रिटर्न गिफ्ट.
भाग -१
भाग -१
“हॅपी बर्थडे मम्माऽऽ” अमेयच्या ओठांचा गालावर स्पर्श होताच श्राव्याची झोप चाळवली.
“अमु तू उठालास देखील?” त्याला रिटर्न किशी करत श्राव्या म्हणाली.
‘रिटर्न कीशी..’
त्याचाच तर तो शब्द होता. त्याने हिला काही दिलं तर रिटर्न हवंच असायचं. काही नाही तर किमान एक किशी तरी.
“क्लोज युअर्स आईज.. सी, इट्स फॉर यू. तुझं बड्डे गिफ्ट.” तिच्या हातात ग्रीटिंग कार्ड ठेवत तो म्हणाला.
“ओऽह हाऊ स्वीट. थँक यू सो मच अमु. माझ्यासाठी केलंस तू हे?” डोळे उघडून त्याने दिलेले छोटुसे भेटकार्ड बघत तिने विचारले.
“होय तर. अमुच्या मम्माचा बड्डे आहे तर अमुने हे आपल्या हाताने बनवलंय.” आपले इवले इवले हात तिच्या गळ्यात गुंफत गोबऱ्या गालाचा अमेय उत्तरला.
“माझा बच्चा किती गं गोड!” तिने त्याच्या गालावर पापी दिली.
“मम्मा गोड मग अमु पण गोड.” त्याने पापण्यांची मोहक हालचाल करत म्हटले.
“मम्मा लव्ह्ज अमु.”
“अमु अल्सो लव्ह्ज मम्मा.” तो निरागसपणे तिच्या मिठीत झेपावला.
त्याच्याभोवतीची मिठी घट्ट करत ती बराच वेळ त्याला कुरवाळत होती.
“मम्माऽऽ कॅन वी गो टू मीट हिम?” घट्ट मिठीतून एक नाजूक आवाज कानी पडला.
“नो.” ती मान हलवत म्हणाली.
“ईट इज नॉट फेअर ना? मी तुला एवढं माझ्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं मग तुलाही रिटर्न गिफ्ट द्यायला हवे ना?” त्याचे गाल फुगले.
“रिटर्न गिफ्ट तर मिळेल; पण हे नाही.” मीठी सैल करत ती म्हणाली. आवाज अजूनही तसाच फर्म होता.
“मम्मा,आय मिस हिम.”
“बट आय डिडन्ट.”
“मम्मा प्लीज?” पाच वर्षाच्या त्याचा बालहट्ट.
“अमु प्लीज? आणि आता हट्ट नको. मी माझं आवरतेय तूही पटापट आवरायला लाग. उशीर झाला तर परत मला बॉसची बोलणी खावी लागतील.” त्याला बाजूला ठेवत ती बेडखाली उतरली.
अमेय पार हिरमुसला होता. त्याला श्राव्याचा फार राग आला. नाही तेव्हा गिफ्ट्सची बरसात करणारी मम्मा जेव्हा तो या गिफ्टबद्दल बोलतो तेव्हा का ठामपणे नकार देते हेच त्याला कळत नव्हते. रागात असलेल्या त्याने बेडवर पडलेले ग्रीटिंग हाती घेतले आणि ते फाडणार तोच श्राव्याने त्याच्याकडून ते हिसकावून घेतले.
“नो, यू कॅन्ट डू ईट. इट्स माय बड्डे गिफ्ट.”
“पण ते मी बनवलं आहे.”
“तर काय झालं?”
“माझं अक्षर आहेत. “
“तर काय झालं? लिहिलं तर तर मम्मासाठी आहे ना? “ मिश्किलपणे ती.
“आय हेट यू.” त्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर यायचे तेवढे बाकी होते.
“बट मम्मा स्टील लव्ह्ज यू अँड इफ मम्मा लव्ह्ज देन अमु अल्सो लव्ह्ज मम्मा.” त्याला कडेवर उचलून घेत ती म्हणाली.
तो रुसला असला तरी त्याचा रुसवा कसा घालवयचा हे तिला पक्के ठाऊक होते. थोडावेळ बाथटबमधील पाण्यात त्याच्याशी खेळून त्याचे आवरून ती बाहेर आली. पाण्यात खेळायला भेटल्याने स्वारी जराशी निवळली होती. त्याचे आवरल्यावर श्राव्याने स्वतःचे आवरले आणि त्याला डे केअर सेंटरमध्ये सोडून ती तिच्या ऑफिसला निघून गेली.
_______
“हैप्पी बड्डे श्राव्याऽऽ”
ऑफिसमधील कलिग्स तिची वाटच बघत होते.
ऑफिसमधील कलिग्स तिची वाटच बघत होते.
“थँक यू.”
तिने हसून सगळयांच्या शुभेच्छा स्विकारल्या आणि लंच ब्रेकमध्ये सगळ्यांना कॅन्टीनमध्ये पार्टी दिली.
“अगं, निदान केकचा पीस तरी घे ना.” सगळ्यांना मनसोक्त खाऊ पिवू घालणाऱ्या तिने कशाला स्पर्शही केला नव्हता हे बघून रीमा, तिची कलीग तिच्या जवळ आली.
“नाही रीमा, आज माझा उपवास असतो.”
“वाढदिवसाला कोण उपवास करतो?”
“वाढदिवस असला तरी आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि मी दरवर्षी उपवास करते. मग आज कसे मोडू?” तिचे स्पष्टीकरण तयार होते.
उपवासाची गोष्ट खरी असली तरी तिच्या नजरेसमोरून सकाळच्या नाराज असलेल्या अमेयची छबी दूर हटत नव्हती. त्याच्या डोळ्यात जमा झालेले पाणी म्हणजे तिची सगळ्यात मोठी कमजोरी होती.
‘अमु, रिटर्न गिफ्ट तर तुला मिळणारच होते पण हे असले रिटर्न गिफ्ट..? नाही ना रे राजा. ते नाही तुला देऊ शकत.’ आलेला उमाळा मागे परतावत ती कामाला लागली. चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते,शेवटी अर्ध्या दिवसाची रजा टाकून ती निघाली.
‘आई, तू हवी होतीस गं. कधी कधी किती गुंता होतो गं मनाचा. मला तो सोडवताच येत नाही आणि मग तुझी आठवण येते खूप. तू माझ्या जागी असतीस तर काय निर्णय घेतला असता असा सारखा प्रश्न पडतो.’ भिंतीवरच्या आईच्या तसबिरीकडे बघून तिने डोळे पुसले.
मनात माजलेली खळबळ थांबेना म्हणून थोडावेळ निजायला म्हणून तिने बेडवर अंग टाकले आणि त्याच वेळी तिचे लक्ष सकाळी अमेयने दिलेल्या ग्रीटिंगकडे गेले.
‘..अक्षर तुझी असली तरी मम्मासाठी लिहिलंय ना.’ ती सकाळी च त्याला म्हणाली होती आणि तिला आठवलं असेच तर काहीसे तिच्यासाठीही कुणी म्हटलं होतं, थोडाश्या वेगळ्या अंदाजात.
‘माझे अक्षर नीट वाचता येत नसले, तरी भावना मात्र तुला नक्कीच कळतील, हे मला ठाऊक आहे. म्हणून तर हा लेख लेखप्रपंच..’
अगदी हेच. हेच लिहिले होते तिने.
कुणी लिहिले होते हे? आणि अमेयला रिटर्न गिफ्ट म्हणून काय हवे होते, वाचा पुढील भागात.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*