रेशम भाग ३ अंतिम

रेशमला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तितक्यात अमित आला , मीनल निघून गेली. त्याने रेशमला प्रश्न विचारला "करशील ना माझ्यासोबत लग्न?"रेशम म्हणाली " पण तुम्ही काही वेळापूर्वी तर..

रेशमला मीनलचा राग आला. ती म्हणाली "हे काय मीनल? कधीही कुठेही मस्करी करतेस तुला काही समजते का??
का ?कशासाठी अभिनंदन मीनल?


मीनल :"अशी काय करते ? तू आधी शांत हो. इतकी छान बातमी आणि मी अभिनंदन करणार नाही?

रेशम:"कसली चांगली बातमी?"

मीनल " अगं जीजूंनी लग्नासाठी होकार कळवला आहे. हीच ती आनंदाची बातमी.

रेशम:"काय सांगतेस?"

मीनल:"तुला माहित आहे का बाहेर काय झालं ते?
रेशम आश्चर्यचकीत झाली .रेशमला माहीतच नव्हते बाहेर काय झाले होते.

रेशम म्हणाली " सांग बरं पटकन काय झालं ते"

मीनल म्हणाली "रेशम काय भारी जिजू आहेत गं बाहेर आल्यावर लगेच ते म्हणाले मला लग्न करायचं तर रेशमशी करायचं आहे"

रेशम म्हणाली "खरंच हे सर्व खरं सांगते आहेस का ?

मीनल म्हणाली "तुझी शप्पथ मी खरं सांगते आहे. जे पण बोलते आहे ते खरं बोलते आहे. बाहेर आले आणि ते म्हणाले की मला लग्न करायचं तर रेशमशी करायचं. मला रेशम पसंत आहे."


रेशमला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तितक्यात अमित आला , मीनल निघून गेली. त्याने रेशमला प्रश्न विचारला
"करशील ना माझ्यासोबत लग्न?"

रेशम म्हणाली " पण तुम्ही काही वेळापूर्वी तर..


अमित:" हो मी काही वेळापूर्वी बाहेर गेलो होतो पण मी घरच्यांना सांगायला गेलो होतो की मला ही मुलगी पसंत आहे"

रेशम:" तुम्ही माझी जी अपेक्षा आहे ती मान्य केली नाही , तुम्ही तर स्पष्टपणे नाही म्हणाला त्यामुळे मला आता तुमच्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही ."

अमित जोरजोरात हसू लागला " रेशम ही तुझी अपेक्षा नाही तुझ्या आईची काळजी घेणे, आईची जबाबदारी घेणं ही तुझी अपेक्षा कशी असू शकते?


रेशमला अमितच्या बोलण्याचा काहीही अर्थ लागत नव्हता. ती त्याच्याकडे फक्त पहात होती. अनेक प्रश्न डोक्यात तिच्या घोंगावत होते. हा असा का बोलतो आहे? असा का हसतो आहे?
ही तर तुझी जबाबदारी आहे जसं मी माझ्या आई-वडिलांची कायमस्वरूपी जबाबदारी घेतली आहे अगदी तशीच तुलाही ती जबाबदारी घ्यायची आहे आणि मुळात लग्न झाल्यावर फक्त तुझ्या एकटीची जबाबदारी नसणार ती माझी देखील जबाबदारी असणार बरोबर ना? रेशमचे डोळे हे ऐकून पाणावले होते .अमित बोलू लागला रेशम आपल्यामध्ये एकदा मुलीचे लग्न झालं की तिला परकी मानली जाते.खरंतर मला ह्या सर्व गोष्टींची चिड आहे ज्या घरामध्ये तिचा जन्म झाला तिचं बालपण तिचं तारुण्य सर्व काही तिने अनुभवलं आणि लग्न झालं की एका क्षणात सर्व सपंत का? अजिबात नाही.


अमितचे इतके सुंदर विचार ऐकून रेशम सुखावली.ती निशब्द झाली होती.

अमित आता गंभीर होऊन बोलू लागला होता. "रेशम तुला असं वाटत असेल की मी हे सर्व का बोलतो आहे;पण काही आजूबाजूच्या घटना खोलवर आपल्यामध्ये रुजतात तेव्हाच असे विचार प्रकट होतात. जेव्हा एका स्त्रीचा नवरा तिच्या आयुष्यातून निघून जातो .काही कारणास्तव तिच्यासोबत नसतो तेव्हा त्या एकट्या स्त्रीला संपूर्ण घराची जबाबदारी घेणे हे किती कठीण होऊन जाते हे मी पाहिले आहे.

माझ्या आत्याचेही तसेच झाले, माझ्या मामा नंतर माझी आत्या एकटी पडली. दोन मुलांची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती तेव्हा माझ्या वडिलांनी तिला आधार दिला. भाऊ म्हणून माझ्या वडिलांनी सर्व कर्तव्य निभावली आणि माझ्या आईनेही माझ्या आत्या सोबत सलोख्याचे संबंध ठेवले गरज पडेल तेव्हा मदतीचा हात दिला.मी अशा घरात वाढलो आहे जिथे या सर्व गोष्टी मी लहानपणापासून पाहत आलो आहे. त्यामुळे जेव्हा तू मला म्हणाली "आईची जबाबदारी घ्यायची आहे" तेव्हा ती गोष्ट मला खरंच आवडली आणि का घेऊ नये आईची जबाबदारी? अपेक्षा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल तुझं कर्तव्य आहे ते आणि हे तू कर्तव्य निभावलंच पाहिजे आणि त्याला मी नक्कीच साथ देईल.

रेशमच्या डोळ्यातील आसवे सांगत होती की ती लग्नाला तयार आहे.

समाप्त.

जलद कथामालिका


कशी वाटली कथा,कंमेंटमध्ये नक्की सांगा ...धन्यवाद.
©®अश्विनी ओगले.
मला फॉलो करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all