Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

सुड.. भाग -3

Read Later
सुड.. भाग -3

भाग - 3

टीम - ठाणे.

विषय - सामाजिक विषय.आई पुन्हा त्याला सावरते.


आई रडकुंडीला येऊन बोलते, " अरे, विजय बाळा. शुद्धीवर ये. "


पण विजय दारूच्या नशेत बेशुद्ध असतो. त्याला आईची कळकळ जराही जाणवत नाही. आई त्याला सोफ्यावर नीट झोपवते, त्याच्या पायातल्या चपला काढते . आई घड्याळाकडे पाहते रात्रीचे आठ वाजलेले असतात.


आई स्वयंपाक घरात जाऊन विजय साठी गरम गरम जेवण बनवते.

खूप वेळ होतो. विजय काही दारूच्या नशेतून बाहेर आलेला नसतो. आई त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. तो शुद्धीवर यावा म्हणून त्याच्या चेहऱ्यावर पणी शिंपडते.


विजय खडबडून जागा होतो.

विजय आईवर वैतागत बोलतो, " काय गं काय केलंस हे ? "


आई बोलते, " काही नाही तू शुद्धीवर यावा म्हणून पाणी शिंपडलंय फक्त. "


विजय बोलतो, " मेलो नव्हतो, पाणी शिंपडायला. "


आई चिडून बोलते, " तेच तर दुःख आहे ना, सोड जेवण केलंय जेऊन घे."


आई स्वयंपाक घरात जाते. आणि विजय समोर ग्लास आणुन ठेवते.

विजय बोलतो, " हे काय, आता ? "


आई बोलते, " घाबरू नकोस विष नाही आहे, लिंबूपाणी पिऊन घे. नशा आणि डोकं दोन्ही उतरेल. "


तो आईने दिलेलं लिंबूपाणी पितो.


विजय आत बेडरूममध्ये जात बोलतो," आलो मी आवरून, जेवण वाढ तू."


काही वेळा ने विजय आवरून बाहेर येतो. डायनिंग टेबलवर बसतो.

आई त्याला जेवण वाढते. तो शांतपणे जेवत असतो. मग आई मुद्दामच मधूचा विषय काढते.


आई बोलते, " आज काय झालं, सांगितलंस नाही ते ? "


विजय हूं नाही की चुं नाही. आई पुन्हा त्याला विचारते.


आई बोलते, " उत्तर नाही दिलसं तू, मी काही तरी विचारलंय तुला विजय ? "


विजय चिडत आईला बोलतो, " तुला आत्ताच हा विषय काढायचा होता का ? जेऊदे की शांतपणे. "


आई बोलते, " आता नाही तरं मग कधी काढणार, दुपारी आल्यापासून तू बाहेर आहेस. नि आता आलास तरं पूर्ण दारूच्या नशेत आलासं. मग बोलायचं तरी कधी ? "


विजय बोलतो, " ती आली नाही आजही कोर्टात. "


आई बोलते, " मग, जज काय बोलले ? "


विजय बोलतो, " काय बोलणार, पुढची तारीख दिली आहे. "


आई बोलते, "ठीक आहे ना, येईल ति काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. "


विजय आईचं हे उत्तर ऐकल्यावर चिडून बोलतो, " तुला बरी चिंता तिची, इतकं होऊन सुद्धा. "


आई बोलते, " इतकं होऊन सुद्धा म्हणजे? "


विजय पुन्हा चिडून बोलतो, " तुझ्या मुलाला ती सोडून गेली आणि तू अजूनही तिचीच बाजू घेते आहेस आई. "


आई बोलते, " का नको घेऊ, एक बाई म्हणून नक्की घेणार. आणि मला दिसतंय तू चुकतो आहेस, सुन म्हणून मी तिला समजून घेत होती. पण बायको म्हणून तुला नंतर ती पटली नाही. "


विजय आईचं बोलणं ऐकुन मध्येच विचित्र हसतो आणि बोलतो "परफेक्ट "


आईला त्याच्या ह्या वागण्याची भीती वाटू लागते. त्याच बोलणं मधेच हसणं .


आई बोलते, " तुला पसंत होती तू लग्न केलंस. मग आता तुला काय प्रॉब्लेम व्हायला लागला माहित नाही."


विजय चिडून बोलतो, "प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा मला काढता येतं!" विजय एकदम कोड्यात बोलू लागतो.


आई बोलते, " म्हणजे? "


विजय हसून बोलतो, " काही नाही. "

आणि विजय आत बेडरूम मध्ये निघून जातो. 


तो सतत मधूला कॉल लावत असतो. पण मधूचा कॉल लागत नसतो.

विजय वैतागत स्वतःशीच बोलतो, " कुठे गेली ही ? "

तो रागाने फोन बेडवर फेकून देतो.


आई आवाज ऐकुन आत बेडरूम मध्ये येते.


आई बोलते, " काय झालं, इतकं चिडला का आहेस ? "


विजय बोलतो, " तू काय आज माझ्यावर नजर ठेवून आहेस का ? "


आई बोलते, " तसं नाही, आवाज आला म्हणून पहायला आली. "

आई बेडवरचा फोन हळुच उचलते आणि पाहते. तरं त्यात मधूला केलेले अनेक कॉल असतात.


विचारायला जावं तरं विजय चिडेल म्हणून आई फोन कडे दुर्लक्ष करते.

आई बेडरूम चा दरवाजा लावून बाहेर येते. तिला कळतं नसतं की काय करावं.


तिला एका क्षणाला वाटतही की मधूला कॉल करावा आणि स्वतःला सांभाळ सांगाव. पण मग पुन्हा विजयला कळलं तरं ? 

रात्रीचे बारा वाजतात, आई विजयच्या विचाराने खूप थकून जाते. तिच्या मनात नको नको ते विचार येतं असतात. एक स्त्री म्हणून आईला मधूची काळ्जी वाटत असते.


सकाळ होते. आई विजय ला उठवायला जाते.

आई बोलते, " विजय बाळा उठ की, वाजले बघ किती. "


विजय काल रात्रीच्या प्रकारानंतर गाढ झोपलेला असतो. त्याला दारूच्या नशेमुळे जाग ही येतं नसते.


आई पुन्हा त्याला उठवते, " विजय बाळा उठ रे, चल उशीर होईल तुला. "


विजय ला आई च्या कित्येक हाका नंतर जाग येते.


विजय बोलतो, " काय गं आई, किती वेळा उठवशील? झोपू दे की जरा. "


आई बोलते, " वाजले बघ किती, ऑफिस नाही आहे का आज तुला ? आवर पटापट. "

असं बोलून आई बाहेर जाते.


काही वेळा नंतर विजय आवरून बाहेर येतो. डायनिंग टेबल वर बसतो.

विजय आई ला हाक देत बोलतो, " झाला का गं नाश्ता आई, भूक लागली आहे. "


आई घाई घाईत नाश्ता आणुन त्याच्या समोर ठेवते, "तू अगदी लहान मुलांसारखं कर, इतक्या हाका मारल्यानंतर तू उठलास आणि बोलतो लवकर नाश्ता दे. "


विजय घाई घाई मध्ये नाश्ता करू लागला.


आई बोलते, " अरे हळू कर की.. "


विजय बोलतो, " नाही आज महत्वाचं काम आहे जरा !"


..... क्रमश..


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Manisha Narendra Parab

Job

मि लॅब टेकनिशन आहे. लिहायला वाचायला खुप आवडत.

//