रेशीमगाठ भाग ८

In this part swati and samr visits near temple then go for shopping .. and swati purchase something special for samar

रेशीमगाठ भाग ८

क्रमश : भाग ७

स्वाती पुढे विषय वाढवेल त्या आधी काहीतरी करून विषय बदलावा असा विचार करून .

समर " स्वाती अग मी विसरूनच गेलो ते टिकेट्स तुझ्याकडे आहेत कि माझ्याकडे ?"

स्वाती " माझ्याकडे नाहीत .. तू तुझ्या कडेच ठेवली होतीस ..हा तर मी म्हणत होते ..

समर उठून टिकेट्स शोधायचे नाटक करतो .. सध्या तरी ह्या विषयावर त्याला स्वाती ला बोलून द्यायचे नव्हते .

स्वाती " ऐक ना समर मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचंय "

समर " एस डार्लिंग .. लेट मी जस्ट फाईंड आऊट टिकेट्स .."

शेवटी स्वाती म्हणते ठीक आहे  आपण नंतर बोलू ..

समर सुटकेचा श्वास टाकतो .. हि पोरगी आता  नवीन काय रामायण  लावणार आहे काय माहित . आमच्या घरात महाभारत नाही झाले म्हणजे झाले . काय करु ? कसे समजावू ह्या पोरगी ला नको त्या ट्रॅक वर च का जाते काय माहित ?

आता मस्त उद्या फिरायला जायचंय ..त्याचे प्लांनिंग करावे एखादीने तर हीच आपला काहीतरीच .. म्हणे हि रूम छोटी आहे काय ? अजून किती मोठी पाहिजे ?आणि कशाला पाहिजे ? काय आता दोन बेड लावायला सांगते कि काय ?

समर आता थोडा वैतागला .. त्याला वाटू लागले कि मी समजून घेतोय तर  आता हे जरा जास्तच होतेय .

समरच दुसरं मन त्याला सांगत होते .. कि स्वाती मनातून वाईट तर नक्कीच नाहीये .. ती नक्कीच घर बदलायला सांगून माझं मन मोडणार नाही .. मग तिला काय बोलायचं असेल .

स्वाती शी डील करताना समर ची चांगलीच कसौटी लागत होती . तो दाखवत होता कि तो नॉर्मल आहे पण त्याच्या आत मध्ये पण एक  विचारांचे वादळ उठायचे .

शेवटी तो पण एक माणूस होता . आणि त्याच्या पण भावना होत्या . त्याची पण स्वप्न होती . आणि मुख्य म्हणजे एकदम साधं आणि सरळ आयुष्य जगणारा मुलगा होता तो . आयुष्याकडून फार मोठ्या अपेक्षा हि नव्हत्या .. एक सिम्पल आणि सुखी लाइफ जगायची हीच एक अपेक्षा होती . त्याच्या बाजूने विचार जर केला तर आज लग्नाला १५ दिवस झालेत त्याला बायको कडून काय अपेक्षा आहेत ह्याचा विचार खुद्द स्वातीने सुद्धा केलेला नाही . तरी बिचारा तिला समजून घेत असतो .. तिला हसवत असतो ..  आणि तिला जमेल तेवढी सुखात ठेवायला बघतो

थोड्याच वेळाने स्वाती परत रुम मध्ये येते .

स्वाती " समर ऐक ना , उद्या आपला एक नवीन प्रवास सुरु होणार आहे तर मला जरा देऊळात जायचे होते . तू नेशील का मला आज ?"

समर " हो चालेल इकडून पाचच मिनिटावर एक मस्त देऊळ आहे . आपण संध्याकाळी ५ वाजता निघू म्हणजे गर्दी नाही लागणार कारण तिकडे रोज संध्याकाळी खूप गर्दी असते"

स्वाती ने आता मनापासून समर ला आणि त्याच्याशी तिचं  झालेल्या लग्नाला स्वीकारायचे ठरवले होते . काल रात्रीच तिला तो तिच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे हे तिला कळले होते . तो नुसता ४ तास घरात नव्हता तर तिचा जीव तळमळला होता . ती त्याच्या प्रेमात पडलीय हे तिला हळू हळू उमगायला लागलय . आणि मुख्य म्हणजे ती  समर वर दया आली किंवा तो बिचारा मला सहन करतोय म्हणून नाही .. तर तिचे प्रेम त्याच्या वर जडलय  हे कळायच्या आत तिने त्याला हे सांगून पण टाकले होते . ती कालच रात्री "आय हेट यु " बोलली होती .

या आय  हेट  यु ची पण गम्मत आहे ..

"आय लव यु " आणि "आय हेट यु " हे खर तर परस्पर विरोधी शब्द आहेत . मराठी व्याकरणाचा नियम असा आहे कि दोनदा नाही म्हणजे होकार असतो

म्हणजे मी तुझ्या बरोबर येणार नाही असे नाही या वाक्याचा अर्थ मी येणार असा होतो .. गम्मत आहे ना तसेच जेव्हा तुमचे प्रेम तुमच्या स्वतःच्या जीवा पेक्षा जास्त महत्वाचे वाटते तेव्हा ते प्रेम तुम्हाला त्रासदायक असते . तरीपण तुम्ही तुमचे प्रेम आहे हे मान्य करता तेव्हा तुम्ही हरलेले असता पण प्रेमात जिंकलेले असता ... म्हणून इथे आय लव्ह यु पेक्षा आय हेट यु म्हणणे स्वातीला आपोआप आले

स्वाती ला प्रेमावर लग्नावर विश्वास नाही ये .. पण आता तिला हे जाणवलय कि समर वर आपलं प्रेम आहे आणि त्याच्या शिवाय एक क्षण जगणे आता तिला जमणार नाही याचा अर्थ ती तिच्याच विचारापुढे  एक प्रकारे हरलीय ... आणि ह्याचीही तिला जाणीव आहे त्यामुळेच तीच म्हणणे असे आहे कि शेवटी तू मला हरवलसच तुझ्या प्रेमात तू मला पाडलंसच ... त्यामुळे "आय लव यु " हे तिने सायलेंट मध्ये मनातं ठेवले आणि तू मला हरवल्याबद्दल " आय हेट यु '

म्हटले .

संध्याकाळी मस्त सिम्पल ड्रेस घालून स्वाती मंदिरात जायला तयार झाली . समर तिकडेच बेड वर झोपला होता

स्वाती " समर चल ना बाहेर जायचंय ना .. मंदिरात जायचंय ना .. मी तयार आहे "

समर पण उठतो आणि तिला सांगतो जरा चहा टाकशील का मला झोप येतेय

स्वाती " हॅलो "

समर " मला माहितेय मी तुझ्यावर कोणतीही ऑर्डर सोडत नाहीये .. " असे म्हणून तो उठतो .. बघतो तर स्वाती हातात चहा घेऊन तयार ..

समर " आयला .. रेडी पण .. थँक उ .. " आणि चहा पितो .. चहा खरा समरच खूप छान करतो ..स्वाती तो चहा बद्दल काहीतरी बोलले अशा आशेवर त्याच्याकडे पाहतेय .

स्वाती " कसा आहे चहा ?"

समर मनात म्हणतो फसलो आता ... चहा ची तारीफ करावी लागणार .. पण तो हि हुशार ..

समर " हा अजून गोड  चालला असता " असे म्हणून विषय संपवतो .

स्वाती " तुझा चहा खूप छान असतो कारण  आपोआप आह्ह असे निघते "

समर " थँक उ .."

स्वाती " मला कधी येईल तसा .. येईल येईल हळू हळू ..

समर पण पटापट आवरतो आणि हिला मंदिरात घेऊन जायला तयार होतो . मंदिर जवळच आहे त्यामुळे ते दोघे बाइक वर जायचे ठरवतात.

 दोघे मंदिरात जातात . स्वाती मनापासून  देवाला  नमस्कार करते आणि देवाला सांगते " हे देवा मी माझ्या नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. मला तुझा आशीर्वाद दे. आणि वेळोवेळी मला मार्गदर्शन कर ..सकाळी वडिलांशी आणि आता  बाप्पाशी बोलल्यावर तिला खूप छान प्रसन्न वाटत होते .

समर देवाला नमस्कार करतो आणि दोघे मंदिरातून बाहेर पडतात .

स्वाती " समर इकडे एखादे गिफ्ट शॉप आहे का रे ?"

समर हो म्हणतो  आणि तिला एका मॉल मध्ये घेऊन जातो स्वाती पण एकदम खुश होते . आणि तिला काही काही शॉपिंग करायचे असते ते करायला लागते . समर पण तिच्या बरोबरच असतो ..स्वाती समर ला मी वॉशरूम ला जाऊन येते तोपर्यंत तू कॉफी ऑर्डर कर असे सांगून वॉशरूम ला जाते .. तो पण ठीक आहे म्हणतो .आणि कॉफी शॉप मध्ये मोबाईल  बघत बसतो .

पाच मिनिटांनी स्वाती वॉश रूम ला जाऊन येते . दोघे कॉफी बरोबर खूप साऱ्या गप्पा मारतात.समर स्वाती च्या चेहऱ्याचे हावभाव पाहत पाहत कॉफी घेत असतो . स्वाती जेव्हा बोलते ना तेव्हा तिचे डोळे पण बोलतात .. कितीही नाही म्हटलं तरी  तिचे  सुंदर डोळे  सारखे सारखे लक्ष वेधून घेत होते . काहीतरी बोलताना स्वाती पटकन खूप हसायची .. तेव्हा तर खूपच छान नजरा असायचा .. आज समर तो नजरा मनसोक्त अनुभवत होता .

थोड्याच वेळात दोघे घरी आले .. आई बाबांना प्रसाद दिला .. मग सगळे मस्त गप्पा मारत जेवले .. असा आनंदात होते सर्वजण .

बाबा " उद्या रात्री तुमची फ्लाइट आहे ना .. झाली का तयारी ? सर्व पॅकिंग झाले का ?नीट जावे रे मुलांनो "

समर " हो बाबा .. नक्कीच "

बाबा "समर जेव्हा बाहेर फिरत असाल तेव्हा स्वातीचा  हात सोडू नकोस काय ? अरे बायको म्हणजे कधी लहान मुली सारखी , कधी मोठ्या बाई सारखी असते .. तिला आपण सांभाळायचे असते .. तिला प्रत्येक क्षणी फक्त आधार द्यायचा असतो . हे विसरू नकोस .. शेवटी तिच्या हक्काच्या आणि मायेच्या माणसांना मागे सोडून ती आपल्या साठी आलेली असते .

समर आपला सर्व ऐकून घेत असतो आणि आपली जवाबदारी समजून घेत होता .

गप्पा मारून झाल्यावर समर त्याच्या रूम मध्ये आला . स्वाती मघाशीच  आलेली होती ..आणि ती सोफ्यावर झोपली होती

समर रूम  आल्यावर त्याला बेड वर एक ग्रिटींग कार्ड आणि एक रेड रोझ ठेवलेले दिसले . समर ने ते कार्ड उघडले ..

त्यात  खूप छान मजकूर होता .

गरज आहे मला मैत्रीची

गरज आहे मला प्रेमाची

हवा  आहे  मला आसरा

घराचा नाही तुझ्या मनाचा

“जसे माझ्या आई ला बाबांनी साथ दिली ,जशी तुझ्या बाबांनी तुझ्या आई ला साथ दिली तशीच  जन्मोजन्मीची साथ ,सुखात दुःखात प्रेमाचा हात आयुष्यभरासाठी मला देशील का ?

🎭 Series Post

View all