Mar 01, 2024
वैचारिक

जबाबदारी ( भाग २)

Read Later
जबाबदारी ( भाग २)


"अहो, पेढा घ्या .."
असे मीरा तिच्या नवऱ्याला राजेशला रात्री जेवताना म्हणाली.

राजेश - "पेढा..कशाबद्दल?"

मीरा - "अहो, नीता ने आणले होते पेढे . तिचा पार्थ NIIT परीक्षा चांगल्या रँकने पास झाला ना त्याबद्दल... संध्याकाळी आली होती पेढे द्यायला."

राजेश - "माझ्याकडून अभिनंदन केले का नाही पार्थचे? मला खात्री होती पार्थबद्दल. खूप हुशार आहे तो.

मीरा - "खूप खूश होती मीरा आज ...किती भाग्यवान आहे ना मीरा ! "

बाजूला जेवायला बसलेल्या पार्थचे आईच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते .तो त्याच्यात विचारात जेवत होता.
पण राजेशच्या लक्षात आले होते मीराचे बोलणे ...
तिचे बोलणे ध्रुवला उद्देशून होते ते..
मीरा अजून काही बोलायच्या अगोदरच राजेशने वेगळा विषय काढून तिच्याशी व ध्रुवशी गप्पा मारल्या.
आणि शांत मनाने तिघांनी
जेवणाचा आस्वाद घेतला.

जेवण झाल्यावर ध्रुव त्याच्या रूममध्ये चालला गेला.

मीराची कामाची आवराआवर झाल्यानंतर ती बेडरूममध्ये गेल्यानंतर राजेशने विचारले, "पार्थच्या यशाने तुझी मैत्रीण आनंदी आहे मग तू का नाराज आहे ? तुला नाही झाला का आनंद ?"


मीरा - "पार्थच्या पास होण्याने मलाही आनंद झाला हो .... आणि मी त्याचे मनापासून अभिनंदन व कौतुक ही केले. पण... आपल्या ध्रुवचा विचार केला की मन नाराज होते.

राजेश - "का नाराज होते तू ?"

मीरा - "जसे काही तुम्हांला काही माहितचं नाही ....असे दाखवत आहात.

आपला ध्रुव जसा पाहिजे तसा अभ्यास करीत नाही. फक्त ऐवरेज मार्क्स मिळतात त्याला. त्याने व्यवस्थित अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवावे असे वाटते मला."

राजेश -"अगं ,सर्वांमध्ये सारखे गुण नसतात. पार्थला जास्त परसेन्टेज मिळतात म्हणून ध्रुवलाही तितके परसेन्टेज मिळतील असे नाही ."

मीरा - "अहो ,आजच्या स्पर्धेच्या जगात शिक्षण किती महत्त्वाचे आहे ? नुसते पास होऊन चालत नाही. अगदी काही पॉइंटच्या फरकाने ऍडमिशन भेटत नाही.जिथे पॉइंट पॉइंट ची स्पर्धा असते तिथे साधारण गुण असणाऱ्यांचे काय ?
अभ्यासात आळशी राहून नाही चालत. पुढे भविष्यात चांगली नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर चांगले आणि योग्य शिक्षण हवेच ना?
आता अभ्यासाचे कष्ट घेतले तर पुढे थोडे सोपे होईल ना? आणि आता अभ्यास नाही केला तर पुढे शिक्षण, नोकरी या सर्व ठिकाणी अडचणी येतील ना ?"

राजेश - "आपण आईवडील म्हणून ध्रुवसाठी सर्व काही करतच आहोत ना ? त्याची सर्व प्रकारे काळजी घेत आहोत ना ? "

मीरा - "तेचं तर मी सांगते आहे ना .. आपण आईवडील म्हणून त्याच्या साठी जे शक्य आहे ते सर्व करीत आहोतच..
चांगली शाळा, चांगले क्लासेस, सर्व काही चांगलेच करत आहोत.
घरातील त्याला काही टेंशन्स नाही, एकुलता एक आहे त्यामुळे बहीण भावांची काही जबाबदारी नाही. आपण त्याला काही कामेही सांगत नाही.
फक्त शाळा, क्लास, अभ्यास एवढचं तर त्याला करायच आहे. मग त्याने ते व्यवस्थित करायला हवे ना ?"


राजेश - "मलाही अभ्यासाची विशेष आवड नव्हती पण घरातील परिस्थितीची जाणीव होती. शिक्षण घेऊन नोकरी करणे गरजेचे होते.त्यासाठी मला अभ्यास करावा लागला."

मीरा - "अहो, तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती सारखी का? शिक्षण, नोकरी या गोष्टी आता सहज ,सोप्या राहिल्या नाही.

पूर्वी लोकसंख्या ही थोडी कमी होती. जास्त करून फक्त पुरूषच सर्व क्षेत्रात नोकरी,व्यवसाय करीत होते. घरातील एका व्यक्तीने कमावले तरी सर्वांच्या गरजा पूर्ण होत होत्या.

आता लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे ,लोकांच्या गरजा वाढत आहे. महागाई वाढत आहे.
पुरूषांप्रमाणे स्त्रिया ही सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. त्यामुळे काही ठिकाणी एका घरातील दोघेही नोकरीला असतात तर काही ठिकाणी घरातील एकालाही नोकरी नसते.

आणि त्यात अजून आरक्षण, वशिला या गोष्टी आल्याच...
व्यवसाय म्हटला तरी तिथे स्पर्धा आलीच ना?
आपल्या सारख्या सामान्य माणसांच्या मुलांना अभ्यास करणे गरजेचेच असते."

राजेश - "बरोबर आहे तुझे.परिस्थिती बदलत चालली आहे.
आणि जगात, देशात, समाजात घडणाऱ्या गोष्टींचा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम होतच असतो.
लोकसंख्यावाढ, महागाई, येणारे नवनवीन आजार,नैसर्गिक संकटे, बदलते राजकारण अशा अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम सर्वांवर होतच असतो.
यासर्व गोष्टी बदलणे आपल्या हातात नसले तरी आपल्या कडून जे शक्य होईल किंवा आपल्या हातात जे काही असते ते आपण करू शकतो."

मीरा - "नीता शाळेत असताना एवढी हुशार नव्हती. पण तिचा पार्थ आज चांगल्या गुणांनी पास होतो आहे,हुशार आहे . हे बघून मला आनंदी ही होत आहे आणि तिचा हेवाही वाटत आहे.

शाळेत तिच्यापेक्षा मला नेहमी चांगले मार्क्स मिळायचे. मला लहानपणापासून अभ्यास करायला आवडते पण माझा मुलगा जेव्हा मनापासून अभ्यास करीत नाही तेव्हा मनाला खूप वाईट वाटते. त्याने स्वतःहून आणि आवडीने अभ्यास करावा असे वाटते.
आपण सांगितल्यावर तो अभ्यासाला बसतो आणि ते ही व्यवस्थित लक्ष देवून करत नाही. मोबाईल, टि.व्ही. हे आवडीने पाहतो. याचेच जास्त वाईट वाटते."

राजेश - "अगं,तुला जे आवडेल तेच त्याला आवडेल असे नाही ना ! करतो ना तो अभ्यास..त्याशिवाय का तो दहावीपर्यंत पोहोचला? आणि बोलण्यात ,वागण्यात किती हुशार व चांगला आहे... अनेक गोष्टींचे ज्ञान आहे त्याला. सर्व जण त्याच्या ज्ञानाचे कौतुक करीत असतात."

मीरा - " मला आवडते म्हणून नाही तर आजची गरज आहे म्हणून तरी त्याने मन लावून अभ्यास करावा जेणेकरुन त्याला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळावी. पुढे चांगले उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करावी म्हणजे त्याचे आयुष्य सुखी होईल . अशीच एका आईची मुलाबद्दल ची इच्छा...

तो बोलण्यात हुशार आहे. त्याला अनेक गोष्टींचे ज्ञान आहे. हे मान्य आहे मला.. पण परीक्षा लेखी ही असते फक्त तोंडी परीक्षा नसते.
आणि त्यात त्याला लिहिण्याचा कंटाळा....
लेखी परीक्षेत जे योग्य आणि व्यवस्थित लिहीले तरच मार्क्स मिळतील ना ? नुसत्या तोंडी परीक्षेवर मार्क्स मिळतील का ? मुलांनी किती व कसा अभ्यास केला . त्यांना काय समजले हे सर्व परीक्षेत काय लिहिले ? यावरून समजते ना!

आता आपण परीक्षापद्धती बदलू शकत नाही ना? दहावीपर्यंत तरी सर्वच विषय असतात आणि ते आवडो वा ना आवडो त्यांचा अभ्यास करावाच लागतो. दहावीनंतर आपण आवडीचे विषय घेऊ शकतो मग त्यातही सर्व च विषय आपल्या आवडीचे असतील असे नाही. त्यातही एखादा आवडीचा नसेल तर ...
तरीही सर्वच विषयांचा अभ्यास करावाच लागेल ना ?
विद्यार्थ्यांची जबाबदारीच आहे अभ्यास करणे आणि त्यांनी ती पूर्ण केलीच पाहिजे असे मला वाटते.

जेव्हा मी एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी बघते ,ज्यांना शिक्षणाची खूप आवड आहे पण पैशाअभावी ते शिक्षण घेऊ शकत नाही तेव्हा खूप वाईट वाटते.

जिथे सर्व सुखसुविधा असतात तिथे मुलांना शिक्षणाचे महत्त्व नसते आणि जिथे शिक्षणाची आवड असते तिथे सुविधा नसतात."

राजेश - "तुझे सगळे म्हणणे मला पटते आहे .
आईवडिलांचे आपल्या मुलांवर प्रेम असते आणि मुलांचे चांगलेच व्हावे यासाठी ते त्यांना रागवत असतात आणि त्यांच्या सुखासाठी कष्ट करत असतात.
पण काही वेळा आईवडिलांचा नाईलाज होतो. मुलांवरील प्रेमापोटी त्यांच्या गुणांबरोबर दोषही स्विकारावे लागतात.प्रत्येकात चांगल्या गुणांबरोबर काही दोषही असतात .परिपूर्ण असे कोणीही नसते. मला ध्रुव बद्दल खात्री आहे की तो त्याच्या आयुष्यात काही तरी निश्चित चांगले करणार ... आपण म्हणजे तू त्याला समजण्यात थोडी चूक करते आहे असे मला वाटते."

मीरा - "तुम्ही त्याचे वडील म्हणून सर्व जबाबदारी छान पार पाडत आहात ..मी पण आई म्हणून माझी जबाबदारी पूर्ण करतच आली आहे ना ...
त्याच्या कडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी माझी चांगली नोकरी सोडली.आपण त्याला जन्म दिला म्हणून आपले कर्तव्य आहे त्याची काळजी घेणे.आपण काही जास्त अपेक्षा नाही करत आहे ना त्याच्या कडून ...आणि ज्या पण अपेक्षा आहेत त्याही त्याच्या चांगल्या भविष्यासाठीच आहेत ना? आपण जर आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत आहोत मग मुलगा म्हणून ,एक विद्यार्थी म्हणून त्याने त्याची जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडायला काय हरकत आहे.... तो हुशार आहे आणि तो करूही शकतो फक्त अभ्यासाचं थोड सिरियसली घ्यायला हव ... एवढचं."

राजेश - "मी समजावून सांगतो त्याला माझ्या पद्धतीने. बघू प्रयत्न करून ..."

मीरा - " ऐकले तर खूप बरे होईल ..मला तर मग खूप आनंदचं होईल ...
या विचाराने तरी आज शांत झोप लागेल मला ."

राजेश - "मगं आता जास्त विचार न करता शांत झोप."

दुसऱ्या दिवशी राजेशने ध्रुवला समजावून सांगितले.

"ध्रुव तू हुशार आहेस,अभ्यासही करतोस फक्त थोडा अजून करं..बेटा,प्रयत्न करणे आपल्या हातात आहे,जे शक्य आहे तेवढे तर आपण करू शकतो ना?"

वडिलांच्या समजावण्याचा ध्रुव वर चांगला परिणाम झाला त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव झाली व तो अजून चांगला अभ्यास करू लागला.

त्याला अभ्यास करताना पाहून मीरालाही आनंद होऊ लागला.


समाप्त


नलिनी बहाळकर

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//