Login

सुड... भाग -6

आईला विजयचं बोलणं खूप विचित्र वाटतं.

भाग -6


मधूला विजयसोबत राहणं आता कठीण झालं होतं. तिने त्याला कित्येकदा सुधरवण्याचा प्रयत्न केला ही पण, त्यात सुधारणा काही होतं नव्हती. तिने अनेकदा विजयच्या आईच्या कानावर सुद्धा घालण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी तिला कधीच साथ दिली नाही. विजयचा स्वभाव हा विक्षिप्त आहे हे तिला लग्नानंतर कळालं.


मधू घरी पोहचते. आज ती खूप थकलेली असते.

मधूची बहीण, " ताई आलीस तू, काय गं काय झालं ? खूप थकलेली दिसत आहेस ? सगळं ठीक आहे ना ? "

बहिणीचा काळजीने प्रश्नांचा भडीमार होतं होता मधूवर.


मधू बोलते, " हो राणी, मी ठीक आहे. "


तितक्यात आई येते.

मधूची आई बोलते, " बाळा मधू, तू बस मी चहा करते तुझ्यासाठी. "


मधू बोलते, " हो आई मी खूप थकले आहे मी आज, तुझ्या हातचा चहा आणि काहीतरी खायला दे आधी. "


मधूची आई तिच्यासाठी चहा आणि नाश्ता करायला जाते.मधू फ्रेश होऊन येते, ती बॅग मधला मोबाईल काढते.


मधू विजयचे मिस्डकॉल्स पाहून बोलते, " हे काय पन्नास मिस्डकॉल विजयचे ? " तिला अतिशय राग येतो.


ती फोन बद्दल करून ठेवते. तितक्यात मधूची आई तिच्यासाठी नाश्ता घेऊन येते.


मधूची आई मधूच्या पुढ्यात नाश्ता आणि चहा ठेवत बोलते, " बाळा घे खाऊन आधी, भूक लागली आहे ना ? थंड होईल नाही तरं. "


मधू खूप विचारात असते. आईच्या बोलण्याने ती भानावर येते.

मधू आईला बोलते, " नको गं मला नाश्ता, भूक नाही आहे. "


आईला आश्चर्य वाटतं, ती मधूला विचारते, " आता काय झालं ? तुला आता तरं भूक होती मध्येच काय झालं ? काही टेन्शन आहे का ? "


मधू आईला बोलते, " नाही गं आई, खूप थकली आहे मी. झोपते जरा जाऊन. "

असं बोलून मधू आत बेडरूममध्ये झोपायला जाते. आईचं मन लागत नसतं. ती सारखी जाऊन मधूला रूममध्ये पाहत असते.


रात्र होते. आई मधूला जेवायला उठवायला बेडरूममध्ये जाते.


आई बोलते, " बाळा उठ की, जेवायला चल. "


मधू उठून बाहेर येते. ती कसबस जेवण जेवते. आईला तिची खूप काळ्जी वाटतं असते.

ती पुन्हा मधूला विचारते, " काय झालं बाळा सगळं ठीक आहे ना ? "


मधू आईला बोलते, " हो गं आई सगळं ठीक आहे. "


आई बोलते, " नाही तू कोर्टातून आल्यापासून खूप काळजीत दिसतेय ? म्हणून तुला विचारलं. "


विजय घरी अजून ही आला नसल्यामुळे आई काळजीत असते. ती विजयची वाट पाहत खिडकीत उभी असते.

तितक्यात विजय येतो. विजयला पाहून आईच्या जीवात जीव येतो.


आई विजयला बोलते, " अरे विजय किती उशीर ? आणि फोनपण सतत व्यस्त तुझा ? "


विजय आईवर चिडत बोलतो, " आल्या आल्या काय कटकट लावली आहेस आई. आलो ना आता घरी, किती प्रश्न विचारशील ? "


आई त्याला शांत करत बोलते, " अरे हो हो, किती चिडतो आहेस. फक्त विचारलं मी, काळ्जी असते म्हणून. "


विजय बोलतो, " चहा दे खूप थकलो आहे मी. " असं बोलून विजय आत बेडरूममध्ये फ्रेश व्हायला जातो.


आईला विजयच्या बोलण्यावरून तरी सगळं ठीक आहे असं वाटतं. नाही तरं नेहमी विजय कोर्टातून यायच्या वेळेला पिऊन घरी यायचा.


आई त्याच्यासाठी चहा गरम करायला आत किचनमध्ये जाते.

तितक्यात विजय फ्रेश होऊन बाहेर येतो. डायनींग टेबलवर बसतो. आई त्याला चहा आणून देते.

विजय गप्पपणे चहा पीत असतो. आई त्याला न राहुन हळुच विचारते.

" आज काय झालं कोर्टात ? "


विजय विचारतो, " काय होणार अजून, तिला घटस्फोट हवा आहे !"


आई त्याला बोलते, " अरे मग दे ना, तुझं ही टेन्शन नि धावपळ कमी होईल. "


विजय आईकडे पाहतो आणि हसतो, " हो देईन की, तिला कायमचं मोकळं करेन ह्यातून. "


आईला विजयचं बोलणं काही कळतं नाही पण, मधूची ह्यातून सुटका होतेय हे समजल्यावर आईला बरं वाटतं.


आई मध्येच बोलते, " चला बरं झालं ! "


विजय आईकडे पाहतो आणि बोलतो, " इतकं आनंदी व्हायला काय झालं ? नक्की आनंद कशासाठी झालाय तुला ? "


आई घाबरते त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच विकृती दिसते. त्याच्या मनात काहीतरी चाललं आहे हे समजून येते असतं.

" अरे कशासाठी म्हणजे ? आनंद थोडी झाला आहे मला. "

आई कसबस विषयांतर करते.


विजय जेवण आटपून आत बेडरूममध्ये जातो. तो शांतपणे बेडवर पडलेला असतो. डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याकडे तो एकटक पाहत असतो.


आई हळुच त्याच्या बेडरूममध्ये डोकावते. तिला समोर जे दिसतं ते पाहून धक्काचं बसतो.

समोर बेडरूमच्या भिंतींवर मधूचे लग्नाआधीचे आणि लग्नानंतरचे काही फोटो विजयने लावलेले असतात.

पूर्ण भिंत फोटोंनीं भरलेली असते.


विजयला काही बोलावं तरं विजय अजून भडकणार. आणि मग संतापाच्या भरात तो अजून काही करायचा.

आई बाहेर हॉल मध्ये येते. ती आराम खुर्चीत बसून विचार करत असते. की नक्की विजयच्या मनात काय असेल आणि सहजासहजी तो ऐकला कसा आणि आज इतका शांतपणे कसा बोलू शकतो.

सगळंच खूप विचित्र घडत आहे. आणि हे कुठेतरी थांबवायला पाहिजे.


सकाळ होते. विजय उठतो नेहमीप्रमाणे तयार होतो आणि नाश्ता करायला येतो.

आई त्याला विचारते, " आज ऑफिस जातो आहेस की अजून कोणतं काम आहे ? "


विजय आईला बोलतो, " अगं ऑफिस आहे माझं, अजून कुठे जाऊ !"


आई पुन्हा त्याला बोलते, " बरं बरं जा, मी टिफिन देते तुला. "


..... क्रमश...


स्तर - ठाणे...

विषय - राज्यस्तरीय कथामालिका..

कथा- सुड..


🎭 Series Post

View all