रेशीमगाठी भाग 5

End of beautiful story of Nil and sanavi

सानवी अजूनही व्यक्त झाली नव्हती कारण आपण एक चांगला मित्र गमावून बसु याची तिला भिती होती. दुसऱ्या दिवशी ती एका मुलाला भेटायला जाणार होती. याबाबत ती नीलसोबत बोलली. सानवी मुलगा पहायला जाणार म्हणाल्यानंतर नीलला रात्रभर झोप लागली नाही, नेमक काय होत आहे ते त्याला कळेना.
 असाच दुसरा दिवस उजाडला. सानवी मुलग्याला भेटायला गेली.सानवी त्या मुलाला भेटली. त्या मुलामध्ये काही वाईट नव्हते. चांगला शिकलेला, चांगली नोकरी असणारा होता. त्याला भेटल्यानंतर सानवीचे विचारचक्र सुरु होते की आपण आता काय करावे , आपल्याला कोणीतरी वेगळ आवडत असताना तिसर्या व्यक्तीसोबत लग्नाचा विचार करणं तरी योग्य आहे का?असाच विचार करत ती घरी आली. आणि पाहिले तर आज तिला बर्याच चपलांचा ढीग दारात दिसत होता. कारण नेहमी घरी ती आणि आई बाबा एवढेच लोक असायचे. तिच्या माहितीप्रमाणे आज कोणी पाहुणे पण येणार नव्हते. 
सानवीने आईला हाक मारली. आईने छान हसत दार उघडले. सानवीने आत येऊन पाहिल्यावर ती फक्त चक्कर येऊन खाली पडायची बाकी होती. कारण तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. नील त्याच्या आईबाबांसोबत घरी आलेला आणि ते ही तिला मागणी घालण्यासाठी.
नीलने सानवीला सांगितलं "तु जेंव्हा मुलगा पहायला जाणार म्हणालीस तेव्हा खूप वाईट वाटत होत ,खुप विचार केला मग रिअलाईज झाल की आपली लाईफ पार्टनर आपल्यासोबतच होती अगदी सुरुवातीपासून. पण मलाच तुझं प्रेम नाही ओळखता आलं. लक्षात येताच मी आईबाबाना सांगितले आणि लगेच आज त्यांना तुझ्या घरी घेऊन आलो. तु यायच्या आधी मी सगळं तुझ्या आईबाबाना सांगितले आहे. यावर सानवीच्या आईवडिलांनी होकार दर्शविला. त्याना नील पसंत पडला होताच पण सानवीच मत त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.आणि तिची वाट पहात ते थांबले होते. आता सानवीला जेव्हा सर्व परिस्थिती लक्षात आली तेव्हा तिच उत्तर तिचा चेहराच सांगत होता.घरच्यांनी तर परवानगी दिलीच होती. 
त्यामुळे आता पहिल्यांदा सर्वांच्या समोर नीलने सानवीला विचारले "आपल मैत्रीच प्रेम मला आयुष्यभरासाठी हवयं, मैत्री आणि प्रेमाच्या धाग्याच मला लग्नाच्या रेशीमगाठी मधे रुपांतर करायचं आहे. होशील का माझी सहचारिणी, जीवनसाथी?"
यावर सानवी उत्तरली " मला प्रेम म्हणजे काय हे तुझ्यामुळे समजले. नील आणि प्रेम हे माझ्याकरता समानार्थी शब्द आहेत. आताचा हा क्षण माझ्या आयुष्यात येईल असा मी स्वप्नात सुध्दा विचार केला नव्हता. मला तु आणि फक्त तूच जोडीदार म्हणून हवा आहेस."
आता काय प्रपोज झाल आणि होकार सुध्दा मिळाला. पुढच्या महिन्यातला छानसा मुहूर्त काढला आणि या रेशीमगाठी जुळून आल्या.

समाप्त

🎭 Series Post

View all