रेशीमगाठ -भाग ३

In this part Samar and Swati becomes friends and decide to be friends forever. Samar understands swati needs time to accept this relationship

रेशीमगाठ -भाग ३

क्रमश:भाग २

स्वाती उठून घरी जायला निघाली . स्वाती ला कळत होते पण वळत नव्हते . तिच्या वागण्याने समर ला त्रास होतोय हे हि तिला चांगलेच जाणवलय . तसं नसतं तर तिने त्याच्या कडे मैत्री चा हात पुढे केला नसता . म्हणजे त्याच्या सारख्या चांगल्या माणसा शी  भांडणे तिला पण पटत नव्हते . त्याला जॉगिंग ला जायचंय म्हटल्यावर लगेच तयार झाली जॉगिंग ला जायला पण . ती नकळत थोडी थोडी बदलत होती .

पण हा तिच्यातला बदल समर च्या लक्षात आला नाहीये .

समर आता डिस्टर्ब होऊन उगाच च प्रॉब्लेम वाढवत होता . ती ज्या गोष्टीला घाबरते त्याच गोष्टीवर तो डिसकस क रू न तिला डिसिजन न घ्यायला मदत करत होता . तसेही तो चुकतोय असे नाही पण थोडा वेळ जाऊन दिला पाहिजे होता . तिला पण जॉगिंग मधली मज्जा अनुभवली पाहिजे होती .

सगळ्याच गोष्टी आपल्याला वाटतात तशा होत नाहीत हे दोघांनाही अजून कळले नाहीये .

स्वाती च्या मागे समर पण घरी जायला निघाला .

परती  च्या  रस्त्यात दोघे हि मौन पळून आले . दोघांची हि तोंडे पडली होती .

समर वैतागला . काय हे नवीन नवीन लग्न झालय त्याचा आनंद तर नाही पण हे नको ते मागे लागलय .

काही नाही समर ने ठरवले कि तो ह्या गोष्टी आता त्याच्या आई वडिलांशी डिसकस करून यातुन कायमचा मार्ग काढेल . असे त्यांना तरी किती दिवस खोटे खोटे दाखववणार कि आम्ही खुश आहोत .

समर आता या कन्क्लुजन आलाच होता . तेवढ्यात स्वाती त्याला म्हणाली

स्वाती "समर सॉरी .. या सगळ्यात तुला उगाच त्रास होतोय . मला थोडा वेळ देशील का ?मी मनातून खूप कॉन्फयुज आहे . मला काय हवय आणि काय नकोय हे मला लग्न आधी सर्व क्लिअर होते पण आता लग्न झाल्यावर मला काय हवंय किंवा मी नक्की काय करू हेच मला कळत नाहीये . मला लग्न तर कधीच करायचे नव्हते . मला माझं आयुष्य  कोणा  बरोबर शेअर करायचे नव्हते पण तरीही मला फोर्सफुल्ली पप्पांनी लग्न करायला लावले त्या शॉक मधून मी अजून बाहेर आलेले नाही आणि आता तू मला फोर्सफुल्ली लग्न  अकॅसेप्ट करायला लावतोस . माझी खूप चीड चीड होतेय . मी माझ्या मनाच्या विरुद्ध काय काय करू .?

आणि स्वाती रडू लागली .आणि म्हणू लागली "समर सॉरी "

समर " समर ने शांत पणे  सगळं ऐकून घेतले . आणि  एखाद्या लहान मुलीला समजावे तसेच तिला समजावू लागला .

" इतकेच ना . मग रडायचे काय त्यात ? तेच तर मी तुला विचारत होतो कि नक्की तुझं काय म्हणणं आहे ते तरी मला कळू दे त्यासाठीच मी हा विषय काढला .

समर तिला हसवण्यासाठी

" थँक गॉड ... मला वाटले आता तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे कि काय ? मग काय माझी लाईफ म्हणजे " हम दिल दे चुके सनम - पार्ट २" सारखी झाली असती .

स्वाती " काय रे ... तुझं आपलं काही तरीच . " आणि हसायला लागते .

समर " हसतेस ना तेव्हा जास्त छान दिसतेस " कीप स्माईलिंग "

समर " मग काय आता फ्रेंड्स बनायचे का ?"माझ्या साठी जरा कठीण आहे पण मी तरी करेन .बघतो आता काही पुस्तक मिळते का " बायकोला मैत्रीण कशी बनवायची ?तुझ्याकडे आहे का ?

स्वाती ऐकत ऐकत हसत हसत घरी जातात .

घरी मस्त आई ने चहा नाश्ता तयार ठेवलेला . दोघे मस्त अंघोळ करून नाश्त्यावर ताव मारतात .

स्वाती आज वेगळीच फ्री झाली होती . तिला समर शी मोकळे पणाने मी बोलल्यावर तिचे टेन्शन गेले होते. आणि तिला एक नवीन मित्र पण मिळाला होता .

समर ला स्वातीचे काही ब्रेक अप वगैरे नाहीये हे ऐकून खूप रिलॅक्स झाला होता  . त्याला कळून चुकले होते कि फक्त  तिच्या डोक्यात लग्ना  बद्दल काही वेगळ्याच कल्पना आहेत .

थोड्या वेळाने स्वाती पॅकिंग करायला सुरुवात करते .८ दिवसांची ट्रिप . आठ दिवसांसाठी वेगवेगळे कपडे, मेक अप किट , फर्स्ट एड बॉक्स ,जॅकेट्स  स्वेटर्स , स्लीपर्स सगळे घेतले. समर एकदा बाहेर जाऊन आला होता पण स्वाती ची हि पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप होती .त्यामुळे विचार करून करून तिने सर्व पॅकिंग केले

समर आणि स्वाती ने एक महिन्याची रजा टाकली होती. युरोप ट्रिप वरून आल्यावर दोघांच्या सुट्ट्या संपणार होत्या आणि मग एक रुटीन सेट होणार होते . समर ला हा सगळं मॅटर त्यांचे  ऑफिस सुरु होयच्या आधी सोडवायचा आहे म्हणजे निदान तो स्वतः हे स्वप्न बघत होता कि एक ना एक दिवस स्वाती त्याची होईलच .

समर तिकडेच  बेड वर झोपला होता .

स्वाती  पूर्ण पॅकिंग झाल्यावर “समर माझे पॅकिंग झाले रे "

समर " ओके बायको ...आय मिन ओके मैत्रीण . माझी आपण करतेस का ?

स्वाती " ए तुझं पॅकिंग तू कर "

समर " ऐक ना स्वाती . मला जरा फ्रेंडशिप मध्ये कसे वागायचे ते जरा डिटेल मध्ये सांग "

स्वाती "म्हणजे तुला काय माहित नाही का ? फ्रेंड्स कसे वागतात ."

समर " नाही म्हणजे माझी कोणी गर्ल फ्रेंड नव्हती ना कधी ? त्यामुळे मुलींशी कसे वागायचे हे मला माहित नाही. उगाच तुला त्रास नको ... "आणि लपून हसतो

स्वाती " अरे मैत्रीत विचार करून वागायचे नसते  जस्ट बी नॉर्मल "

समर " ओके  डार्लिंग ... म्हणजे .. डार्लिंग फ्रेंड असतेच ना तर तुला "डार्लिंग "म्हटले तर चालेल ना .

स्वाती " ओह गॉड !

समर " म्हणजे आता आपलं ठरलं आपण मित्र आहोत . म्हणजे मी तुझ्या बरोबर कसाही वागू शकतो ... म्हणजे एकदम फ्री ... का काही रिस्टिकशन आहेत . ते कळलं म्हणजे झालं "

स्वाती " तुला जाम मज्जा वाटते ना माझी ? बहुदा हि मुलगी किती वेडी आहे असेच वाटतं असेल तुला ?

समर " नाही यार .. मी असाच आहे मला वाक्या  गणिक जोक मारायची सवय आहे . सॉरी इफ यु गॉट हर्ट . नथिंग  पर्सनल "

स्वाती "ठीक आहे .जस्ट बी नॉर्मल ... यु आर टू गुड  "

समर " ओके राणी साहेब " शिट  आय  मिन ओके स्वाती .

स्वाती " यु आर इम्पॉसिबल " आणि दोघेही हसायला लागतात

समर " स्वाती यु जस्ट रिलॅक्स . मित्र किंवा नवरा यात गुरफटू  नको . लाईफ जसे चाललीय तशी चालू दे . तू माझ्याशी वागताना कशीही वागू शकतेस . फक्त माझ्या घरच्यांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे . आणि एक आपल नातं जे काही असेल ते असेल पण खोटारडे पण नको . निदान आपण दोघे एकमेकांशी प्रामाणिक असलो पाहिजे . सध्या तरी माझी एवढीच एक रिकवेस्ट आहे तुला . "

स्वाती " थँक्स समर . मी तुला प्रॉमिस करते . तुझे आई वडील हे माझे आई वडील आहेत यात कधीच बदल होणार नाही . आणि मी जे तुला आज सकाळी सांगितले यातील कोणताही शब्द खोटा नाहीये . माझा कधीहि  बॉयफ्रेंड नव्हता . हा पण फ्रेंड्स खूप आहेत . त्यांना मी तुला भेटवीनच "

समर  ह्या   नात्याचा गुंता कसा होणार नाही या कडे लक्ष देत होता . स्वाती ला थोडा वेळ  द्यायला लागणार आहे हे त्याच्या लक्षात आले आणि अशावेळी पेशन्स ठेवावे लागणार आहेत हे हि त्याच्या लक्षात आले .

तेवढ्यात स्वातीला तिच्या आई चा मोबाईल वर फोन आला

स्वाती " हॅलो आई , कशी आहेस ? पप्पा कसे आहेत ? माझी आठवण येते का ?

स्वातीची आई " तू कशी आहेस बाळा ? रमलीस का सासरी ?अजिबात फोन केला नाहीस आम्हाला ?"

स्वाती " हो इकडे छान रुटीन तयार होतंय ना त्यामुळे वेळच नाही मिळाला ?

स्वातीची आई " तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता . म्हणाल्या पोर गुणांची आहे हो तुमची . हसून खेळून असते "

स्वाती " हो का ... अग त्या पण खूप छान आहेत "

स्वातीची आई " आणि जावई कसे आहेत आमचे ?"

स्वाती " हो तो पण खूप चांगला आहे . सारखा हसवतो मला "

स्वातीची आई " भांडू नको ग त्यांच्याशी . खूप चांगला मुलगा आहे तो "

स्वाती " मग काय मी चांगली नाही का ?

स्वाती ची आई " अग  तसे नाही ग . तू पण छानच आहेस . जोडास जोड आहात तुम्ही दोघे पण नवीन लग्न आहे ना म्हणून म्हटलं तू जरा गोष्टी सबुरीने घे. हट्टीपणा करू नकोस

स्वाती " हो आई .

स्वातीची आई " बाकी काय ... ओव्हर ऑल ठीक आहेस ना बाळा ?

स्वाती चे डोळे भरून येतात .. आणि अश्रूंचा आवंढा गिळून . 

स्वाती " हो आई , मी मजेत आहे ... तुम्ही पण घ्या काळजी .. ठेवते फोन आता ."

स्वातीची आई " थांब अग  पप्पांशी  बोल "

स्वाती " नको आई आता नको .. मी नंतर करेन त्यांना फोन "

स्वातीची आई " अग तुझं लग्न लावून दिले म्हणून एवढं रागवतात का कुणी आपल्या वडिलांवर "

स्वाती " नाही तसे नाही "

स्वातीची आई " तू जेव्हा एका बाळाची आई होशील ना तेव्हा तुला आमच्या भावना कळतील . आम्ही काही दुश्मन नाही ?ठीक आहे तुझा राग गेला कि बोल पप्पांशी , मी आता ठेवते फोन .

एकुलत्या एक स्वाती ला तिच्या वडिलांनी  एकदम मुक्तपणे वाढवली होती . तिला स्वतःच्या पायावर उभी केली होती . तिला स्वतंत्र विचार दिले होते आणि अचानक तिला लग्न करण्यासाठी रूढी परंपरा अशा गोष्टी सांगू लागले . स्वातीला हा एक मोठा शॉक होता . कालपर्यंत पप्पा वेगळ्या विचाराचे होते आणि आज अचानक वेगळे वागतात असेच तिला वाटले .

आयुष्य जगण्यासाठी एका मुलीच्या आयुष्यात लग्न हा टप्पा  किती महत्वाचा आहे हे तिला समजेच ना . मी माझ्या पायावर उभी आहे . मला कोणाच्या आधाराची गरज नाहीये आणि मला माझ्या आई वडीलां बरोबर राहण्याचा पूर्ण हक्क आहे . हे असे काहीसे विचार तिच्या डोक्यात बसले होते . त्यामुळेच तर तिला लग्न करायचे नव्हते.

🎭 Series Post

View all