May 15, 2021
प्रेम

 रेशीमगाठ भाग ६

Read Later
 रेशीमगाठ भाग ६

                                         रेशीमगाठ भाग ६

क्रमश: भाग ५

स्वातीने ने मोबाइल हातात घेतला आणि ती समर ला मेसेज टाकायाला सुरुवात केली. टाईप  करून झाल्यावर सेंड करताना तिच्या मनाने  तिला हटकले . आणि लक्ख प्रकाश पडल्या सारखा झाले . तिला वाटले मी काय त्रास करून घेतेय ? मला लग्नच करायचे नव्हते , मला या बंधनातच अडकायचे नव्हते आणि मला जे हवय ते सर्व समर ने आता मान्य केलय तर मी उगाच माझा ट्रॅक का बदलतेय .

 

स्वाती च्या मनात द्वंद युद्ध चालू झाले . दोन दिवसांनी ती युरोप ला जाणार होती . आणि ती हनिमून ट्रिप होती . जर तिला समर मध्ये काडीचा इंटरेस्ट नाहीये तर ती त्याच्या बरोबर युरोप ला जायला का तयार झाली ? तिचा समर वर एवढा विश्वास का आहे ? आज सकाळी समर तिला सोडून एकटाच जॉगिंग ला गेला तेव्हा पासून च ती जरा मनातून  अस्वस्थ होती .

 

म्हणजे जर मी लग्न accept केले नाही तर ती नक्की कोणता आनंद मिस करणार आहे हे तिला हळूहळू जाणवायला लागले होते .

 

तेवढ्यात रूम चे दार वाजले आणि रूममध्ये हळूच समर आला . स्वाती सोफ्यावर पडून विचार करत बसली होती. त्यामुले तिला डिस्टर्ब होऊ नये ती कदाचित झोपली असेल म्हणून समर सगळी काळजी घेत होता .

 

तेवढ्यात स्वातीने लाईट्स लावले .

 

समर " अरे तू अजून झोपली नाहीस ?

 

स्वाती " हो ना अरे झोपच येत नाहीये "

 

समर मागे वळून तिच्याकडे बघतो . ती अजूनही साडी नेसून त्याच्यासाठी  थांबली होती . समर तिला पाहून न पहिल्या सारखा करून तोंड फिरवतो .

 

समर " काय मॅडम .. मग आज चा दिवस कसा गेला ?"बाय द वे .. थँक्स यार आई ची ईच्छा तू पूर्ण केलीस  आय नो तुला हे सर्व आवडत नाही तरीही तू हे सर्व केलेस "

 

स्वाती ला वाटले मला बघितल्यावर समर काहीतरी कॉप्लिमेंट देईल .. ते राहिले बाजूला आणि समर वेगळाच विषय काढत होता .

 

स्वाती " तसे नाही रे .. मला पण मज्जा आली ... आणि हो थँक्स फॉर थे इअर  रिंग्स..खूपच छान आहेत .. थँक्स फॉर द हेल्प ."

 

समर जसा बेड वर आडवा पडला तशी स्वाती पण वॉशरूम मध्ये गेली आणि तिचा सगळा  साज श्रुंगार काढायला सुरुवात केली . आणि आरशात बघून तिला रडायला यायला लागले .

 

बाथरूम च्या आत रडत असल्याने समर ला पण काही कल्पना नव्हती कि ती आज कोणत्या विचारांमध्ये आहे .

 

स्वाती ला आता या क्षणी तिच्या बाबांची आठवण येत होती .. तिला आता बाबांना फोन करावा असे वाटू लागले . पण रात्रीचे १२ वाजले होते बाबांना त्रास नको म्हणून तिने कंट्रोल केले .

पण हे अश्रू का ? कोणा  साठी हे अश्रू येत आहेत . नक्की मनाला काय हवय ? काय पाहिजे ? तिला आज आई बाबांची पण खूप  आठवण येत होती . तिला खर तर आता इथे परकं वाटू लागलं . सगले चांगले आहेत पण इथे माझं कोणच नाहीये . तर मी इथे काय करतेय ? माझी इथे गरज आहे का ? माझी इथे गरज कोणालाच नाहीये ? माझी खरी मदत माझ्या आई वडिलनांना आहे ? मी उगाचच लग्न केले . आता इथे अडकून पडले .

मनात खूपच निगेटिव्ह विचार येऊ लागले कारण काय होत .? तर कारण होत अपेक्षा भंग .. तिची एक अपेक्षा होती कि समर ने तिला कॉम्प्लिमेंट द्यावी.

आज अचानक त्याची कॉम्प्लिमेंट एवढी महत्वाची का झाली होती ?

 

बराच वेळ झाला तरी स्वाती बाहेर आली नाही समर ने दार वाजवले आणि म्हणाला " हॅलो मॅडम आर यु ऑल राईट ?"

 

स्वाती रडत नाहीये असे दाखवून " हो .. मी आलेच बाहेर "

 

समर ला तिच्या आवाजातला फरक जाणवला .. पण तो हि  थांबला .

 

समर च्या मनात नक्की काय चाललेय .

 

समर ला आता कळून चुकले कि स्वाती ला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाहीये .. आणि तिला जबरदस्तीने संसार करवून घेण्यात हि त्याला काही इंटरेस्ट वाटत नव्हता . आणि तो तुटक वागत होता कारण त्याला भीती वाटत होती मैत्री मैत्री करता करता तो तिच्या गुंतू लागला तर नंतर प्रॉब्लेम होईल . त्यापेक्षा एक खोलीत अनोळखी असल्या सारखे च वागावे.

कसे आहे ना दोन माणसांना एकत्र ठेवले ना कि त्यांच्यात  नक्कीच काहीतरी नातं निर्माण होताच . मग ते मैत्रीचे , रागाचे  द्वेषाचे किंवा प्रेमाचे ... पण नातं तर नक्कीच तयार होते त्याला आपण बॉण्डिंग म्हणतो . दोघांच्या लग्नाला आता १५ दिवस झाले होते . आणि दोघांनी एकमेकां विषयी खूप माहिती मिळवली होती . कारण ते रूम शेअर करत होते . शिवाय सुरुवातीला समर एकदम नॉर्मल वागत होता .. आज तो नॉर्मल वागत नव्हता . स्वातीला त्याच्या नॉर्मल वागण्याची सवय झाली होती आणि आता तो नॉर्मल वागत नाहीये त्याचाच स्वातीला ला त्रास होतोय

तेवढयात स्वाती बाथरूमच्या बाहेर आली .तिचे डोळे रडून लाल झाले होते.

 

समर :" स्वाती काही प्रॉब्लेम आहे का ? तुझे डोळे  का लाल झालेत ?

 

स्वाती च्या मनात येत होते तुला काय करायचंय ? माझं मी बघून घेईन असे उत्तर त्याला द्यावे . पण ती म्हणाली" नाही काहीच नाही .. मला झोप आलीय  ना म्हणून असेल  .

 

समर " ओके .. मग झोप आता .

स्वातीने अंगावर घेतले आणि झोपून गेली असे समर ला वाटले पण आज तिची मनस्थिती काही ठीक नव्हती . ती चादरीच्या आत रडत होती . तिच्या रडण्याचा आवाज समर ला येऊ नये म्हणून प्रयत्न करत होती . जनरली स्वाती सारख्या मुलींना आपण रडतोय हे कोणाला दिसू नये असेच वाटत असते . कारण त्यांनी त्यांच्या मनाला  समजावलेलं असते कि मला कोणाची गरज नाहि .. पण शेवटी स्त्री हि स्त्रीच असते मनाच्या आतल्या कोपऱ्यात एक हळवा कोपरा असतोच . त्या कोपऱ्यात सहसा त्या कोणाला पोहचू देत नाहीत . किंवा तो कोपरा आहे ह्याची जाणीव त्यांना पण नसते . जसे  कस्तुरी च्या शोधात मृग सगळीकडे  सैरावैरा धावत असते पण त्याला हे कुठे माहित आहे कि हि कस्तुरी त्याच्याच बेंबीत आहे . त्या बेंबी पर्यंत तो पोंहचतच नाही म्हणून तर कस्तुरी मृग म्हणतात . स्वाती च्या आत असलेली कस्तुरी चा वास तिला येतोय पण तिला हि ती सापडत नाहीये . आणि म्हणूनच हि बेचैनी आलीय

 

समर ने शेवटी लाईट लावला .. आणि स्वाती ला आवाज देऊ लागला .. त्याचे मन त्याला इंट्युशन देत होते कि आज आत्ता या क्षणी स्वाती ला त्याची गरज आहे .. आणि समर सोफ्या पर्यंत गेला आणि चक्क तिला हात लावून उठवू लागला ..

 

स्वातीने अंगावरची चादर काढली .. समर ने विचारले .. "तू का रडतेस ? माझं काही चुकलं का ? आय एम सॉरी इफ आय हर्ट यु  , प्लिज डोन्ट क्राय "

स्वाती झोपलेली ती उठली आणि समर च्या गळ्यात पडून रडायला लागली . तिच्या या ऍक्शन ने समर पुरता गोधळून गेला . त्याने त्याचे हात मागे केले .

 

स्वाती काहीच न बोलता नुसती आभाळ कोसळल्या सारखी रडत होती .

 

समर " अग काय झालय ?मला सांगशील का नीट ?"

 

स्वाती " सॉरी समर मी खूप चुकिची वागले तुझ्याशी . तुझ्या भावनांचा विचार न करता वागले . आज मला माझ्या बाबांची आठवण येतेय .. मला आईकडे जायचंय"

 

समर " ठीक आहे मग त्यात रडतेस कशाला ? उद्या सकाळी जा .. तुला कोण अडवणार नाही ?"

 

स्वाती " आणि मी  परत  आले नाही तर तुला चालेल का ?

 

समर "माझ्या चलण्याचा प्रश्नच नाहीये .. इथे आपण तुझा विचार करतोय "

 

आता स्वातीच्या लक्षात आले कि आपण समर च्या गळ्यात पडून रडतोय ... आणि ती एकदम सावरल्यासारखी वागायला लागते .

स्वाती आता एकदमच अनकंम्फरटेबल होतेय हे बघितल्यावर समर

समर " इट्स ओके .. फ्रेंडस मध्ये इतके चालते . आम्ही मित्र मित्र तर पाप्या पण घेतो एकमेकांच्या .. तू तरी खूप सोज्वळ आहेस . "

 

स्वाती डोळे पुसते आणि हसायला लागते .

 

समर " बघ मी म्हटले ना तुला .. तू हसताना खूप छान दिसतेस .. मग रडतेस कशाला .. ?

 

स्वाती " सॉरी फॉर माय बॅड बिहेविअर "

 

समर " बाकी आज साडीत एकदम भारी दिसत होतीस "

 

स्वाती " डिड यु नोटीस दयाट  ?"

 

समर " हो मग नक्कीच .. तू खूपच सुंदर दिसत होतीस इतकी सुंदर  वाटत होतीस कि मला  तुला उचलून घ्यावेसे  वाटत होतं .. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले .. म्हणून मी जरा उशिरा आलो .. म्हटले तू झोपली असशील .. तर तू जागी होतीस ..

तुला माहितेय आज मी माझ्या मित्र बरोबर गेलो होतो पण त्याच्या बरोबर नव्हतोच .. माझे मन तुझ्या अवती भवती फिरत होते . तुझा DP मी कितीदा पहिला असेल . तू समोर असताना तुला असे पाहू पण शकत नाही ना .. म्हणून तुझा dp पाहत बसलो होतो .

हे सगळे ऐकल्यावर स्वाती पुन्हा त्याच्या गळ्यात पडते आणि पुन्हा रडायला लागते

स्वाती" समर आज मी पण तुला खूप मिस केले .. मला वाटत होते कि तू आज पाहिजे होतास माझ्या बरोबर "

समर " शिव शिव .. मित्रा बद्दल असा विचार नसतो करायचा ..

स्वाती पुन्हा समर ला मिठी मारते आणित्याच्या कानात  म्हणते समर “आय हेट यु "