सुड... भाग -5

विजय कोर्टाकडे मधूला घरी घेऊन जाण्याची मागणी करतो.

भाग - 5

स्तर - ठाणे

विषय - सामाजिक.

कथामालिका.



विजय गाडीच्या बाहेर उतरतो. तो कोर्टाच्या गेटमधून आत येतो. त्याची नजर सतत मधूला शोधत असते.


तितक्यात विजयचा वकील भेटतो.

विजयचा वकील बोलतो, " या मिस्टर विजय, मी तुमचीच वाट पाहत होतो. "


विजय वकिलाला विचारतो, " पुकारणी झाली का माझी ? "


वकील बोलतो, " नाही अजून, पण होईल इतक्यातच."


विजय मधूची विचारपूस करत बोलतो, " बरं, मधू आली आहे का ? "


वकील बोलतो, " हो आल्या आहेत, कारण मगाशी त्या दिसल्या होत्या मला त्यांच्या वकिलाशी बोलत असताना. "


विजय हसतो आणि तोंडातल्या तोंडात बोलतो, " गुड, परफेक्ट. मी भेटू शकतो का तिला ? "


वकील बोलतो, " हो का नाही, तुम्ही भेटा मी काही पेपर तयार करतो. तुमचं झालं की मला कॉल करा मी येतो. "

असं बोलून वकील तिथून निघून जातो.


तितक्यात विजयला मधू दिसते. तो मधूला आवाज देत तिच्या पाठी पाठी जातो.

" मधू, मधू.. थांब जरा. " विजय बोलतो.


मधू त्याचा आवाज ऐकून थांबते. मधू मध्ये फार बदल झालेला असतो. आणि तो कुठे तरी विजयला खटकतो.


विजय मधूला पाहून बोलतो, " वाह मॅडम, खूप बदल झाला आहे तुमच्यात ? "


मधू त्याला खडसावून बोलते, " तुझं काय आहे आता ? कोर्टात केस चालु असताना तू मला आवाज देऊ नाही शकत. "


विजय हसतो आणि बोलतो, " अरेरे किती तो राग, रुसवा. आवाज दिला तरं इतकं काय त्यांत चिडायचं ? "


मधू विजयला बोलते, " काय बोलायचं होतं ते बोल पटकन.. "


विजय बोलतो, " इतकी कसली घाई, थांब की.. "


मधू विजयला बोलते, " मला तुझ्याशी वाद घालायचा नाही आहे, समजलं. "


तितक्यात मधूची वकील येते.


वकील मधूला आवाज देते, " मधू, चल जरा काही पेपर बनवायचे आहेत. "

आणि वकील मधूला तिथून घेऊन जाते.


मधू तिच्या वकिलाला बोलते, " मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. मी ह्या विचित्र माणसासोबत जास्त काळ केस नाही लढू शकत मॅडम. "


वकील बोलते, " हो मधू मला कळतंय, मी समजू शकते. मी तुला लवकरात लवकर ह्यातून मोकळं करेन. "


काही पेपर ती मधूच्या हातात देत बोलते, " बरं ह्या पेपर च्या काही झेरॉक्स काढून घेऊन ये, आपण पुढची प्रोसेस चालू करूया. "


मधू वकिलाला बोलते, " ठीक आहे मॅडम.. "


काही वेळानंतर कोर्टाची पुकारणी होते.

"मिसेस मधू सरपोतदार आणि विजय सरपोतदार.." दोघंही आत जातात. वकिलाचं आणि जजच संभाषण होतं.

जज विजयला विचारतात, " तुमचं काय मत आहे, मिस्टर विजय. तुम्हाला राहायचं आहे की नाही ? "


विजय कोर्टात जजला सांगतो, " मला राहायचं आहे, मी तयार आहे. "


तितक्यात मधूची वकील बोलते, " पण आम्ही तयार नाही आहोत. अशा विकृत व्यक्तीसोबत मधू नाही राहू शकत. "


जज मधूला विचारतात, " तुमचं काय मत आहे, मधू ? "


मधू बोलते, " मला नाही राहायचं, मी तयार नाही. मला डिवोर्स हवाय. "


तितक्यात विजयचा वकील बोलतो, " आम्हाला एकत्र राहण्यासाठी सहा महिन्याचा वेळ हवा. "


तितक्यात मधूची वकील बोलते, " जज आम्हाला नकोय. आम्ही तयार नाही. "


जज बोलतात, " ठीक आहे. मी पुढची तारीख देतो. "

वकील आणि मधू बाहेर येतात.


मधू वकिलाला बोलते, " त्याने काय म्हणून एकत्र राहण्यासाठी वेळ मागितला कोर्टाकडे . "


वकील तिला समजावत बोलते, " अगं मधू तो सगळे प्रयत्न करणार, कारणं त्याला तुला सोडायचं नाही आहे म्हणून. पण कोर्ट सुद्धा तुझ्यावर जबरदस्ती नाही करू शकत हे लक्षात ठेव. "


मधूला वकिलाचं बोलणं ऐकून जीवात जीव येतो. तितक्यात विजयचा वकील तिथे येतो.


विजयचा वकील मधूच्या वकिलाला बोलतो, " मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी ? "

मधूची वकील मधूकडे पाहते.


मधूची वकील विजयच्या वकिलाला बोलते, " बोला, काय झालं ? "


विजयचा वकील बोलतो, " मिस्टर विजय म्हणत आहेत की, सहा महिन्यांचा वेळ घेऊन जर एकमेकांना समजून घेता आलं तरं बरंच होईल . "


मधूची वकील बोलते, " कोर्टात काय उत्तरं दिल ते तुमच्या क्लायंटने मिस्टर विजयने नीट ऐकलं नाही का?"


विजयचा वकील बोलतो, " ऐकलं पण एक चान्स मिळाला असता तरं बरं झालं असतं. असं ते म्हणतं आहेत. "


मधू वैतागत मध्ये बोलते, " त्याला सांगा जाऊन, की झाला तेवढा तमाशा भरपूर झाला. आता माझा अंत पाहू नकोस, गप्पपणे डिवोर्स पेपरवर सही कर. "


विजयचा वकील हे ऐकून तिथून निघून जातो.


मधूची वकील खूश होऊन बोलते, " ग्रेट मधू, छान उत्तरं दिलंस. बरं तू थांब मी आलेच पुढची तारीख घेऊन. "


मधू बोलते, " हो मॅडम मी थांबते इथे. "


काही वेळानंतर मधू कोर्टातून निघते. तिला कोर्टातून महिन्याभरानंतरची तारीख मिळालेली असते.


मधू घरी पोहचते.

मधू ही तिच्या आई वडिलांची मोठी मुलगी असते. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली. तिला एक लहान भाऊ, एक बहीण, आई, वडील आणि ती असे लहानशा घरात राहत असतात.


ती एका कंपनीत कामाला असते. भाऊ शिक्षण घेत असतो आणि बहीण सुद्धा एका लहानशा कंपनीमध्ये कामाला असते. वडील रिटायर्ड होऊन घरी असतात आणि आई घरकाम करायची.


मधू आणि विजयचा प्रेमविवाह होता. लग्नानंतर ही मधू काम करायची. विजयच्या आईला आधीपासून मधू सून म्हणून पटली नव्हती, तिचा स्वभाव हा वेगळा असल्यामुळे. कोणालाही सरळ उत्तरं देणारी मधू, कसलाही घमेंड न बाळगणारी. लग्नाला काहीच वर्ष झालेली, पण लग्नानंतर तिला विजयचा स्वभाव कळला होता.

....

क्रमश...


🎭 Series Post

View all