आहे का", आई म्हणाली.

"आई बाबा मी शेवटच सांगते आहे माझा निर्णय झाला आहे, मला लवकरात लवकर ऋग्वेद सोबत लग्न करायचे आहे",. रुचिरा म्हणाली.

तसा राघव रागाने उठला, आणि तो पुन्हा रुचिराच्या कानाखाली मारणार इतक्यात ऋग्वेदने मध्येच त्याचा हात अडवल.

"अजिबात तिला मारायची हिंमत करायची नाही, रुचिरा पटकन आवर आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊ", ऋग्वेद सर्वांनवर नजर टाकत म्हणाला.

"ऋग्वेद ती माझी मुलगी आहे, तिच्या बाबतीतले निर्णय घ्यायला मी अजून सक्षम आहे", बाबा चिडून ऋग्वेदला म्हणाले.

"मामा तिच्या बाबतीत जेव्हा तु स्डॅणड घ्यायला हवा होतास तेव्हा तर तु तोंड बंद करून बसला होतास,आणि आता काय होतय", ऋग्वेद चिडत म्हणाला.

"ऋग्वेद मामा आहेत ते तुझे याच भान ठेऊन बोल", रुचिराची आई म्हणाली.

"मामी मी अजून तरी नीटच् बोलत आहे, रुचिरा चल", म्हणत रुचिरा च्या रुममध्ये कडे पाहिले.

"ऋग्वेद तु हे खुप चुकीचे करत आहेस हे तुला महागात पडणार आहे लक्षात ठेव", राघव रागाने म्हणाले.

तेवढ्यात रूचिरा रुम मधून तिच्या दोन बॅगा घेऊन बाहेर आली.

त्यातील एक बॅग तिने तिच्या वहिनी समोर धरली.

"धर तुला हव होत ते सगळं यात आहे, आता तरी मला सुखाने जगु दे", म्हणत ती ऋग्वेदचा हात धरत घरातून बाहेर पडली.


"राजश्री झाल का आता तरी तुझ समाधान, गेली माझी मुलगी एकदाची ह्या घरातून", रुचिराची आई चिडत म्हणाली.

"एक मिनिट आई यात हिचा काय संबंध, आणि मगाशी कसली बॅग रुचिराने हिला दिली", राघव म्हणाला.

"मला कश्याला विचारतो आहेस विचार ना तुझ्या बायकोलाच", रुचिराची आई रागाने राजश्री कडे बघत म्हणाली.

"आई राजश्री नक्की काय चालू आहे मला नीट कळेल का", राघव दोघींन कडे बघत म्हणाला.

"आई जाऊ दे तो विषय,आपल्या सगळ्यांचा विरोध असून देखील रुचिरा गेलीच ना त्या ऋग्वेद सोबत", राजश्री म्हणाली.

"नाही राजश्री, आई तु नक्की काय झालं आहे, मला सगळ काही ऐकून घ्यायच आहे, कारण मला माहीत आहे, काही तरी मोठ कारण असल्याशिवाय माझी रुची कधीच अशी वागणार नाही", राघव म्हणाला.

त्यानंतर रुचिराच्या आईंनी सर्वाचा अपरोक्ष राजश्री रूचिराचा कसा अपमान करायची, तिला घालून पाडून बोलायची हे राघवला सांगितले.

"आणि म्हणूनच हिला वैतागून माझी रुचिरा त्या राघव सोबत गेली", आई म्हणाली.

यावर काही न बोलता राघव रागात घरातून निघून गेला.


तर दुसरीकडे

ऋग्वेद आणि रुचिरा तिथून बाहेर पडल्या नंतर ऋग्वेदने त्याची कार डायरेक्टर रजिस्टर ऑफिस कडे वळवली.

काहीच मिनीटांत तिथे ऋग्वेदच्या काही मित्रांच्या उपस्थित रुचिरा आणि ऋग्वेदचे कोर्ट मॅरेज पार पडले.


ऋग्वेद वकिल असल्यामुळे त्याला ह्या सर्व गोष्टी अगदी सहज शक्य होत्या, आणि त्यांने केले देखील तसेच होते.


त्यानंतर दोघेही तिथून निघाले, आता रुचिरा आणि ऋग्वेदची गाडी एका टुमदार दुमजली बंगल्या समोर थांबली.

"रुचिरा काहीही होणार नाहीय, मी कायम तुझ्या सोबत आहे", ऋग्वेद रुचिरा च्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.

दोघेही गाडीतून खाली उतरले.

ऋग्वेदने रुचिराची बॅग बाहेर काढली.

"चल आत जाऊयात" म्हणत रुचिराचा हात हातात घेत दोघेही मेन डोअर समोर उभे राहिले.

ऋग्वेदने डोअर बेल वाजली,

तस ऋग्वेदची आईने हातात सहा महिन्यांच्या छोट्या परीला कडेवर घेऊन दरवाजा उघडला.

"अरे वा रुचिरा आज किती दिवसांने आलीस ग, आमच्या सगळ्यांनची आठवण येत नाही का ग, म्हणून इतके दिवस आली नाहीस", ऋग्वेदची आई रुचिरा कडे बघत म्हणाली.

"आई आजपासून रुचिरा कायमची सौ रुचिरा ऋग्वेद जोशी म्हणून याच घरात राहणार आहे", ऋग्वेद आईच्या हातातील त्या छोट्या परीला आपल्या कडे घेत म्हणाला.

"ऋग्वेद काही चेष्टा करु नकोस", ऋग्वेदची आई हसत बोली.

"आई मी चेष्टा करत नाहीय, मी आणि रुचिरा खरच मगाशी कोर्ट मॅरेज करून आलो आहोत", ऋग्वेद म्हणाला.
हे ऐकून ऋग्वेदच्या आईला चांगलाच धक्का बसला होता.

"ऋग्वेद अरे तुला कळतय का तु काय बोलतो आहेस", ऋग्वेदची आई म्हणाली.

"हो आई मला बरोबर कळतय मी काय केलं आहे", ऋग्वेद म्हणाला.

तशी आई सटकन एक ऋग्वेदच्या कानाखाली मारली. त्याना पण ऋग्वेदच्या अश्या वागण्याचा राग आला होता.

रुचिरा तर घाबरून हे सगळ बघत होती.

पण ह्या गोंधळात मात्र ती छोटी परी रडायला लागली होती.

तस पटकन पुढे होत रुचिराने तिला घेतले, आणि पाठीवर हळुवार थोपटत तिला शांत करु लागली.

दुपारी तिच्या परीचा झोपायची वेळ असल्यामुळे मायेची कुस मिळताच ती झोपून गेली.

"रुचिरा तिला रुममध्ये नेऊन झोपव आणि तिच्या जवळच थांब, मी आलोच", ऋग्वेद म्हणाला.

ऋग्वेदच ऐकून रुचिरा हातात झोपलेल्या त्या छोट्या परीला घेऊन आतल्या खोलीत निघून गेली.

"ऋग्वेद अरे काय केलस हे", रुचिरा आत मध्ये गेल्या आई डोक्याला हात लावत सोफ्यावर बसली.


क्रमशः


✍अमृता..

🎭 Series Post

View all