सुड..

विजय आणि मधू च्या डिवोर्स ची तारीख असते.. विजय कोर्टात जातो पण!

कथेचे नाव - सुड 

जिल्हा - ठाणे.

फेरी - राज्यस्तरीय सामाजिक कथामालिका 





मी कथामालिकेचा पहिला भाग लिहला आहे.. काही चुका असतील तर सांगावे.


भाग -1


( ही कथा एका गरीब कुटुंबातील मुलीची! ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजात इतक्या घटना घडतात की तुम्हाला वेगळं काही सांगायलाच नको. तर त्यातलीच एक घटना काल्पनिक स्वरूपात मी तुमच्यासमोर ह्या कथेच्या रूपातून मांडण्याचा प्रयत्न करतेय. पात्रांची नावे आणि स्थळे ही काल्पनिक आहेत. वाचुन कोणत्याही व्यक्तीशी त्याचा संबंध लावू नये.)


विजय बराच वेळ कपाटात काहीतरी शोधत होता.

विजय जरा वैतागतच म्हणाला, "गेली कुठे? इथेच तर ठेवली होती." अस बोलून तो पुन्हा कपाटात शोधाशोध करु लागतो.


विजय बोलतो, "कालपर्यंत इथेच होती आणि आजच काय झालं हिला? आईss.... अग आई..ss" तो आईला जोर-जोरात आवाज देत असतो. कारण की, त्याची आज खूप चिडचिड होत असते.


आई बोलते, "काय झाल विजय इतक्या मोठ्याने आवाज द्यायला? एवढं काय झाल?"


आई रूममध्ये येते. रूमची झालेली अवस्था पाहून आईला संशय येतो कि, ह्याच काही तरी बिनसलंय!


कपाटात शोधतच विजय विचारतो, "तु माझी फाईल पाहिलीस का?" 


आई बोलते, "अस काय करतोस! कपाटातच असेल. तूच तर ठेवली होतीस ना?"


विजय जरा वैतागतच बोलतो, "नाही मिळत आहे, म्हणून तर तुला विचारल ना मी?"


आई बोलते, "बरं बरं ! हो बाजुला मी शोधून देते." आणि आई विजयला बाजुला करून फाईल शोधते.


"हे घे, मिळाली बाई एकदाची!" त्याच्या हातात फाईल टेकवत म्हणते.


विजय बोलतो, "बघ मला वाटलेलंच, इथेच कुठे तरी असणार!" इतका वेळ विजय त्याच्या नी मधूच्या डिवोर्सची फाईल शोधत असतो.


"हम्म आता तू हेच बोल. बरं आटप, आणि बाहेर ये उशीर होईल ना तुला?" असं बोलून आई बाहेर जाते.


विजय फाईल घेऊन रूमच्या बाहेर येतो. विजय त्याच्या आईसोबत राहत असतो. त्याला एकुलती एक बहीण असते. तीसुद्धा लग्न करून स्वतःच्या सासरी असते. वडील विजयच्या लग्नाच्या काही वर्षांपूर्वीच गेले. त्यानंतर त्याने मधू शी प्रेम विवाह केला. लग्नाला फक्त दोन वर्ष झाले नि मधू त्याला सोडुन तिच्या माहेरी राहते.


"आलो ग मी आईss!" अस बोलुन विजय डायनिंग टेबल वर बसतो.


आई त्याच्या पुढ्यात गरमागरम नाश्ता आणि चहा आणुन ठेवते.


आई बोलते, "ह्म्म्म घे !" 


आई त्याच्या शेजारी बसते. विजय पटापटा नाश्ता करत-करत मध्येच हातावरच्या घड्याळामध्येही पाहत असतो.


आई त्याला हळुच आवाजात विचारते, "काय ठरवलंय तू?" 


विजय नाश्ता करतच विचारतो, "कशाबद्दल?"


आई बोलते, "हेच आज कोर्टात जातोयस ना? त्याबद्दल...."


तो आईकडे पाहतो. काहीच न बोलता टेबलवरून उठतो. आज कोर्टात विजय आणि मधुची डिवोर्सची तारीख असते.

विजय उठतो, शर्ट इन नीट करतो. केसावरून हलकासा हात फिरवतो आणि मध्येच हसतो.


विजय स्वतःकडे बघून बोलतो, "हम्म, परफेक्ट!" 


त्याचं वागणं आणि बोलणं खुप विक्षिप्त असतं कोणीही ते पाहिलं, तर त्याला विजयचा रागच येईल असं होतं . विजय कोर्टात जायला निघतो. तो सोसायटीच्या गेट बाहेर येतो. त्याने ऑनलाईन गाडी बुक केलेली असते. तो पुन्हा मनगटावरच्या घड्याळाकडे पाहतो आणि तितक्यात गाडी त्याच्या समोर येऊन थांबते. तो गाडीत बसतो आणि गाडी कोर्टच्या दिशेने चालु लागते. काही वेळाने गाडी कोर्टाच्या गेट जवळ येऊन थांबते.


ड्राईवर बोलतो, "साहेब आलं, तुमच ठिकाण! साहेब..." 


ड्राईवर विजयला जोर जोरात आवाज देतो. विजय भानावर येतो.


विजय गोंधळत विचारतो, "परफेक्ट, आलं का?"


ड्राईवर विचारतो, "हो आलं!"


विजय गाडीतुन उतरतो. गाडीचा दरवाजा खाडकन लावतो. तो पुन्हा शर्ट व्यवस्थित इन करतो . केसावरून पुन्हा हात फिरवतो आणि हसतो, "परफेक्ट!"


त्याची नजर सतत मधू ला शोधत असते. तो हळु हळु कोर्टाची पायरी चढतो. तितक्यात त्याला त्याचा वकील भेटतो.


वकील बोलतो, "मिस्टर विजय, अजून आपली पुकारणी झाली नाही. तुम्ही थांबा! मी काही पेपर देतो, ते एकदा नीट वाचुन घ्या."


पण विजयचं लक्षचं नसतं . त्याची नजर सतत मधुला शोधत असते.


वकील बोलतो, "मिस्टर विजय!"


विजय जरा स्वतःला सावरत बोलतो, "हो, हो! ऐकतोय मी!!"


वकीलाला समजत कि, विजय मधूला शोधत आहे.


वकील बोलतो, "तुम्ही मधूला शोधताय का? विजय!"


विजय बोलतो, "हा म्हणजे तारीख आहे आणि मॅडम विसरल्या तर नाही ना?"


"नाही, आल्या असतील त्या. त्यांना माहित आहे ना तारीख आहे ती!" अस बोलुन वकील पुढच्या कामासाठी निघुन जातो.


विजय मधूला शोधत असतो. तो मोबाईल काढतो आणि मधूला कॉल लावतो. तिचा कॉल लागत नसतो.


"परफेक्ट! हिचा कॉल का लागत नाही आहे? माहित नाही का हिला, कि आजची तारीख आहे ते?" तो स्वतःशीच बडबडतो. 


त्याच्या रागाचा पारा चढत असतो. तितक्यात त्याला आईचा कॉल येतो. तो आईचा कॉल कट करतो. पुन्हा त्याला आई कॉल करते. शेवटी तो कॉल उचलतो.


आई काळजीयुक्त स्वरातच बोलते, "अरे विजय काय झालं? माझा कॉल का उचलला नाहीस तू ?"

आई काळजीने विचारते.


विजय आईवर चिडचिड करतच बोलतो , "मी तुझा कॉल उचलला नाही कारण तुला माहित आहे ना आई, मी कोर्टात आलो आहे."


आई बोलते, "तसं नाही रे! तु पोहचलास कि नाही आणि मधू आली कि नाही, ह्या साठी कॉल करत होती."


"बरं मी पोहचलो आहे, चल ठेवतो." असं बोलून विजय कॉल कट करतो. त्याला संशय आलेला असतो कि, मधू नेहमीप्रमाणे आलेली नाही.


🎭 Series Post

View all