ऋणानुबंध नात्यांचे... भाग 2 (मराठी कथा: marathi katha)

Kritikani ninad baddal ghari sangayach tharaval, pan don tin divas tari ti kahi bolali navhati

ऋणानुबंध नात्यांचे...भाग 2

मागील भागात आपण पाहिले,

क्रितिकाच निनादवर प्रेम जडलं, तिनी निनादला सगळं सांगितलं, पण परिस्थिती बघता निनादनी क्रितिकाला नकार दिला, क्रितिकानी निनादला विश्वास दाखवला की काहीही झालं तरी ती त्याला सोडणार नाही, कॉलेजचे वर्ष संपले, क्रितिका तिच्या घरी परत गेली, तिनी तिच्या भावाला सगळं सांगितलं....

आता पुढे,

क्रितिकानी निनाद बद्दल घरी सांगायचं ठरवलं, पण दोन-तीन दिवस तरी ती काही बोलली नव्हती..
 एका रात्री क्रितिकानी खूप विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिनी बोलायचं ठरवलं.... सगळे नाश्त्यासाठी हॉलमध्ये जमलेले होते क्रितिका पण खाली आली..
“ गुड मॉर्निंग माँ बाऊजी...
“ गुड मॉर्निंग बेटा...
“बाऊजी ,मुझे आपसे कुछ बात करनी है...”
“ हा बोलो बेटा...”
“मै मुंबई जाकर नोकरी करना चाहती हू.., मै वहा जाकर रहने का सोच रही हू...”
क्रितिका अडखळत बोलत होती... 
“अरे बेटा अभी अभी तो कॉलेज खतम हुआ है, अभी तो तुम आई हो, अभी जाने की बात मत करो..... तुम्हारे बिना यहा हमारे दिन कैसे गुजरते है हमे ही पता .... क्रितिकांच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं,ते भावुक झाले, कृतिका त्यांना जाऊन बिलगली आणि
“ बाऊजी मुझे आपसे बात करनी है..”
“ क्या ....बोलो...”
“ मुझे एक लडका पसंद है.... क्रितिका ची आई किंचाळली ...
“क्या, हाय दय्या.. ये लडकी हमारा नाक कटवायेगी... सून रहे है क्रितु के बाऊजी क्या कह रही है आपकी लाडली....”
“ तुम थोडा रुको..”
“ बैठो बेटा, कौन है लडका?...”
“ बाऊजी मुंबई मे रहता है वो, मल्टिनॅशनल कंपनी में जॉब करता है... निनाद सावंत नाम है उसका....”
“ देखो बेटा, तुम हमारे घर की आन बान शान हो, तुम हमारी इज्जत हो, हमारे घर मे लडकीया खुद शादी बिहा तय नही करते, बडे बुजुर्ग करते है,  कितनी पीढियो के बाद तुम्हारा जनम हुआ है, ईस घर में सबकी इच्छाए तुमसे जुडी हुई है तुम उनकी इच्छाओ का अनादर नही कर सकती.....”
“ लेकिन बाऊजी , मै उससे प्यार करती हु मैने उसे वादा किया है, कुछ भी हो जाये मै उसे नही छोडूंगी.... बाऊजी वो बहुत अच्छा लडका है और मुझे बहुत प्यार करता है, मुझे बहुत खुश रखेगा....”
 बाऊजी : “नही बेटा, तुम्हारे इस बात के लिए ताऊजी  कभी राजी नही होंगे....”
“ बाऊजी मै मनाऊंगी ताऊजीको, बस आप हा कर दीजिए ...
कृतिका तिच्या बाबांना हात जोडून विनंती करत होती
  बाऊजी:  हम सोचते है तुम अपने कमरे मे जाओ...”
 क्रितिकाने सगळं सांगितलं खरं, मनातलं सगळं बोलून देखील तिला अस्वस्थ वाटत होतं... दोन-तीन दिवस कुणीच कुणाशी बोललं नव्हतं क्रितिका पण रूममधून निघाली नव्हती, दाई तिला तिच्या रूम मध्ये सगळं नेऊन द्यायची...

 एक दिवस पारुल घरी आली, दाई क्रितिकाला बोलवायला रूममध्ये गेली, तिने दरवाज्याला नॉक केला आणि
“ क्रितु बेबी दरवाजा खोलो, तुम्हारी दोस्त आई है तुमसे मिलने पारुल... पारुलच नाव ऐकताच क्रितिका धावतच खाली गेली आणि पारुलच्या गळ्यात हात घालून तिला बिलगुन रडायला लागली...
“ काय झालं क्रितिका, मला वाटलं तुला मला बघून आनंद होईल,पण हे काय तू तर रडायलाच लागलीस ... काय झालं?
“ काही नाही, तू ये बस... 
मां...मां 
क्रितिकाची आई हॉल मध्ये आली...
“ मां ये मेरी दोस्त है पारुल...
“ नमस्ते बेटा ,  कैसे हो बेटा...
“मै ठीक हू अँटिजी..
“ तुम दोनो बाते करो, मै आती हू... क्रितिकाची आई तिथून निघून गेली “पारूल तू चल माझ्या रूम मध्ये” क्रितिका पारूलला रूम मध्ये घेऊन  जातानी दाईला रूम मध्येच नाश्ता आणायला सांगितले आणि दोघेही रुममध्ये निघुन गेल्या
“पारूल बस...
“ थांब, आधी मला तुला काहीतरी दाखवायचं आहे, पारुल तिला खिडकीजवळ घेऊन गेली, पडदा बाजूला सरकवला तर दूर गेटच्या बाहेर निनाद उभा होता... निनादनी  तिला हात दाखवला, क्रितिका चे डोळे भरून आले ती धावतच रूममधून निघाली अठरा-वीस पायऱ्या उतरत हॉल मधून धावत धावत निघून गेली मागोमाग पारूल ही गेली तिची आई मागेहून बघतच राहिली “ही अशी का धावत जातीये” हा विचार तिच्या मनात घोळावून गेला... क्रितिकानी मागचा पुढचा विचार न करता धावत जाऊन निनादला मिठी मारली आणि दुसर्याच क्षणी तिथून तिच्या ताऊजींची गाडी आली, त्यांचं क्रितिका कडे लक्ष गेलं त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली क्षणभर तिच्याकडे पाहीलं आणि गेटच्या आत गाडी नेली दरवाज्यात पाय ठेवतच ताऊजीने ओरडायला सुरुवात केली,
“ उर्मिला बहू... उर्मिला बहू...”
“ जी भाईसा, आपने बुलाया ...
“ये मेरे घर मे , मेरे नजर के सामने क्या हो रहा है...”
“ क्या हुआ भाईसा...
“ये लडकी बाहर गुल खीला रही है... “कृतिका?... क्या किया भाईसा?”
“ बाहर जाकर देखो ,एक लडके के साथ गुलछररे उडा रही है..
 उर्मिला धावत धावत बाहेर गेली मेन गेट उघडाच होता, धावता-धावता अचानक थांबली आणि तोंडावर हात ठेवत समोर बघतच राहिली... दोघेही अजूनही एकमेकांच्या मिठीत होते, दोघांकडे बघून असं वाटलं कितीतरी वर्षांचा वीरह होता, त्यांच्या डोळ्यात एकमेकांबद्दल फक्त प्रेमच प्रेम होतं... उर्मिला जवळ गेली आणि क्रितिका च्या एक थोबाडीत मारली आणि तिला खेचत खेचत आतमध्ये आणलं...
“मां, मेरी बात तो सुनो...
“ कुछ नही सुनना मुझे , आज तो तुने मेरी नाक कटवादी... ताऊजीने तुझे उस लडके के साथ देख लिया है न जाने अब क्या होगा .....
उर्मिलाने क्रितिकाला हॉल मध्ये आणून सोफ्यावर ढकलल..आणि 
“कौन था वो लडका?...
“ उस दिन बाऊजीको मैने निनाद के बारे मे बताया था, मै उसे प्यार करती हू मा...
“ पागल हो गई है तू, हमारे घर मे ये सब नही चलेगा ताऊजी कभी नही मानेंगे तू चल अपने कमरे मे चल.... उर्मिलाने क्रितिका चा हात पकडून तिला तिच्या रूम मध्ये नेणार तितक्यात तिथे पारूल आली उर्मीलाच लक्ष गेलं...
“ पारूल, तुम यहासे चली जाओ मै तुम्हारे सामने हात जोडती हू.....पारूल तिथून निमूटपणे निघून गेली... उर्मिला क्रितिकाला तिच्या रूम मध्ये घेऊन गेली आणि बाहेरून दाराची कडी लावून घेतली... आतून क्रीतिका “ मां दरवाजा खोलो, मां दरवाजा खोलो... प्लीज दरवाजा खोलो... संध्याकाळी क्रितिका चे बाऊजी घरी आले तेव्हा त्यांना हा सगळा प्रकार कळला, ते कृतिका च्या रूम मध्ये गेले
“ ये सब क्या है बेटा?”
“ पापा मै उसे प्यार करती हु..
“ तुम्हे एक बार बताया ना, घर मे ये सब नही चलेगा”
 बाबांनी तिला बराच वेळ समजावलं होतं आणि ते तिथून निघून गेले दुसर्‍या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सगळे जमले होते, सगळे शांत होते ताऊजीने बोलायला सुरुवात केली
 “ अभय मेरी नजर मे एक लडका है, क्रितिका का बिहा करादो, नही तो वो क्या करेगी पता नही....
उर्मिला:  लेकिन भाईसा अभी वो नही मानेगी... 
“माने या ना माने ,शादी तो उसे करनी पडेगी, मै लडके वालो से फोन पे बात करके बोल देता हु शाम को आ जाये ... देखने का कार्यक्रम करेंगे.... वो लोग आ जावेंगे तुम क्रितु को तयार रखना ....”
“जी भाईसा...” असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. थोड्यावेळात राघव क्रितिकाच्या रूममध्ये गेला ,क्रितु बसली होती...
“ नीचे क्या चल रहा है पता है तुम्हे ?...
“क्या हुआ भय्यू?...
“ तुम्हारी शादी की बात चल रही है....”
“ क्या?....”
“ तुम्हे शाम को लडके वाले देखने आने वाले है..”
“ भय्यू मुझे ये शादी नही करनी है, मै निनाद से प्यार करती हु..
“ ये पॉसिबल नही है, तुम भाग जाओ, भाग जाओ क्रितु, ये लोग तुम्हारे प्यार को नही समझेंगे...
क्रितिका जोरातच
“ क्या?....लेकिन भैय्यु
ती समोर काही बोलणार तेवढ्यात राघवने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि शुश्श....तुम कुछ मत बोलो, तुम जाओ, यहापे मै संभालुंगा...शाम होने के पहले तुम यहासे निकलो.....
 क्रमश:

🎭 Series Post

View all