सुड. भाग -7

मधूचा आणि विजयचा आज डिवोर्स होणार असतो.

भाग -7


विजय बोलतो, " ठीक आहे. "

आई जाऊन टिफिन आणते आणि विजयला देते.


काही वेळानंतर विजय ऑफिसला पोहचतो. खिशातून मोबाईल काढतो आणि मधूला कॉल लावतो. मधू समोरून कॉल कट करते. पुन्हा विजय मधूला कॉल लावतो. मधू कॉल उचलत नाही म्हणून विजय मधूला मॅसेज करतो.


विजयचा मॅसेज, " मधू डार्लिंग, तू कॉल उचलत नाही. म्हणून हा मॅसेज करतो आहे. प्लीज कॉल उचल जरा कोर्टाच्या केसबद्दल बोलायचं आहे. "


काही वेळानंतर मधूचा रिप्लाय येतो, " जे काही आहे ते तू कोर्टात बोल."


विजयला माहित असतं की मधू कॉल किंवा मॅसेजचा रिप्लाय देणार नाही.

संध्याकाळ होते विजय ऑफिसमधून घरी येतो.


आई त्याला पाहून आश्चर्यचकित होते, " हे काय ? वेळेच्याआधी घरी आलास आज ? "


विजय आईला बोलतो, " का गं ? असं का विचारते आहेस ? "

आईला विजयवर संशय येतो. काहीतरी चुकतंय असं वाटतं आईला.


विजय हसतो आणि बोलतो, " बघ मी सुधारलो तरी तुला माझ्यावर संशय येतो आहे ? "


आई गडबडते, " नाही रे संशय कशाला घेऊ ? चांगल आहे ना ? बरं तू बस फ्रेश हो मी चहा देते तुला ? "


विजय फ्रेश व्हायला बेडरूम मध्ये जातो. काही वेळानंतर विजय फ्रेश होऊन बाहेर हॉलमध्ये येतो.


डायनिंग टेबलवर बसतो. आई त्याला गरम चहा आणून देते. विजय चहा घेतो. आणि मध्येच शांत होतो. आईला त्याच्या शांतपणाची भीती वाटते.


आई विचारते, " काही झालं विजय बाळा ? असं शांत का झालासं ? "


विजय रडू लागतो आणि तो आईला कॉल आणि मेसेज दाखवतो मधूला केलेले, " हे बघ मी तिला इतकं समजावलं, पण ती ऐकतच नाही माझ्याशी बोलायला "

आणि आईच्या पुढ्यात डोळे पुसतो.


आईला हे सगळं विचित्र वाटतं. ती बोलते, " मी बोलू का तिच्याशी ? "


विजय रडत रडत बोलतो, " कशाबद्दल आई ?"


आई बोलते, " हेच की तुझ्याशी एकदा बोलायला ? "


विजय बोलतो, " नको राहूदे, मी तिला डिवोर्स द्यायला तयार आहे . पण ? "


आई बोलते, " पण काय ?"


विजय बोलतो, " पण काय करणार माझं प्रेम आहे तिच्यावर मग वाईट तरं वाटणार ना मला ? "


आई बोलते, " मी समजू शकते. पण जाऊदे तिला नाही ना रहायची इच्छा? मग कशाला ना, तुही तुझं आयुष्य चांगलं घालवाव एका चांगल्या मुलीसोबत !"


विजय रडत रडत बोलतो," बरोबर बोललीस आई तू. उद्या कोर्टची तारीख आहे मी सही करतो. " आणि विजय हसतो.


आईला आनंद होतो की विजय आपला सुधारला आहे ह्यासाठी. चला काहीतरी चांगल घडलं. म्हणून ती मनोमनी देवाचे आभार मानते. 


रात्र होते. विजय एकटाच काहीवेळ बेडरूमच्या खिडकीत उभा असतो. त्याच्या डोक्यात एक वेगळाच विचार चाललेला असतो.

आई हळुच त्याच्या बेडरूममध्ये डोकावून पाहते. आईला खूप वाईट वाटतं की त्याला आवडणाऱ्या व्यक्तीपासून तो असा दूर होतोय.

आणि आनंद ही होतो की तो सुधारला आहे ते, मधूचा विचार त्याने इतक्या सहज सोडला आहे ते.


आई मनात बोलते, " तुला असं एकटं निराश झालेलं मला बघवत नाही आहे विजय बाळ ? "

आणि आईच्या डोळ्यांतून पाणी येते.

विजयला माहित असतं की आईचा आता माझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे.


बराच वेळ विजयच्या बेडरूमची लाईट चालू होती. आई त्याच्या वागण्याकडे बारकाईने लक्ष देऊन होती.


सकाळ होते. विजय लवकर उठून आईसाठी नाश्ता बनवत किचनमध्ये असतो. आई उठते, किचनमध्ये जाते. तिला आश्चर्य वाटतं की आज चक्क विजय किचनमध्ये कसा ?


आई विजयला विचारते, " हे काय, आज तू किचनमध्ये कसा ? "


विजय बोलतो, " गेले कित्येक दिवस तू माझ्यासाठी बनवलंस. आज मी तुझ्यासाठी बनवणार. "

विजयच्या अशा बोलण्याने आई खूश होते. आणि त्याच्याकडे काहीवेळ बघतंच राहते.


विजय बोलतो, " आई चल तू फ्रेश हो, मी नाश्ता देतो तुला."


आई फ्रेश होऊन येते, विजयने गरम गरम उपमा बनवलेला असतो.

आई उपमा खाते, " अरे वाह, येतो म्हणजे बनवता तुला ? "


विजय बोलतो, " हो तरं ! बरं चल मी निघतो. आज मला कोर्टात जायचं आहे."


आई बोलते, " अरे हो की, विसरले होते मी. "


आणि विजय कोर्टात जायला निघतो. नेहमी प्रमाणे त्याने गाडी बुक केलेली असते. काही मिनिटातचं गाडी बिल्डिंगखाली येते.


विजय तोंडातल्या तोंडात बोलतो, " परफेक्ट.. "


तो गाडीत बसतो, गाडी कोर्टाच्या दिशेने चालू लागते. त्याच्या डोक्यात भलताच विचार चालू असतो.

तो मोबाईल काढतो, आणि मधूला कॉल लावतो. पण मधूचा कॉल बंद लागतो.


विजय चिडून बोलतो, " हे काय, आज कोर्टची तारीख आहे माहित नाही का हिला ? "


ड्राइव्हर त्याच्याकडे आरशातून पाहतो. त्याला जरा हा विचित्रच वाटतो. मध्येच हसतो काय, बोलतो काय.


काही वेळात गाडी कोर्टा जवळ पोहचते. विजय गाडीच्या बाहेर उतरतो. पैसे देऊन तो कोर्टाची पायरी चढू लागतो.


तितक्यात वकील त्याला भेटतो.

विजयचा वकील, " ओह्ह्ह मिस्टर विजय, अजून पुकारणी झाली नाही आपली !"


विजय बोलतो, " ग्रेट, सो मिस मधू आल्या नाही का ? "

मधूला शोधत विजय विचारतो.


वकील बोलतो, " आल्या आहेत, आज शेवटची पुकारणी आणि आज तुमच्या सहीचा दिवस सो त्या येणार ना. "


विजय तोंडातल्या तोंडात बोलतो, " परफेक्ट. "


तितक्यात पुकारणी होते.

वकील बोलतो, " चला विजय आपल्याला बोलावलंय. "

असं बोलून विजय आणि वकील दोघही कोर्टात आत सुनावणीच्या ठिकाणी पोहचतात.


तिथे समोरच मधू उभी असते. लाल ड्रेस घातलेला, केस मोकळे सोडलेले, कानात मोठे रिंगा. सुंदर ती मनमोहक अशी दिसतं होती. विजय तिला पाहून एका क्षणासाठी फिदा होतो तिच्यावर. 


राज्यस्तरीय कथामालिका...

ठाणे..

विषय - सामाजिक..

नाव - सुड 


🎭 Series Post

View all