A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session06087cdf902a9194bd3e100cbb34d8dff6ff65ee87bff3dea260c367bf68ad34a76c94ec): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Reshimgathi
Oct 26, 2020
प्रेम

रेशीमगाठी

Read Later
रेशीमगाठी

रेशीमगाठी:- 

पूजा ची आज सकाळपासून खूप गडबड सुरू होती थोड्याच वेळात ती सर्व प्रवासाला निघणार होती . उद्या सकाळपासून तिच्या मैत्रिणी म्हणजे गौरी च्या घरी तिच्या भावाच्या लग्नाचे प्रोग्रॅम सुरू होणार होते. लग्न म्हणावे तर डेस्टिनशन वेडिंग असे नव्हते तर त्यांच्या गावी जे  कर्नाटक गोवा सीमेजवळ होते तिथे छान सागरसंगीत पद्धतीने होणार होते.
गावात तर पूजा ला फारसा रस नव्हता , तिच्या मते गाव म्हणजे गावंढळ पणा!  तिथली लोक त्यांचे राहणीमान कसे हे सगळे गावठी होते पण गौरी ही तीची खूप जवळची मैत्रीण असल्यामुळे ती या सगळ्यात सामील झाली होती.
छान 4 दिवस वेगवेगळे कार्यक्रम होणार होते आणि मग पाचव्या दिवशी लग्न असा सगळा फंक्शन  चा आराखडा होता. त्या बेताने पूजा ने ट्रॅडिशनल , काही पार्टी वेयर आणि काही कॅज्युएल असे ड्रेस घेतले होते.गव्हाळ वर्ण , धारदार नाक आणि बोलके डोळे यामुळे चारचौघात उठून दिसेल असेच पूजा चे रूप होते आणि सोबतीला बांध्याला साजेशी उंची.
दुपारी सुरू झालेला प्रवास तसा तिला थोडा रटाळ वाटला पण जसजशी संध्याकाळ होत होती आणि ज्या परिसरात तिचा प्रवेश होत होता ते बघून ती स्तब्ध होत होती आणि हरखून गेली होती. शहरातील गोंगाटासून दूर , निसर्ग , हिरवळ , नजर जाईल तोपर्यंत पसरलेली शेती , नद्या ,डोंगर सगळे तिचे लक्ष वेधून घेत होते. साधारण 7 च्या सुमारास ते गावच्या स्थळी पोहचले पण आता तिला कसलाही थकवा जाणवत नव्हता की कंटाळा. कसलीशी हुरहूर जाणवत होती आणि नकळत उत्साह संचारला होता.  आनंदही वाटत होता. जशी त्यांची कार गावाच्या वेशीत आली तसे काही लोक स्वागतासाठी उभे होते , त्यामध्ये एक हसरा चेहरा तिला दिसला. तिच्याच वयाचा पण काहीतरी नक्की वेगळे त्याच्यात तिला जाणवले. फारसा विचार करायला वेळ नव्हता आणि तिला गरज पण नाही वाटली. 
सगळे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले , जुन्या पद्धतीचा लाकडी बांधकामाचा वाडा होता तो , तिथेही तिला त्या व्यक्तीचा  अगदी सहज वावर जाणवत होता. सगळ्यांशी बोलत , तिथली व्यवस्था सांगत,  नकळत त्याचे लक्ष आपल्याकडे जाते आहे हे तिने हेरले होते. अगदी आपलेपणाने तो सगळ्यांची चौकशी करत होता , मदत करत होता.
"पूजा , हा बघ माझा मंदार दादा." गौरी ने ओळख करून देण्यासाठी हाक मारली.
वळून बघते तर हा तोच व्यक्ती जो डोळ्यांनी हसत तिच्याकडे पाहत होता.
" हॅलो , मी पूजा " इतकेच ती बोलली .
"  हॅलो मी मंदार , काही लागले तर नक्की सांगा , नाही म्हणजे तुम्हाला गावातील राहणीमान आणि वावराची सवय नसते म्हणून सांगतोय . " इतकेच पण लाघवी बोलून तो पुढे गेला.
 त्याच्या बोलण्यात गर्क झाल्यासारखे वाटून ती तशीच उभी होती तेवढ्यात "अग पूजा ,चल तुला आपली रूम दाखवते बघ कशी मस्त आहे " असे म्हणत गौरी ने बॅग उचलली आणि पूजा तिच्या पाठोपाठ मूर्तीवत चालत होती पण डोळ्यासमोरून तो हसरा चेहरा जात नव्हता.
" गौरी हा तुझा कोणता नवीन दादा ? मला कसे नाही माहीत?" पूजा आपल्याच नादात विचारात होती. 
"अग , बाबांच्या मित्राचा मुलगा आहे मंदार आणि आपल्या दादाच्या बरोबरीचा. दोघे एकदम घट्ट मित्र बरं का!  मी पण बरेच महिन्यांनी भेटले आज त्याला. " गौरी म्हणाली.
थोडी फ्रेश होऊन , कपडे बदलून ती खाली आली तर, घरच्या जेवणाचा छानसा बेत होता सोबत तिचा आवडीचा कर्ड राईस . हलके फुलके जेवण झाले . जवळपास सगळ्या वयोगटातील लोकांचे ग्रुप तयार झाले होते त्याप्रमाणे गप्पा सुरु होत्या. मंदार आपल्याच नादात जवाबदारी पेलत काय हवे नको ते सगळे बघत होता , दुरून कोणीतरी आपल्याकडे बघतय याचे त्याला भान नव्हते. आणि कोणीतरी त्याच्याकडे नकळत वारंवार बघताय हे गौरी च्या मात्र लक्षात येत होते.
" छान आहे ना गाव आमचे " गौरी तिची तंद्री भंग करत म्हणाली "अं...हो ना" म्हणत पूजा ओशाळाली , तशी गौरी मोठ्याने हसत चोरी पकडतेय असे दर्शवत होती.
"मुलींनो, उद्या सकाळी लवकर उठून आवरून यायचे आहे खाली, त्यामुळे वर जा आता  आणि लवकर झोपा - लवकर उठा " काकू म्हणाल्या तश्या दोघी उठल्या आणि आपल्या खोलीत गेल्या. गौरी  ने पहाटे 5.30 चा गजर लावला आणि पटकन झोपली  पण पूजा ला आज झोप येत नव्हती.  का हे पण कळत नव्हते. काय होतंय नक्की याचा विचार करत तिला कधीतरी झोप लागली मात्र कसलासा आवाज झाल्याने सकाळी लवकर जाग
 आली . रूम मधून बाहेर गॅलरीत येऊन बघते तर खाली गडबड सुरू होती . गरम पाण्यासाठी मोठमोठे बम्ब लावले होते , कोणी त्यातून पाणी नेत होते तर कोणी ते पुन्हा भरत होते . तिला हे सगळं नविन होते ,कधीतरी आजीने सांगितले आणि चित्रात पाहिले होते म्हणून याला बम्ब म्हणतात इतके माहीत होते.
तशीच उभी राहून ती सगळी गडबड बघत होती , तेवढ्यात कोणीतरी बुलेट गाडी घेऊन त्यावर बरेच सामान आणताना तिने पाहिले. गाडी गॅलरी खाली थांबली तेव्हा दिसले तर तो दुसरा कोणी नाही मंदारच होता.त्याचे लक्ष वर गेले तशी ती थोडी मागे झाली आणि हलकेच खाली डोकावून पाहिले तर तो मिश्किल हसत होता. आता थोडे उजेडायला लागले होते.  स्वच्छ ताजी  हवा , हलकेच दिसणारे सूर्यकिरण पाहून आज तिला काहीतरी वेगळीच अनुभूती होत होती. खूप प्रसन्न वाटत होते. दूरवर दिसणारी हिरवी गार शेतजमीन जणू आपण दुसऱ्या विश्वात आलोय असेच पूजा भासवत होती. 
" कधी उठलीस ग? आणि हे काय कसली गोड हसतेय? क्या बात है मॅडम?" गौरी म्हणाली. 
" नवीन अनुभव घेतेय , नवीन जग वाटतंय जे मी पहिल्यांदा बघतेय . किती स्वच्छ सुंदर वातावरण आहे ग , काही गोंगाट नाही गर्दी नाही . मस्त एकदम फ्रेश वाटत आहे ."
" आपल्याच नादात बोलते आहेस की माझ्याशी ?"
"अगं, तुझ्याशीच बोलत आहे"
 "मॅडम तुम्ही तर यायला तयार नव्हतात! ये तो सुरवात है, आगे आगे देखो क्या होता है.
 आता तुला कळेल मी का सारखी यायची इथे ते आणि मी गावाला जाते म्हणाले की तू वैतागायची. बर चल आवर पटकन . आपल्याला प्रोग्रॅम अटेंड करायचा आहे."
थोड्या वेळाने ट्रॅडिशनल गेट अप करून दोघीही खाली आल्या. पूजा ने छान गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता त्यावर साधा मोत्याचा सर आणि तसेच कानातले आणि अगदी हलकासा  मेकअप. 
 मस्त गरम कॉफी प्यायला मिळाली ,तोवर काय ते विधी सुरू झाले होते.
पूजा चे मन त्या विधी मध्ये लागतच नव्हते, नजर काहीतरी शोधत होती.
तिची चलबिचल गौरी मार्क करत होती. थोड्या वेळाने एक कार आली आणि त्यातून एक स्त्री, एक पुरुष, एक तिच्या वयाची मुलगी उतरली आणि ड्राइवर च्या तिथून मंदार बाहेर आला. 
पांढऱ्या शुभ्र कुडता पायजमा घातला होता , त्यात त्याचे गौरवर्ण खूप उठून दिसत होता.
त्याला बघताच जणू काही एक लहर आपल्यातून उठली अशी जाणीव पूजा ला झाली आणि ती शहारली. नकळत तिचा चेहरा खुलला आणि तिने हात दाखवून त्याला 'हाय' केले.
तोही तिला तसा रिप्लाय देत , हसत घरात गेला तशी ती खट्टू झाली . हलकेच तिला ढुशा देत कोपऱ्याने गौरी ने खुणावले आणि डोळा मारत काहीतरी चिडवले, पूजा एकदम लाजली. "काय मग पूजा, काय विचार आहे? ईतका वेळ मंदार चीच वाट बघत होतीस का?" गौरी तिला डीवचत होती.
" गप्प ग , काय तुझं !मी तर निरीक्षण करतेय इथलं सगळं." पूजा विषय बदलत म्हणाली.
थोड्या वेळाने मंदार बाहेर आला आणि बाईक घेऊन जायच्या बेतात होता "अरे ये मंदार दादा , कुठे निघालास?" गौरीने विचारले. 
" अग थोडं काम होत , जरा जाऊन येतोय बाजूच्या गावातून थोडं राहिलाय ते आणायचं आहे. का ग?"
" अरे एक कर ना ! ही पूजा बघ खूप बोर होतेय , जा हिला घेऊन . आपलं गाव दाखव फिरवून आण .नेशील का?"
हे ऐकून खुश झालेला चेहरा पूजाला बिलकूल लपवता नाही आला पण उगाच लटक्या रागाने ती गौरी ला म्हणाली" अगं काय हे ? मी ओळखत नाही त्याला आणि तू डायरेक्ट मला ने म्हणून सांगते आहेस. मला ऑकवर्ड वाटतंय."
" ते दिसतंय चेहऱ्यावर ,आणि ओळख करून घ्यायलाच पाठवते आहे." तिची चेष्टा करत गौरी म्हणाली.
इकडे  मंदार पण  मनात खुश होत लगेच तयार झाला. दोघे निघाले " किती वेळ लागेल आपल्याला यायला?" पूजा म्हणाली.बसताना थोडी अवघडत होती.
" 2 तास तरी लागतील तिथे जाऊन यायला आणि थोडा वेळ वस्तू घ्यायला. तू नीट तुला योग्य वाटेल तशी बस ."
आतापर्यंत मंदार ला ती गावातील असाच एक समजत होती पण त्याचे बोलणे, सांगणे ऐकून तिला तो सुशिक्षित वाटत होता.
" तुम्ही काय करता इथे गावात ? म्हणजे व्यवसाय?" पूजा म्हणाली.
" आधी तर तुम्ही पेक्षा मला तू म्हणलेले जास्ती योग्य वाटेल. गावात म्हणशील तर आमची 20 एकर जमीन आहे ,त्याची देखरेख आणि त्याच्या रिलेटेड नवीन व्यवसाय करण्याचा माझा मानस आहे."
" तुमचे म्हणजे तुझे शिक्षण इथेच झाले का?" कुतूहलाने पूजा बोलत होती.
" माझं शालेय शिक्षण इथे जवळ गावात झाले , पण नंतर मी कॉलेज शिक्षण बेळगाव मध्ये  झाले. मी MSC ऍग्री केले , त्यासोबत नवीन तंत्रज्ञान शिक्षणासाठी 2 वर्षे जर्मनी ला होतो पण मला नाही तिथे करमले म्हणून परत आलो. सुरवातीला म्हैसूर ला एक कंपनी मध्ये जॉब केला 1 वर्ष,  पण मन हे गावाकडे धावते . शेवटी ठरवले की जे करायचे ते इथेच राहून."
हे ऐकत तिला खूप आश्चर्य वाटत होते. तिला तो सामान्य शिक्षण घेऊन काहीतरी करत असेल असे वाटत होते पण त्याचे शिक्षण परदेशी सुद्धा झाले आणि तरी तो गावात याचे नवल वाटत होते.
एक ओढ तिला जाणवत होती , नकळत त्याच्या कडे आपण खेचले जात आहोत हे जाणवत होते. त्याचप्रमाणे काहीसं मंदार ला पण वाटत होते.त्याला तर ती बघता क्षणी आवडली होती.
"तुझ्याबद्द्ल काय?"
भानावर येत ती म्हणाली " मी पूजा सबनीस. माझं कॉम्प्युटर इंजिनीरिंग झाले आहे. मला नवीन तंत्रज्ञान यात खूप इंटरेस्ट आहे. मी गावातील जीवन पहिल्यांदा अनुभवते आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळे आहे हे सगळे."
इतके बोलणे होईस्तोवर, इकडेच तिकडचे बोलून ते परत आले. पण रास्ता संपूच नये आणि असेच बोलत असावे हे दोघेही मनात म्हणत होते. खरंतर भेट होऊन काही तास झाले होते पण ओढ जणू वर्षोनुवर्षे  ची होती .
"काय मग , कशी झाली खरेदी ?" तिला ढोपराने खुणावत ती मंदार ला म्हणाली. तो पण मिश्किल हसत " एकदम झकास" म्हणत तो आत गेला . गौरी च्या खोड्या दोघांनाही कळात होत्या.
जरी ते दोघे सगळ्यामध्ये होते तरी एकमेकांना शोधत होते अशीच त्यांची अवस्था होती , चोरून बघणे लक्षात आले की ओशाळणे सुरू होते आणि त्यावर गौरी वॉच ठेऊन होती.
दिवसाची सांगता झाली . गौरी आणि मंदार काहीतरी बोलत होते हे पूजा वरून गॅलरी मधून बघत होती आणि मध्येच वर बघून ते आपल्याबद्दल बोलत आहेत का असेच तिला वाटत होते.
" काय बोलत होतात ग माझ्याविषयी?"
" हो ग ,तू तर महाराणीच ना, की तुझ्याबद्दल च बोलू" तिला चिडवत गौरी म्हणाली.
पूजा नुसतीच हसली. 
"आवडला का ग तुला मंदार? खर सांगायचं तर खूप छान आहे तो. मनमिळाऊ , केयरिंग आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पक्का भारतीय. तो कधीच गाव , राज्य आणि देश सोडून जाणार नाही. नीट विचार कर. मला काय आनंदच होईल तुझ्यासाठी."
हे ऐकून चोरी पकडल्यासारखी पूजा लाजली 
"आवडणे आणि आयुष्य घालवणे यात फरक आहे ग. मला तो आवडला की फक्त ओढ वाटते ते कळू दे. मला त्याला जाणू दे आणि त्याला मला. गावात राहणे कसे ते मला समजू दे . तू आहेसच तर मला ते समजेल यासाठी मदत करु शकतेस ना?" पूजा ने अगदी स्पष्ट व्यक्त केले.
गौरी ने तिला घट्ट मिठी मारत " मी आहे तुझ्यासोबत ,उद्या बघाच काय करते ते म्हणाली."
रात्री बराच वेळ पूजा तशीच उभी होती , नक्की काय होतंय , योग्य की नाही याचा विचार करत. असे काही घडेल, आपण गावात येऊ , मंदार नावाचे कोणी भेटेल सगळं कसं अचानक ठरल्यासारखं घडत होतं. शेवटी जे होईल ते बघू आणि योग्य निर्णय घेऊ असा विश्वास ठेवून ती पण झोपायला गेली.
पुन्हा कालच्या सारखीच रमणीय सकाळ अनुभवत तिच्या दिवसाची सुरुवात झाली. सगळं आवरून दोघी 9 पर्यंत खाली आल्या. मंदार आलाच होता आणि कधी एकदा या खाली येतात याचीच जणू वाट बघत होता. 
" गुडमॉर्निंग" दोघींनाही म्हणत त्याने कॉफी चे मग दिले.तेवढ्यात गौरी आईशी बोलायला गेली " मग कसे वाटतंय आमचं गाव?" मंदार सूचक काही विचारत होता.
" गाव छान आहे , लोक कसे आहे ते कळतील " तिने पण तसाच रिप्लाय दिला आणि तो छान हसला.
" क्या खिचडी पक रही है?" म्हणत गौरी जॉईन झाली आणि दुपारच्या वेळेत काही कार्यक्रम नसताना, मंदार चे शेत बघायला जायचा प्लॅन नक्की झाला.
तिघेही कार ने त्यांच्या शेताकडे निघाले , शेतात अगदी मधोमध फार्म हाऊस असावा असे मंदार चे घर होते. अगदी सुस्थितीतले हे घर बाहेरून बघून सुद्धा लक्षात येत होतं. छानसे दुमजली, त्यात अत्यानुधिक सगळ्या सुविधा तरी पण बाहेरून काही जुन्या पद्धती जपल्या होत्या. विस्तृत अंगण, पोर्च, झोपाळा आणि नक्षीदार लाकडी इंटेरिअर होत. पूजा पार हरखून गेली होती त्यात त्याच्या घरच्यांचं अगदी त्याच्याच सारखे मनमोकळं वागणं , स्वागत करणे,  आपलंसं वागणं तिला आणखी भारावून टाकत होत आणि नकळत ती अजून मंदारच्या कडे ओढली जात होती.
" जा रे तुम्ही दोघे , दादा शेत दाखव न तिला तोपर्यत मी काकू शी गप्पा मारते" म्हणत गौरी ने त्यांना खुणावले आणि पिटाळले जेणेकरून ते एकमेकांशी बोलू शकतील अनि जाणू शकतील.
" चल पूजा " म्हणत मंदार तिला शेताकडे घेऊन गेला. तो तिला माहिती देत होता , तंत्रज्ञान सांगत होता जे सगळं तिला नवीन होते. त्याची सोबत हवीहवीशी वाटत होती आणि तो ही उत्साहाने सगळं बोलत होता. एकमेकांशी आवडी निवडी शेयर होत होत्या , गप्पा रंगत होत्या. आपण एकमेकांना आवडतो आहे हे दोघांनाही जाणवत होते.
असेच एकमेकांच्या सोबतीने भेटीगाठीने 4 दिवस कुठे गेले हे तिला कळले पण नाही. आणि आज लग्नाचा दिवस होता. गौरी आणि पूजा आज छान नटून थटून तयार झाल्या होत्या.
जिन्यावरून येणाऱ्या पूजा कडे मंदार बघतच राहीला. सी ब्लु रंगाची छान शी जॉर्जेट ची साडी नेसलेली , त्यावर छानशी मोकळ्या केसांची हेअर स्टाईल ,चकाकणारे खड्याचे नाजूक दागिने तिने घातले होते. समोर मंदार ला बघून ती पण लाजली आणि तितक्यात मंदार च्या समोर टाळी वाजली आणि तो भानावर आला. गौरी मोठ्याने हसत होती आणि आपण आज पूर्ण सापडलो या जाणिवेने मंदार एकदम केसात हात घालून , तिरके बघत तिथून मागे वळला. 
मंदार ला पण आकाशी रंगाच्या शेरवानी सारख्या ड्रेस मध्ये बघून पूजा पण हरखून गेली होती. लग्न समारंभ सुरू होता पण 2 दिवसात जायचे या विचाराने ती व्याकुळ होत होती. मध्येच मंदार मुद्दाम काही निमित्त काढून येत होता , बोलत होता आणि नजरानजर होत होती. 
" पूजा, मला वाटत की एकदा बोला तुम्ही. जर दोघांनाही  एकमेकांबद्दल सारखेच वाटत असेल तर हे नक्की कसे जमेल याचा विचार करा आणि मगच ठरवा. तो गाव सोडणार नाही आणि तू शहरात वाढलेली , मग नीट विचार कर ."
याच विचारात पूजा गर्क होती आणि थोड्याच वेळात" पूजा मला बोलायचे आहे तुझ्याशी ! आपण बाहेर जाऊ यात का?" मंदार तिला म्हणाला.
" मी थोडं कम्फर्टेबल होऊन येऊ का , मग जाऊ. अवघडल्यासारखं होतंय." पूजा.
त्याने हो म्हणताच ती लगेच रूम वर गेली ,जीन्स आणि छानसा टॉप घालून ती खाली आली. त्या ड्रेस मध्येही ती खूप आकर्षक दिसत होती.
गौरी शी बोलून दोघेही बाहेर पडले , गावाबाहेर असलेल्या नदीकाठी मंदार ने गाडी थांबवली . छानशी जागा बघून दोघेही तिथे बसले.
" पूजा ,मला वाटते, मला तू आवडायला लागली आहेस. पहिल्या नजरेतील प्रेम वगैरे म्हणतात ते असेल पण बघताक्षणी तुझ्याबद्दल काहीसं वेगळं फीलिंग आल. तुझी सोबत हवीहवीशी वाटते , खूप ओढ वाटेते तुझी. तुला माझ्याबद्दल काय वाटतं?"
" मंदार खर सांगायचं तर मलाही तुझ्याबद्दल खूप ओढ वाटते आहे. 2 दिवसांनी जायचं आणि तू भेटणार नाही या विचाराने  मन चलबिचल होतंय. मला तुझ्यासोबत राहावे असच वाटतंय. मला वाटतंय की मी सुदधा तुझ्या प्रेमात पडली आहे"  हे बोलताना पूजा चे गाल पूर्ण आरक्त झाले होते. तिची नजर नकळत खाली जमिनीवर गेली आणि लाजेने ती पार चूर चुर झाली. 
तिला असे बघून मंदार ला पण आभाळ ठेंगणे वाटत होते , हलकेच तिचा हात हातात घेत त्याने तिची मान हाताने वर केली. काही क्षण ती दोघे फक्त एकमेकांच्या नजरेत बघत होती आणि एकमेकांच्या मिठीत ते कधी सामावले हे त्यांना पण नाही कळले.
असाच काही वेळ गेला , " पूजा मी इथेच गावात नवीन तंत्रज्ञानाने काहीतरी करायचे आणि पुढे जायचे हाच माझा विचार आहे. तू इंजिनिअरिंग केले आहेस , तुझी पण स्वप्न असतील त्याबद्दल विचार केला आहेत का?"
" मंदार खूप कमी दिवसात आपण जवळ आलो आहोत , पण हे बंध जणू विधिलिखित आहेत. आपली भेट हे पण वरूनच लिहिलेले . मी नीट विचार केलाय , माझे शिक्षण याचा उपयोग आपण इथे आपल्यासाठी आणि इतर लोकांसाठी पण करू शकते. माझया आईवडिलांना आश्चर्य वाटेल पण माझी खात्री आहे की मी त्यांना नक्की समजावू शकेन. 
माझी पूर्ण तयारी आहे तुला कायम सोबत करण्याची आणि इथे राहण्याची."
थोडा वेळ आणखी काही बोलून ती दोघे परतीच्या मार्गी असतानाच गौरी चा फोन आला काय ते विचारायला.जुजबी बोलणे  झाले , तशी तिला कल्पना होतीच.
घरी पोचले तर " congratulations " म्हणत ओरडत गौरी धावत आली आणि तिने दोघांनाही मिठी मारली. एव्हाना ही बातमी तिने आई वडिलांना आणि मंदार च्या घरच्यांना सांगून दिली होती त्यामुळे त्यांचे स्वागतच तसे झाले.
आता मात्र 2 दिवसांनी जायचे पण परत लगेच आणि लवकर यायचे या विचारांनी पूजा आनंदित झाली होती आणि तसे तिने घरीही सांगितले.
निघायच्या दिवशी एकांतात " I Love You "  म्हणत दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारून एकमेकांचं निरोप घेतला.
घरा बाहेर मंदार, पूजा ला सोडायला आला तर, गौरी ने ऑलरेडी त्याची बॅग त्याच्या कार मध्ये ठेवली होती. ती बघून " अग हे काय करतेय गौरी" म्हणत तो आश्चर्य चकित होऊन बघत होता.  
तर गौरी " अरे दादा, असा कसा रे तू लगेच बाय करतोय. तू आमच्या सोबत येतो आहेस काही दिवस."
आनंदाचा धक्का बसलेली पूजा कृतार्थ नजरेने गौरी कडे बघत होती आणि गौरी हलकेच डोळा मारून " चल" म्हणत गाडीत बसली. 
त्यांच्या मागून मंदार आणि पूजा गाडीत आपल्या भावी जीवनाचे स्वप्न रंगवत आणि देवाचे आभार मानत मार्गस्थ झाले.
गाव न आवडणारी पूजा आज त्याच गावाला आपलं कर्मस्थान आणि आयुष्य मानून तिथेच कायमस्वरूपी राहण्यासाठीच पुन्हा परत येण्यासाठी निघाली होती.
आणि ती येणारच होती कारण तिच्या जीवनातील सगळ्यात सुंदर अशी 'रेशीमगाठ' या गावात 'मंदार रूपाने बांधली गेली होती!
©®अमित मेढेकर

Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!