Login

रिटायर्ड शुभेच्छा बाबा

रिटायर्ड शुभेच्छा बाबा

रिटायर्ड शुभेच्छा बाबा                                                                 प्रिय आबासाहेब, आज तुमचा वाढदिवस, तुम्हाला ह्या खास दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! ह्याच वर्षी जानेवारी महिन्यात आपल्या कामातून निवृत्तही झालात आणि वाढत्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भावाचा विचार करुन कुठल्याही प्रकारच्या आयोजनाला नकार दर्शावला. खरतरं निवृती ही निवृती नसुन जगण्याची एक आवृत्तीही आहे. गेली ३३ वर्षांची तूमची सेवा तुम्ही सामाजिक बंधिलकी जपत प्रामणिकपणाने पूर्ण केलित. ह्या सगळ्यात अनेक चढ उतार तुम्ही पहिलेत आणि त्या सर्व परिस्थितींना विचारात घेऊन पूढे जात रहिलात आणि तुमच्या वागण्यातून आम्हाला आदर्श ठेवला. शिक्षकी हा एक असा पेशा आहे की माणूस तिथे स्वतः काही घडवू शकतो आणि मला अभिमान आहे ह्या गोष्टीचा की आबा तुम्ही कित्येक मुलं आणि त्यांच्या पिढ्या घडवण्यात मोलाचा वाटा उचललात. आबा तुम्ही शिक्षकी पेशा मधून जरी रिटायर्ड झाले असला तरी तुमच्यातील शिक्षक शेवटपर्यंत असेल आणि तुमच मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहील. तुम्ही तुमच्या कामाला पूर्ण वेळ देत विद्यार्थ्याना, संस्थेला, संस्था चालकांना, शिक्षकांना आणि इतर कर्मचार्याना नेहमी प्राधान्य दिल पण त्याच बरोबर आपल्या कूटुंबाकडे, तुमचा मित्र परिवार, नातेवाईक आणि समाजिक बंधिलकी ह्याकडे कधी दुर्लक्ष होऊ दिल नाही. हे लिहित असताना आण्णा आणि आक्का हयांच्या बरोबरच आपल्या दादांची आठवण होतेय ज्यांची उणीव आपल्याला नेहमी भासेल. आम्हाला आशा आहे की यापूर्वी आपल्याकडे वेळ नसलेल्या गोष्टी करण्याचा आपण आनंद घ्याल आणि स्वतःकडेही लक्ष द्याल. Once again best wishes on your birthday & retired life.. Pappa.                                                            - तुमचाच बाळ...