

पण कधी द्वेषभावनेने कोणाचे जीवन उद्ववस्त ही करते
तू इतरांसाठी आपल्या सुखांची आहूती देते
पण कधी स्वार्थासाठी कोणाच्या सुखांची राखरांगोळी ही करते
तू स्वतः स्त्री म्हणून खूप काही सहन करत असते
पण कधी खट्याळ सासू बनून सूनेला छळते
तू आपल्या मायेने कुटुंबाला जोडून ठेवते
पण कधी मोहमायेसाठी कुटुंबात दुरावा आणते
तू आपल्या शौर्याने युद्ध ही जिंकते
पण कधी मंथरा बनून रामायण ही घडविते
तू आपल्या लेकरांची माय बनते
पण कधी वंशाच्या दिव्यासाठी लेकीला गर्भातचं मारते
तू प्रत्येक स्त्री मध्ये स्वतः चं प्रतिबिंब पाहते
पण कधी इर्षेपोटी स्रीचा च अपमान करते
तू प्रत्येक रुपात सर्वश्रेष्ठ असते
पण कधी अवगुणांमुळे शापित होते
तू आपल्या कर्तृत्वाने अनेकांसाठी आदर्श बनते
पण कधी दुष्कर्मांमुळे स्त्री जातीस कलंक ही ठरते