रेशीमगाठी भाग 4

Nil and sanavi who met eachother and may be apart from each other... lovestory of them

इकडे राधाच्या मनात काही वेगळंच चालल होतं. ती काहीच घरी सांगायला तयार नव्हती. हळूहळू तिने फोन , मेसेजेस कमी केले.आता नीलच्या मेसेजेस ला ती उत्तर सुद्धा देत नव्हती एक दिवस राधाचा मेसेज आला की 'मला फोन अथवा मेसेज करू नकोस. मला तुझ्यासोबत लग्न करायच नाहीये. माझ्या स्वप्नातला राजकुमार कोणीतरी वेगळा आहे. आजपर्यंत आपल्यात जे होत तो फक्त टाईमपास होता. तु इतका माझ्यामध्ये गुंतशील अस मला वाटल नव्हत. पण हे नात तु खुप सिरिअस घेत आहेस. त्यामुळे मी माझ्याकडून ब्रेकअप करते. तु आपल्यात जे होत ते विसरून जा' 
हे ऐकल्यावर नीलच्या पायाखालची जमीन सरकली.नील या धक्क्याने पुरता हादरुन गेला. या गोष्टीमुळे त्याच ना नोकरीत लक्ष ना खाण्यापिण्यात. त्याच पुर्ण आयुष्य आता एकलकोंड झालेल होत. त्याच्या सगळ्या स्वप्नांचा तिने चुराडा केला होता. आणि हे सगळ घरी कस सांगायचं हा मोठा प्रश्न होता. हिंमत दाखवून त्याने सर्व घरी सांगितले. आता मुलगी तयार नसताना घरचे तरी काय करणार ?
हे सगळ सुरु असताना सानवीने मात्र करिअर घडविण्यासाठी वेळ दिला आणि आता ती एका डॉक्टरांच्या हाताखाली प्रँक्टिस करत होती.सानवी जाणूनबुजून नील पासुन लांब राहु लागली होती. इकडे नील सावरायचा खुप प्रयत्न करत होता, ते त्याला शक्य होत नव्हते. त्याचे फेसबुक स्टेटस त्याने कमिटेड वरुन सिंगल केले.सानवीने लगेचच ओळखलं की काहीतरी गडबड आहे. आतापर्यंत सानवीचा समज होता की तो खुश आहे. आपल्यासोबत नसला तरी तो खुश आहे हे पुरेसं आहे.पण आता परिस्थिती वेगळी झाली होती. सानवीने लगेच फोन करून चौकशी केली. नील ने सगळं सानवीला सांगितले. आता नीलला सानवी ची साथ हवी होती. कारण ती त्याची एकमेव बेस्ट फ्रेंड होती. एकाच गोष्टीवर सानवी चिडत असे अन् तो म्हणजे अजूनही अधुनमधून येणारा राधाचा फोन. आणि तो फोन फक्त आर्थिक मदत हवी असल्यास येत असे. राधाला नीलसोबत काहीच देणघेण नव्हतं.राधाचा फोन येताच नीलची खुप चिडचिड होत असे. तरीही सानवीने त्याला समजून घेतले आणि समजुन सांगितले. 
काही काळ असा निघून गेला. आता सानवीने स्वतःचं क्लिनिक सुरु केलं. कर्मदैवसंयोगान तिथेच नीलची बदली झाली. दोघे कधीतरी भेटत असत पण नेहमी जनरल गप्पा होतं.
आता दोघेही सेटल असल्याने दोघांच्या घरीही लग्नाची पाहणी बोलणी सुरू होती. नील दोनतीन मुली पाहून देखील आला.


आता नील ला कोणती मुलगी पसंतीस उतरली हे पाहुया पुढील भागात

🎭 Series Post

View all