ऋणानुबंध नात्यांचे ...भाग 5 ( मराठी कथा: marathi katha)

Phonachi ring vajali kritikane phone uchlala Hello Hello kritu

ऋणानुबंध नात्यांचे... भाग 5


आधीच्या भागात आपण पाहिले,

क्रितिकानी एका गोंडस मुलीला जन्म दिला, तिची इच्छा होती की तिच्या मुलीचं नामकरण तिच्या माहेरी व्हावं. ती तिच्या माहेरी गेली, पण कुणीही तिचा स्वीकार केला नाही, ती घरी येऊन खूप रडली आणि नंतर एक फोन आला....


 आता पुढे,


 फोनची रिंग वाजली क्रितिका ने फोन उचलला,
“ हॅलो....
“ हॅलो  क्रितु
“ राघव.. हा राघव बोल...”
“क्रितु ताउजी की तबीयत अचानक बिघड गई है हम उन्हे हॉस्पिटल लेके आये है... 
हे ऐकताच क्रितिकाच्या हातून फोन खाली पडला, ती स्तब्ध झाली निनादने बघितलं

“ क्रितिका काय झालं?... कुणाचा फोन होता, ती स्तब्ध उभी होती,  काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती, शेवटी निनादने कॉलबॅक केला तेव्हा त्याला सगळं कळलं...
 

क्रितिका द्विधा मनस्थितीत अडकली, जायचं की नाही जायचं? गेलं तर ताऊजी ची तब्येत अजून खराब व्हायला नको,  पण जर नाही गेले तर..... ती स्वतःशीच पुटपुटली 

ती देव्हाऱ्यासमोर जाऊन उभी राहिली,
“ हे देवबाप्पा , तू सांग मी काय करू मला तिथे जायचं आहे पण मी तिथे गेल्याने प्रॉब्लेम वाढायला नको, देव बाप्पा तूच माझी मदत कर प्लीज ....

निनाद मागे उभा राहून हे सगळं ऐकत होता आणि तो खळखळत हसला तशी क्रितिका पलटली. 

“तू हसतोयस निनाद, ही हसण्याची वेळ नाही आहे...

“ सॉरी सॉरी ग , अगं तू इतकं छान लहान मुलीसारखी बोललीस म्हणून मला छान वाटलं पण आता मी काही बोलू का..”
“ बोल...
“ तु  जा तिथे...”
“ पण निनाद...
“ आता पण नाही की बीम नाही तू जायचं तिथे....
 निनाद मस्करीच्या तोऱ्यात तिच्यासमोर हात जोडत
“ जा गं बाई” म्हटलं..
 तिने लगेच  राघवला फोन केला आणि हॉस्पिटलचा अड्रेस मागवला आणि बसने गेली,  हॉस्पिटल ला पोहचल्यावर
“मां.., ताईजी.... कैसे है ताउजी ?...
“ तुम्हारी वजेसे इनकी ये हालत हुई है,  हॉस्पिटल मे है वो...  चली जाओ यहासे......”
“ऐसा मत कहीये ताईजी.. मै ताऊजीसे मिलने आई हु..”
“ खबरदार जो तुम उनसे मिली......

या दोघींचं आवाज ऐकून तिथे नर्स आली ....

“शु..... इथे आवाज करायचा नाही. त्यानंतर कुणीच कुणाशी बोलल नाही, क्रितिकाने हळूच नर्स ला जाऊन विचारलं ....

“काय झालं त्यांना...?

“ मायनर हार्ट अटॅक आला आहे आता स्टेबल आहेत काळजी करण्यासारखं काही नाही.....”

 रात्री राघवनी जबरदस्तीने सगळ्यांना घरी पाठवलं कुणी जायला तयार नव्हते

“ मां, ताईजी आप जाईये,  मै हूना.... आप लोक जाईये, आराम कीजिए

“ देख लल्ला, कुछ भी हो जाये , तू उसे ताऊजीसे मिलने नही देगा ....”

“ताईजी आप चिंता मत किजीए आप  लोग जाने के बाद में उसे भी भेज दूंगा और रात भर ताऊजी के पास बैठा रहूंगा अब आप जाईए...

सगळे घरी गेले राघवने हळूच क्रितिका ला आत बोलावलं,
 क्रितू देख ले ताऊजीको  और जा यहासे , नही तो  बवाल हो जायेगा,”

 क्रितिका बेडच्या बाजूला टेबलवर बसली, तिने त्यांच्या माथ्यावरुन हात फिरवला आणि

“ मुझे माफ कर दीजिए ताऊजी मैने आपका दिल दुखाया है लेकीन मै अपनी जिंदगी मे बहुत खुश हू, सब मेरा बहुत खयाल रखते है हमारा आलिशान बंगला नही है उनका छोटासा घर है लेकिन फिर भी मै बहुत खुश हु, निनाद मुझसे बहोत प्यार करता है...”

ताऊजीने हळूच डोळे उघडले, क्रितिकाच्या लक्षात येताच ती उठून जायला निघाली, तसंच त्यांनी तिचा हात पकडला,

“ बिना बात किये ही जाओगी
“ ताऊजी ......असं म्हणत ती त्यांच्या जवळ गेली...
“ क्या नाम रखा है हमारे नातीका?..”
“ अभी तक नाम नही रखा है ताऊजी ...

“तो रख दे ‘’दुर्गा’’ ये तुम्हारे दादीजी का नाम था,तुम्हारी दादी बहुत ही कर्तृत्व वाण औरत थी, और हमारी इच्छा है की हमारी नाती भी ऐसें ही बने.... तुम अभी जाओ बेटा घरमे सब इंतजार कर रहे होंगे.. 

क्रितिका तिथून निघाली, घरी जाऊन तिने सगळं निनादला सांगितलं क्रितिका खूप खुश होती... रात्री मुलीला झोपवून ती गच्चीवर गेली, आज खूप दिवसानंतर ती मोकळ्या हवेत गेली... थोड्या वेळात निनाद गाणं गुणगुणत आला...
   

       ये हसी वादिया 
      ये खुला आसमान
      आगये हम कहा 
       ए मेरे साजना 
        इन बहारो मे दिल 
      की कली खील गई
     मुझको तुम जो मिले 
     हर खुशी मिल गई
      तेरे होटो पे है 
     हुस्न की बिजलिया 
        तेरे गालो पे है 
     जुल्फ की बदलीया
 तेरे दामन की खुशियो 
    से मेहक के चमन 
   संग मरमर के जैसे 
        ये तेरा बदन 
 

गाण गुणगुणत निनादने क्रितिका ला जवळ घेतलं, तिच्या कंबरेत हात घालून ओठाजवळ ओठ नेले, तो काही करणार त्याआधी क्रितिका

“ अरे हो हो , बस कर, काय चाललंय ?..कुठे 92 मध्ये गेला आहेस... 

“काही नाही ग, आज खुप दिवसानंतर फक्त आपण दोघे असे इथे उभे आहोत , तिच्या गळ्यात हात टाकत “आय लव यु पारो...”

“ अरे नाही नाही पारो नाही, तुझा देवदास व्हायचा नाही तर....
“ अरे देवा नको नको ....

“पण निनाद मी खूप खुश आहे त्यांचं बोलणं सुरू होतं तितक्यात रडण्याचा आवाज आला 

“अरे बाप रे पिल्लू उठली,  दोघे खाली गेले पिल्लूला झोपवून स्वतःही झोपले...
 

आठ दिवसानंतर ताऊजींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला, त्यांच्या घरचे त्यांना घरी घेऊन गेले, आता ताऊजींना थोडं बरं होतं म्हणजे चालू फिरू शकत होते. त्यांनी घरी पंडितजीला बोलावून घेतलं पंडित कडून एक शुभकार्यासाठी मुहूर्त काढायचा होता..

 मनोरमा: एक बात पुछु आपसे?

 “हा बोलो...
“ आप किस चीज के लिए मुहूर्त निकलवा रहे है?.
“ पता चलेगा, धीरे धीरे सब पता चलेगा, तुम पंकज को फोन लगाओ मुझे बात करनी है ( ताऊजींचा मुलगा पंकज, त्याची पत्नी सुमेधा आणि त्यांचा नातू पार्थ हे सगळे अमेरिकेला राहायचे) मनोरमा ने फोन लावला 
“हॅलो...
“हॅलो, मा कैसी हो...
“ ठीक हू बेटा, तुम कैसे हो और बहू कैसी है हमारा लाडला कैसा है?
“ सब ठीक है माँ,  ,बाऊजी की तबियात कैसी है....
“ लो तुम ही बात करो बेटा, इनको तुमसे कुछ बात करनी ही थी...
“ हॅलो बेटा...
“नमस्ते बाऊजी, कैसी है आपकी तबियात? राघवने मुझे सब बताया लेकिन मैं नही आ सका, लेकिन मै उसे हालचाल पुछता रहता था...
“ कोई गल नही बेटा, मी ठीक हू... लेकिन मेरी एक गल सून...
 एक मिनिट,
 मनोरमा मेरे लिए पानी लाना मनोरमा रूममधून जाते
“ देखो बेटा अगले महिने के बीस तारीख को तुम्हे यहा आना है, देड महिना अभी बाकी है तुम अपना आने का टिकीट  करवालो ....
“लेकिन, क्या हुआ बाऊजी , ऐसें अचानक..
“ बेटा मै अभी तुम्हे कुछ नही बता सकता, तुम्हे ये बात किसी को नही बतानी है, तुम आ रहे हो ये किसी को बोलना मत , 
 जी बाऊजी ठीक है...
“रखता हू बेटा....

ताऊजीनी फोन ठेवला, आणि मनोमन खुश झाले.....

क्रमशः

© ऋतुजा वैरागडकर

ताऊजीनी कोणत्या शुभ कार्यासाठी  मुहूर्त काढला असेल, पंकज अमेरिकेवरून येऊ शकेल काय?  हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा, हा भाग कसा वाटला तेही कळवा.... 

🎭 Series Post

View all