९.तुझी आठवण.

आठवणींची एक कुलूपबंद पेटी असतें मनात नकळतच आपल्या कधीं आठवणी बाहेर येतात तें कळत नाहि पण आता म??

अशीच बसले होते खिडकीत 
अंगणात बरसणाऱ्या पाऊस धारा बघत 
एक वीज अचानक कडाडली 
अन भानावर आले मी 
हरवले होते तुझ्या आठवणीत 
पाऊस पहिला जरा भिजले 
कि नेहमीच असं होतं 
आठवणींच्या गाभाऱ्यातून 
एक एक आठवण सहज बाहेर पडत राहते 
अंगण पावसाने भिजतं 
अन माझी ओंजळ आठवणींनी भरून जाते 
नको नको वाटताना 
सहज त्यांना वाट मोकळी होते 
पाऊस थांबला 
कि मी मात्र आठवणींसोबत एकटीच उरते 
अगदी तशीच जशी तू सोडून गेलास 
आणि गेलास तो कायमचाच 
आधी राग यायचा 
आता तसं काही होत नाही 
मी अशीही होते 
असं जाणवलं कि माझाच विरंगुळा होतो 
माणसं भेटतात 
आयुष्याचा भाग होतात 
रमतात 
पण ती इथलीच होऊन राहत नाहीत 
फुलपाखरा सारखं जगणं ती शिकतात 
एकाच अंगणात फार काळ ती घिरट्या घालत नाहीत 
हे आताशा समजायला लागलं 
आणि त्या एका तू दिलेल्या अनुभवाने 
मी माणसं ओळखायला ही शिकले 
दिल घेतलं 
काय गुंतवलं 
सारं विसरून नव्याने 
जगायला शिकले.