ऋणानुबंध नात्यांचे भाग 8 अंतिम (मराठी कथा: marathi katha)

Sumedha pani pyayala uthali ani ticha tol gela

ऋणानुबंध नात्यांचे...भाग 8 (अंतिम )


मागील भागात आपण पाहिले,


सुमेधानी आपलं मन वळवलं, सगळे वाईट विचार मनातून काढून घेतले,  क्रितिकाची माफी मागितली आणि घरी येण्याचं निमंत्रण दिल..
घरी पण  सगळं सांगितलं, क्रितिका येणार असल्याने सगळ्यांना खूप आनंद झाला,  क्रितिका च्या पिल्लू च नामकरण झालं...


 आता पुढे,


 सुमेधा पाणी घ्यायला उठली आणि तिचा तोल गेला तितक्यात तिला कोणीतरी आधार दिला.. बघितलं तर तिला नवीनच चेहरा दिसला, त्यानी तिला सोफ्यावर बसवलं...

“ थँक्यू....

“ हाय... आय एम कार्तिक निनादचा चुलत भाऊ...मी दुबईला असतो..”
 

सुमेधा छोटीशी स्माईल करत 

“ ओ .  थँक यू..
 म्युझिक बंद झालं आणि सगळ्यांच लक्ष सुमेधाकडे गेलं....
मनोरमा: बेटा क्या हुआ? तुमे कही लगा तो नही...”

“नही मम्मीजी, मै ठीक हू, मै गिरने ही वाली थी, लेकिन इन्होने बचा लिया....”

“अरे तुम कौन हो बेटा..?
 तो मनोरमा च्या पाया पडून

“नमस्ते ऑंटीजी, मै निनाद का चचेरा भाई, दुबई मे रहता हू, कार्तिक नाम है मेरा ...

“जुग जुग जिओ बेटा....जमाई जीने कभी जिक्र नही किया तुम्हारे बारे मे ....

“जी, कभी बात निकली नही होगी इसलिये.....

“अच्छा...

 थोड्या वेळात प्रोग्राम संपला आणि सगळे आपापल्या घरी गेले, क्रितिकाने कार्तिकची सगळ्यांना ओळख करून दिली....
 

काही दिवस कार्तिक त्याच शहरात राहणार असल्यामुळे त्याचं क्रितिका च्या माहेरी जाणं सुरू झालं, हळूहळू सुमेधाची ओळख वाढली, सुमेधाचा स्वभाव.. तिचा हळवेपणा त्याला भावला.... एक महीना असाच निघून गेला.
 एक दिवस कार्तिकने  सुमेधाला  डायरेक्ट विचारलं,

“ माझी अर्धांगिनी होशील?...

“ कार्तिक तुम्ही काय बोलताय? मी अशी एका पायाने अपंग तुमची काय साथ देणार....

“ मनाने साथ दिली तरी खूप आहे आणि त्याची काळजी तु करु नकोस मी तुझा ऑपरेशन  करेल...

“ पण कार्तिक हे शक्य नाही आहे...मी या घरची सून आहे, मुलगी नाही....

“ तर काय झालं? अख्ख आयुष्य तु ऐकट्याने काढायचं ....

“मी बोलतोय तुझ्या सासू-सासऱ्यांशी...
 कार्तिक सुमेधाच्या सासर्यांसोबत  बोलायला गेला

 “नमस्ते अंकल जी....

“  नमस्ते बेटा.... आज कैसे आना हुआ...

“ मुझे आपसे कुछ कहना है सुमेधा के बारे मे.....

“ सुमेधा के बारे मे ....बोल बेटा...

“ अंकलजी अगर आप को कोई ऐतराज ना हो तो, मै सुमेधा से शादी करना चाहता हु...

“ क्या..... लेकिन बेटा....

“ अंकलजी मुझे पता है, सुमेधा इस घर की बहू है लेकिन पुरी जिंदगी अकेले काटना कितना मुश्किल रहता है,मै उसका साथ देना चाहता हु अंकलजी.....

“ तुम पहिले अपने घर वालो से बात करो उसके बाद हम सोचेगे”

“ ठीक है अंकलजी...... 
 कार्तिक पुन्हा सुमेधाच्या रूम मध्ये जातो

“ सुमेधा मेने अंकलजी से बात कर ली है अगर मेरे घर वाले को कोई एतराज नही होगा तो तुम्हारे घर वालो को भी कोई एतराज नही है....”

 कार्तिक त्याच्या घरच्यांशी बोलतो.... ते या लग्नाला मान्यता देत नाहीत.... कार्तिक त्यांना खूप समजावतो पण तरीही ते त्याची साथ देत नाहीत....कारण कार्तिक त्यांचा एकुलता एक मुलगा असतो, त्यांचंही काही स्वप्ने असतात त्यांच्या सुनेबद्दल ......

पण कार्तिक जिद्दी असतो, तो मागे हटला नाही, त्याने सुमेधाच्या घरच्यांना विश्वास दाखवला आणि लग्न करायला त्यांना तयार केलं , महिनाभरात लग्न करून त्याने सुमेधाला दुबईला नेलं , पार्थ ला काही महिन्यांसाठी दादा दादी कडेच ठेवलं....

दोन महिन्यानंतर सुमेधाच ऑपरेशन झालं, आर्टिफिशियल पाय बसवला.... सुमेधाला लहानपणापासून नृत्याची खूप आवड होती,त्यानी ठरवलं तिच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करायची त्याने तिला क्लासिकल चे क्लास लावून दिले. आर्टिफिशियल  पाय असतानासुद्धा सुमेधा क्लासीकल मध्ये पारंगत झाली....

थायलंड ला “ क्लासिकल      सिनेफेस्ट कॉम्पिटेशन ‘’ होत ... 
सुमेधा नी त्यात पार्टीसीपेट केलं आणि त्यात ती अव्वल आली, जेव्हा अवॉर्ड देण्यासाठी तिच्या नावाची अनाऊससमेंट झाली, तिच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत....ती डबडबल्या डोळ्यांनी च स्टेज वर गेली.... अवॉर्ड दिल्यानंतर तिला दोन शब्द बोलण्यासाठी विनंती केली तेव्हा तिनी सर्वात आधी कार्तिक ला स्टेज वर बोलावलं.....
आणि बोलयाला सुरुवात केली

“thank you so much....आज मला  हा पुरस्कार मिळाला याचा खरा मानकरी माझा नवरा म्हणजेच कार्तिक आहे, त्याच्याशिवाय मी हे करूच शकले नसते...तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला...म्हणून मी इथवर आले, थँक्स कार्तिक..आय लव यु.....”


इतकं बोलून तिनी कार्तिक ला मिठी मारली....


हे सगळं सुमेधानी तिच्या घरी संगीतल ,त्यांनाही खूप आनंद झाला... काही महिन्याने सुमेधा आणि कार्तिक घरी परतले, क्रितिकाला पण बोलावण्यात आलं,, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बघून ताऊजीना खूप आनंद झाला....


“कुठल्या तरी नात्यांचे हे ऋणानुबंध असतील म्हणून मला एवढे चांगले जावई मिळाले”......


ते स्वतःशीच पुटपुटले....
राघव: ताऊजी आपने मराठी मे कुछ कहा....


“नही तो....अस म्हणत दोघेही हसले...


आज इतने सालो बाद मेरे परिवार मे खुशीया आई है...इसे ऐसेही बनाये रखना भगवान.....


राघव: इसी बात पे एक फॅमिली फोटो हो जाये....


सगळ्यांची एक फॅमिली फोटो काढली.....


समाप्त::::


कधी कधी आपल्या आयुष्यात खूप वाईट घटना घडतात, पण त्या मागेही काहीतरी चांगलं घडण्याचे संकेत असतात...


लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात असं म्हणतात पण काही नात्यांची गाठ हे इथेच बांधण्यात येते....


क्रितिका आणि सुमेधा च्या आयुष्यात आलेली ही दोन माणसे, ज्यांनी त्यांचं आयुष्य बदलवून टाकलं ,कुठल्या तरी जन्माचे आणि कुठल्या तरी नात्यांचे हे ऋणानुबंधच आहेत...नाही का.....


तुम्हाला काय वाटतं हे कंमेट्स मध्ये नक्की कळवा....

🎭 Series Post

View all